Posts

Showing posts from April, 2025

देवघर व केळठण गावी निवासी बाल सुसंस्कार शिबिरे

Image
मुलांना मोबाईल-इंटरनेटच्या महाजालातुन बाहेर काढणारी व संस्कारांची दिशा दाखवणारी बाल सुसंस्कार शिबिरे शाळांना लागणा-या मे महिन्‍यातील सुटटयांचे निमित्‍त साधुन सालाबादप्रमाणे यंदाही पालघर जिल्‍हयातील विविध ठिकाणी बाल सुसंस्‍कार शिबीरांचे आयोजन करण्‍यात आले आहे. बाल संस्‍कार वारकरी शिक्षण संस्‍था, देवघर यांच्‍या वतीने गुरुवार दिनांक १ मे ते २१ मे २०२५ या कालावधीत भव्‍य बाल संस्‍कार निवासी शिबीराचे आयोजन वाडा तालुक्‍यातील देवघर गावी करण्‍यात आले आहे. आजच्‍या मोबाईलच्‍या व विज्ञान युगामध्ये तरुण पिढी ही आपले आई वडिल, बहिण भाऊ व गुरुजन यांच्‍या आदरापासुन दुरावत चाललेली आहे. कारण कुटुंबे ही धनाने श्रीमंत झाली पण संस्काराची श्रीमंती गमावून बसली आहे. कामधंदयाच्‍या व्‍यापामुळे आज पालकांना मुलांकडे लक्ष देण्‍यास वेळ नाही.  विभक्‍त कुटुंब पध्‍दतीमुळे वडिलधा-यांच्‍या संस्‍कारांपासुनही अनेक कुटुंबांतील मुले दुरावत चाललेली आहेत. संस्‍कार चांगले असतील तर संतती चांगली होईल. संस्‍कारक्षम संतती निर्माण होण्‍यासाठी प्रथम लहान मुलांवर चांगले संस्कार होणे अत्‍यंत आवश्‍यक आहे. याच...

स्व. शरदजी नाईक यांच्या जयंतीनिमित्त नवी मुंबईत महारक्तदान शिबीर

Image
एस बी ग्रुपचा स्तुत्य उपक्रम : स्व. शरदजी नाईक यांच्या जयंतीनिमित्त नवी मुंबईत महारक्तदान शिबीर स्व. शरदजी नाईक यांच्या जयंतीनिमित्त एस बी ग्रुपच्या वतीने रविवार दिनांक १३ एप्रिल २०२५ रोजी सकाळी १० ते सायंकाळी ५ ह्या वेळेत महारक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. कोपरखैरणे येथील गुलाब सन्स डेअरीसमोरील छत्रपती संभाजी राजे भोसले रिक्षास्टँड येथे तसेच ठाणे बेलापूर मार्गावर घणसोली रेल्वे स्टेशन येथील एस बी रिक्षा स्टँड येथे हे रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते. यावेळी मोठ्या संख्येने रक्तदाते उपस्थित होते. सदर उपक्रम दरवर्षी राबवण्यात येत असल्याचे आयोजक एस बी ग्रुपचे अध्यक्ष डॉ देवेंद्र शरदजी नाईक यांनी स्पष्ट करून शिबिरात ५०० पेक्षा अधिक युनिटचे संकलन करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. सदर रक्तदान शिबिर यशस्वी करण्यासाठी एस बी रिक्षा चालक मालक संघटनेच्या प्रतिनिधींचा तसेच नवी मुंबई ब्लड सेंटर यांचा अत्यंत मोलाचा सहभाग लाभल्याचेही डॉ नाईक यांनी सांगितले. यावेळी सर्व रक्तदात्यांचा सन्मानदेखील करण्यात आला. नवी मुंबईतील विविध क्षेत्रात कार्यरत अनेक मान्यवर मंडळीं...

जागतिक आरोग्य दिनानिमित्त रक्तदान शिबिर

Image
डी बी मार्ग पोलीस ठाण्यात रक्तदान शिबीर संपन्न जागतिक आरोग्य दिनाच्या निमित्ताने मुंबईच्या डी बी मार्ग पोलीस दवाखान्याच्या वतीने बुधवार दिनांक ९ एप्रिल २०२५ रोजी दि रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. नागपाडा येथील पोलीस रुग्णालयाचे पोलिस शल्यचिकित्सक डॉ गजानन सानप यांच्या हस्ते ह्या रक्तदान शिबीराचे उद्घाटन पार पडले. डी बी मार्ग पोलीस ठाण्याच्या तळमजल्यावरील हॉलमध्ये आयोजित करण्यात आलेल्या ह्या रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.  डी बी मार्ग पोलीस ठाण्याचे प्रमुख पोलीस निरीक्षक श्री संजय गायकवाड यांनी व त्यांच्या अधिपत्याखाली कार्यरत पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी रक्तदान शिबीर यशस्वी करण्यासाठी बहुमोल योगदान दिले. पोलिस ठाण्यामधील सर्व अधिकारी व कर्मचारी या सर्वानी ह्या शिबिरात सक्रिय सहभाग नोंदविला. रक्तदान शिबिरासाठी जे.जे. रुग्णालयातील  महानगर रक्तपेढीचे डॉ पगारे व यांच्या चमूने मदत केली. डी बी मार्ग पोलीस दवाखान्यात कार्यरत वैद्यकीय अधिकारी डॉ सुभाष घोलप व त्यांचे सहकारी अधिकारी व कर्मचारी यांनी शिबीर आयोजनासाठी विशेष परिश्रम घेतले. उन्हाळ्यात रक...

जागतिक आरोग्‍य दिन "आरोग्यपूर्ण सुरुवात, आशादायक भविष्य'' 'स्वच्छतेतुन आरोग्याकडे'

Image
जागतिक आरोग्‍य दिन विशेष `` आरोग्यपूर्ण सुरुवात, आशादायक भविष्य '' दरवर्षी ७ एप्रिल हा दिवस जागतिक आरोग्य दिन म्हणून साजरा केला जातो. दरवर्षी जागतिक आरोग्‍य संघटनेमार्फत एक घोषवाक्‍य निवडण्‍यात येते ज्‍याचा प्रचार व प्रसार जागतिक स्‍तरावर सर्वत्र करण्‍यात येतो. यंदाच्या आरोग्य दिनाचे घोषवाक्य "आरोग्यपूर्ण सुरुवात, आशादायक भविष्य" (Healthy Start, Hopeful Future) आहे, जे माता आणि नवजात बालकांच्या आरोग्यावर लक्ष केंद्रित करते.आपल्‍या व कुटुंबाच्‍या निरोगी आयुष्‍यासाठी प्रत्‍येकाने दक्ष असणे आवश्‍यक आहे. यासाठी व्‍यक्‍तीगत स्‍वच्‍छता फार महत्‍वाची आहे. जागतिक आरोग्‍य दिनी आरोग्‍याच्‍या दृष्‍टीने विविध उपक्रम दरवर्षी राबविण्‍यात येतात. या दिवशी स्थापन झालेल्या जाग‍तिक आरोग्‍य संघटनेमध्ये जगातील जवळ जवळ १९२ देशांचा सहभागी झाले. लोकांच्या आरोग्यविषयक जास्तीतजास्त समस्यांकडे लक्ष पुरवणे हे या संघटनेचे मूळ उद्दिष्ट आहे. संघटनेची आरोग्यविषयक कल्पना केवळ रोग व त्यावरिल उपाय यावरच मर्यादित न रहाता त्यामध्ये मानसिक, शारीरिक आरोग्याबरोबरच सामाजिक आरोग्याचाही विचार केला ...