Posts

Showing posts from February, 2022

महाशिवरात्री - प्राचीन मंदिरांचे ठाणे-पालघर

Image
ठाणे पालघर मधील प्राचीन शिवमंदिरे यंदाच्‍या महाशिवरात्री उत्‍सवावरदेखील कोरोनाचे काहीसे सावट आहे. त्‍यामुळे अंबरनाथच्‍या शिवमंदिरासह काही शिवमंदिरांमधील यांत्रावर निर्बंध आणण्‍यात आलेले आहेत. महाराष्‍ट्रामध्‍ये अनेक शिवमंदिरे प्रसिध्‍द असुन या ठिकाणी सतत भाविकांची वर्दळ सुरु असते. ठाणे जिल्‍हयातील अंबरनाथ आणि खिडकाळी येथील प्राचीन शिवमंदिर सर्वपरिचीत आहेत. तसेच ठाणे शहराच्या प्राचीनत्वाची खूण सांगणारे एक मंदिर म्हणजे कौपिनेश्वर मंदिर. मासुंदा तलावाजवळ असलेल्‍या या मंदिराची उभारणी १७६०मध्ये झाली. पेशव्यांच्या दरबारी असलेल्या सरसुभेदार रामजी बिवलकर यांनी हे मंदिर बांधले आहे. पेशव्‍यांनी १७६० साली बांधलेल्‍या हया मंदिरातील शिवलिंग तब्बल तीन फूट उंच आणि १२ फुटांचा गोलाकार घेर भव्य आकाराचे आहे. मंदिराच्या सभागृहाला १६ कलात्मक खांब असून खांबाच्या तळाशी कलशाची चित्रकृती कोरण्यात आलेली आहे. डोंबिवलीच्या ग्रामीण भागात सागाव येथे असलेले पिंपळेश्वर हे मंदिर १५० वर्षांपूर्वीचे आहे. शहापूर तालुक्यातील आणि टिटवाळय़ापासून जवळच असलेले श्रीगंगा गोरजेश्‍वर हया ५०० वर्ष...

कारवायांबाबत साशंकता

Image
वास्तविक अनधिकृत बांधकामे हा सर्वच महानगरपालिकांच्या दृष्टिकोनातून डोकेदुखीचा विषय आहे. रातोरात बनवली जाणारी बेकायदा बांधकामे, झोपडपट्टी निर्माण, वाढीव मजले, अतिक्रमणे अशा प्रकारे नियमबाह्य बांधकामांना निर्माण करणारे अनेक भूमाफिया व त्यांना अभय देणारे प्रशासकीय घटक महानगरपालीकांमध्ये सक्रिय आहेत. सर्वच बाबतीत आर्थिक व्यवहार दडलेले असल्याकारणाने अशी प्रकरणे उघड होऊ न देता दाबण्याचे प्रकार वाढू लागले आहेत. मात्र सध्या राजकीय व्यक्ती त्याचा एकमेकांवर कुरघोड्या करण्यासाठी व राजकीय लाभासाठी वापर करताना दिसू लागले आहेत. राजकीयदृष्ट्या एखाद्या नेत्याची प्रतिमा बिघडवण्यासाठी अनधिकृत बांधकामांवर कारवाईचा आधार घेतला जात असेल तर ते कितपत योग्य आहे याचा विचार व्हायला हवा. खरोखरच एखाद्या प्रतिष्ठित व्यक्तीने आपल्या मालकीच्या बांधकामामध्ये काही अनियमितता केली असेल तर त्यावर बांधकाम झाल्यानंतर लगोलग कारवाई व्हायला हवी. केवळ राजकीय लाभासाठी व निवडणुका डोळ्यासमोर ठेवून प्रशासकीय यंत्रणांच्या आधारे केल्या जाणाऱ्या अशा कारवाया समन्यायी नाहीत. अनधिकृत बांधकामांवरील कारवाया नियमित स्वरूपात व बड...

अशाने कृषिप्रधान देश म्हणून ओळख पुसली जाईल

Image
अनियमित ऋतुचक्र, सततचा दुष्काळ, अवकाळी पर्जन्यमान व वाढता कृषी खर्च यामुळे शेतीची अवस्था आज दोलायमान स्थितीत आहे. उत्पन्नाची हमी राहिलेली नसल्याने शेतकऱ्यांची मुले आज शेतीकडे वळत नाहीत. एकेकाळी सर्वाधिक भाताचे उत्पादन घेणाऱ्या कोकणात तर शेतकरी केवळ नावाला शिल्लक आहे. मौसमी पिके घेणारा शेतकरी आज कर्जबाजारी अवस्थेत आहे. शेतीला जोडधंदे निर्माण झाले मात्र ते करण्यासाठी इच्छाशक्ती व रिस्क वाढल्याने फार लोक त्याकडे वळत नाहीत. शहरात येऊन नोकरी, धंद्यात स्थिरावण्याकडे लोकांचा कल वाढतो आहे ज्यात नियमित व वाढत्या उत्पन्नाची हमी निश्चितपणे मिळते. हीच परिस्थिती कायम राहिली तर काही वर्षांत राज्यातील शेती नामशेष होईल. यासाठी शेतकऱ्यांना सरकारी बळ देण्याची गरज आहे. शेतकऱ्यांना दरवर्षी कर्जमाफी देण्यापेक्षा त्यांना कर्जबाजारी होऊ न देण्यासाठी प्रयत्न आवश्यक आहेत. शेतीपिकांना हमीभाव, बिनव्याजी कर्ज, सहजसाध्य कर्जप्रक्रिया, शेतीत नव्या प्रकारांचा व प्रजातींचा समावेश, अधिक उत्पादन व उत्पन्न देणाऱ्या पिकांचा प्रसार अशा उपाययोजना शेतीतील गुंतवणूक वाढवतील. शेतीमधील कष्ट कमी व्हायला हवेत. त्याचप्...

वॉटर टॅक्सीचे दर कमी करा

Image
मोठया प्रतिक्षेनंतर मागील आठवडयात केंद्र व राज्‍य शासनाच्‍या प्रयत्‍नाने नवी मुंबई शहराला मुंबईशी जोडणारी बेलापूर ते भाऊचा धक्‍का ही देशातील पहिली वॉटर टॅक्‍सी सेवा अखेर सुरु करण्‍यात आलेली आहे. बेलापूर जेट्टीवरून सुटणारी ही वॉटर टॅक्सी भाऊचा धक्का आणि एलिफन्टा या दोन मार्गांवर जाणार आहे.  मात्र ही वाहतूक नियमित प्रवासी वाहतूक आहे की केवळ पर्यटनासाठी असा प्रश्‍न उपस्थित होत आहे. या जलवाहतुकीच्‍या प्रवासाचे असलेले दर पाहता ही वॉटर टॅक्सी सेवा सर्वसामान्यांपासून दूरच राहणार असल्याचे चित्र आहे. अनेक जण मोठ्या उत्साहाने या वॉटर टॅक्सी सेवेचा लाभ घेण्यासाठी बेलापूर जेट्टीवर जात आहेत, मात्र येथील प्रवासीभाडे ऐकून त्यांचा हिरमोड होत असून ते माघारी परतत आहेत. त्यामुळेही वॉटर टॅक्सी सेवा सर्वसामान्य, मध्यमवर्गीयांना परवडणारी नसल्‍याने त्‍याचा काहीही लाभ दररोज मुंबईकडे प्रवास करणा-या नवी मुंबईकरांना होणार नाही. बेलापूर ते भाऊचा धक्का यासाठी १२०० रुपये आणि घारापुरीसाठी ६६० रुपये तिकीटभाडे आहे. बेलापूर ते मुंबई मासिक पास तर १२ हजार रुपयांचा आहे. त्यामुळे हे प्रवासभाडे सर्वसामान्यां...

सरकारने सकारात्मकता दाखवावी

Image
गेल्‍या ३ महिन्‍यांपासुन सुरु असलेला एसटीचा संप आता प्रवाशांच्‍या अंगवळणी पडला असला तरी ग्रामीण जनतेला त्‍याचा फार मोठा भुर्दंड सोसावा लागत आहे. शहरी जनतेवर एसटी संपाचा फार मोठा परिणाम जाणवत नसला तरी ग्रामीण जिवनवाहिनी समजली जाणारी एसटी बंद झाल्‍याने ग्रामीण दळणवळण पूर्णतः मंदावले आहे. खाजगी वाहतुक सर्वांनाच परवडत नाही किंवा अनेक ठिकाणी उपलब्‍धच नाही. अशा प‍रिस्‍थीतीत शालेय विदयार्थी, शेतमालवाहतूक करणारे शेतकरी, रोजगारासाठी घराबाहेर पडणारे चाकरमानी असे सर्वच घटक एसटी संपाने बाधित आहेत. यामुळे ग्रामीण भागाचा विकास खुंटत आहे. एसटी विलीनीकरणाचा प्रश्‍न न्‍यायप्रविष्‍ठ असला तरी हा संप दोन्‍ही बाजुंनी सामोपचाराने मिटवायला हवा होता. एकमेकांना जबाबदार धरुन लोकांचे हाल करण्‍यात काही अर्थ नाही. या संपाने राज्‍यात उदभवलेली अभूतपूर्व व गंभीर परिस्‍थीती लक्षात घेता न्‍यायालयाने नेमलेल्‍या समितीने आपला अहवाल विनाविलंब सरकारकडे सादर करायला हवा. तसेच सरकारनेदेखील सकारात्‍मकता दाखवत एसटी कर्मचा-यांच्‍या गेल्‍या अनेक वर्षांच्‍या सेवेचा व मागण्‍यांचा विचार करुन निर्णय घ्‍यावा. मात्र तोवर प्र...

छत्रपती शिवाजी महाराज जयंती

Image
शिवछत्रपती जयंती. मराठी साम्राज्याची मुहूर्तमेढ रोवण्यासाठी ज्या दिवशी एका तेजस्वी सूर्याने जन्म घेतला तो दिवस. ज्या काळात मुघल सम्राज्यविरुद्ध मुखातून ब्र काढण्याची सोय नव्हती त्या काळात मराठी मुलखाची शान असणारा भगवा हातात घेऊन मुघलांच्या ताब्यातील गड, किल्ले व मुलुख परत मिळविण्यासाठी जीवाचे रान करणारा स्वाभिमानी राजा म्हणजे शिवछत्रपती. महाराष्ट्राचा इतिहास छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शौर्यगाथांनी समृद्ध झाला आहे. रयतेचा राजा, उत्तम संघटक आणि पराक्रमी योद्धा म्हणून त्यांनी आजवर फत्‍ते केलेल्‍या अनेक मोहिमा आज आपल्‍यासाठी प्रेरणादायी आहेत. १९ फेब्रुवारी १६३० रोजी शिवनेरी गडावर या तेजस्‍वी ता-याचा जन्‍म झाला व त्‍याने न भुतो असा इतिहास घडवला. मर्दमराठी मावळ्यांना मातृभूमी व स्वतःच्या ताबेदारीबाबत जाणीव करून देऊन त्यांना सोबत घेऊन मुघलांना सळो कि पळो करून सोडणारा आमचा शिवाजी. ज्याचे नाव मराठी माणसाच्या हृदयात व मनात कायमचे कोरले गेले आहे व ज्याच्या वंदनाशिवाय आज कोणत्याही क्रांतिकारी कामाची सुरुवात करता येत नाही तो तमाम मराठ्यांचा व हिंदूंचा आदर्श म्हणजे शिवछत्र...

समन्यायी नियमांची अपेक्षा

Image
लेपळे नियामक या संपादकीयमधून (दै लोकसत्‍ता, १७ फेब्रुवारी) सेबी व आरबीआय हया देशातील प्रमुख नियंत्रक मंडळांवर अचूक बोट ठेवले आहे. धनदांडग्‍या उदयोगांसमोर माथे टेकणा-या सेबीच्‍या धोरणांचा फटका आर्थिक अशक्‍त उदयोगांना अनेकदा बसलेला आहे. उदयोगांसाठी आखून दिलेल्‍या नियमांची अंमलबजावणी होत नाही म्‍हटल्‍यावर ते नियम ऐच्‍छीकतेत परावर्तीत करणे ही एक प्रकारची शरणागतीच आहे. बडया उदयोजकांवर नियंत्रण ठेवण्‍याचे प्रमुख काम सेबीचे असताना अशा प्रकारे नियम न पाळणा-या बडया उदयोजकांवर बडगा उगारण्‍याऐवजी त्‍यांना पाळत नसलेले तेच नियम एच्छिक करणे उदयोगक्षेत्रासाठी शिस्‍तीचे नाही. आरबीआयनेदेखील गेल्‍या काही वर्षात आपली वक्रदृष्‍टी सहकारी बॅंकावर फिरवली आहे. धनदांडग्‍यांच्‍या राष्‍ट्रीयीकृत बॅंकाना अभय तर सामान्‍य लोकवस्‍त्‍यांमधील सहकारी बॅंकांवर काटेकोर कारवाई व परिणामी निर्बंध अशी परिस्‍थीती आहे. एखादी धनाढय बॅंक बुडीत निघाली वा अडचणीत सापडली तर तिला वाचवायला आरबीआय तिचे विलीनीकरण तरी करणार किंवा अर्थसहाय उपलब्‍ध करणार मात्र तेच एखादी सहकारी बॅंक अडचणीत आली तर वर्षानुवर्षे तिच्‍या...

व्हॅलेन्टाईन हा काही सण नाही!

Image
प्रेम व्यक्त करण्याच्या अनेक पद्धती आपल्याकडे दृढ आहेत. व्हॅलेंटाईन डे ह्या एकाच विशिष्ट दिवशी प्रेम व्यक्त का करावे हा खरा तर यक्षप्रश्न आहे. ज्याच्यावर आपले खरे प्रेम आहे ती व्यक्ती सदासर्वदा आपल्यासाठी प्रेमाचीच असते. त्यामुळे प्रेम व्यक्त करण्यासाठी ठराविक दिवस, वेळ, काळ असू शकत नाही. व्हॅलेन्टाईन डे हा कुठला भारतीय सण, उत्सव नाही की जो जल्लोषात साजरा केला पाहिजे. गेल्या काही वर्षांत या दिवशी तरुण, अल्पवयीन मुलामुलींचा जो काही धांगडधिंगा पाहायला मिळत होता त्यामुळे व्हॅलेन्टाईनला विरोध वाढत गेला. पाश्चात्य संस्कृतीचे अनुकरण मोठया प्रमाणावर होऊ लागल्याने भारतीय सुसंस्कृतपणा कुठेतरी लुप्त होत चाललाय. गुढीपाडव्याएवजी ३१ डिसेंबरला नव्या वर्षाचे धुंदावस्थेत स्वागत करणारी आजची पिढी व्हॅलेन्टाईन डेलादेखील आपला सण समजत आहेत. त्याऐवजी या दिवशी काहीतरी समाजोपयोगी कामे करून या दिवसाप्रति आपली सद्भावना प्रकट करायला काय हरकत आहे?  वैभव मोहन पाटील  घणसोली, नवी मुंबई 

जॉय ऑफ गिव्हिंगची पालघर जिल्ह्यातील विद्यार्थी व वृद्धाश्रमास मदत - नवे वर्ष नवा उपक्रम

Image
जॉय संस्थेनी केली वाडा-काटी गावातील आदिवासी विद्यार्थ्यांना मदत शनिवार दिनांक १२ फेब्रुवारी २०२२ रोजी जॉय ऑफ गिव्हिंग मुंबई सामाजिक संस्थेमार्फत पालघर जिल्ह्यातील काटी या दुर्गम खेडेगावातील शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक व दैनंदिन गरजेच्या वस्तूंचे वाटप करण्यात आले. जॉय ऑफ गिव्हिंग मार्फत समाजातील गरीब, गरजू व दुर्बल घटकांना सातत्याने विविध स्वरूपात सहाय्य करण्यात येते. संस्थांमार्फत आजवर महाराष्ट्र राज्यातील विविध ठिकाणच्या आदिवासी शाळा, वृद्धाश्रम, अनाथालयांना मदत करण्यात आलेली आहे. काटी गाव हे पालघर जिल्ह्याचे दुर्गम व अखेरचे टोक. या गावातील शाळेत बालवर्गात ४५ मुले तर प्राथमिक शाळेत ५० विद्यार्थी शिकत असून सर्व विद्यार्थी आदिवासी, आर्थिकदृष्टया दुर्बल घटकात मोडतात. त्यांचेपर्यंत मदत पोहोचवण्याची आवश्यकता लक्षात घेता शनिवारी सकाळी जॉय संस्था व शाळेच्या वतीने एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सदर कार्यक्रमात बालवर्गाच्या मुलांना शैक्षणिक साहित्य तर प्राथमिक वर्गात शिकणाऱ्या मुलांना दैनंदिन गरजेच्या किराणा वस्तूंचे वाटप संस्थेच्या वतीने करण्यात आले. तसेच शाळे...

अशाने शेती नामशेष होईल

Image
अनियमित ऋतुचक्र, सततचा दुष्काळ, अवकाळी पर्जन्यमान व वाढता कृषी खर्च यामुळे शेतीची अवस्था आज दोलायमान स्थितीत आहे. उत्पन्नाची हमी राहिलेली नसल्याने शेतकऱ्यांची मुले आज शेतीकडे वळत नाहीत. एकेकाळी सर्वाधिक भाताचे उत्पादन घेणाऱ्या कोकणात तर शेतकरी केवळ नावाला शिल्लक आहे. मौसमी पिके घेणारा शेतकरी आज कर्जबाजारी अवस्थेत आहे. शेतीला जोडधंदे निर्माण झाले मात्र ते करण्यासाठी इच्छाशक्ती व रिस्क वाढल्याने फार लोक त्याकडे वळत नाहीत. शहरात येऊन नोकरी, धंद्यात स्थिरावण्याकडे लोकांचा कल वाढतो आहे ज्यात नियमित व वाढत्या उत्पन्नाची हमी निश्चितपणे मिळते. हीच परिस्थिती कायम राहिली तर काही वर्षांत राज्यातील शेती नामशेष होईल. यासाठी शेतकऱ्यांना सरकारी बळ देण्याची गरज आहे. शेतकऱ्यांना दरवर्षी कर्जमाफी देण्यापेक्षा त्यांना कर्जबाजारी होऊ न देण्यासाठी प्रयत्न आवश्यक आहेत. शेतीपिकांना हमीभाव, बिनव्याजी कर्ज, सहजसाध्य कर्जप्रक्रिया, शेतीत नव्या प्रकारांचा व प्रजातींचा समावेश, अधिक उत्पादन व उत्पन्न देणाऱ्या पिकांचा प्रसार अशा उपाययोजना शेतीतील गुंतवणूक वाढवतील. शेतीमधील कष्ट कमी व्हायला हवेत. त्याचप्...

लस न घेतलेल्यांवर कारवाई आवश्यक

Image
कोविडच्या पहिल्या व दुसऱ्या लाटेत लोकांमध्ये दिसून आलेली भीती सध्या रुग्णासंख्या वाढत असतानाही दिसून येत नाही. कोविड चाचणी पॉझिटिव्ह आली तरी दोन तीन दिवसांतच लक्षणे नाहीशी होत असल्याने या आजाराचा धोका तसा कमी झालेला आहे. याला कारणीभूत खरेतर कोविड लसीकरण आहे. बहुतांश नागरिकांचे लसीकरण पूर्ण झालेले असल्याने कोविड संसर्गाचे सुरक्षा कवच त्यांना लाभलेले आहे. त्यामुळे लोकांमधील संसर्गाची व मानसिक भीती बऱ्याच अंशी कमी झालेली आहे. तसेच कोविडची लागण झाल्यावर दिसून आलेला मृत्युदरदेखील कमी झाल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. त्यामुळे लसीकरणाचा सकारात्मक परिणाम कोविड साथीच्या बाबतीत दिसून येत आहे. मात्र अद्यापि अनेक नागरिक लसीकरणापासून दूर असून पहिला डोस घेतल्यानंतर दुसऱ्या डोस न घेतलेल्यांची संख्याही मोठी आहे. अशा व्यक्ती तुलनेत लवकर बाधित होतात व इतरांनाही संसर्गाचा जास्त धोका निर्माण करतात. सध्यातरी लसीकरण हा एकमेव सक्षम उपाय कोविड प्रतिबंधासाठी उपलब्ध आहे. त्यामुळे लसीची पहिली किंवा दुसरी मात्रा घेण्यासाठी अद्यापि तयार न झालेल्या किंवा वंचीत राहिलेल्या व्यक्तींना शोधून त्यांना प्...

कोरोना काळातही समतोल

Image
गेल्या दोन वर्षांपासून कोरोना प्रादुर्भावाने भारतीय जनजीवन व अर्थव्यवस्था पार कोलमडून गेली आहे. करप्रणालीत निर्माण झालेली तूट देशाच्या अर्थकारणावर थेट परिणाम करणारी ठरत आहे. अशा परिस्थितीत मंगळवारी जाहीर झालेला केंद्रीय अर्थसंकल्प नक्कीच समतोल साधणारा आहे. शिक्षण व आरोग्यासारख्या महत्वपूर्ण बाबींवर अर्थसंकल्पात लक्ष केंद्रित करण्यात आले असून तो रोजगार व डिजिटल व्यवहारांना चालना देणारादेखील आहे. आरोग्य क्षेत्रात करण्यात आलेली वाढीव तरतूद आरोग्यव्यवस्थेला बळकट करणारी ठरणार आहे. खाजगी बँकांची कमी होत चाललेली विश्वासार्हता पाहता पोस्ट ऑफिस बँकिंगला बळ मिळाल्यास लोकांना आर्थिक सुरक्षिततेचा चांगला पर्याय मिळेल. ऑनलाइन शिक्षणाचे वाढते महत्व लक्षात घेता विद्यार्थ्यांना टीव्ही चॅनेल्सच्या माध्यमातून शिक्षण उपलब्ध करून देण्याचा पर्याय स्वागतार्ह आहे. 'हर घर नल से जल' तसेच नदी जोड प्रकल्प जलसमृद्धी मिळवून देणारे आहेत. वाढत चाललेले खाद्यतेलाचे भाव पाहता तेलबियांच्या उत्पादनाला चालना देण्याची भूमिका आगामी काळात सर्वसामान्यांच्या किचनचे बजेट कमी करेल अशी आशा करण्यास हरकत नाही. जव...

वाईनबाबत स्पष्टता करावी

Image
महाराष्ट्रात किराणा दुकानांत वाईन विक्रीला परवानगी देण्यात आलेली आहे. राज्यात वाईन धोरण प्रामुख्याने द्राक्ष बागायतदार शेतकऱ्यांना फायदा व्हावा, तसेच वाईन उद्योगाला चालना मिळावी, या हेतूने राबवण्यात येत असल्याचे सरकारी म्हणणे आहे. मात्र वाईन हा शब्द केवळ शेतीजन्य पिकांशी संबंधित आहे असे मानने संयुक्तिक ठरणार नाही. कारण राज्यातील मद्य विक्री करणाऱ्या सर्व दुकानांना वाईन शॉप म्हणून संबोधले जाते. वाईन हा प्रकार पूर्णतः अल्कोहोलमुक्त नाही, त्यामुळे तो नशेच्या प्रकारातच मोडतो. त्यामुळे वाईनला किराणा दुकानात विकायला परवानगी दिल्यास त्याचा वापर सर्रास होण्याची शक्यता आहे. वाईनचे औषधी वापर असतील तर ते लोकांना अगोदर पटवून द्यायला हवेत. वाईनमध्ये समाविष्ट घटक जाहीर करायला हवेत. अचानकपणे घेतलेल्या ह्या निर्णयाने सर्वत्र आरोप प्रत्यारोप, शंका कुशंकांना वाव मिळत आहे. वाईनच्या बाबतीत अनेक संभ्रम सध्या राज्यातील जनतेत आहेत. वाईन हा प्रकारच मुळात मद्याशी संबंधित असल्याने त्याच्या खुल्या विक्रीचे समर्थन करता येणार नाही. वाईन हा मद्याचा प्रकार नसेल तर दारू विक्री दुकानांच्या (वाईन शॉप) नावात...

विराटने आणखी खेळत राहावे

Image
विराट कोहली भारतीय क्रिकेटच्‍या आजवरच्‍या इतिहासातील सर्वात यशस्‍वी कर्णधार राहिला आहे. २०१४ मध्ये महेंद्रसिंग धोनीने कसोटी कर्णधारपद सोडल्यानंतर ‘बीसीसीआय’ने कोहलीची नियुक्ती केली होती. कोहलीच्या कसोटी नेतृत्वाच्या कारकीर्दीत भारताने जागतिक क्रमवारीतील अग्रस्थान गाठले. जागतिक कसोटी अजिंक्यपदाचे उपविजेतेपद पटकावले. विराटने ६८ कसोटी सामन्यांमध्ये संघाचे नेतृत्व केले, त्यापैकी ४० सामने भारताने जिंकले. कर्णधार म्हणून भारताने २०१५ मध्ये श्रीलंकेत कसोटी मालिका जिंकली होती. २२ वर्षात प्रथमच भारताने हा पराक्रम केला. याशिवाय त्याच्या नेतृत्वाखाली भारताने २०१८-१९ मध्ये ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच भूमीवर पराभूत केले. त्याच वर्षी भारताने वेस्ट इंडिजविरुद्धची मालिकाही जिंकली होती. मात्र दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेतील अनपेक्षित पराभवानंतर विराट कोहलीने शनिवारी कसोटी कर्णधारपदाचा राजीनामा देत भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला (बीसीसीआय) व तमाम क्रिकेट रसिकांना धक्का दिला आहे. गेल्‍या काही दिवसांपासुन कोहलीचे ‘बीसीसीआय’शी त्याचे संबंध चिघळले होते. त्‍यामुळे क्रिकेटमधील राजकारणाला कंटा...