Posts

Showing posts from December, 2024

नव्या वर्षांत संकल्प निरोगी आयुष्याचा

Image
२०२५ या नव्या कोऱ्या करकरीत वर्षात आपण पदार्पण करत आहोत. नवीन वर्ष साजरे करण्याच्या अनेक देशी विदेशी पद्धती आपल्या समाजात दृढ आहेत. कुणी फिरायला शहर सोडून बाहेर पडतो, कुणी कुटुंबासह दिवस घालवतो, अगदीच हौशी मंडळी मित्रमंडळीसह या दिवसाचे सेलिब्रेशन करतो तर काही नव्या वर्षाचे विविध संकल्प सोडून नववर्षाचे स्वागत करतात. एखादा नवा उद्योगधंदा सुरू करण्याचा पण केला जातो, नवे घर, गाडी विकत घेण्याचा संकल्प किंवा दररोजच्या जीवनात ठराविक गोष्ट खाणे सोडणे, वागणे, बोलणे, चालणे यात बदल करण्याचादेखील संकल्प केला जातो. मात्र माणसाच्या आयुष्यात सर्वात महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे त्याचे आरोग्य. आरोग्य व्यवस्थित असेल तर त्याला हव्या त्या गोष्टी मिळवण्यात फारशा अडचणी उदभवत नाहीत त्यामुळेच आपले आरोग्य नीट सांभाळण्याचा संकल्प प्रत्येकाने नव्या वर्षात करायला हवा. नव्या वर्षाकडून आपल्यापैकी प्रत्येकाला अनेक आशा असतात. अनेक प्रकारची नियोजने केलेली असतात. मात्र, आपले नियोजन तेव्हाच यशस्वी होते, जेव्हा आपण तंदुरुस्त आणि निरोगी राहू. आपले शरीर निरोगी राहावे असे प्रत्येकाला वाटते. त्यासाठी ...

नागपूर आरोग्य प्रशिक्षण केंद्र उपहारगृहातील 'विठ्ठल'

Image
नागपूर अधिवेशन काळात मुक्कामाची व्यवस्था आरोग्य विभागाच्या प्रशिक्षण केंद्रात करण्यात येते. या प्रशिक्षण केंद्रातील उपहारगृहात गेली अनेक वर्षे विठ्ठल नावाचा हसतमुख, प्रामाणिक व्यक्ती कार्यरत आहे. विठ्ठल स्वतः उत्तम अस्सल नागपुरी स्वयंपाक बनवतो व सर्वांना अगदी आग्रहाने खाऊ घालत असतो. येथे जेवणाची थाळी घेतल्यानंतर अगदी मनसोक्त व भरपेट खाता येते. जेवणातील सर्व पदार्थ जितक्या वेळा हवेत तितके ते वाढण्यासाठी विठ्ठल नेहमीच तत्पर असतो. जेवणाचा उत्तम दर्जा व घरगुती चव यामुळे येथील जेवण दोन घास जास्तीचेच जाते. नागपूरच्या झणझणीत सावजी जेवणाची चवदेखील इथे चाखायला मिळते. शाकाहारी व मांसाहारी जेवणाची व्यवस्था असलेल्या ह्या उपहारगृहाचे चालक दोन भाऊ आहेत. मात्र हे उपहारगृह या ठिकाणी काम करणाऱ्या विठ्ठलच्याच नावाने अधिक ओळखले जाते. त्यामुळे विभागातील अधिवेशनात नागपूरला येणाऱ्या प्रत्येक अधिकाऱ्याच्या तोंडी हे नाव अगदी घट्ट बसले आहे. मी गेली अनेक वर्षे अधिवेशनात कित्येक दिवस नागपूरला राहिलो आहे. त्यामुळे गेली जवळपास पंधराएक वर्षे तरी या ठिकाणी विठ्ठलला पाहत आलो आहे. त्यामुळे केवळ अधिवेशन काळ...

नागपूरचे श्रीगणेश टेकडी मंदिर

Image
मागील आठवड्यात विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन नागपूर येथे पार पडले. आठवडाभर सुरू असलेल्या ह्या अधिवेशन काळात नागपुरातील काही ठिकाणांना भेट देण्याचा मी आवर्जून प्रयत्न करत असतो. त्यातीलच एक ठिकाण म्हणजे टेकडी गणेश मंदिर. गेल्या बुधवारी आलेल्या संकष्टी चतुर्थीचे निमित्त साधून कार्यालयीन सहकाऱ्यांसह मी ह्या श्रीगणेशाचे दर्शन घेतले. नागपुरातील टेकडी गणपती मंदिर हे अत्यंत प्राचीन आहे. या ठिकाणी असलेल्या श्रीगणेशाची मूर्ती स्वयंभू आहे. पूर्वीच्या काळात भोसले राजघराण्यातील मंडळी नियमित येथे दर्शनाला येत होते. टेकडीच्या गणपतीचा ३५० वर्षे जुना इतिहास आहे. विदर्भातील अष्टविनायकांमध्ये पहिला मान टेकडी गणपतीला आहे. असंख्य भाविकांचे आराध्य दैवत असलेले टेकडी गणपती मंदिर हे नागपूर रेल्वे स्टेशनपासून अगदी हाकेच्या अंतरावर आहे. सीताबर्डीच्या टेकडीवर हे गणपती मंदिर असल्याने त्याला टेकडी गणपती मंदिर असे म्हटले जाते. पूर्वी या ठिकाणी असलेला स्टेशन समोरील भला मोठा ब्रिज पाडण्यात आला आहे. त्यामुळे येथील रहदारीची समस्या बऱ्यापैकी सुटलेली आहे. १८१८ साली नागपूरचे राजे अप्पासाहेब...

एनएमएमटी परिवहन सेवेकडे दुर्लक्ष

Image
नवी मुंबई महानगरपालिकेचा एनएमएमटी हा परिवहन उपक्रम शहरांतर्गत वाहतुकीसाठी निर्माण केला गेला. कालांतराने त्याचा विस्तार करून शेजारील पनवेल, ठाणे, कल्याण डोंबिवली, बदलापुरपर्यंत एनएमएमटी धावू लागली. मात्र त्यात ज्या प्रमाणात सुधार व वाढ अपेक्षित होती ती न झाल्याने आज ह्या परिवहन सेवेला घरघर लागली आहे. मधल्या काळात आयुक्तपदी भारतीय प्रशासकीय सेवेतील तुकाराम मुंढे हे अधिकारी असताना या सेवेला डिजिटल रूप देऊन आमूलाग्र बदल घडवण्याचा प्रयत्न झाला. मुळात महानगरपालिकेने स्वतःची सार्वजनिक परिवहन सेवा बळकट करण्यासाठी ठोस उपाययोजना करून मुबलक निधी ह्या सेवेला द्यायला हवा. ह्या सेवेचा वापर करणारे प्रवाशी हेदेखील नवी मुंबईचे करदाता आहेत. ज्या प्रमाणात स्वच्छता, रस्ते, पथदिवे, नाले, गटारे यासारख्या पायाभूत सुविधांकडे महानगरपालिका लक्ष केंद्रित करतेय त्या प्रमाणात सार्वजनिक वाहतूक म्हणजे एनएमएमटी बळकटीकरणासाठी लक्ष दिले जात नाही असे चित्र आहे. त्यामुळे आजही नवी मुंबईतील प्रवाशांना एनएमएमटीपेक्षा बेस्टचा प्रवास अधिक सुखदायक वाटतो. नवीन बसेसची उपलब्धता, विविध मार्गांवरील फेऱ्यांमध्ये वाढ, बस ...