नवे मराठी सरन्यायाधीश
सरन्यायाधीश पदी न्यायमूर्ती बोबडे यांची नियुक्ती समस्त मराठी जनांसाठी अभिमानास्पद बाब आहे. तब्बल चार दशकांनंतर मराठी पताका न्यायव्यवस्थेच्या सर्वोच्च पदावर फडकणार असल्यामुळे महाराष्ट्र व मराठीचा तो सन्मानच म्हणावा लागेल. न्यायमूर्ती बोबडे आपल्या अनुभवसंपन्नतेच्या जोरावर पदाला योग्य न्याय देतील व त्याचा सन्मान वाढवतील याबाबत अजिबात शंका नाही. वर्षभरापूर्वी सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांच्या राजीनाम्याबाबत घडलेल्या नाट्यपूर्ण घडामोडीनंतर न्यायव्यवस्थेवर उपस्थित होत असलेले प्रश्न व त्यातून न्यायव्यवस्थेला अधिक बळकट व पारदर्शक करण्याचे मोठे आव्हान नव्या सरन्यायाधीशांसमोर असणार आहे. वैभव मोहन पाटील घणसोली, नवी मुंबई