पनवेलच्या वनवासी कल्याण आश्रमातील निराधार मुलांना कपडे व खाऊचे वाटप
*पनवेलच्या वनवासी कल्याण आश्रमातील निराधार मुलांना कपडे व खाऊचे वाटप* प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला जॉय ऑफ गिव्हिंग ह्या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून शनिवार दिनांक २५ जानेवारी २०२५ रोजी पनवेलच्या वनवासी कल्याण आश्रमातील निराधार मुलांना कपडे व खाऊचे वाटप करण्यात आले. मुंबई येथील व्यवसायिक श्री अर्जुन सिंग झाला यांनी आश्रमातील मुलांना नवीन कपडे शिवून देण्यासाठी आर्थिक सहाय्य केले. जॉय संस्थेच्या माध्यमातून सदर कपडे मुलांना वाटप करण्यात आले. तसेच यावेळी मुलांना खाऊचे वाटपही करण्यात आले. यावेळी जॉयचे नवी मुंबई समन्वयक वैभव पाटील आणि आरोग्य सेवेतील वैद्यकीय अधिकारी डॉ सुभाष घोलप उपस्थित होते. पनवेल वनवासी आश्रमाचे केंद्रप्रमुख राजेंद्र शिंदे यांनी उपस्थितांचे स्वागत करत आभारही व्यक्त केले. जॉय ऑफ गिव्हिंग ह्या संस्थेने नोव्हेंबरमध्ये दिवाळी भेट उपक्रम ह्या आश्रमातील मुलांसोबत साजरा करत त्यांना फराळ व जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले होते. त्यावेळी नव्या वर्षात ह्या निराधार मुलांना नवे कपडे उपलब्ध करून देण्याचा संकल्प जॉयमार्फत करण्यात आला होता. त्यानंतर मुंबईतील संवेदनशील व्यावसायिक अर्ज...