Posts

Showing posts from July, 2024

एकमजली लिफ्ट बसवा

Image
घणसोली ते सिएसएमटी व्हाया हार्बर लाईन असा दररोजचा प्रवास मी करतो. या मार्गावरील नवी मुंबईतील जवळपास सर्वच रेल्वे स्थानकांवर बहुतांश प्रवाशी ट्रान्स हार्बरवरून हार्बर रेल्वे मार्गावरील गाडी पकडण्यासाठी रेल्वे फलाट ओलांडण्याचा मार्ग निवडतात. अगदी महिला प्रवाशीदेखील यात अग्रेसर दिसतात. या प्रयत्नात अनेक प्रवाशी पडून जखमी झाल्याची उदाहरणे मी पाहिली आहेत. सध्या फलाटांवर दोन्ही बाजूला असलेला स्लोप नाहीसा करून लोखंडी जाळ्या बसवण्याचा पर्याय रेल्वेने निवडला असला तरी प्रवाशी त्यालाही न जुमानता उड्या मारून एका फलाटावरून दुसऱ्यावर जात असल्याचे दररोज पहायला मिळते. अंडरग्राउंड सबवे मधील पायऱ्या चढउतार करून अगदी नगण्य प्रवाशी फलाट बदलण्याचा मार्ग निवडतात. याला कारणीभूत जिने चढउतार करताना लागणारा वेळ व अनेकांना पाठ मणक्याचे असलेले विकार हेदेखील आहे. मध्य रेल्वेच्या बहुतांश स्थानकांवर फलाट बदलण्यासाठी सरकते जिने बसवण्यात आलेले आहेत. तसेच एकमजली लिफ्ट देखील अनेक स्थानकांत पाहायला मिळतात. हीच पद्धत नवी मुंबईतील स्थानकांवर वापरायला हरकत नाही. असे केल्यास धोकादायक पद्धतीने प्रवास क...

अशा गुन्ह्यातील आरोपी सुटू नयेत

Image
नवी मुंबईसारख्या अत्याधुनिक व सुरक्षित शहरात मंदिरासारख्या पवित्र ठिकाणी कौटुंबिक त्रासातून सुटका करून घेण्यासाठी आलेल्या विवाहितेवर मंदिरातील पुजाऱ्यांनी केलेल्या अत्याचाराची व खुनाची घटना अत्यंत वेदनादायक व चीड आणणारी आहे. यामुळे समाजात अजूनही महिला सुरक्षित आहेत का यावर शंका उपस्थित होत आहे. कायदा व परिणामांची भीती राहिलेली नसल्याने अशा घटना वारंवार घडत आहेत. नवी मुंबई ही सुशिक्षित, सुसंस्कृत व सुरक्षित शहर म्हणून ओळखले जाते. शहरात घडणाऱ्या प्रत्येक अनुचित घटनेचे पडसाद तात्काळ सर्वत्र उमटतात. सदर घटनेतील पिडितेला व तिच्या कुटुंबीयांना न्याय मिळावा यासाठी नवी मुंबईतील नागरिक, सामाजिक संस्था, संघटना व जागरूक घटक आज रस्त्यावर उतरून आरोपींना कठोर शासन करण्याची मागणी करत आहेत. अन्याय अत्याचाराच्या विरोधात एकजुटीने आवाज उठवून आरोपींना कठोरातील कठोर शिक्षा होईपर्यंत माघार घेतली जाणार नाही हाच संदेश या निमित्ताने नवी मुंबईकर देत आहेत. कितीही गंभीर गुन्हा असला तरी काही काळाने त्याचा तपास व मागोवा थंडावतो व गुन्हेगार तुरुंगातून सुटण्याचा मार्ग मोकळा होतो हा आजवरचा अनुभव आहे. मात्र...

अशा गुन्ह्यांतील आरोपी सुटू नयेत

Image
सत्ता आणि पैशाच्या बळावर काहीही मिळवता येते हा धनदांडग्यांचा भ्रम दुर्दैवाने खरा ठरताना दिसतोय. परवाना नसतानाही महागड्या गाड्या बेदरकारपणे हाकत सर्वसामान्यांच्या जीवावर उठणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. पुण्यातील घटनेनंतर मुंबईतील वरळीत घडलेली घटना त्याचाच प्रत्यय देणारी आहे. गाडीखाली चिरडून एखाद्याचा जीव घेणारी व्यक्ती पकडल्यानंतर काही दिवसांतच कायद्याच्या कचाट्यातून सहीसलामत कशी सुटते याचेच खरंतर अप्रूप वाटते. एरव्ही किरकोळ प्रकरणांमध्ये सर्वसामान्य लोकांना वर्षानुवर्षे न्यायालयाचे खेटे मारावे लागतात. मात्र पैशाच्या जोरावर अशा प्रकारे गंभीर गुन्ह्यांमध्ये सुटका होत असेल तर भविष्यात अशा बड्या बापाच्या धेंडांची हिंमत नक्कीच वाढणार आहे. काहीही केले तरी पैसा खर्च करून किंवा वशील्याने आपली सुटका होणारच आहे हा भ्रम उच्चभ्रू वर्गामध्ये दृढ होत चाललेला आहे. त्यामुळेच रात्री अपरात्री मद्यपान करून वाहने चालवणाऱ्या श्रीमंत घरातील तरुणांची संख्या मुंबई पुण्यासारख्या शहरांमध्ये वाढलेली आहे. त्यांना वेळीच आवरले नाही तर राज्यातील कायदा व न्यायव्यवस्थेचे तीन...

यांना वेळीच आवरा

Image
सत्ता आणि पैशाच्या बळावर काहीही मिळवता येते हा धनदांडग्यांचा भ्रम खरा ठरताना दिसतोय. परवाना नसतानाही महागड्या गाड्या बेदरकारपणे हाकत सर्वसामान्यांच्या जीवावर उठणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. पुण्यातील घटनेनंतर मुंबईतील वरळीत घडलेली घटना त्याचाच प्रत्यय देणारी आहे. गाडीखाली चिरडून एखाद्याचा जीव घेणारी व्यक्ती पकडल्यानंतर काही दिवसांतच कायद्याच्या कचाट्यातून सहीसलामत कशी सुटते याचेच खरंतर अप्रूप वाटते. एरव्ही किरकोळ प्रकरणांमध्ये सर्वसामान्य लोकांना वर्षानुवर्षे न्यायालयाचे खेटे मारावे लागतात. मात्र पैशाच्या जोरावर अशा प्रकारे गंभीर गुन्ह्यांमध्ये सुटका होत असेल तर भविष्यात अशा बड्या बापाच्या धेंडांची हिंमत नक्कीच वाढणार आहे. काहीही केले तरी पैसा खर्च करून किंवा वशील्याने आपली सुटका होणारच आहे हा भ्रम उच्चभ्रू वर्गामध्ये दृढ होत चाललेला आहे. त्यामुळेच रात्री अपरात्री मद्यपान करून वाहने चालवणाऱ्या श्रीमंत घरातील तरुणांची संख्या मेट्रो शहरांमध्ये वाढलेली आहे. त्यांना वेळीच आवरले नाही तर राज्यातील कायदा व न्यायव्यवस्थेला डाग लागल्याशिवाय राहणार नाही.  वैभव मोहन पाटील...

अपात्र लाभार्थ्यांचा भार नको

Image
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना नक्कीच स्वागतार्ह व लक्षावधी गरजू महिलांसाठी फायदेशीर ठरणारी आहे. याचा लाभ गरीब व सर्वसामान्य कुटुंबातील असंख्य गृहिणींना मिळणार आहे. यासाठी महिलांची होत असलेली धावपळ पाहता मुदतीमध्ये खरंतर वाढ करण्याची गरज आहे. तसेच दरवर्षी यामध्ये दिल्या जाणाऱ्या रक्कमेतही वाढ करण्यात यावी. मात्र दरवेळी सरकारी योजनांमधील अनुभवास येणारी लाचखोरी, दलाली या योजनेतही होत असल्याचे पाहायला मिळत आहे. कुठे दाखल्यांसाठी अडवणूक तर कुठे पैशांची मागणी असे प्रकार दररोज उघडकीस येत आहेत. ह्या गैरप्रकरांवर अंकुश ठेवण्यात सरकारी यंत्रणांना अपयश येत आहे हे वास्तव नाकारता येणार नाही. मात्र या आडवाटांचा फायदा घेत पात्र नसणारे लाभार्थींदेखील सरसकट ह्या योजनेत समाविष्ट होण्याची शक्यता वाढली आहे. योजनेचा लाभ घेण्यासाठी ठराविक निकष सरकारने दिलेले आहेत. यात प्रमुख पुरावे असणारे उत्पन्न, रहिवाशी व जन्म दाखल्यांच्या सत्यतेत व वितरणात पारदर्शकता राखणे गरजेचे आहे. हे दाखले मिळवून देण्यासाठी वावरणाऱ्या दलालांवर कठोर कारवाई करण्यात यावी. सरकारी, निमसरकारी कार्यालयांमध्ये ...

शाळांच्या आवारात तंबाखू विक्री

Image
शाळा, महाविद्यालये व शैक्षणिक संस्थांच्या १०० मीटर परिसरात सिगारेट व तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करण्यास प्रतिबंध आहे. असे असताना शहरी भागातील बहुतांश शाळा परिसरात पान टपऱ्या बिनधास्तपणे सुरू असल्याचे निदर्शनास येत आहे. तसेच मद्यविक्रीची दुकानेदेखील जागोजागी दिसून येतात. शालेय, महाविद्यालयीन मुलांचे भवितव्य सुरक्षित राहावे, त्यांनी व्यसनांपासून दूर राहावे यासाठी अनेक कडक नियम शासनाने केलेले आहेत. मात्र त्याची योग्य अंमलबजावणी होत नसल्याने समाजविघातक प्रवृत्तीनकडून त्याचा गैरफायदा घेतला जात आहे. मागील काही महिन्यांपासून राज्यात तंबाखू, गुटखाविरुद्ध मोहीम तीव्र करण्यात आली आहे. अनेक ठिकाणांवरून गुटख्याचा मोठा साठा जप्त करण्यात आलेला आहे. यावरून अशा पदार्थांचे सेवन किती मोठया प्रमाणात करण्यात येते हे समोर आले आहे. यात अल्पवयीन मुलांची संख्याही मोठी आहे. तंबाखूसेवनाचे दुष्परिणाम व त्याचे आरोग्यावर होणाऱ्या विपरीत परिणामांची जाणीव असतानाही समाजातील मोठा गट व शाळा महाविद्यालयीन मुले हे व्यसन करत असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे अशा नशेच्या पदार्थांच्या विक्रीवर कडक निर्बंध व...

वाचाल तर वाचाल

Image
ज्ञान हे दोन गोष्टीतून मिळते. एक अनुभव व दुसरे वाचन. अनुभव तर आपण पदोपदी घेत असतो त्यातून शिकण्यासारखे काय व किती हे प्रत्येकाच्या बुद्धिकौशल्यावर अवलंबून असते. अनुभवाने माणूस प्रगल्भ होतो पण हि प्रगल्भता जपण्यासाठी व ज्ञान आत्मसात करण्यासाठी वाचन हे अत्यंत आवश्यक आहे. वाचनामुळे व्यक्तीची वैचारिक पातळी उंचावून ज्ञानात वाढ होते व मुख्य म्हणजे शब्दसंचयात भर पडते. धावत्या जगाबरोबर चालण्यासाठी, प्रत्येक घटनेवर प्रतिक्रिया व्यक्त होण्यासाठी वाचनाशिवाय पर्याय नाही. "वाचाल तर वाचाल" हि नुसती उक्ती नसून यशस्वी जीवनाचा तो मूलमंत्र आहे. वाचन करत नसलेला माणूस एकतर अज्ञानी म्हणून ओळखला जातो अथवा आयुष्याबद्दल निरुत्साही. त्यामुळे वाचन हे यशस्वी व्यक्तीचे खरे उपासना यंत्र आहे. आजच्या पिढीने तर वाचनात सातत्य राखणे काळाची गरज आहे. परंतु नेमके याच्या उलट परिस्थिती आज पाहायला मिळते. संगणक, मोबाईल, लॅपटॉप या यंत्रामध्ये अडकलेला आधुनिक युवक आज वाचन पूर्णपणे विसरलेला आहे. फेसबुक, व्हाट्सअप, इंटरनेट या अभावी स्वतःला अपूर्णतेची जाणीव त्याला होते. एकतर वाचनासाठी वेळ मिळत नाही किंवा काढला...

पाण्याशी खेळ नकोच !

Image
रविवारचा दिवस. हडपसरच्या सय्यदनगरच्या अन्सारी कुटुंबाचा वर्षा सहलीसाठी भूशी डॅमवर जाण्याचा प्लॅन झाला. कुटुंबातील सगळेच 16-17 सदस्य भूशी डॅमच्या वरच्या भागात धबधबा पाहण्यासाठी गेले. संथ गतीने वाहणाऱ्या पाण्यात कुटुंबातील सदस्य उतरले, पण अचानक पाण्याचा जोर वाढला अन् होत्याचं नव्हतं झालं. एका डोंगरातून धबधबा वाहत होता. धबधब्याला पाणी कमी होतं. अन्सारी कुटुंबाने त्या धबधब्याच्या खाली भिजण्याचा मनसोक्त आनंद घेतला. पुढे काय होईल याचा कोणाला अंदाज नव्हता. अचानक पाण्याचा जोर वाढला आणि अन्सारी कुटुंब अडकलं. पाण्याचा वेढा पडल्याने सगळे एकमेकांना धरून खडकावर उभे होते. पाण्याच्या बाहेर असलेल्या लोकांनी त्यांना बाहेर काढण्यासाठी प्रयत्न केले. मात्र पाण्याचा वाढता जोर त्यांना बाहेर पडू देत नव्हता. अखेर हे संपूर्ण कुटुंब लहान मुलांसह पाण्यात वाहून गेल्याची अत्यंत हादरून सोडणारी वेदनादायी व्हिडिओ क्लिप सर्वांनी पाहिली. ह्या दुर्दैवी घटनेबद्दल सर्वत्र हळहळ व्यक्त झाली. मागील आठवड्यात असाच  मुंबईतील विविध काॅलेजमध्ये शिक्षण घेणाऱ्या तरुणांचा एक गट सोडाई किल्ल्यावर ट्रेकिंगसाठी गेला होता...

अतिउत्साही पर्यटकांमुळे पावसाळी पर्यटन धोक्यात

Image
मुंबईतील विविध काॅलेजमध्ये शिक्षण घेणाऱ्या तरुणांचा एक गट सोडाई किल्ल्यावर ट्रेकिंगसाठी गेला होता. मात्र, ट्रेकिंगला जाण्याऐवजी ते दुपारी पोखरवाडी येथील मोरबे डॅमच्या बंधाऱ्याजवळ आले. यापैकी एक जण बंधाऱ्यात पोहण्यासाठी उतरला. त्याला पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्यामुळे तो बुडत असताना वाचविण्यासाठी अन्य तिघे मित्र गेले. यामध्ये चौघांचाही बुडून मृत्यू झाला. पावसाळा सुरू होण्याच्या तोंडावरच घडलेल्या या दुर्दैवी घटनेने पावसाळी पर्यटन पुन्हा एकदा धोक्यात आले आहे. अति उत्साही पर्यटकांना आवर घालण्यासाठी राज्यातील अनेक पर्यटन स्थळांवर फिरण्यास लोकांना बंदी घालण्यात येते. पावसाळ्यात हिरवळ, पाणथळ, धबधबे, ओढे, नद्या, बंधारे, तलाव इत्यादी ठिकाणी निसर्गसौंदर्याचा निराळा आस्वाद घेता येत असल्याने दरवर्षी पर्यटक मोठया संख्येने अशी ठिकाणे आवर्जून हेरत असतात. मात्र गेल्या काही वर्षांपासून ह्या ठिकाणी घडत असलेल्या दुर्घटनांचा फटका पावसाळी पर्यटनाला बसत आहे. अति उत्साह, अति आत्मविश्वास, सेल्फी वेड, नशेच्या पदार्थांचे सेवन अशी कारणे या दुर्घटनांना असून त्यावर अंकुश आणण्याचे प्रशासन व स्थानिकांचे...

दोस्त मुंबई संस्थेच्या अवयवदान व आरोग्य सेवा दिंडीचा प्रस्थान सोहळा व सत्कार सोहळा संपन्न

Image
रविवारी डॉ डी वाय पाटील रुग्णालयाचे डॉ कैलास जवादे सर यांच्या निमंत्रणावरून त्यांच्या दोस्त मुंबई संस्थेच्या एका उत्तम, वैचारिक, सेवाभावी कार्यक्रमास उपस्थित राहण्याचा योग आला. दोस्त मुंबई या संस्थेच्या माध्यमातून गेल्या दहा वर्षांपासून आषाढी वारी पालखी सोहळ्यादरम्यान अवयवदान व आरोग्य सेवा दिंडीचे आयोजन केले जाते. या उपक्रमादरम्यान वारीमध्ये अवयवदानाबाबत जनजागृती आणि आरोग्यविषयक कार्यक्रम राबविण्यात येतात. यामध्ये कॅन्सर जनजागृती, लिव्हर किडनी व पचन संस्था आरोग्य कार्यक्रम, वैद्यकीय शिबीर, चरण सेवा, शस्त्रक्रिया सल्ला, फायब्रोस्कॅन तपासणी इत्यादी उपक्रम राबविण्यात येतात. यंदाही या आरोग्य दिंडीचे आयोजन करण्यात आले असून त्याचा प्रस्थान सोहळा व आरोग्य क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बजावणाऱ्या समाजातील मान्यवरांचा सन्मान सोहळा रविवार ३० जून २०२४ रोजी वेस्टर्न हिल्स हायस्कुल, कामोठे येथे आयोजित करण्यात आलेला होता. यावेळी विचार मंचावर महिला आर्थिक विकास मंडळाच्या महाव्यवस्थापक श्रीमती कुसुम बाळसराफ, मुंबईच्या कौशल्य विद्यालयाच्या प्राचार्य व सत्यसाई संजीवनी रुग्णालयाच्या...