Posts

Showing posts from June, 2024

वाचन संस्कृती जोपासायला हवी

Image
गेल्या ३१ मे २०२४ रोजी पश्चिम रेल्वेतून सेवानिवृत्त झालेले मोटरमन चंद्रशेखर सावंत यांनी आपल्या सेवनिवृत्तीला पुस्तके भेट देण्याचे आवाहन मित्रमंडळी, सहकारी तसेच आप्तस्वकीयांना केले होते. सेवानिवृत्तीला जमा होणारी पुस्तके शालेय विद्यार्थ्यांना भेट देण्याचा त्यांचा मानस होता. त्यानुसार जमा झालेली व काही खरेदी केलेली पुस्तके त्यांनी पालघर जिल्ह्यातील काटी या दुर्गम गावातील जिल्हा परिषद शाळेत ग्रंथालय निर्मितीसाठी काल कार्यालयात येऊन माझ्याकडे सुपूर्द केली. या वेळी त्यांच्यासोबत आमचे मित्र जॉयचे संस्थापक गणेश हिरवे सर हेदेखील उपस्थित होते. पश्चिम रेल्वेतील सेवेची ३२ वर्षे पूर्ण करून सावंत सेवानिवृत्त झाले. अंधेरी येथील रेल्वे ब्रिज दुर्घटनेदरम्यान त्यांच्या असामान्य कामगिरीसाठी त्यांना रेल्वेने तसेच अनेक शासकीय व स्वयंसेवी संस्थांनी गौरवले आहे. पश्चिम रेल्वेने त्यांचा आदर्श मोटरमन म्हणून गौरव करत रु ५ लक्षच पारितोषिक दिले त्यातील ३ लाख रुपये त्यांनी विविध सामाजिक उपक्रमांसाठी दिले. सेवानिवृत्तीच्या निमित्ताने त्यांनी वाचन संस्कृती जोपासण्याप्रति दाखवलेल्या स्तुत्य सद्भावनेसाठी त...

प्रवासातील फटफजिती

Image
काही वर्षांपूर्वी मी कामानिमित्त दररोज घणसोली ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस व्हाया ठाणे असा प्रवास करायचो. संध्याकाळी घणसोलीला परतताना ठाणे स्थानकातुन लोकलची संख्या जास्त असल्यामुळे व ठाण्यावरून जाताना जलद लोकल मिळत असल्याने ठाण्याहुन मुंबईकडचा प्रवास सोयीचा वाटायचा. सायंकाळी घरी येताना बऱ्याचदा कार्यालयीन कामाच्या व्यापामुळे थोडा उशिरच व्‍हायचा. त्या दिवशी देखील असाच उशीर झाला होता. सीएसटी ठाणे ही रात्रीची 8.18 ची धीमी लोकल पकडली. ठाण्यात सव्वानउच्या सुमाराला पोहोचलो. दोन नंबरवरून नऊ नंबरच्या प्लॅटफॉर्मवर आल्यावर 9.20 ची वाशी लोकल लागली होती. ऑफिसला जाताना माझ्यासोबत नेहमी बॅग असते ज्यात काही महत्वाची कागदपत्रे, ऑफिसचे ओळखपत्र व जेवणाचा डब्बा इत्यादी सामग्री ठेवलेली असते. लोकल रिकामी असल्यामुळे नेहमीप्रमाणे पुढच्या बाजूच्या वाशीकडील डब्यात येऊन विंडो सीटला बसलो. लोकल मध्ये बसल्यावर नेहमी मोबाईलमध्ये एखाद्या विषयावर काहीतरी टाईप करण्याचा उपद्व्याप मी करत असतो. मात्र त्या दिवशी थोडासा थकवा जाणवत असल्याने सोबतची बॅग, वर सामान ठेवण्याच्या रॅकवर ठेवून निवांत बसलो. ठाणे ऐरोली...

निकृष्ट खाद्यपदार्थ लोकांनीच टाळावेत

पाकिस्तानी वा बांग्लादेशी लोक अवैधरित्या वास्तव्य करत असल्याच्या घटना देशात नव्या नाहीत. महाराष्ट्रात व मुख्यत्वे मुंबईत ही संख्या अधिक असावी. परराष्ट्रीय धोरणे आपल्या देशात काहीशी शिथिल असल्यामुळे अशा लोकांच्या अनधिकृत राहण्यावर कुठलेही नियंत्रण राहिलेले नाही. थोडया आर्थिक स्वार्थापायी अशा लोकांना निवास व इतर सोयीसुविधा सहजरीत्या उपलब्ध करून दिल्या जातात. त्यामुळे अगदी आधार, पॅन, रेशन, मतदान कार्डदेखील बाळगून वर्षानुवर्षे एखाद्या भागात बिनदिक्कतपणे हे लोक मुक्काम ठोकत आहेत. मात्र दहशतवादी कृत्यांना समर्थन देणाऱ्या राष्ट्रातील हे लोक भारतीयांशी किती प्रामाणिक असतात याची अनेक गंभीर उदाहरणे आपण पाहिली आहेत. यामुळे अनेक अतिरेकी व गुन्हेगारी घटनांमध्ये ह्या लोकांचा हातभार लपून राहिलेला नाही. छोटीमोठी गुन्हेगारी कृत्ये करून हे लोक सामाजीक वातावरण दूषित करण्याचादेखील प्रयत्न वारंवार करताना दिसून येतात. अवैध वास्तव्य करणारे असे लोक शोधून त्यांच्यावर कारवाई करण्याचे मोठे आव्हान पोलीस आज यंत्रणांसमोर आहे. त्यामुळे जागरूक नागरिक व सामाजिक कार्यकर्ते - संस्थांनीच पुढाकार घेऊन अशा लोकांविरुद्ध आवा...