Posts

Showing posts from February, 2025

विद्यार्थ्यांनो, जोमाने अभ्यास करा पण तब्येतही सांभाळा !

Image
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या बारावीच्या परीक्षा ११ फेब्रुवारीपासून आणि एसएससीच्या परीक्षा आजपासून सुरू झालेल्या आहेत. यंदा परीक्षा नियोजित वेळेपेक्षा अगोदर सुरू झालेल्या असून निकालही लवकर जाहीर होणार आहेत. १५ मेपर्यंत बारावी आणि दहावीचा निकाल जाहीर होतील असा अंदाज आहे. राज्यात यंदा बारावी परीक्षेसाठी १५ लाखांपेक्षा जास्त विद्यार्थी परीक्षा देत आहेत ज्यामध्ये कला, वाणिज्य व विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांचा समावेश आहे. राज्यात सोळा लाखांहून अधिक विद्यार्थी दहावीची परीक्षा देत आहेत. खरंतर दहावी व बारावीची वर्षे विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील महत्वाची व टर्निंग पॉईंट ठरणारी वर्षे. त्यामुळे पालक, शिक्षक व विद्यार्थी सर्व शक्तीनिशी या परीक्षेची तयारी करण्यात व्यग्र आहेत. अभियांत्रिकी, वैद्यकीय, पदवी यासारख्या शाखांची दारे इथूनच पुढे उघडत असल्याने शैक्षणिक करिअरच्या दृष्टीने मुले अगदी झोकून देऊन अभ्यासात मग्न असल्याचे चित्र पाहायला मिळते. वर्षभर मुले अगदी मन लावून अंतिम परीक्षेची तयारी करत असतात. मात्र वर्षभर तयारी केल्यानंतर ऐन परीक्षेच्या वेळी विद्यार्...

घणसोलीतील वास्तू साफल्य सोसायटीत माघी गणेशोत्सव व वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरे

Image
घणसोलीतील वास्तू साफल्य सोसायटीत माघी गणेशोत्सव व वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरे घणसोलीतील वास्तू साफल्य को ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटीच्या प्रांगणात सालाबादप्रमाणे यंदाही दिनांक १ फेब्रुवारी २०२५ रोजी माघी गणेशोत्सव तसेच सोसायटीच्या वर्धापन दिनानिमित्त वार्षिक स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात साजरे करण्यात आले. यावेळी सत्यनारायण महापूजा व महाप्रसादाचे आयोजन सोसायटीच्या वतीने करण्यात आले. सोसायटीतील लहान मुलांचे सांस्कृतिक कार्यक्रम व स्पर्धा पार पडल्या. त्यानंतर स्पर्धांचा बक्षीस वितरण सोहळा व सोसायटीतील  चांगल्या गुणांनी उत्तीर्ण शालेय  मुलांना प्रोत्साहनपर भेटवस्तूचे वाटप सोसायटीच्या वतीने करण्यात आले. जवळपास २२ वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या वास्तू साफल्य सोसायटीच्या आवारात श्री गणेशाचे सुंदर मंदिर बनवण्यात आले असून १५ वर्षांपासून माघी गणेशोत्सव साजरा करण्यात येत आहे. सोसायटीत एकूण ४ विंग असून ४२ कुटुंबे वास्तव्य करत आहेत. सोसायटीत १४ दुकानेदेखील आहेत. सर्व हिंदू सण उत्सव सोसायटीमध्ये रहिवाशांच्या सहभागातून उत्साहपूर्ण वातावरणात साजरे करण्यात ...