Abacus स्पर्धेत APPLच्या विद्यार्थ्यांची चमकदार कामगिरी
प्रादेशिक Abacus स्पर्धेमध्ये सानपाडा आणि जुईनगर येथील एपीपीएलचे (APPL) चे विद्यार्थी चमकले अक्षरशिल्प पिमास प्रायव्हेट लिमिटेड यांचेमार्फत Abacus आणि मानसिक अंकगणित पामा इंडीया प्रादेशिक स्पर्धेचे भव्य आयोजन नुकतेच नेरुळ, नवी मुंबई येथील आगरी कोळी संस्कृती भवन येथे करण्यात आले होते. या स्पर्धेमध्ये सानपाडा आणि जुईनगर (नवी मुंबई) येथील APPL Abacus Learning Center च्या ८० मुलांनी सहभाग घेतला आणि विविध गटांमध्ये पारितोषिके पटकावली. मुलांमध्ये बौद्धिक विकासाला चालना मिळावी व लहान वयात मेंदूची क्षमता वृद्धिंगत व्हावी हया उददेशाने दरवर्षी Abacus स्पर्धा आयोजित करण्यात येतात ज्यात मोठ्या संख्येने मुले सहभाग नोंदवतात. यंदा ह्या स्पर्धेमध्ये ८५० विद्यार्थी सहभागी झाले होते. यात ओम सुनील पाटील, युतीका संदीप सिंग, चिन्मय सुभाष जाधव, स्वरा नंदकुमार कदम, रुद्राक्ष तुफानराव माळी यांनी अनुक्रमे ए, बी, ई, एफ या गटांमध्ये चॅम्पियन्स ऑफ चॅम्पियन्स ट्रॉफी पटकावली. इतर सहभागी विद्यार्थ्यांनी देखील विविध गटांमध्ये प्राविण्य मिळवत भरघोस पारितोषिके मिळवली. अबॅकस व मानसि...