Posts

Showing posts from September, 2022

वित्त व लेखा संचालक श्री चंद्रशेखर बिवलकर सेवानिवृत्त

Image
राष्ट्रीय आरोग्य अभियानातील वित्त व लेखा विभागाचे संचालक श्री चंद्रशेखर बाळकृष्ण बिवलकर हे आज शासकीय सेवेचा निरोप घेत सेवानिवृत्त झाले. शासनाच्या विविध विभागांमधील प्रदीर्घ सेवेनंतर आज आरोग्य विभागात त्यांची निवृत्ती झाली. आरोग्य विभागात येण्यापूर्वी ते सिडको प्रशासनात नवी मुंबई येथे कार्यरत होते. गेल्या दीड वर्षांपासून राष्ट्रीय आरोग्य अभियानातील वित्त व लेखाविषयक बाबी सांभाळताना अत्यंत प्रामाणिक, पारदर्शक, निष्कलंक, परिणामकारक व संयमी सेवा त्यांनी दिली. अत्यंत शांत व मितभाषी समजल्या जाणाऱ्या बिवलकर सरांनी त्यांच्या कारकिर्दीत त्यांना मिळालेल्या जबाबदारीला पूर्ण न्याय दिला. वित्त विभागासारख्या महत्वपूर्ण व संवेदनशील खात्यात काम करताना त्यांची दूरदृष्टी, विषयाचा सखोल अभ्यास व अचूकता वाखाणण्याजोगी होती. त्यामुळे विभागाला त्यांच्या कामगिरीचा व योगदानाचा नक्कीच दूरगामी उपयोग होईल असे वाटते. विभागाच्या बैठकांमधील त्यांची संयमी भूमिका व योगदान कदापि विसरता येणार नाही. अभियानातील शासनस्तरावर अनेक रेंगाळलेल्या बाबी त्यांनी मार्गी लावल्या तसेच केंद्र शासनातील अधिकाऱ्यांशीही उत्तम स...

रस्त्यांची दुर्दशा हे दुर्दैव

Image
टाटा समूहाचे सायरस मिस्त्री यांचा नुकताच रस्ते अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. याला जबाबदार कुठेतरी रस्त्यांची दुरावस्थादेखील आहे. मुंबईकडून गुजरात, नाशिक, कोकणात जाणारे सर्वच प्रमुख महामार्ग आज खड्डयांनी व्यापलेले दिसतात. खराब रस्ते व त्यावरील जीवघेण्या खड्ड्यांमुळे दररोज अनेक निष्पाप जीव जात आहेत तर अनेकजण जखमी होत आहेत. वेळेचे व वाहनांचे होणारे नुकसान तर गिणतीतच नाही. रस्ते अपघातात पडणाऱ्या बळींची संख्या चिंताजनक आहे. मात्र याकडे प्रशासनाकडून जाणीवपूर्वक कानाडोळा केला जातो. वर्षांनुवर्षे खड्डेयुक्त रस्त्यांची समस्या सोडवण्याकडे सर्वच घटकांची उदासीनता दिसून येते. याला कारणीभूत रस्ते बांधणी व दुरुस्तीत मूरत असलेली टक्केवारी आहे. प्रशासनापासून लोकप्रतिनिधीपर्यंत सर्वच या साखळीत प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे सहभागी असल्याने रस्त्यांच्या गुणवत्तेकडे सोयीस्कर कानाडोळा केला जातो. रस्ते दुरुस्तीची कामे वर्षानुवर्षे केली जातात मात्र रस्ते टिकत नाहीत ही समस्या सातत्याने व सर्वत्रच भेडसावते. अनेक आंदोलने करूनही रस्त्यांची कामे केली जात नाहीत अशी ओरड सातत्याने केली जाते. मात्र झोपलेल्यांना ...

गृहपाठ बंद करू नये

Image
चौथीपर्यंतच्या विद्यार्थ्यांचा गृहपाठ रद्द करण्याचा शालेय शिक्षण विभागाचा विचार मुलांच्या अभ्यासावर विपरीत परिणाम करणारा ठरू शकतो. शाळेत शिकवल्या जाणाऱ्या अभ्यासाची घरी उजळणी करण्याचे काम गृहपाठ करत असतो. अशा प्रकारच्या उजळणीसाठी आजकाल खाजगी ट्युशन, क्लासेस मुलांना लावले जातात. मात्र सर्वच मुले अशा ट्युशनमध्ये जात नाहीत. अनेक पालक आपल्या मुलांचा घरीच अभ्यास घेतात. अशावेळी गृहपाठातून मुलांना व पालकांना शाळेत शिकवल्या जाणाऱ्या अभ्यासाचे आकलन होते. मुलांना अभ्यासात तरबेज व अचूक बनवण्यात ह्या गृहपाठाची भूमिका पूर्वीपासून मोलाची राहिली आहे. शाळेत मुले ठराविक वेळ असतात. या वेळेत आजकालचा अभ्यासक्रम पूर्ण करणे शिक्षकांना जिकिरीचे ठरते. त्यात उजळणीला वेळ मिळत नाही. तसेच गृहपाठ बंद केला तर मुले मैदानी खेळांऐवजी टीव्ही, मोबाईल, सोशल मीडिया ह्या वेळखाऊ संसाधनांकडे वळण्याची भीती व शक्यता अधिक आहे. गृहपाठातून मुले शाळेत व घरी अभ्यासाच्या साखळीत बांधून राहतात. मुलांना अभ्यासाची एक प्रकारची ओढ व सवय राहते. त्यामुळे गृहपाठ बंद करण्याचा निर्णय न घेणे उत्तम!  वैभव मोहन पाटील  घणसोली,...

महाराष्ट्रातील नोकऱ्यांत महाराष्ट्राचा रहिवाशी असल्याची अट हवी

Image
राज्यातील उद्योगधंद्यांमध्ये स्थानिकांना किती रोजगार मिळाला हे पडताळून पाहण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. राज्यातील जवळपास सर्वच भागांमध्ये देशी विदेशी उद्योगांचे जाळे बऱ्यापैकी पसरले आहे. मात्र त्यात महाराष्ट्रातील उमेदवार किती सामावून घेतले याची आकडेवारी उघड व्हायला हवी. राज्यसेवा, लोकसेवा, सरळ सेवा सारख्या सरकारी भरती प्रक्रियांमध्ये महाराष्ट्राचा रहिवाशी असल्याची अट ठेवली जाते. त्यासाठी मोजक्या जागांसाठी राज्यातील लाखो उच्चशिक्षित तरुण अर्ज करतात. त्यावरून राज्यातील बेकारीची दाहकता लक्षात येते. नोकरभरतीत राज्यातील रहिवाशी असल्याची अट खाजगी उद्योगांसाठीदेखील लागू केल्यास स्थानिक बेरोजगारांना खऱ्या अर्थाने न्याय मिळेल असे वाटते. वैभव मोहन पाटील  घणसोली, नवी मुंबई 

श्री बालाजी दर्शन

Image
मित्रमंडळींसह तिरुपती श्री बालाजी दर्शनाचा योग देशभरातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या तिरुपती येथील श्री बालाजी दर्शनाला जाण्याचा योग यंदा आला. मित्रमंडळींसह दरवर्षी दर्शनाला जाण्याचा प्रघात मागील दोन वर्षे कोरोनामुळे थांबला होता. यंदा घटस्थापनेच्या पार्श्वभूमीवर सुधीर, हरिकेश, कन्हय्या, प्रफुल्ल या मित्रांसह श्री बालाजी दर्शनाला जाण्याचे नियोजन केले होते. त्यानुसार  २३ सप्टेंबरच्या चेन्नई एक्सप्रेसने २४ तारखेला तिरुपती जवळील रेणूगुंटा रेल्वे स्टेशनला दुपारी २च्या दरम्यान उतरलो. त्यानंतर तिरुपती परिवहन सेवेच्या बसने तिरुमाला येथे साडेतीन वाजता पोहोचलो. रेणूगुंटा ते तिरुपती हे अंतर १० किमी तर तिरुपती ते तिरुमाला देवस्थान हे निसर्गरम्य व डोंगरमाथ्यांचे अंतर २२ किमी आहे. तिथपर्यंत पोहोचण्याचा प्रवास मात्र कमालीचा सुखावणारा व निसर्गसौंदर्याचा आस्वाद देणारा आहे. तिरुमाला येथे पोहोचल्यावर नारायणगिरी येथे आम्ही रूम बुक केली व त्यानंतर जेवण केले. थोडा विश्राम केल्यावर संध्याकाळी आम्ही दर्शनासाठी निघालो. अगोदरच काढलेल्या दर...

निसर्गसंतूलन राखण्‍याचा जवळचा मार्ग म्‍हणजे वृक्षलागवड

Image
रोटरी क्‍लबमार्फत सरस्‍वती गणपत पाटील विदयालय, केळठण येथे वृक्षलागवड निसर्गाच्‍या होत असलेल्‍या अपरिमीत हानीमुळे निसर्गचक्र व ऋतुचक्र बिघडले आहे. अनेकदा मुसळधार पावसाने पूरस्थिती निर्माण होते तर काही भाग पावसाविना दुष्‍काळी राहतात अशी परिस्‍थीती आहे. निसर्गाचे संतूलन राखण्‍याचा एकच मार्ग आपल्‍याकडे उपलब्‍ध आहे व तो म्‍हणजे निसर्गसंपदा म्‍हणजेच वृक्षसंपदा जोपासणे. यासाठी वृक्षागवडीची चळवळ व्‍यापक व्‍हायला हवी. अशाच प्रकारे वृक्षलागवडीच्‍या ध्‍येयाने अनेक निसर्गप्रेमी पदरमोड करुन वृक्षवाढीसाठी प्रयत्‍नशील असतात. मुळगाव आंबिस्ते , जि. पालघर   येथे जन्मलेले असेच एक वेगळे व्यक्तिमत्व वाडा तालूक्‍याला लाभले आहे. वाड्यातून शिक्षण घेत शहराकडे जाऊन उच्च शिक्षण घेऊन मुंबई युनिव्हर्सिटी सारख्या शिक्षणाच्या माहेरघराचे कुलगुरू पद प्राप्त करून घेणारे डॉक्टर अरुण सावंत सर यांच्या संकल्पनेतून तसेच अध्यक्ष रोटरी क्लब डाऊन टाऊन सि लँड डॉक्टर सरोज वर्मा , रोटरी क्लब सदस्य अजय कासोटिया यांच्या माध्‍यमातून वृक्षलागवडीचा अनोखा वसा हाती घेण्‍यात आलेला आहे. नुकतेच त्‍यांच्‍या सहकार्यातून केळठण , जिल्...

ऍम्युकेअर ऍक्ट नाऊ संस्‍थेचा स्‍तूत्‍य उपक्रम

Image
अन्‍नदानातून समाजकार्य  अन्‍नदान हे श्रेष्‍ठ दान मानले जाते. अन्‍नादानातून मिळणारे समाधान अवर्णनीय असते. समाजातील अनेक दानशुर लोक विविध माध्‍यमांव्‍दारे अन्‍नदानासाठी आग्रही असतात. मुंबईतील अशीच एक संस्‍था सध्‍या ठाणे पालघर जिल्‍हयात ग्रामीण भागातील गरीब , गरजू लोकांना पोटभर अन्‍न खाऊ घालण्‍याचे स्‍तुत्‍य समाजकार्य करण्‍यात व्‍यस्‍त आहे. ऍम्युकेअर ऍक्ट नाऊ , मुंबई या संस्‍थेमार्फत हे समाजकार्य हाती घेण्‍यात आलेले आहे. गणेशपुरी स्थित श्री नित्‍यांनंद बाबांच्‍या आशिर्वादाने श्री भरत ठिया या समाजसेवकांच्‍या माध्‍यमातून संस्‍थेने या परिसरात कोविड प्रादुर्भावाच्‍या काळापासुन मार्च २०२० पासुन परिसरातील गावांमधील गरीब व गरजू लोकांना मोफत जेवण देण्‍याचा उपक्रम सुरु केला जो आजदेखील या परिसरात सुरु आहे. अकलोली कॉलनी , उसगाव , गांधी पाडा या ठिकाणी त्‍यांनी अन्‍नदान केले आहे. सध्‍या या संस्‍थेमार्फत केळठण (जि.पालघर) येथील सरस्‍वती गणपत पाटील विदयालय , गोराड अवचित पाडा येथील जिल्‍हा परिषद शाळा तसेच देवघर येथील के. जी. पाटील विदयालय या शाळांमधील विदयार्थ्‍यांना दररोज मध्‍यान्‍न भोजन देण्‍या...