Posts

Showing posts from November, 2022

Lions club of Bombay Willingdon Crescent यांचेमार्फत पालघर जिल्ह्यातील ग्रामीण व दुर्गम शाळांना संगणकीय साहित्याचे वाटप

Image
जिल्हा परिषद शाळा काटी व के जी पाटील विद्यालय, देवघर लायन्‍स क्‍लब ऑफ मुंबई वेलिंग्‍टन यांचे वतीने आज पालघर जिल्‍हयातील वाडा तालुक्‍यातील जिल्‍हा परिषद प्राथमिक शाळा, काटी हया दुर्गम भागातील शाळेस तसेच के. जी. पाटील माध्यमिक विदयालय, देवघर या बहुतांशी आदिवासी मुले शिकत असलेल्‍या दोन ग्रामीण शाळांना गुरुवार दिनांक १० नोव्हेंम्बर २०२२ रोजी संगणक, प्रिंटर साहित्‍य भेट देण्‍यात आले. यावेळी लायन्‍स क्‍लब मुंबईचे अध्‍यक्ष लायन सुमित अग्रवाल, लायन फतेबहादूर  ठाकुर, लायन अन्‍सुता डिसोझा हे उपस्थित होते. काटी शाळेमध्‍ये शिक्षक प्रविण बडे यांनी मान्‍यवरांचे स्वागत केले तसेच शाळेच्या वतीने लायन्स क्लबचे आभार व्यक्त केले. याप्रसंगी अंसुता डिसोझा यांनी विद्यार्थ्यांना सकारात्मक दृष्टिकोनाबाबत मार्गदर्शनदेखील केले. त्याचप्रमाणे देवघर शाळेमध्ये पार पडलेल्या छोटेखानी कार्यक्रमाप्रसंगी मुख्याध्यापक श्री एन के पाटील, श्री दीपक कोंब, शिक्षक श्री मदन राव व इतर शिक्षक वृंद तसेच शाळेतील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी मुलांनी स्वागत गीते देखील सादर केली. मुख्याध्यापक श्री पाट...