Posts

Showing posts from July, 2020

घरबसल्या आरोग्य सेवा

Image
घरबसल्‍या आरोग्‍य सेवा - महा ई संजिवनी ओपीडी सध्या कोरोना प्रादुर्भावामुळे अनेक खाजगी दवाखाने, रुग्णालये बंद आहेत. जी सुरू आहेत तिथे रुग्णसंख्या भरमसाठ असल्यामुळे एकतर रुग्णांना दाखल करून न घेण्याचे प्रकार वाढायला लागलेत किंवा रुग्णही संसर्गाच्या भीतीपोटी खाजगी रुग्णालये गाठायला घाबरत आहेत. अनेक ठिकाणी खाजगी रुग्‍णालयांमध्‍ये  मनमानी पध्‍दतीने बीले आकारण्‍याचे प्रकारदेखील वाढस लागले आहेत. यामुळे रुग्‍ण व रुग्‍णालयीन प्रशासन असा संघर्षदेखील उभा राहत आहे. कोरोनाची लागण झालेल्‍या व लक्षणे दिसणा-या रुग्‍णांना खरेतर रुग्‍णालयात भरती होण्‍याशिवाय गत्‍यंतर नसते. मात्र ज्‍यांना विविध कारणांनी आरोग्‍याच्‍या कुरबुरी जाणवतात किंवा कोरोनाची लक्षणे जाणवत नाहीत त्‍यांना उपचारासाठी वणवण फिरावे लागत आहे. येत्‍या काळात ही समस्‍या अधिक गंभीर होत जाणार आहे. गंभीर स्वरूपाच्या रुग्णांना खरेतर पर्याय नसतो मात्र खरी अडचण होते ती आरोग्याच्या किरकोळ तक्रारी असलेल्या रुग्णांची. त्यांना उपचारासाठी वणवण फिरावे लागत असल्याचे चित्र आज सगळीकडे आहे. यावर उपाय म्हणून शासनाच्या आरोग्य विभागाने ऑनलाईन ओपीडी...

सरकारी प्रयत्न महत्वाचे

Image
कोरोनाची लस सर्वसामान्यांना सहजरित्या लवकर उपलब्ध होईल अशी शक्यता सध्या धूसर आहे. लसीच्या चाचण्या, आंतराष्ट्रीय परवानग्या, कँपन्यांमधील चुरस, पुरेशी लसनिर्मिती, वादविवाद, कोर्ट या सर्व जंजाळातून सुटून बाजारात लस उपलब्ध होण्यास बराच अवधी लागणार आहे. कोरोना रुग्ण सध्या विनासायासदेखील बरे होत असल्याने कोरोनाची भीती तोवर बऱ्याच अंशी कमी झालेली असेल. सध्या रेमडेसिवीर, टोसिलिझुम यासारख्या इंजेक्शनांचा काळाबाजार बघितला तर लोकांच्या मनातील भीतीचा फायदा उचलत कोरोनावरील लसीच्या बाबतीतदेखिल हीच परिस्थिती उदभवण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे लोकांना सहज, स्वस्त किंवा मोफत लस उपलब्ध होण्यासाठी आगामी काळात सरकारी प्रयत्न फार मोलाची भूमिका बजावणार आहेत.  वैभव मोहन पाटील  घणसोली, नवी मुंबई 

स्थानिक यंत्रणांचे मनोबल वाढवणे गरजेचे

Image
प्रशासकीय सेवेतील अधिकाऱ्यांच्या बदल्यांना अनेक कारणे असतात. प्रशासकीय, विनंतीने, राजकीय दबावापोटी किंवा कामकाजातील अपयशानेदेखील ह्या बदल्या होत असतात. सध्या कोरोना साथीने अनेक महानगरपालिका, जिल्हे व अगदी मंत्रालयीन अधिकाऱ्यांचेदेखील विभाग बदलण्यात आले आहेत. त्याला कोरोना साथ रोखण्यातील अपयश असे कारण सोयीस्कररित्या लावले जाते जे वास्तविकतेला धरून नाही. वरिष्ठ स्तरावरील प्रत्येक अधिकारी आपापल्या कार्यपद्धतीने उपलब्ध यंत्रणांच्या मदतीने परिस्थितीवर नियंत्रण आणण्यासाठी प्रयत्न करत असतो मात्र अपयशाला त्याला एकट्याला जबाबदार धरणे योग्य नाही. एखादया महापालिका किंवा जिल्ह्यातील साथ आटोक्यात आणण्यासाठी एकसंघपणे काम करणारी संपूर्ण यंत्रणा जबाबदार असते. ही यंत्रणा जितक्या कार्यक्षमतेने काम करेल तितकी परिणामकारकता अधिक असते. कोरोनासारख्या साथीत तर प्रशासकीय यंत्रणांबरोबर लोकसहभागदेखील महत्वाचा आहे. सध्याच्या परिस्थितीत स्थानिक प्रशासकीय यंत्रणेला प्रोत्साहित करून त्यांचे मनोबल वाढवणे गरजेचे आहे. त्यामुळे प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्यांनी फार काही साध्य होईल असे वाटत नाही.  वैभव...

महत्वाकांक्षी आयुष कार्यक्रम

Image
महत्‍वाकांक्षी आयुष कार्यक्रम आज आपल्या आजूबाजूला विविध आजारांनी, व्याधींनी त्रस्त असणारे रुग्ण आपल्याला पावलोपावली दिसतात. ओसंडून वाहणारी रुग्णालये व दवाखान्यांमधील गर्दी याची साक्ष आपल्याला देतील. पारंपरिक आजारांची व उपचारांची जागा आता संसर्गजन्य व अससंसर्गजन्य आजार अशा नव्या आधुनिक नावांनी घेतली आहे. त्यावरील निरनिराळ्या उपचार पद्धती व शस्त्रक्रिया जर आपण पहिल्या तर त्यासाठीच्या वैद्यकीय खर्चाचे आकडे पाहूनच गरगरायला होते. घर ते कार्यालय यामधील प्रवासात व कामात आपण इतके गुरफटलेले आहोत की मानसिक तणाव व शारीरिक व्याधी आपल्यामध्ये कधी घर करतात हे आपल्याला कळतही नाही. लहान मोठ्या व्याधींसाठी जवळपासच्या किंवा ओळखीच्या डॉक्टरकडे जाऊन जुजबी औषधोपचार करून घेतो व हा औषधोपचार असंख्य वैद्यकीय चाचण्यांसह वर्षानुवर्षे तसाच पुढे चालू ठेवतो. याचा परिणाम शरीराची रोग प्रतिकारशक्ती कमी होण्यात तसेच मानसिक संतुलन ढासळण्यात होतो हे अनेक संशोधनाअंती सिद्ध झाले आहे. बळावणारा आजार हा गरीब, श्रीमंत, उच,नीच, जाती, जमाती असा कोणताही भेदभाव करत नाही त्यामुळे त्यातून कुणीही सुटत नाही. आता तुम्ही म्हणाल ...

संकटात संधी शोधू नका

Image
कोरोना काळात खाजगी रुग्णालयांनी लोकांची सुरू केलेली लूट थांबवायला हवी. कोरोनविषयी रुग्णांच्या मनात असलेल्या भीतीचा फायदा घेऊन खाजगी रुग्णालये मनमानी पद्धतीने बिले आकारत आहेत. लक्षणे दिसत असलेल्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांना बेड उपलब्ध होत नसल्याने मिळेल त्या रुग्णालयात जाऊन उपचार घेतले जात आहेत. त्यात खाजगी रुग्णालये या रुग्णांच्या निरनिराळ्या चाचण्या करतात, लसी देतात आणि विविध सर्व्हिसेस दाखवून भरमसाठ बिले रुग्णांच्या हातात देत आहेत. डॉकटर व कर्मचाऱ्यांच्या पीपीई किटच्या नावाखाली हजारो रुपये बिलामध्ये समाविष्ट केले जातात. खाजगी रुग्णालयातील ठराविक खाटा सरकारने प्राधिकृत केलेल्या दराने रुग्णांसाठी उपलब्ध करून देण्याचे आदेश असताना या नियमांची सर्रास पायमल्ली केली जाते. गरीब व मध्यमवर्गीय रुग्णांना खाजगी रुग्णालयांच्या मनमानीचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. कोरोनासारख्या संकटकाळात संधी शोधणाऱ्या या खाजगी रुग्णालयांनी लोकांची लूट थांबवावी व या अडचणीच्या काळात लोकांना माफक दरात आरोग्य सुविधा उपलब्ध करून वैद्यकीय सेवाव्रत सुरू ठेवावे.  वैभव मोहन पाटील...

लॉकडाऊन हा पर्याय नाही तर उपाय

Image
कोरोना संसर्ग रोखण्यासाठी लॉकडाऊन हा पर्याय नसला तरी उपाय आहे. आज या आजाराचा प्रसार वेगाने होण्यामागचे कारण स्वैर होणारे जनजीवन आहे. अतिआत्मविश्वासाने अनेक लोक आज आवश्यक प्रतिबंधात्मक काळजी घेत नाहीत ही वस्तुस्थिती आहे. मुख्यतः बाजारपेठा व सार्वजनिक ठिकाणी या विषाणूचा प्रसार होण्याची शक्यता लक्षात घेता टाळेबंदीचा निर्णय हा नाईलाज आहे. मात्र त्यामुळे बाधित होणाऱ्या नोकरदार, व्यवसायिकांची संख्याही मोठी आहे. किरकोळ विक्रेते व रिक्षा टॅक्सीवाले यासारखे रोज कमावून खाणाऱ्यांची अवस्था गेल्या तीन चार महिन्यांपासून अतिशय दयनीय आहे. त्यामुळे लोकांनी घराबाहेर पडताना स्वयंशिस्त पाळली तर दैनंदिन व्यवहार सुरळीत सुरू राहतील व टाळेबंदीची वेळच येणार नाही. आज पॉझिटिव्ह रुग्णांची वाढत चाललेली रुग्णसंख्या संसर्ग थोपवणे हीच प्राथमिकता असून यात लोकांची भूमिका अत्यंत मोलाची आहे. त्यामुळे कोरोनापासून बचाव हाच टाळेबंदीतून मुक्त होण्याचा मार्ग आहे.  वैभव मोहन पाटील घणसोली, नवी मुंबई 

आंग्रीया क्रुझ - पर्यटनासोबत नौदल सैनिक कान्होजी आंग्रे यांची आठवण

Image
आंग्रीया - दर्या सारंग  सरखेल कान्होजी आंग्रे यांच्या कर्तुत्वाला मानवंदना को‍रोना प्रादुर्भावामुळे सर्वत्र लॉकडाऊन असला तरी अत्‍यावश्‍यक सेवा असल्‍यामुळे मुंबई येथील  कार्यालयात नियमितपणे कामावर कार्यरत आहे. मुळात मुंबई ही चोहूबाजुंनी समुद्र व खाडी परिसराने वेढलेली आहे. अथांग अशा अरबी समुद्राच्‍या किनारी वसलेल्‍या मुंबईतील बहुतांश इमारतींमधुन समुद्राचे विराट रुप नजरेस पडते, त्‍यापैकीच आमच्‍या कार्यालयाची एक इमारत. रोज सकाळी कार्यालयात पोहोचल्‍यावर खिडकीतून दिसणारे दृष्‍य म्‍हणजे भला मोठा समुद्र व त्‍यात असंख्‍य बोटी व अवाढव्‍य जहाजे. बाजुलाच मुंबई पोर्ट असल्‍यामुळे बहुतांशी मालवाहू जहाजे येतात व एक दोन दिवसांनी माल खाली किंवा भरुन झाल्‍यावर निघुनही जातात. मात्र गेली तीन चार महिने म्‍हणजे लॉकडाऊन लागल्‍यापासुन त्‍यातीलच एक जहाज रोज नजरेस पडते व ते म्‍हणजे हे आंग्रीया जहाज. देशातील सर्वात अलिशान जहाजांपैकी एक जहाज म्‍हणून ते ओळखले जाते. ऑक्‍टोबर २०१८ पासून मुंबई - गोवा जलमार्गावर आंग्रीया ही पहिली क्रूझ सेवा सुरू झाली होती. छत्रपती शिवाजी महाराजांचे आरमारप्रमुख सरखेल ...

करूया कुटुंबाचे नियोजन, आंनदी राहू प्रत्येकजण

Image
आज जागतिक लोकसंख्या दिन - ११ जुलै सन 1950 साली जगाची लोकसंख्या 250 कोटीच्या घरात होती. सन 1987 साली हि लोकसंख्या दुप्पट म्हणजे 500 कोटी झाल्याने वाढत चाललेल्या जागतिक लोकसंख्येच्या आकडेवारीला प्रतिबंध घालण्याच्या उद्देशाने 11 जुलै 1987 पासून जागतिक लोकसंख्या दिन साजरा केला जातो. आज लोकसंख्या वाढ हि केवळ कोण्या देशाची वा प्रांताची समस्या नाही तर संपूर्ण जगाची समस्या बनलेली आहे. लोकसंख्या वाढीबरोबरच ग्लोबल वार्मिंगची समस्या देखील मानव जातीला प्रचंड मनस्ताप देऊ लागलेली आहे. वाढत्या लोकाद्रेकाने  व मानवी गरजांनी निर्माण केलेल्या अनैसर्गिक व तांत्रिक गोष्टींमुळे निसर्गाची भयंकर हानी होऊन निसर्गव्यवस्थेचा विस्फोट होण्याची भीतीदेखील वाढ्लेली आहे. यामुळेच जागतिक पातळीवर लोकसंख्या वाढीची गंभीर दखल घेतली जात आहे. जगातील वाढत्या लोकसंख्येच्या समस्यांविषयी लोकांच्या मनात जागरुकता निर्माण  करण्यासाठी दरवर्षी 11 जुलैला जागतिक लोकसंख्या दिन साजरा केला जातो. भारतामधील झपाटय़ाने वाढणार्‍या लोकसंख्येमुळे अन्न, वस्त्र, निवारा, दारिद्रय़, बेकारी, महागाई आणि रोगराई असे अनेक प्रश...

आरोग्य विभागाची डिजिटल वाटचाल

Image
कोरोना प्रदूर्भावाच्या पार्श्वभूमीवर सध्या सोशल डिस्टनसींगला प्रचंड महत्व आलेले आहे. हस्ते परहस्ते करावयाच्या गोष्टींवर प्रचंड बंधने आल्यामुळे तंत्रज्ञानाचा वापर अनिवार्य झालेला आहे. तसे पाहायला गेले तर तंत्रज्ञानाने आज सर्वच गोष्‍टींवर मात केली आहे. इंटरनेट क्षेत्रातील क्रांतीमुळे संपर्क यंत्रणा अत्‍यंत जलद व प्रभावी बनलेली आहे. कोणतीही माहिती किंवा घटना काही क्षणामध्‍ये एकमेकांकडे पोहोचताना दिसत आहे. मात्र शासकीय कामकाज याला अपवाद ठरत होता. फायलींची लाकडी कपाटे, टेबलावर फायलींचे व कागदांचे मोठमोठे गठ्ठे आणि त्यात हरवून जाऊन काम करणारे कर्मचारी अशा पद्धतीचे चित्र जवळपास सर्वच शासकीय कार्यालयांमध्ये दिसते. मात्र गेल्‍या काही वर्षांपासुन राज्‍याच्‍या आरोग्‍य सेवेत अमुलाग्र असे बदल घडुन येताना दिसत आहेत. फाईली व कागदांच्‍या ढिगा-यात हरवलेली कार्यालये आता चक्क डिजीटल व्‍यवहारांकडे वाटचाल करताना दिसत आहेत. कोरोना काळात तर ह्या डिजिटल व्यवहारांना अनन्यसाधारण महत्व प्राप्त झाले आहे. प्रत्यक्षात घेण्यात येणाऱ्या बहुतांश बैठका आज व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे घेण्यात येत आहेत. यासाठी झूम, इको...

कोरोनाग्रस्तांना मानसिक बळ आवश्यक

Image
कोरोनाची दाहकता ही बऱ्याच अंशी मानसिक स्थिती कमकुवत असल्याने वाढते. संसर्ग हा निव्वळ निमित्तमात्र. शारीरिक संसर्गातून तुम्ही बरे व्हाल मात्र मानसिक संसर्ग फार धोकादायक आहे. त्यातच समाजाची मानसिकतादेखील ढासळत चालली आहे असेच म्हणावे लागेल. गाव खेड्यांमध्ये आणि शहरातदेखील अनेक भागांतील लोक ह्या रुग्णांना वाळीत टाकल्यासारखे करतात ज्यामुळे माणुसकी व ऋणानुबंध दुरावत चालले आहेत. कोरोना हा काही असाध्य आजार किंवा अस्पृश्यतेचा पुरस्कार करणारा तर मुळीच नाही. येत्या काळात प्रत्येक घरापर्यंत हा संसर्ग पसरण्याची भीती आहेच. कारण आयुष्यभर घरी बसून आपल्याला कोरोनावर मात करता येईल मात्र पोटापाण्याचे काय? त्यामुळे आज ना उद्या आपल्याला पोटासाठी कोरोनाचा धोका पत्करून घराबाहेर पडावेच लागेल. तेव्हादेखील हा धोका कमी झालेला नसेल आणि आपल्याला संसर्ग होणारच नाही या भ्रमात तर अजिबात राहू नका. आज पॉझिटिव्ह रिपोर्ट आलेले सर्व आपल्यातलेच आहेत आणि यातून बरे झालेलेही. त्यांना इतर कुठला आधार देता येत नसला तरी मानसिक आधार नक्की द्या. कदाचित तुमच्या त्या शाब्दिक आजारानेच ते लवकर बरे होतील. त्यामुळे रिपोर्ट पॉझिटिव्ह ...