सरस्वती गणपत पाटील विदयालय, केळठण शाळेत शैक्षणिक साहित्याचे वाटप
विविध स्वयंसेवी संस्थाकडून, दानशूर व्यक्तींकडून मदतीचा हात देवघर विभाग शिक्षण प्रसारक ट्रस्ट अंतर्गत सरस्वती गणपत पाटील विदयालय , केळठण ही शाळा गेल्या २० वर्षांपासुन आदिवासी , दुर्गम भागात ज्ञानदानाचे कार्य करत असुन शाळेत ८वी ते १०वी पर्यंत माध्यमिक वर्ग कार्यरत आहेत. परिसरातील आदिवासी व गरीब कुटुंबातील शेकडो मुलांना या शाळेमुळे लाभ झालेला आहे. शाळेची शैक्षणिक प्रगती व गुणवत्तादेखील वाखाणण्याजोगी असुन दरवर्षी दहावीच्या उत्तूंग निकालातून ती प्रतीत होत असते. शाळेतील अनेक मुलांनी क्रिडा क्षेत्रात उंच भरारी घेत तालूका , जिल्हा , राज्य पातळीवर आपले व शाळेचे नाव कोरले आहे. वर्जेश्वरी , गणेशपुरी यासारख्या नैसर्गिक , पवित्र व पर्यटनस्थळापासुन हाकेच्या अंतरावर वसलेली ही शाळा मुलांच्या कलागुणांमुळे उत्तरोत्तर चांगली कामगिरी करत आहे. यामुळेच समाजातील अनेक दानशूर मंडळी सढळ हस्ते या शाळेसाठी व मुलांसाठी मदत करताना दिसतात. नुकतेच २५ ऑगस्ट २०२२ रोजी सेवा सहयोग फाउंडेशन मुंबई यांच्या सहकार्याने आणि सचिन तेंडुलकर फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने या शाळेतील सर...