Posts

Showing posts from February, 2021

..अशाने आयुर्वेद दूषित होईल

Image
पतंजलीने निर्माण केलेल्‍या कथित कोरोना औषधाच्‍या अनावरणासाठी केंद्र शासनाच्‍या दोन मंत्र्यांनी उपस्थिती लावत या औषधाची स्‍तुतीदेखील केली. याला आक्षेप घेत देशातील प्रमुख वैदयक संघटना इंडियन मेडीकल असोसिऐशनने पतंजलीचा कोरोना औषधाचा दावा चुकीचा असल्‍याचे खडसावत मंत्रीमहोदयांनाच खुलासा करण्‍याचे आवाहन केले आहे. वास्‍ताविक आयुर्वेद हे एक शास्त्र असून त्याचा वापर व प्रसार पूर्वापार चालत आलेला आहे. मात्र काही व्यवसायधार्जिणे लोक याच आयुर्वेदाचा वापर स्‍वताच्‍या आर्थिक समृद्धीसाठी करताना दिसत आहेत. कोरोना आजाराने जगभरात मृत्यूतांडव माजवून लोकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण केलेले आहे. याच भीतीचा वापर स्वार्थासाठी करून घेण्याचे प्रयत्न अनेकांचे सुरू आहेत. तसाच प्रकार पतंजलीच्या उत्पादनाला राजमान्यता देऊन करण्याचा प्रयत्न झाला. मात्र भारतीय वैद्यक परिषदेच्या सतर्कतेने जनतेची ही भलामण वेळीच समोर आणली आहे. वैदयकशास्‍त्राच्‍या सर्व चाचण्‍यांवर खरे उतरुन पतंजलीच्‍या औषधाने बाजारात एन्‍ट्री केली असती तर त्‍याची सर्वत्र वाहवा व स्‍वागतच झाले असते. मात्र शास्‍त्रीय निकषात न बसणा-या या कथ...

अशी व्यक्ती संविधानिक पदावर नकोच

Image
विद्यमान वनमंत्र्यांवर होत असलेल्या आरोपांमुळे राज्याचे महत्वपूर्ण असे वनखाते चर्चेला आले आहे. विपुल वनसंपदा लाभलेल्‍या महाराष्‍ट्रासारख्‍या राज्‍याचा वनखात्‍याचा प्रमुख हा निसर्गसंपत्‍तीविषयी प्रेम असणारा हवा. त्‍याच भावनेतुन वने व त्‍यावर अवलंबुन प्राणीमात्रांच्‍या संवर्धनासाठी व्‍यापक प्रयत्‍न आपल्‍या कारकिर्दीत करणे वनमंत्र्यांकडून अपेक्षित आहे. मात्र तशा प्रकारचे प्रयत्‍न व ठोस कार्य सध्‍याच्‍या वनमंत्र्यांकडून गेल्‍या दीड वर्षांत दिसुन आलेले नाहीत. या अगोदरच्‍या सरकारमधील वनमंत्री सुधीर मुनगुंटीवार यांनी वित्‍तसारख्‍या महत्‍वाच्‍या खात्‍याचा कारभार सांभाळुन वनमंत्री पदाला आपल्‍या परीने रास्‍त न्‍याय दिला असेच म्‍हणावे लागेल. वनांच्‍या संवर्धनासाठी त्‍यांनी राबविलेल्‍या अनेक योजना विशेष लक्षात राहतात. यासाठी त्‍यांनी बदल्‍यांच्‍या खेळात न पडता योग्‍य प्रशासकीय समन्‍वय राखला. मात्र सध्‍याच्‍या वनंमंत्र्यांवर होत असलेले गंभीर आरोप व मंगळवारी त्‍यांच्‍या समर्थनार्थ कोविड प्रतिबंध नियमांचे उल्‍लंघन करुन जमवलेला जमाव राज्‍याच्‍या मंत्रीपदाला शोभनिय नाहीत. संविधा...

गंभीर गुन्हे करणारे मोकाट

Image
कायदे, नियम केवळ सर्वसामान्‍यांपुरतेच असतात का हा आपल्‍याला वारंवार पडणारा प्रश्‍न आहे. प्रतिष्‍ठीत, सुप्रसिध्‍द, कुप्रसिध्‍द लोक कायदयाची पायमल्‍ली करत असताना त्‍यांच्‍यावर अपवादानेच कारवाई होताना दिसते तीदेखील फार मिडीया ट्रोलनंतर. सर्वसामान्‍यांना ना वाहतूक नियमांतुन सुट मिळत ना टोलमधुन. मात्र कुख्‍यात गुंड गज्‍या मारणे जेलमधुन सुटल्‍यानंतर नवी मुंबईतून पुण्‍यापर्यंत शेकडो वाहनांसह वाहतुकीचे नियम तोडून, टोल न भरता काढलेली मिरवणूक कुणालाच कशी दिसली नाही की दिसत असुनही नसती कटकट नको म्‍हणून त्‍याकडे दुर्लक्ष केले गेले? हे कळायला मार्ग नाही. आतातर तळोजा कारागृहातून पुण्यापर्यंत मिरवत आलेला हा कुख्यात गुंड फरार झाल्‍याचे समजते. किरकोळ गुन्‍हे करणारे वर्षानुवर्षे तुरुंगात खितपत पडतात व कायदयातील पळवाटांचा आधार घेत गंभीर गुन्‍हे करुनदेखील अल्‍पकाळातच मोकळे फिरणारे अनेक दिसतात. यावरुन कायदयाची अंमलबजावणीदेखील सोईनुसार होते हे स्‍पष्‍ट आहे. कायदयाला हातातील बाहुले समजणा-या व त्‍याच्‍याशी खेळणा-यांना वेळीच वठणीवर आणणे गरजेचे आहे. तरच गुन्‍हेगारांची संख्‍या कमी होईल. वैभव मोहन पाट...

हे लोक रेल्वे परिसरात येतातच कसे

Image
लोकल रेल्वे स्थानके व डब्यांमध्ये पुन्हा एकदा भुरटे चोर, भिकारी, फेरीवाले व तृतीयपंथीयांचा वावर वाढत चालला आहे. हे लोक बिनदिक्कतपणे प्रवाशांच्या अंगाला हात लावून पैशांची मागणी करतात. त्यांना प्रतिबंध करणारी कोणतीही यंत्रणा रेल्वेकडे सध्या उपलब्ध नाही. त्यामुळे रेल्वे प्रशासन व त्यांच्यात कुठेतरी साटेलोटे असल्याचा संशयदेखील येतो.   हे भुरटे चोर व फेरीवाले कुणाच्या आशीर्वादाने बिनधास्तपणे रेल्वे परिसरात वावरत असतात याचा शोध घेण्याचा प्रयत्न कुणीच करत नाही. ठराविक लोक अशा प्रकारचे कृत्य करत असताना रेल्वे स्थानकांमध्ये दररोज प्रवेश करतातच कसे हा मोठा प्रश्न पडतो. रेल्वे स्थानकांमध्ये पोलीस व सीसीटीव्ही सारख्या यंत्रणा कार्यान्वित असतानादेखील मोठ्या हिंमतीने हे लोक स्थानकांमध्ये घुसतात व आपला कार्यभार साधण्याचा प्रयत्न करतात. रेल्वे डब्यांमध्ये लहान लहान मुलांकडून सर्रास भीक मागितली जाते. अशा मुलांना बालसुधागृहात भरती केले पाहिजे. सध्या रेल्वे मधील गर्दी वाढत आहे. या परिस्थितीचा फायदा घेऊन चोरीसारखे प्रकार करण्याचे धाडस होत असून रेल्वे स्थानकांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह...

करते कोण आणि भोगते कोण

Image
करते कोण आणि भोगते कोण या मुशाफिरीतून अत्यंत महत्वाच्या व संवेदनशील विषयाला हात घातला आहे. नवी मुंबई मनपाचे पशु वैद्यकीय अधिकारी डॉ वैभव झुंजारे व त्यांच्या आई, पत्नी व मुलीचे मुंबई पुणे एक्सप्रेस वे वर मागील आठवड्यात दुर्दैवी अपघाती निधन झाले. हृदय हेलावून टाकणारी अत्यन्त क्लेशदायक अशी ही घटना. या अपघातात एका कंटेनर चालकाच्या चुकीने निष्पाप जीवांना मुकावे लागले. खरेतर असे अपघात दररोज सर्वत्र घडत असतात. दर चार मिनिटाला एक अपघाती मृत्यू होत असेल तर अपघातांचा विषय हा कोरोनापेक्षा महाभयंकर आहे. वर्षाकाठी दीड लाख मृत्यू देशात केवळ अपघाताने होत असतील तर साथरोगनियंत्रणाबरोबरच अपघात टाळण्यासाठीदेखील भरीव नियोजन युद्धपातळीवर होणे गरजेचे आहे. देशात वाहतूक व रस्ते नियोजनासाठी मोठमोठी सरकारी खाती केंद्रात व राज्यात कार्यरत आहेत. या खात्यांच्या माध्यमातून रस्ते बांधणी व वाहतुकीच्या नियमनावर कोट्यवधींचा खर्च दरवर्षी केला जातो. मात्र अपघात थांबण्याचे वा कमी होण्याचे नाव घेत नाहीत. वास्तविक आज सर्वत्र चकाचक रस्ते व अत्याधुनिक तंत्रज्ञानाने युक्त वाहने रस्त्यांवर फिरतात मात्र म...

शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा

Image
हिंदवी स्वराज्य संस्थापक राजा शिवछत्रपती आज शिवछत्रपती जयंती. मराठी साम्राज्याची मुहूर्तमेढ रोवण्यासाठी ज्या दिवशी एका तेजस्वी सूर्याने जन्म घेतला तो दिवस. ज्या काळात मुघल सम्राज्यविरुद्ध मुखातून ब्र काढण्याची सोय नव्हती त्या काळात मराठी मुलखाची शान असणारा भगवा हातात घेऊन मुघलांच्या ताब्यातील गड, किल्ले व मुलुख परत मिळविण्यासाठी जीवाचे रान करणारा स्वाभिमानी राजा म्हणजे शिवछत्रपती. महाराष्ट्राचा इतिहास छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शौर्यगाथांनी समृद्ध झाला आहे. रयतेचा राजा, उत्तम संघटक आणि पराक्रमी योद्धा म्हणून त्यांनी आजवर फत्‍ते केलेल्‍या अनेक मोहिमा आज आपल्‍यासाठी प्रेरणादायी आहेत. १९ फेब्रुवारी १६३० रोजी शिवनेरी गडावर या तेजस्‍वी ता-याचा जन्‍म झाला व त्‍याने न भुतो असा इतिहास घडवला. मर्दमराठी मावळ्यांना मातृभूमी व स्वतःच्या ताबेदारीबाबत जाणीव करून देऊन त्यांना सोबत घेऊन मुघलांना सळो कि पळो करून सोडणारा आमचा शिवाजी. ज्याचे नाव मराठी माणसाच्या हृदयात व मनात कायमचे कोरले गेले आहे व ज्याच्या वंदनाशिवाय आज कोणत्याही क्रांतिकारी कामाची सुरुवात करता येत नाही तो तमा...

कोरोना लस : शंकाकुशंकांचे आव्हान

Image
बहुचर्चित कोविड लसीचे अगमन झाले आहे. हळूहळू सर्वांपर्यंत ही लस पोहोचणार आहे. त्‍यामुळे लवकर लस मिळायला हवी हा अटटाहास सध्‍यातरी कमी आहे. मात्र अजुनही लोकांच्‍या व फ्रंट लाईन वर्कर्सच्‍या मनामध्‍ये काही प्रमाणात या लसीबाबतचा संभ्रम कायम आहे. लसीकरणाचे प्रमाण  जगामधील इतर देशांच्‍या तुलनेत भारतात लक्षणीय असले तरी लसीबाबतच्‍या शंकाकुशंका कमी करण्‍याचे आव्‍हान अजुनही कायम आहे. कोणतीही लस म्‍हटली काही अंशी तीचे दुष्‍परिणाम हे जाणवत असतातच. १०० टक्‍के परिणामकारक व दुष्‍परीणामरहित लस कोणतीही नाही. आजवर देशभरात लक्षावधी लोकांना कोरोना प्रतिबंधासाठी कोविशिल्‍ड अथवा कोव्‍हॅक्‍सीन देण्‍यात आलेले आहे. मात्र त्‍या तुलनेत फार मोठे दुष्‍परिणाम या लसीचे जाणवुन आलेले नाहीत. सध्‍या केवळ सिरम व भारत बायोटेक या दोन कंपन्‍यांंच्‍या लसी सरकारमार्फत देण्‍यात येत आहेत. येत्‍या काही महिन्‍यांत अजुनही काही कंपन्‍यांच्‍या लसी बाजारात येणार आहेत. त्‍यानंंतर लसीची सुरक्षितता ढळु शकते. मात्र सध्‍या देण्‍यात येत असलेल्‍या लसीचे गंभीर दुष्‍परिणाम कुठेही दिसुन न आल्‍यामुळे ही लस पूर्णपणे सुरक्षित आहे अ...

हळदी कुंकू समारंभ थोडे वेगळे पणाने साजरे व्हावेत

Image
निवडणुकांच्या तोंडावर हळदी कुंकू समारंभांचा राजकीय लाभ उठवण्याचा प्रयत्न सर्वत्र केला जातोय. जवळपास सर्वच प्रभागांमध्ये राजकीय नेतेमंडळी अशा हळदी कुंकू समारंभांचे आयोजन करून शक्ती प्रदर्शन करत आहेत. प्रभागातील आपली ताकद आजमावण्यासाठी व वरिष्ठ नेत्यांना गर्दीद्वारे खुश करण्यासाठी अशा कार्यक्रमांची मोठ्या प्रमाणावर जाहिरात केली जाते, कुंकवाचे वाण म्हणून चांगल्या भेटवस्तू महिलांना वाटप केल्या जातात, मनोरंजनासाठी सांस्कृतिक व खेळांचे विविध कार्यक्रम या समारंभात आयोजित केले जातात. यामागील हेतू केवळ राजकीय इप्सित साध्य करण्याचा असतो. तसेही आजकालचे गणेशोत्सव, नवरात्री, दहीहंडी यासारखे सणदेखील राजकीय अजेंड्याविणा साजरे होत नाहीत. त्यामुळे हळदी कुंकवासारख्या महिलांच्या समारंभातदेखील राजकारण नसते घुसले तरच नवल. मात्र हळदी कुंकु समारंभांचा राजकीय वापर करत असताना त्यामध्ये विधवा, दुर्बल, अपंग महिला, शहीद स्वातंत्र्य सौनिकांच्या पत्नी, पीडित,  अनाथ मुली यांसह विविध क्षेत्रांत आपल्या कला कौशल्याने विशेष नैपुण्य मिळवणाऱ्या महिलांना गौरवले गेले तर असे हळदी कुंकू समारंभ विशेष लक्षात राह...

इंधन करामध्ये पारदर्शकता हवी

Image
इंधन दरवाढ थांबण्याचे नाव घेत नाहीय. पेट्रोल नव्वदीपार तर डिझेल ऐंशी रुपयांच्या घरात आहे. लवकरच ते शंभरी गाठणार असेच दिसते. मात्र देशात निरनिराळे मुद्दे काढून दरवाढीचे सूत्र सोयीस्कररित्या लपवले जात आहे अशी शंका घेण्यास वाव आहे. आंतराष्ट्रीय बाजारात तेलाची आधारभूत किंमत पन्नास रुपयांच्या आत असताना केंद्र सरकार, राज्य सरकार, विक्रेते यांचा मिळून भारतीय कर तितकाच होत असल्यामुळे साधारणतः इंधनाचे दर दुप्पट वेगाने देशात वाढले आहेत. केंद्र सरकार तीस टक्क्यांच्या वर कर लावते म्हणून राज्य सरकारांनीही हा कर 19 टक्यांपर्यंत नेला तर विक्रेत्यांनीही आपली कमाई यात दोन रुपयांवरून साडेतीन रुपये करून दुप्पटीने वाढवून घेतली. सातत्याने होत असलेली इंधन दरवाढ सर्वसामान्य लोकांचे कंबरडे मोडणारी आहे. सर्वसामान्य माणूस दररोज सरकारला भरत असलेल्या करामधील 15 ते 20 टक्के वाटा हा इंधनावरील कराचा आहे. मात्र राजकीय व माध्यमांच्या बळावर ही बाब सोयीस्कररित्या लपवली जात आहे. इंधनेतर कर वसूल करण्यात सरकारला येत असलेले अपयश झाकण्यासाठी सोपा व जवळचा मार्ग म्हणून इंधन दरवाढीचा पर्याय दरवेळी निवडला...

लोकभावना अशीही

Image
लोकभावना अशी आणि तशीही या मुशाफिरीत सुप्त, उग्र व शिस्तबद्ध लोकभावनांचा समग्र आढावा घेतलेला आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे वाचकांच्या पत्रांना देत असलेले महत्व व त्या पत्रांतील भावनांना कृतीद्वारे देत असलेला सन्मान सध्या दुर्मिळ होऊ पाहत आहे. याच कारणांमुळे दिवसेंदिवस नवपत्रलेखकांची संख्या रोडावत चालली आहे. वृत्तपत्रांतील पत्रांना न्यायच मिळत नसेल अशा रकान्यांचा उद्देश तरी काय याचा विचार वृत्तपत्रमालकांनी करण्याची गरज आहे. राहिला प्रश्न लोकभावनांचा, तर आज सर्वसामान्य लोकांच्या मनातील भावना व्यक्त करण्याचे काम वृत्तपत्रलेखकांशिवाय इतर कुठला घटक प्रभावी व पोटतिडकीने क्वचितच करत असेल. राजकीय आंदोलने, जनआंदोलन, शेतकरी आंदोलने यांचे स्थान केवळ नेत्यांना समृद्ध करणे इतकेच राहिल्याचे दिसून येत आहे. कृषी कायद्यांसाठी दोन तीन महिने आंदोलन करून शेतकऱ्यांच्या पदरात काही पडत नसेल, वीजबिल माफीच्या लोकभावनेला केराची टोपली दाखवली जात असेल, नवी मुंबई विमानतळाला स्थानिक व शेतकरी नेते स्व दि बा पाटलांचे नाव देण्याची स्थानिकांची मागणी दुर्लक्षित केली जात असेल, इंधन दरवाढीवि...

न पटणारा देवमाणूस

Image
भामटेगिरीत पटाईत असलेली एखादी व्यक्ती अख्ख्या गावाला हातोहात फसवते. परिणामी खुनही करून ते पचवण्याचे धाडस करते. ज्यांच्या लक्षात ही भामटेगिरी येते त्यांनाच संपवण्याचे पराक्रम दाखवणारी देवमाणूस ही झी मराठीवरील मालिका सध्या प्रचंड गाजत आहे. शॉर्टकट पैसा मिळवण्याच्या नादात चक्क बोगस डॉक्टर बनून वावरणारा तथाकथित डॉ अजित कुमार एका गावात आपले बस्तान बसवून तेथील लोकांना फसवण्याचे काम करतोय. देवमाणूस असल्याचा मुखवटा घेऊन जगणारा एक डॉक्टर लोकांच्या जीवाशी कसा खेळतो याची थरारक कथा या मालिकेत दाखवली आहे. सर्वच कलाकारांचा अभिनय दमदार आहे यात शंका नाही. चांगुलपणाच्या पडद्याआड घडणारा हा थरार आपल्याला टिव्हीजवळ नक्कीच खिळवून ठेवणारा असला तरी वास्तववादी नक्कीच नाही. दिवसाढवळ्या व रात्रीअपरात्री कुणालाही कळू न देता डॉक्टर लोकांचे खून करतो व त्यातून सहीसलामत निसटतो हे न पटणारे वास्तव आहे. त्याला मदत करणारी डिंपल (अस्मिता देशमुख) ही व्यक्तिरेखादेखील कल्पनेच्या पलीकडे डॉक्टरला साथ देते. सुरुवातीला डॉक्टरची भामटेगिरी अचूक ओळखणारे अभिनेत्री प्रतीक्षा जाधव हिने साकारलेले मंजुळाचे पात्र...

न्यायासाठी दाद मागणारे भरडू नयेत

Image
सध्‍या विविध राजकीय, सामाजिक संघटनांमार्फत सोशल माध्‍यमांचा अनिर्बंध वापर सुरु आहे. यात तरुणाई आघाडीवर आहे. यामध्‍ये अनेकदा आक्षेपार्ह, सामाजिक वा विशीष्‍ट गटाच्‍या भावना दुखावणा-या, सामाजिक दुही व कलह निर्माण करणा-या, देशविरोधी पोस्‍टचादेखील वापर केला जातो. यावर कुठेतरी नियंत्रण आणण्‍याची गरज निर्माण झाली आहे. त्‍यामुळे सामाजिक वातावरण गढुळ करणा-या पोस्‍टच्‍या निर्मात्‍यांवर कडक कारवाई झालीच पाहिजे यात दुमत नाही. मात्र  आंदोलनात सहभाग घेणे हा गुन्‍हा शिक्षेस थेट पात्र ठरवणे संंयुक्‍तीक वाटत नाही. यात तरुण पिढीच्‍या करिअरचा प्रश्‍नदेखील उदभवू शकतो. अन्‍यायाविरुध्‍द आंदोलन, निषेध, उपोषण, धरणे हे घटनेने दिलेले अधिकार आहेत. त्‍यामध्‍ये कायदा मोडणा-यांचे समर्थन करता येणार नाही. मात्र त्‍यात सहभाग घेतला म्‍हणून त्‍याला नागरिकत्‍वाच्‍या इतर सवलती नाकारणे योग्‍य ठरणार नाही. त्‍यामुळे देश व कायदाविरोधी वर्तन करणा-यांना शिक्षा झालीच पाहीजे पण त्‍यात न्‍यायासाठी दाद मागणारे भरडू नयेत असे वाटते. वैभव मोहन पाटील घणसाेली, नवी मुंबई

भेसळखोरांवर कारवाई व्हावी

Image
विविध वस्तू वा खाद्यपदार्थांमध्ये भेसळ असल्याचे किंवा नकली लेबल लाऊन त्यांची विक्री होत असल्याचे सातत्याने दिसून येत आहे. मात्र आता आपल्या दररोजच्या वापरातील अन्न शिजवण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या सुट्या खाद्यतेलापैकी सुमारे 50 टक्के तेल भेसळयुक्त असल्याचं अन्न आणि औषध प्रशासनाच्या तपासणीत आढळून आले आहे. एफडीएनं ३० पथकं तयार करून सुट्या तेलाचे नमुने गोळा केले आणि ते तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवले. तेव्हा खाद्यतेलात केमिकल तसंच रंग मिसळण्यात आल्याचं आढळले. सुटं खाद्यतेल स्वस्त असतं. झोपडपट्टी तसंच ग्रामीण भागात या सुट्या तेलाला प्रचंड मागणी असते. त्यामुळंच तिथंच मोठ्या प्रमाणात बोगस तेलाची विक्री होत असल्याचं आढळलंय. एफडीएच्या धाडीत तब्बल 5 कोटी रुपयांचा भेसळयुक्त तेलाचा साठा जप्त करण्यात आलाय. खाद्यतेल प्रत्येकाच्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे. आज खाद्यतेलाचे अनेक ब्रँड बाजारात कमी अधिक किंमतीला उपलब्ध असतात. असे खाद्यतेल विकत घेताना ते भेसळयुक्त आहे किंवा कसे याबाबत खात्री केली जात नाही किंवा तशी यंत्रणा आपल्याकडे उपलब्ध नसते. त्यामुळे भेसळीचे तेल ओळखणे तसे फार अवघडच. सुट्ट्या त...

आरबीआय सक्षम आहे का?

Image
राष्ट्रीयीकृत बँकांसह सर्व सहकारी बँकादेखील आरबीआयच्या थेट नियंत्रणाखाली आणल्या गेल्या आहेत. मात्र आरबीआय सर्व बँकांवर थेट नियंत्रण राखण्यात यशस्वी होईल का याबाबत संधीग्धता कायम आहे. गेल्या काही महिन्यांमध्ये येस बँक, लक्ष्मी विलास बँक, पीएमसी बँक यांसारख्या नामांकित बँकांमधील उघडकीस आलेले घोटाळे पाहिले तर घोटाळ्यांनंतर बँकेवर निर्बंध आणल्यावर आपली आयुष्याची जमापुंजी बँकांमध्ये गुंतवणाऱ्या सर्वसामान्य खातेधारकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागलेला आहे. डीआयसीजीसी अंतर्गत बँक खात्यांवर लागू असलेला विमा एक लाखांवरून पाच लाख केला गेला असला तरी ती रक्कमदेखील तुटपुंजीच असून त्यासाठीची प्रक्रियादेखील वेळखाऊ आहे. आरबीआयमार्फत सर्वच बँकांचे नियमित ऑडिट होत असतानाही बँकांमध्ये अनिर्बंध व अनियमित पद्धतीने दिली जाणारी कर्जे व त्यामुळे निर्माण होणारी तूट ह्या ऑडिट मध्ये समोर येत नसल्याबद्दल आश्चर्य वाटते. त्यामुळे या बँकांवर व त्यांच्या व्यवहारांवर काटेकोर नियंत्रण ठेवण्यासाठी आरबीआयकडे ठोस यंत्रणा उपलब्ध असायला हवी. खातेदारांच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य द्यायला हवे. मुळात बँकांना परव...

ग्लॅमरवाल्यांची लोकप्रतिनिधीपदे

Image
ग्लॅमरवाल्यांची लोकप्रतिनिधीपदे हे मुशाफिरी सदर कटू वास्तवावर बोट ठेवणारे आहे. राजकारण-फिल्म इंडस्ट्री हे समीकरण देशाला नवे नाही. पडद्यावरील अभिनयात हिट ठरलेल्या अनेक कलाकारांची राजकारणातील एन्ट्री सुखकर होऊन जाते. चंदेरी दुनियेतील प्रसिद्धीचा वापर मग राजकिय गणितांसाठी  घेण्याचा प्रयत्न केला जातो. अनेकदा मतदार अशा कलाकारांना राजकीय गणवेशात स्वीकारतातदेखील. मात्र या राजकारणाची शाल अंगावर पांघरलेल्या एखाद्या कलावंताने राजकीय पदावर फार मोठी असामान्य कामगिरी केल्याचे दृष्टिपथात नाही. याला काही अपवाद असतीलही. जसे अमरावतीच्या खासदार व भूतकालीन तेलगू सिनेसृष्टीतील कलाकार नवनीत राणा ह्या बराच काळ लोकसेवेत राहिल्याचे व त्यामुळेच राजकीय पक्षाच्या आधारविना राजकारणात यशस्वी झाल्याचे उदाहरण आहे. अन्यथा राज्यसभा, विधानसभा यासारख्या मागल्या दाराने लोकप्रतिनिधी पदाचा शुभारंभ करणारे अल्पकाळात सामाजिक जीवनातून संन्यास घेणारेही कमी नाहीत. ज्यांचा उल्लेख या मुशाफिरीत अगदी समर्पक पद्धतीने केलेला आहे. वास्तविक लोकांच्या दृष्टीने लोकप्रतिनिधी व सिनेकलावन्त ह्या दोन भूमिका परस्पर भ...

हे धुके नव्हे तर प्रदूषण

Image
एमआयडीसीमधील कंपन्यांमधून हवेत सोडले जाणारे विषारी गॅस, नवीन बांधकामे, वाहनांमधून निघणारा धूर आदी करणांमुळे नवी मुंबई, पनवेल भागातील प्रदूषणाची पातळी धोक्याच्या वर जाऊन पोहोचली आहे. यासंदर्भात पर्यावरणावर काम करणाऱ्या अनेक संस्थांनी शिक्कामोर्तब केले आहे. हवेतील प्रदूषणाची पातळी वाढल्याचे दर्शवणारे वस्तुस्थितीदर्शक अहवाल उपलब्ध असले तरी त्यावर नियंत्रणासाठी कोणतेही ठोस प्रयत्न प्रदूषण मंडळाकडून होत नाहीत. रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत एमआयडीसीमधील काही कंपन्या विषारी वायू हवेत सोडत असतात ज्याचा विपरीत परिणाम श्वसनाचा त्रास, अस्थमा, स्मृतीभ्रंश, कॅन्सर, हार्ट अटॅकसारखे आजार यांमध्ये होत आहे. पर्यावरणातील हा प्रदूषित बदल नियमित मॉर्निंग वॉक करणाऱ्या लोकांच्या अनुभवास सध्या दररोज येत आहे. सकाळचे दिसणारे धुके हे धुके नसून प्रदूषणाचे कण असल्याचे लक्षात येत असून त्यामुळे लगेच थकवादेखील जाणवत आहे. नवी मुंबईचे वातावरण प्रदूषित करणाऱ्या केमिकल कंपन्या, कन्स्ट्रक्शन साईट व बेसुमार वाहनांवर कुठेतरी निर्बंध आणण्याची गरज निर्माण झाली आहे. यासाठी प्रदूषण महामंडळ व महानगरपालिका यांनी संयु...

अनाथांची माय

Image
हजारो अनाथ मुला-मुलींना आश्रय देत त्यांच्या 'माई' बनलेल्या सिंधुताई सपकाळ यांना 'पद्मश्री' किताबाने सन्मानित करून, केंद्र सरकारने त्यांच्या कार्याची उचित दखल घेतली आहे. मानवतेची केवळ भाषा न करता, ती कृतीतून साकारणाऱ्या सिंधुताई 'अनाथांच्या आई' आहेत. प्रतिकूल परिस्थितीशी दोन हात करीत, आयुष्याला दोष न देता, त्यावर मात करीत सिंधुताईंनी उभे केलेले काम प्रशंसनीय आणि वंदनीय आहे. त्यांची कहाणी महाराष्ट्राला काही नवीन नाही. खुद्द त्यांच्या भाषणांतून, त्यांच्यावरील लेखनांतून आणि चित्रपटातून ते सर्वांसमोर गेले आहे. याद्वारे समाजाने एकप्रकारे त्यांच्या कार्याला सलामच ठोकला आहे; 'पद्मश्री'द्वारे आज सरकारनेही त्यांना वंदन केले आहे. सिंधुताईंच्या आयुष्याची कहाणी संघर्षमय असली, तरी प्रेरक आहे. कोवळ्या वयातील विवाह, त्यानंतर मुलांचा जन्म, मुलांना वाढवितानाच करावे लागणारे काबाडकष्ट, घरात आणि दारात होणारी उपेक्षा... पन्नास-साठच्या दशकात भारतातील बहुतेक महिलांची कहाणी अशीच असे. वर्धा जिल्ह्यातील नवरगाव येथे जन्मलेल्या सिंधुताईंची कथा सुरुवातीला याहून वेगळी नाही...