आषाढीची वारी, आली पंढरीच्या दारी - कविता
आषाढीची वारी, आली पंढरीच्या दारी आषाढीची वारी, आली पंढरीच्या दारी | पाहता माऊली, सुखावले वारकरी || दिंडी चालतसे वाटेने, ओढ असे ती पंढरी | तृप्त झाले मन, पाय लागे चंद्रभागातिरी || आषाढीचा सण मोठा, चाले संतांच्या संगती | वारीचा देखणा सोहळा, शिण देहाचा हरती || नाही कमी कुठे पडती, सर्व सोयी वारी मिळती | आजाराला नाही थारा, औषधोपचार जागोजागी || रिंगणाचा तो सोहळा, नाही कुठे दिसे जगी | माझ्या विठुरायाच्या चरणी, सर्व सुखे सदा उभी || चंद्रभागेच्या त्या तीरी, सर्व विघ्ने विसरती | रखुमाईच्या मंदिरी, मन शांत चित्त होई || वारीच्या ऊर्जेने, फिरता जड पावली | पुन्हा धाव घेऊ, मनी ठेवू विठू माऊली || शासनाच्या सोयी भारी, स्वच्छ निरोगी पंढरी | वारकरी उपचार घेती, महा आरोग्य शिबिरी || पंढरीचा हा सोहळा, आहे जगात वेगळा | एकदा तरी अनुभवा, संत भेटीचा हा मेळा || *वैभव मोहन पाटील*