Posts

Showing posts from April, 2020

घरबसल्या मिळवा ई संजीवनीद्वारे मोफत आरोग्यसेवा

Image
केंद्र शासनाचा अभिनव उपक्रम कोरोना आजाराचा मुकाबला करण्‍यासाठी सरकारी यंत्रणा प्रयत्‍नांची पराकाष्‍ठा करत आहे. आज या आजारावर नियंत्रण मिळवण्‍यात काही अंशी तरी आपल्‍याला यश मिळाले आहे असेच म्‍हणावे लागेल. याला कारणीभुत आहे ते आपल्‍या देशात व महाराष्‍ट्रात अगदी वेळेवर जाहीर केलेला लॉकडाऊन. या आजाराचे गांभीर्य लक्षात घेता   राज्‍यातील जनतादेखील लॉकडाऊनच्‍या काळात गेल्‍या सहा सात आठवडयांपासुन घरात बसुन प्रशासनाला पूर्णपणे सहकार्य करत आहे. त्‍यामुळेच इतर देशांच्‍या तुलनेत व आपल्‍या लोकसंख्‍येच्‍या मानात करोनाचा फार प्रसार व  संसर्ग आपल्‍याकडे अदयापपर्यंत होऊ शकलेला नाही. मात्र या लॉकडाऊनच्‍या काळात एक महत्‍वाची समस्‍या उदभवलेली आहे व ती महणजे ज्‍या लोकांना अथवा रुग्‍णांना वैदयकीय उपचारासाठी घराबाहेर पडणे शक्‍य होत नाही त्‍या रुग्‍णांना वेळेत उपचार मिळणे अडचणीचे ठरत आहे. मात्र अशा रुग्‍णांसाठी केंद्रीय आरोग्‍य विभागाने पुढाकार घेत एक नवीन योजना सर्वांसमोर आणली आहे. ई संजीवनी या नावाने सुरु करण्‍यात आलेल्‍या या योजनेनुसार रुग्‍णांचा घरबसल्‍या तज्‍ज्ञ डॉक्‍टरांशी थेट...

पोलिसांच्‍या पाठीवर कौतुकाची छाप

Image
पोलिस व आरोग्‍य यंत्रणांंचे काम योध्‍दयासारखे  करोनाच्‍या प्रादुर्भावामुळे जनजीवन विस्‍कळीत झालेले असुन जवळपास दीड महिन्‍यांपासुन लोक लॉकडाऊनमध्‍ये आहेत. मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक, औरंगाबाद, नगर आदींसह ग्रामीण भागातही रुग्णांची संख्या अधिक आहे. मात्र महाराष्‍ट्रासारख्‍या एक मोठया राज्‍यात कोरोनावर नियंत्रण मिळवण्‍यात आरोग्‍य यंत्रणांना मिळत असलेले यश एकमेवाव्दितीय आहे असेच म्‍हणावे लागेल. वेळेत निदान, योग्‍य उपचारपध्‍दती व संशयीत रुग्‍णांचे उचित नियोजन यामुळे राज्‍यातील यंत्रणांना या आजाराचा संसर्ग रोखण्‍यात ब-यापैकी यश आले आहे. एकंदरीत करोनाला पराभूत करण्‍याचा निर्धार राज्य सरकारनं केलेला आहे. या सर्वांमध्‍ये आरोग्य यंत्रणेतील कर्मचारी आणि पोलीस विभाग हे एखाद्या योद्ध्यासारखा लढा देत आहेत. सर्वच जण झोकून काम करताना दिसत आहेत. एकीकडे सर्वसामान्‍य नागरीक कोरोना संशयीताच्‍या संपर्कात येण्‍यापासुन टाळण्‍यासाठी सामाजिक अंतर राखण्‍याचा आटोकाट प्रयत्‍न करताना दिसत आहेत तर दुसरीकडे रुग्‍णालयांमधील डॉक्‍टर, नर्स व इतर कर्मचारी वर्ग कोरोना बाधित रुग्‍णांच्‍या संपर्कात चोवीस तास त्‍...

नाण्याची दुसरी बाजू

Image
ठणठणीत रुग्‍ण नाण्‍याची दुसरी बाजू महाराष्‍ट्रातील कोराना बाधितांची संख्‍या पाच हजारांच्‍या उंबरठयावर आहे. मात्र या आजारातुन बरे होऊन घरी परतणा-यांची संख्‍यादेखील लक्षणीय आहे हे दुर्लक्षित करुन चालणार नाही. जवळपास ६०० जण या आजारातुन पूर्णपणे बरे होऊन घरी परतलेले आहेत. खरेतर हे चित्र आशादायक व लोकांना दिलासा देणारे आहे. मात्र दररोज वृत्‍त वाहीन्‍यांवर दाखविण्‍यात येणा-या कोरोनाच्‍या दाहकतेमुळे लोक प्रचंड तणावाखाली आहेत. या आजारापासुन स्‍वतःचा बचाव करण्‍यासाठी आवश्‍यक काळजी ही घेतलीच पाहिजे मात्र उगाचच त्‍याला घाबरुन त्‍याचे दडपण घेतले तर मानसिक ताण व गैरसमजांमुळे होणा-या रुग्‍णसंख्‍येतदेखील मोठी भर पडेल एव्‍हढे लक्षात घेतले पाहीजे. त्‍यामुळे लोकांच्‍या मनातील या आजाराविषयी असलेले दडपण आता दुर करण्‍याची आवश्‍यकता आहे. कोरोनासारख्‍या गंभीर आजारातुन बरे होता येते हे ठणठणीत बरे झालेल्‍या जवळपास ६०० जणानी दाखवून दिले आहे. त्‍यामुळे कोरोनाची उगाच धास्‍ती बाळगण्‍याची गरज नाही मात्र प्रत्‍येकाने प्रतिबंधात्‍मक काळजी ही घेतलीच पाहिजे. महत्‍वाचे म्‍हणजे प्रसारमाध्‍यमां...

जान है तो जहान है

Image
लॉकडाऊनमुळे कंटाळा आलाय, घरात बसवत नाही, शारीरिक व्यायाम होत नाही, प्रवास करता येत नाही, मनासारखी शॉपिंग करता येत नाही, रस्त्यावर भटकताही येत नाही अशा तक्रारी सध्या वाढू लागल्यात. पंधरा वीस दिवस घरातच बसल्याने अनेक लोक अस्वस्थ झालेत. १४ तारखेला लॉकडाऊन शिथिल होईल या आशेने बसलेल्यांची तर घनघोर निराशाच झाली. परवा बांद्रा रेल्वे स्टेशनवर गावी परतण्यासाठी हजारो लोक जमा झाल्याने प्रचंड गोंधळ उडाला. खरेतर या गोष्टींवरून लोकांना अजून कोरोना विषाणूची दाहकता लक्षात आलेली दिसत नाही असेच म्हणावे लागेल. जगातील कोरोनाग्रस्तांची संख्या वीस लाखांवर गेली आहे. महाराष्ट्रात हा आकडा अडीच हजारापार गेला आहे. मृत्यूचा आकडा दोनशेच्या घरात आहे. मुंबईत ह्या आजाराचे देशामधील सर्वाधिक रुग्ण सापडले असताना लॉकडाऊन वाढवणे क्रमप्राप्तच होते. सरकारचा हा निर्णय सध्याच्या परिस्थीतिला धरूनच आहे. या विषाणूची निर्माण होत असलेली साखळी तोडणे अत्यंत महत्वाचे आहे. या विषाणूमुळे पसरलेली जागतिक महामारी पाहता सरकार लोकांच्या सुरक्षिततेसाठी गँभीर असताना अनेकांच्या ध्यानात ह्या आजाराचे गांभीर्य येत नाही हे खरेतर आकलनापलीकड...

कम्युनिटी संसर्ग अधिक भयावह

Image
कम्युनिटी संसर्ग अधिक भयावह कोरोना विषाणूने सध्‍या महाराष्‍ट्रात थैमान घातले आहे. या आजाराचे देशामध्ये सर्वाधिक रुग्‍ण महाराष्‍ट्रात आढळले आहेत जे दिवसांगणिक वाढतच चालले आहेत. मुंबईतील रुग्‍णसंख्‍या तर थांबण्‍याचे नावच घेत नाहीये. मुंबईतील अनेक भाग विशेषतः झोपडपट्टी क्षेत्र तर पूर्णपणे सील करण्‍यात आलेले आहेत. लोकांना प्रशासनामार्फत वारंवार आवाहन करुनदेखील घरी थांबायचे सोडून निरनिराळया बहाण्‍याने लोक अजुनही मोठया प्रमाणावर घराबाहेर पडताना दिसत आहेत. संसर्गाने पसरणारा हा ‍विषाणू असल्‍यामुळे एका व्‍यक्‍तीचा संसर्ग इतर अनेक व्‍यक्‍तींना होण्‍याची शक्‍यता असल्‍यामुळेच सरकारने राज्‍यातील पर्यायाने देशातील सर्व जनतेला घरातच राहण्यास बंधनकारक केले आहे जेणेकरुन सर्वसामान्‍य निरोगी व्‍यक्‍ती विषाणूबाधित व्‍यक्‍तीच्‍या संपर्कात येण्‍याची शक्‍यता कमी होईल आणि जगभरात प्रचंड नरसंहार  घडवत असलेल्‍या हया जिवघेण्‍या विषाणूला राज्यात वेळीच थो‍पविता येईल. मात्र अनेक अतिउत्‍साही व अतिआत्‍मविश्‍वासू लोकांना अजुनही हा पोरखेळ वाटतोय हीच मोठी शेकांतिका आहे. अनेकजण विविध प्रकारे किरकोळ कारणांनी व खोट...

गांभीर्य ओळखा, हा पोरखेळ नाही

Image
कम्युनिटी संसर्ग अधिक भयावह कोरोना विषाणूने सध्‍या महाराष्‍ट्रात थैमान घातले आहे. या आजाराचे देशामध्ये सर्वाधिक रुग्‍ण महाराष्‍ट्रात आढळले आहेत जे दिवसांगणिक वाढतच चालले आहेत. मुंबईतील रुग्‍णसंख्‍या तर थांबण्‍याचे नावच घेत नाहीये. मुंबईतील अनेक भाग विशेषतः झोपडपट्टी क्षेत्र तर पूर्णपणे सील करण्‍यात आलेले आहेत. लोकांना प्रशासनामार्फत वारंवार आवाहन करुनदेखील घरी थांबायचे सोडून निरनिराळया बहाण्‍याने लोक अजुनही मोठया प्रमाणावर घराबाहेर पडताना दिसत आहेत. संसर्गाने पसरणारा हा ‍विषाणू असल्‍यामुळे एका व्‍यक्‍तीचा संसर्ग इतर अनेक व्‍यक्‍तींना होण्‍याची शक्‍यता असल्‍यामुळेच सरकारने राज्‍यातील पर्यायाने देशातील सर्व जनतेला घरातच राहण्यास बंधनकारक केले आहे जेणेकरुन सर्वसामान्‍य निरोगी व्‍यक्‍ती विषाणूबाधित व्‍यक्‍तीच्‍या संपर्कात येण्‍याची शक्‍यता कमी होईल आणि जगभरात प्रचंड नरसंहार  घडवत असलेल्‍या हया जिवघेण्‍या विषाणूला राज्यात वेळीच थो‍पविता येईल. मात्र अनेक अतिउत्‍साही व अतिआत्‍मविश्‍वासू लोकांना अजुनही हा पोरखेळ वाटतोय हीच मोठी शेकांतिका आहे. अनेकजण विविध प्रकारे किरकोळ कारणांनी व खोटय...

कोरोना आणि वृत्‍तपत्रे

Image
कोरोना आणि वृत्‍तपत्रे शहरी व ग्रामीण भागातील लोकांच्‍या जिवनात वृत्‍तपत्रांचे महत्‍व अनन्‍यसाधारण आहे. आजकालच्‍या सोशल माध्‍यमाच्‍या दुषीत व संभ्रमावस्‍था निर्माण करणा-या वातावरणात विश्‍वासार्ह बातम्‍या वाचण्‍यासाठी लोक वृत्‍तपत्रांकडे वळतात. त्‍यामुळे घरोघरी वाचली जाणारी ही वृत्‍तपत्रे आपले एक वेगळे स्‍थान जनमानसांत टिकवून आहेत. मात्र सध्‍या कोरोना प्रादुर्भावाच्‍या पार्श्‍वभुमीवर वृत्‍तपत्रांमधुनदेखील संसर्ग पसरतो असा समज तयार झाल्‍याने काही दिवसांपूर्वी या वृत्‍तपत्रांच्‍या विक्रीवरदेखील निर्बंध आणण्‍यात आले. मात्र वृत्तपत्रांमुळे करोना विषाणूचा संसर्ग होत नसल्याचे जागतिक आरोग्य संघटना व वैद्यकीय तज्ज्ञांनी स्पष्ट केल्याने वृत्तपत्र वाचकांमध्‍ये आनंदाची लहर पसरली आहे. आधीच लॉकडाऊनमुळे घरी बसलेल्‍या लोकांचा वेळ जात नाही. मिनिटामिनिटाला बदलणा-या न्‍युज चॅनलवरील त्‍याच त्‍याच बातम्‍यांनी लोक कंटाळुन गेलेले आहेत. त्‍यातच घरी येणारे हक्‍काचे वृत्‍तपत्रदेखील बंद झाल्‍याने चोखंदळ वाचकांमध्‍ये नाराजी होती. अनेक वृत्‍तपत्र मालकांनी तर वृत्‍तपत्रांवर निर्बंध आणल्‍याने छापाई करणे ...