Posts

Showing posts from August, 2019

सणांचे बदलते स्वरूप

Image
गेल्या काही वर्षामध्ये दहीहंडी, गणेशोत्सव, नवरात्रोत्सवाचे स्वरूप पूर्णतः पालटले आहे. हे सण साजरा करण्यामागील उद्देश बाजूला पडून त्यात मोठ्या प्रमाणावर स्पर्धा व अर्थकारण शिरले आहे. राजकीय पक्षांच्या दृष्टीने ही मोठी सुवर्णसंधीच असते. त्यामुळे राजकीय पक्ष पुरस्कृत गणेश मंडळांमध्ये प्रचंड चढाओढ पाहायला मिळते. भव्यदिव्य देखावे व आरास यासाठी मोठा खर्च करण्यात येतो. सध्या या सणांचा एक प्रकारचा इव्हेंट झाल्याचे पहायला मिळते व त्यातूनच गणेशोत्सवात 'नवसाला पावतो' ही संकल्पना पुढे आली. अशा प्रकारचा प्रचार करणाऱ्यांवर आता कारवाईचा बडगा उगारण्याचा घेतलेला निर्णय आशादायक आहे. सर्वच मोठ्या सार्वजनिक उत्सवांमध्ये खूप प्रमाणावर अर्थकारण होत असते. यात तगडया प्रायोजकांच्या जाहिराती मंडळांच्या मंडपांत आढळतात. काही मंडळांचे गणपती नवसाला पावतात, असा समज असल्याने भाविकांच्या मोठया रांगा लागतात. काही गणपतींच्या दर्शनासाठी ‘सेलिब्रेटीं’ची गर्दी असते, त्यांना पाहण्यासाठीच भाविक गर्दी करतात. महाराष्ट्रात गोपाळकाला, गणेशचतुर्थी, नवरात्रोत्सव अशा सणांच्या कालावधीत आनंदाला उधाण आलेले असते. नऊ थर, १०...

मोदी सरकारची वाटचाल आश्वासक

Image
रिझर्व बँकेने सरकारला 1 लाख 76 हजार 51 कोटी हस्तांतर करण्याचा निर्णय घेतला आहे. देशातील सध्याची आर्थिक परिस्थिती पाहता यामुळे केंद्र सरकारला मोठा आर्थिक दिलासा मिळणार असून कर महसूल आणि खर्चाचा ताळमेळ राखण्यात सरकारला याची मदत होणार आहे. सध्या रिझर्व्ह बॅंकेकडे जवळपास 9.43 लाख कोटींहून अधिक राखीव निधी आहे. या राखीव निधी बाबत पुनर्विचार करण्यासाठी एक समिती नेमली होती. या समितीकडून मिळालेल्या अहवालाच्या आधारे 2018-19 या वर्षात 1 लाख 23 हजार 414 कोटींचा निधी सरकारला देण्यात येणार आहे. त्याशिवाय 52 हजार 637 कोटींचा अतिरिक्त तरतूद केली जाणार असल्याचे रिझर्व्ह बॅंकेने म्हटले आहे. रिझर्व्ह बॅंकेकडून मिळाणाऱ्या निधीने चालू वर्षातील आर्थिक तूट भरून काढण्यासाठी नक्कीच हातभार लागेल व विकासकामांना अधिक गती मिळेल. स्विस बँकेतील काळा पैसा परत मिळवणे गेल्या अनेक वर्षांत कोणत्याही सरकारला जमलेले नाही. आंतराष्ट्रीय आर्थिक धोरणांनुसार तांत्रिक अडचणींची अनेक कारणे त्यासाठी देण्यात येत असली तरी देशाबाहेर गेलेला हा काळा पैसा देशात परत आणून सरकारजमा होणेदेखील आवश्यक आहे. मोदी सरकारची सध्याची वाटचाल त्या ...

कधी लागणार आचारसंहिता?

Image
विधानसभेचा कार्यकाळ संपण्याआधी नवे सरकार नियुक्त होणे अपेक्षित आहे. या विधानसभेचा कार्यकाळ 9 नोव्हेंबरला संपत असून त्याआधी निवडणुकीची प्रक्रिया पूर्ण होणे आवश्यक आहे. विधानसभा निवडणूकीबाबत सध्या सर्वांच्याच मनात प्रचंड उत्सुकता असून अनेक तर्क वितर्क लढवले जात आहेत. मागील 2014 च्या निवडणुकीचा अनुभव पाहता गणेशोत्सवानंतर म्हणजे 12 सप्टेंबरनंतर निवडणुकीच्या तारखा जाहीर होण्याची शक्यता आहे. साधारणतः 15 ते 20 ऑक्टोबरच्या दरम्यान निवडणूक होण्याची शक्यता आहे. गणेशोत्सवानंतर आणि 25 ऑक्टोबरला सुरू होणाऱ्या दिवाळीपूर्वी मतदान घेतले जाईल अशी शक्यता आहे.  2 ते 12 सप्टेंबर या कालावधीत राज्यात गणेशोत्सव आहे. 12 सप्टेंबरला गणेश विसर्जन झाल्यानंतर लगेचच सप्टेंबरच्या दुसर्‍याच आठवड्यात विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर होतील. म्हणजेच साधारणतः 15 सप्टेंबरपासून आचारसंहिता लागण्याची दाट शक्यता आहे.  वैभव मोहन पाटील  घणसोली, नवी मुंबई

महाआरोग्य शिबिरांचा महायज्ञ

Image
वैद्यकीय व दंत शिबिरांचे राज्यस्तरीय उदघाटन सार्वजनिक आरोग्‍य विभागाच्‍या वतीने सातत्‍याने आरोग्‍य शिबीरे महाराष्‍ट्रभर भरवण्‍यात येतात ज्‍यांचा लाभ हजारो, लाखो गोरगरीब लोकांना होतो. राष्‍ट्रीय आरोग्‍य अभियान या केंद्र शासन पुरस्‍कृत योजनेच्‍या माध्‍यमातुन आदिवासी जिल्‍हयांमध्‍ये वैदयकीय व दंत आरोग्‍य शिबिरांचे आयोजन नियमितपणे करण्‍यात येत आहे. एखाद्या रोगावर उपचारापेक्षा तो होऊ नये यासाठी प्रतिबंधात्मक उपायांवर आरोग्य विभागाचा भर आहे. त्यासाठी राज्यात महाआरोग्य शिबीरे घेतली जात आहेत. या वर्षी पालघर, ठाणे, रायगड, पुणे, नाशिक, नंदुरबार, धुळे, जळगाव, यवतमाळ, अमरावती, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदीया, नांदेड या १६ आदिवासी जिल्‍हयांमध्‍ये एकाच वेळी वैदयकीय व दंतचिकीत्‍सा महा आरोग्‍य शिबिरांचे आयोजन करण्‍यात आले. नांदेड, धुळे, अमरावती व नोगपूर या जिल्‍हयांमध्‍ये सदर महाआरोग्‍य शिबिर २४ ऑगस्‍ट पासुन सुरु झाले तर उर्वरीत जिल्‍हयांमध्‍ये २६ ऑगस्‍ट पासुन सुरु करण्‍यात आले. सदरील महाआरोग्‍य शिबिराचे १२ जिल्‍हयांमधील राज्‍यस्‍तरीय उदघाटन डिजीटल पध्‍दतीने दिनांक २६ ऑगस्‍ट २०१९ रो...

Collaboration with Swades Foundation for better health services

Image
MoU signed on 27th Aug Public Health Department of Maharashtra is committed to health and wellbeing for all and realises the potential of Public Private Partnership to compliment the efforts of government in delivering the holistic health services. In order to take this forward and encourage NGO's participation, Commissioner Health Services and Mission Director NHM Dr Anup Kumar Yadav has signed a MoU with Swadesh foundation at Arogya Bhavan on 27th August, 2019. In particular, the Swades Foundation has been doing some good work in the district of Raigad and assisting the government counter the health issues like cataract, anaemia and malnutrition. At the event Dr Anup Kumar Yadav has appreciated Swadesh Foundation for their work in Raigad district and conveyed his expectations to expand the similar services all over the State with same conviction and commitment. He wished them luck and expressed his willingness to encourage such collaboration with all the st...

सरकरीपेक्षा सामाजिक मदत अधिक

Image
कोल्हापूर सांगलीमध्ये आलेल्या महापुराने लोकांचे अतोनात नुकसान झाले आहे. शेतकरी, व्यापारी यांसह सर्वसामान्य लोकांचे यामध्ये सर्वस्व वाहून गेले आहे. हे नुकसान केवळ सरकारी मदतीने भरून निघणार नाही याची जाणीव असल्यामुळेच महाराष्ट्रभरातून संवेदनशील लोकांच्या, स्वयंसेवी संस्थांच्या मदतीचा महापूर या भागात वाहत आहे. झालेले नुकसान व वाताहात समोर दिसत असल्यामुळेच लोक आपापल्या परीने मदत घेऊन या भागाकडे धाव घेत आहेत. या घटनेतून महाराष्ट्राच्या मातीचा सुसंकृत व संवेदनशीलपणा पुन्हा एकदा जगासमोर आला आहे. सरकारने धनधान्य, आरोग्य या सर्वच पातळ्यांवर शक्य तितकी मदत करण्याचा प्रयत्न चालवला आहे. मात्र सरकारी मदतीपेक्षा सामाजिक मदतीचा हातभार या भागाचे नुकसान भरून काढण्यासाठी मोलाची भूमिका पार पाडत आहे हेदेखील तितकेच खरे आहे.  वैभव मोहन पाटील  घणसोली, नवी मुंबई

अवयवदान श्रेष्ठ दान

Image
जिवंतपणी रक्तदान तर मरणानंतर अवयवदान असे म्हटले जाते. अवयवदान हे मानवी आयुष्यातील सर्वात श्रेष्ठ दान असून या दानातून अनेकांना जगण्याची एक नवी उमेद मिळू शकते. याबाबत लोकांमध्ये जागृती येत असल्याने मुंबईसह राज्यात मोठया प्रमाणावर अवयवदानाच्या घटना पाहायला मिळू लागल्या आहेत. अशीच एक घटना नुकतीच नवी मुंबईत घडली. तीन ऑगस्ट रोजी एका चाळीस वर्षीय व्यक्तीचा अपघात झाला होता. त्यांच्यावर नवी मुंबईच्या अपोलो रूग्णालयात उपचार सुरू होते. उपचारादरम्यान त्यांना ब्रेनडेड घोषित करण्यात आले. कुटुंबीयांचे समुपदेशन करून त्यांना अवयदान करण्याची परवानी मागण्यात आली. त्यानुसार या व्यक्तीचे यकृत, दोन मूत्रपिंडे, हृदय दान करण्यात आले आहे. या व्यक्तीचे हृदय मुलुंडच्या फोर्टिस रुग्णालयाला देण्यात आले. यासाठी अपोलो ते फोर्टिस रुग्णालयामध्ये ग्रीन कॉरिडोर तयार करून हृदय पोहचवण्यात आले. नवी मुंबईतील अपोलो रुग्णालयात ६ ऑगस्टला या ४० वर्षीय व्यक्तीने केलेल्या अवयवदानामुळे व त्याच्या कुटुंबीयांनी दाखवलेल्या सद्भावनेने चार जणांना जीवनदान मिळणार आहे. ब्रेन डेड अवस्थेमध्ये असलेल्या चाळीस वर्षीय व्यक्तीचे अवयवदान करण्...

वृत्तपत्रलेखक हा समाजमनाचा आरसा

Image
22 ऑगस्‍ट रोजी वृत्‍तपत्रलेखक दिन साजरा करण्‍यात आला. समाजात घडणाऱ्या अनेक अनुचित, अन्यायकारक व नियमबाह्य गोष्टींबाबत प्रत्येक सुजाण नागरिकाच्या मनात प्रचंड चीड असते. ती व्यक्त करण्याचे कोणतेही साधन वा व्यासपीठ समान्यजनांकडे उपलब्ध नसते ही वस्तुस्थिती आहे. मात्र सर्वसामान्य नागरिकाने उचललेली लेखणी व त्यातून मांडलेले विचार नागरिकांच्या नजरेतून प्रशासनाला भेदणारे ठरू शकतात याचा प्रत्यय अनेकदा आलेला आहे. वृत्तपत्रातून सातत्याने विविध विषयांवर निस्वार्थीपणे लेखन करणारे वृत्तपत्रलेखक ही भूमिका चोख बजावत असतात. आज पत्रकारितेमध्ये व्यावसायिक दृष्टिकोन अधिक प्रमाणात वास करत असल्याचे पाहायला मिळते, नेतेमंडळी व व्यावसायिकांकडून रक्कमा उकळून बातम्या लावणाऱ्या दलालांचा शिडकाव ह्या क्षेत्रातदेखील पाहायला मिळतो. मात्र अत्यंत प्रामाणिकपणे व सामाजिक जबाबदारीने आपले कर्तव्य पार पाडणारे पत्रकारदेखील कार्यरत आहेत ज्यांच्यामुळे लोकांचा व राजकारण्यांचा थोडाफार विश्वास व त्यांना भीतीयुक्त दरारा पत्रकारितेबाबत आजदेखील टिकून आहे. मात्र प्रत्येक वृत्तपत्राचा अविभाज्य भाग असणाऱ्या वृत्तपत्रलेखकाला मात्र उपे...

आरोग्य कर्मचाऱ्यांचा पूरग्रस्त भागाला मदतीचा हात

Image
आरोग्य भवन कर्मचाऱ्यांचा संवेदनशील उपक्रम सालाबादप्रमाणे या वर्षीदखील आरोग्‍य सेवा आयुक्‍तालयामध्‍ये सत्‍यनारायण महापूजेचे आयोजन आज शुक्रवार दिनांक २३ ऑगस्‍ट २०१९ रोजी अधिकारी व कर्मचा-यांच्‍या वतीने करण्‍यात आले. दरवर्षी अधिकारी व कर्मचा-यांच्‍या वर्गणीतुन पूजेसाठी मनमोहक आरास, विदयुत रोषणाई, कर्मचा-यांसाठी दुपारच्‍या भोजनाची व्‍यवस्‍था, गुणवंत पाल्‍यांसाठी पारितोषिके  व कर्मचा-यांच्‍या कलागुणांना वाव देणारे मनोरंजनात्‍मक कार्यक्रम अशा प्रकारचे कार्यक्रम आयोजित करण्‍यात येतात. मात्र यंदा कोल्‍हापूर, सांगली परिसरात उदभवलेल्‍या पूरस्‍थतीच्‍या पार्श्‍वभुमीवर कर्मचा-यांनी महापूजेचा कार्यक्रम अगदी थोडक्‍यात उरकण्‍याचा निर्णय घेतला. पूजेसाठी कर्मचा-यांच्‍या वर्गणीतुन जमा झालेल्या रक्‍कमेतून पूरग्रस्‍त भागातील संसार उध्‍वस्‍त झालेल्‍या लोकांना मदतिचा हात देण्‍याचा निर्णय कर्मचा-यांनी घेतला आहे. आज या महापूजेसाठी विभागाचे आयुक्‍त डॉ. अनूपकुमार यादव सर, संचालक डॉ. साधना तायडे मॅडम, अतिरीक्‍त अभियान संचालक डॉ. सतिश पवार सर यांनी उपस्थिती दर्शवत आयो‍जक मंडळींचा उत्‍साह वाढवला. कार्यालया...

सामाजिक मदतीची गरज

Image
पश्चिम महाराष्ट्रातील पूरग्रस्त भागांत घरे, व्यवसाय, गुरे, रस्ते, वाहने याबरोबरच पिकांची देखील मोठी हानी झाली आहे. पिकांबरोबरच शेतकऱ्यांची वर्षभराची सुखी संसाराची स्वप्नेदेखील वाहून गेली आहेत. त्यामुळे पिकांच्या झालेल्या नुकसानीसाठी त्यांना विशेष मदतीची गरज आहे. मुख्यमंत्रांनी जाहीर केलेली एक हेक्टरच्या पिकांसाठीची कर्जमाफी बहुतांशी शेतकऱ्यांसाठी निश्चित उपयोगी ठरेल मात्र त्याचबरोबर त्यांना काही आर्थिक मोबदला दिला गेल्यास त्यांच्या मोडलेल्या संसारासाठी हातभार लागेल. त्यांच्यावर कोसळलेले वर्षभराचे धनधान्याचे संकट पाहता सरकारी मदतीबरोबरच सामाजिक मदतीचीदेखील त्यांना आवश्यकता आहे.  वैभव मोहन पाटील  घणसोली, नवी मुंबई 

पारदर्शकता आवश्यक

Image
सरकारी गृहनिर्माण योजनांच्या धोरणात बदल करताना एका लाभार्थीस एकच घर देण्याच्या निर्णयाचा फायदा या घरांसाठी प्रयत्न करणाऱ्या लोकांना निश्चितपणे होणार आहे. मात्र या घरांच्या सोडतीमध्ये सहभाग घेणाऱ्या लोकांची प्रचंड संख्या व घरांचे आवाक्याबाहेर गेलले भाव पाहिले तर सर्वसामान्य नागरिकांना याचा किती फायदा होईल याबाबत साशंकता आहे. त्यापेक्षा महाराष्ट्रीयन व अल्पबचत गटातील लोकांसाठी अधीकची घरे आणि त्यासाठी निकषांच्या पडताळणीमध्ये पारदर्शकता आणली तर ते सर्वसामान्यांच्या दृष्टीने जास्त लाभदायक होईल असे वाटते.  वैभव मोहन पाटील  घणसोली, नवी मुंबई

मोदींची प्लॅस्टिक मुक्त संकल्पना

Image
स्वातंत्र्यदिनाच्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी प्लास्टिक मुक्तीचा उल्लेख करून प्लॅस्टिकसारख्या समस्येचे गांभीर्य अधोरेखित केले आहे. प्लास्टिक हा अविघटनशील घटक असल्यामुळे निसर्गात त्याचा निचरा होत नाही. यामुळे जमा झालेले प्लास्टिक रसायनाचे रूप धारण करते व ते मानवी आरोग्यासाठी अत्यंत घातक आहे. निसर्गदेखील त्याला पचवू शकत नसल्याने त्याचा अतिरिक्त भार पर्यावरणावर पडतो व त्याचे देखील संतुलन बिघडते.  खरेतर प्‍लॅस्टिकजन्‍य पदार्थांपासुन बनवलेल्‍या राष्ट्रध्वजावर बंदी असतानादेखील प्रजासत्ताक व स्वातंत्र्यदिनी असे ध्वज सर्रास रेल्वे स्टेशन, बाजार, बस थांबे, रस्त्यारस्त्यांवर कसे उपलब्ध होतात हा प्रश्न पडतो, त्यामुळे असे राष्ट्रध्वज खरेदी न करण्याची जबाबदारी भारतीय नागरिकांचीच आहे. कापडी किंवा कागदी राष्ट्रध्वजच तसेच पिशव्याच वापराव्यात, त्यांची योग्य प्रकारे हाताळणी करावी व वापर झाल्यावर उचित मार्गाने विघटन करावे. पर्यावरण संतुलनाला हातभार लावणे हि प्रत्येकाची नैतिक जबाबदारी आहे, त्यामुळे मोदींची 'प्लॅस्टिकमुक्त भारत' हि संकल्पना प्रत्यक्षात उतरवण्यासाठी सर्व भारतीयांचा सहभाग ...

समर्पित आरोग्य सेवा

Image
सार्वजनिक आरोग्य सेवा दिवसागणिक संवेदनशील बनत चालल्याची अनेक उदाहरणे समोर येत आहेत. आरोग्य सेवेतील काही असंवेदनशील घटकांमुळे पूर्ण विभागाला दूषणे लागतात. मात्र ह्या सेवेत काम करणारे अनेक कर्मचारी रुग्णांप्रति प्रचंड सहानुभूती ठेवून काम करतात हेदेखील तितकेच खरे आहे. गेल्या आठवड्यात झालेल्या अतिवृष्टीत याचा परिचय कोल्हापूर जिल्ह्यात आला. कोल्हापुरातील निवडे प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रसूतीसाठी दाखल झालेल्या नीता खंदारे या गरोदर महिलेच्या कुटुंबियांना हा शासकीय सेवेच्या आपुलकीचा रोमांचक अनुभव आला. साखरी येथे राहणाऱ्या नीता खंदारे यांना दुपारी बाराच्या सुमारास निवडे प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रसूतीसाठी भरती करण्यात आले. मात्र तेथे प्रसूतीसाठी प्रयत्न केल्यानन्तर सायंकाळी पाच वाजता त्यांची प्रकृती चिंताजनक बनू लागली. तेथे अत्याधुनिक यंत्रसामग्री उपलब्ध नसल्यामुळे त्यांना त्वरित कोल्हापूर येथे हलवणे गरजेचे होते. मात्र कोल्हापूर गगनबावडा या रस्त्यावर पावसाचे प्रचंड पाणी जमा झाल्याने हा रस्ता वाहतुकीसाठी पूर्णतः बंद करण्यात आला होता. त्यावेळी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी प्रसंगावधान दाखवत तातडीने...

एसटी आली धावून

Image
रस्ते वाहतुकीसाठी लोकांच्या मदतीला आपात परिस्थितीत राज्य परिवहन सेवा म्हणजेच एसटी नेहमीच धावून येत असल्याचे चित्र दिसून येत असते. मुंबई पुणे ही रेल्वेसेवा गेली अनेक दिवस दरड कोसळल्यामुळे व रुळाखालील खडी वाहून गेल्याने बंद करण्यात आलेली आहे. त्यामुळे पुणे मुंबई नियमित प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे या काळात प्रचंड हाल होताना दिसत आहेत. खाजगी प्रवाशी वाहतुकीशीवाय अन्य मार्ग या काळात प्रवाशांसमोर उपलब्ध नसल्याने मोठा आर्थिक भार त्यांच्यावर पडत आहे. खाजगी वाहतूकदारदेखील मनमर्जीप्रमाणे भाडे आकारून प्रवाशांची उघड लूट करत आहेत. त्यामुळे एसटीने या काळात बसफेऱ्यांची संख्या वाढवण्याचा घेतलेला निर्णय नक्कीच दिलासादायक आहे. यामुळे एसटी पुन्हा एकदा लोकांच्या मदतीला धावून आली आहे असेच म्हणावे लागेल.  वैभव मोहन पाटील  घणसोली, नवी मुंबई

महाराष्ट्रातील पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक आरोग्य विभागाच्या उपाययोजना

Image
मानवतेच्या भावनेतेतून आरोग्य कर्मचाऱ्यांचे कार्य कोल्हापूर सांगलीतील पूर आता ओसरत असून पूरानंतरचे मदतकार्य वेगात सुरु आहे. पूरपरिस्थितीनंतर सार्वजनिक स्वच्छता, कीटकजन्य व जलजन्य आजारांचे प्रतिबंध व नियंत्रण, पाणी शुध्दीकरणासाठीचे प्रयत्न, लेप्टो प्रतिबंधात्मक उपचार, पूरग्रस्त भागात आणि मदत छावण्यांमध्ये नियमित साथरोग सर्वेक्षण इत्यादी उपाययोजना युध्द पातळीवर सुरु आहेत. सांगली आणि कोल्हापूरातील अनुक्रमे ८१ आणि २१६ गावे पूरग्रस्त असून सध्या सांगली मध्ये शहरी भागात ५३ तर ग्रामीण भागात ३६ मदत छावण्या सुरु आहेत. कोल्हापूरात १३७ मदत छावण्या सुरु आहेत. या दोन्ही जिल्ह्यात मिळून सुमारे १ लाख ७२ हजार लोक मदतछावण्यांमध्ये आहेत. मदतछावण्या आणि पूरग्रस्त गावे यांना आरोग्यविषयक सुविधा पुरविण्यासाठी कोल्हापूर जिल्ह्यात १४० तर सांगली जिल्ह्यात १८७ वैद्यकीय पथके कार्यरत आहेत. मानवतेच्या भावनेने कार्य पूरग्रस्त भागांमध्ये आरोग्य सेवा देताना स्वतःच्या अडचणीकडे दुर्लक्ष करत मानवतेच्या भावनेने प्रेरित होऊन अनेकजण काम करताना दिसत आहेत. सांगली जिल्ह्यातील डॉ. सारिका कुंभार या वैद्यकीय अधिका-यां...

स्वातंत्र्यदिनी प्लॅस्टिकमुक्तीचा नारा

Image

पथदिवे कधी सुरू होणार

Image
पथदिवे कधी सुरू होणार घणसोली सेक्टर 1 व 2 मधील रस्त्यांवरील पथदिवे गेल्या महिन्याभरापासून बंद अवस्थेत आहेत. रात्री लोकांना या अधांऱ्या रस्त्यावरून जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतो. तातडीने हे दिवे पूर्ववत सुरु करावेत. वैभव मोहन पाटील घणसोली, नवी मुंबई