Posts

Showing posts from April, 2019

कामगारांच्या आरोग्यासाठी - १ मे महाराष्ट्र दिन व कामगार दिनाच्या शुभेच्छा

Image
महाराष्ट्र दिन व कामगार दिनाच्या शुभेच्छा राज्‍य कामगार विमा योजना ही अधिनियम, १९४८ च्या अन्वये सुरु करण्‍यात आली. आजार, प्रसूती, काम करताना आलेली विकलांगता इत्यादींसाठी तरतुदी करून कामगारहिताचे संरक्षण करणे हा तिचा हेतू आहे. ही योजना संपूर्ण भारतात लागू असून तिच्याखाली हंगामी नसलेल्या परंतु वीसपेक्षा अधिक कामगारांना रोजगार देणार्‍या कारखान्यांतील सर्व कामगारांना लागू आहे. कारखान्यांप्रमाणेच इतर आस्थापनांमधील कामगारांकरितादेखील ही योजना लागू करता येते. राज्य कामगार विमा योजनेमध्‍ये आजारपण, मातृत्व, तात्पुरत्या किंवा कायम स्वरूपाचे अपंगत्व, सेवेतील इजेमुळे होणारे मृत्यू व त्यामुळे कमविण्याच्या क्षमतेत होणारी घट यासारख्या आकस्मिक घटनांमध्ये कामगारांचे हितरक्षण करणारी ही योजना आहे. अधिनियमामध्ये कामगार व त्यांच्या लगतच्या अवलंबीतांच्या वैद्यकीय देखभालीची हमी देण्यात आली आहे. अधिनियमाचा आधार घेऊन केंद्र सरकारने योजना प्रशासित करण्यासाठी राज्य कामगार विमा महामंडळाची स्थापना केली. त्यानंतर, ही योजना दिल्ली व कानपूर येथे २४ फेब्रुवारी १९५२ रोजी प्रथम अंमलबजावणी करण्यात आली. अधिनिय...

Summer is here, take care of your health.!

Image
Summer is here, take care of your health.! World Health organization says that global temperatures and the frequency and intensity of heat waves will rise in the 21st century as a result of climate change. Extended periods of high day and nighttime temperatures would affect physiological stress on the human body. Heatwaves can acutely impact large populations for short periods of time, often trigger public health emergencies and result in excess mortality. They can also cause loss of health service delivery capacity, where power-shortages which often accompany heatwaves disrupt health facilities, transport, and water infrastructure. In India, as March started, heat of summer is increasing all over the state. Heat stroke also affects the body. Favorable days of winter transforms to two to three months of intolerable days of summer. It should not be ignored that this summer heat causes many bad impact on our health. Impact of summer is referred as heat stroke. Every year heat ...

उष्माघातापासून बचाव करण्याचे उपाय

Image
उष्माघातापासून बचाव करा उन्‍हाचा तडाका संपूर्ण राज्‍यभर वाढत चालला आहे. गेल्‍या काही दिवसांमध्‍ये  उन्‍हाने अगदी सर्वोच्‍च पातळी गाठल्‍याचे पाहायला मिळत आहे. गरम हवा व असहय करणारे उन यामुळे शरीरातील पाण्‍याचे प्रमाण कमी होते व परिणामी थकवा, चक्‍कर अशा समस्‍या वाढताना दिसत आहेत. उन्हामुळे अचानक बेशुद्धावस्था येण्यासारखी लक्षणे अनेकांमध्‍ये दिसू लागलेली आहेत. उष्माघात होण्याइतके कडक तापमान अजून दिसत नसले, तरी त्यापासून बचाव करण्यासाठी वेळीच काळजी घेणे आवश्‍यक आहे. गेल्या काही दिवसांमधील विषम हवामान संपून उन्हाचा तडाखा हळूहळू वाढू लागला आहे. अशा वातावरणात ऊन बाधून त्याचा त्रास होण्याचे प्रमाण मोठे असते. उन्हाचा त्रास झालेल्या रुग्णांमध्ये सध्या शरीरातील पाणी कमी होणे (डीहायड्रेशन) आणि थकवा येणे ही लक्षणे प्रामुख्याने पाहायला मिळतात. ज्यांना काम धंदयानिमित्‍त सतत उन्हात बाहेर फिरावे लागते त्यांच्यात अतिउन्हामुळे चेहऱ्याला आणि त्वचेला खाज सुटते, त्वचा लाल होणे, त्यावर पुरळही उठते. उष्माघात होण्याइतके कडक तापमान सध्या दिसत नसले, तरी तापमान वाढत असल्यामुळे त्यापासून बचाव करण्यासा...

उन्हाचा कहर

Image
उन्हाचा कहर उन्हाने सर्वत्र अगदीच कहर केलेला आहे. कधी नव्हे इतकी गर्मी सध्या राज्याच्या जवळपास सर्वच भागांत होत आहे. आटलेले जलस्रोत व लोप पावत चाललेला निसर्ग यांचा परिणाम म्हणून सर्वत्र उष्णता हाहाकार करत आहे. वाढत्या उष्णतेपासून स्वतःचा बचाव करणे हेच आज सर्वांचे मुख्य उद्दिष्ट झाले असून ग्रामीण व शहरी भागातील परिस्थिती वेगळी नाही. विदर्भात तापमानाने सर्वाधिक उच्चांक गाठला असून मानवी व प्राणी जीवनासाठी ही धोक्याची घंटा आहे. महाराष्ट्रात सध्या सुरू असलेली लग्नसराई व निवडणुकांनी तापलेल्या वातावरणात वाढते ऊन तेल ओतण्याचे काम करत आहे. त्यामुळे नागरिकांनी उष्माघाटापासून वाचण्यासाठी आवश्यक उपाययोजना स्वतःच कराव्यात.  वैभव मोहन पाटील  घणसोली, नवी मुंबई

सक्षम लोकशाहीसाठी मतदान करा

Image
निवडणूक प्रक्रिया पारदर्शक हवी येत्या 29 तारखेला सोमवारी मुंबई ठाण्यासह राज्यातील बहुतांशी मतदारसंघात लोकसभा निवडणूकीसाठी मतदान होत आहे. शनिवार, रविवार ला जोडुन आलेल्या मतदानाच्या सुट्टीमुळे मतदानावर परिणाम होण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. अनेक लोक जोडून मिळालेल्या सुट्ट्यांचे निमित्त साधत बाहेर फिरायला जाणे पसंत करतात. सुशिक्षित मतदारांचा यात अधिक भरणा असतो. त्यामुळे मतदानावर त्याचा विपरीत परिणाम होतो. निवडणूक आयोग व राजकीय पक्ष लोकांना मतदानासाठी कितीही जागृत करण्याचा प्रयत्न करत असले तरी लोक जुमानत नाहीत ही वर्षानुवर्षांची परिस्थिती आहे. त्यामुळे मतदानाची सुट्टी देणाऱ्या आस्थापनांनी आपल्या कर्मचाऱ्यांना मतदानास प्रवृत्त करण्यासाठी ठोस पावले उचलणे गरजेचे आहे. लोकशाही सक्षम बनवण्यासाठी मतदान प्रक्रिया अत्यंत महत्वाची असून यात लोकांचा अधिकाधिक व सक्रिय सहभाग असणे आवश्यक आहे. सरकारी कार्यालये व खाजगी आस्थापनांनी मतदानाच्या सुट्टीचा उपभोग घेणाऱ्या कर्मचाऱ्यांना मतदान सक्तीचे करायला हवे. मतदान न करणाऱ्या कर्मचाऱ्यांची त्या दिवसाची रजा विनावेतन करावी तरच परिस्थिती काही अंशी सुधारे...

"MahaAyudaan" for Organ Transplantation

Image
MahaAyudaan for Organ Transplantation Department of Public Health, Maharashtra has signed MOU with Tech Startup company Chainworks Digital on 25th April 2019 to implement blockchain technology for HOTA section of DHS. All the permissions and approval related to Organ Transplantation will be managed through the software named as “MahaAyudaan”, which is based on Blockchain Technology. The hospitals will get the secured digital ceritificate generated using Blockchain Technology. This is the pioneer project in the area of Public Health in India using Block chain technology. A Blockchain is a decentralized, distributed and public digital ledger that is used to record transactions across many computers so that any involved record cannot be altered retroactively, without the alteration of all subsequent blocks. Blockchain Technology allows digital information to be distributed across number of computers but not copied, blockchain technology created the backbone of a new type of inte...

रेल्वे स्थानकांत मेटल डिटेक्टरचा वापर खरंच होतोय का?

Image
रेल्वे स्थानकांत मेटल डिटेक्टरचा वापर खरंच होतोय का? मुंबई उपनगरातील बहुतेक सर्व महत्वाच्या रेल्वे स्थानकांवर सुरक्षेचा उपाय म्हणून मेटल डिटेक्टर बसवण्यात आलेले आहेत. मात्र हे मेटल डीटेक्टर बसवण्याचा उद्देश सफल होतो का हाच मोठा यक्षप्रश्न सर्वांसमोर आहे. बहुतेक प्रवाशी या यंत्राना बगल देऊन पुढे सरकत असल्याने त्यांची अवस्था आज अडगळीसारखी झाली आहे. याचे खरे कारण रेल्वे स्थानकांवर वाढलेली भरमसाठ गर्दी हेच आहे. मोजक्या संख्येने असलेली ही मेटल डिटेक्टर्स, लाखोंच्या संख्येने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना अपुरी पडत आहेत. त्यामुळे प्रत्येक प्रवाशाची ह्या यंत्रातून तपासणी करावयाची झाल्यास ती वेळखाऊ प्रक्रिया ठरेल व प्रवाशांना देखील तितका वेळ नसतो. त्यामुळे सोयीस्करपणे मेटल डिटेक्टरना बगल देऊन प्रवाशी अन्य मार्गाने जाताना दिसतात. सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्वपूर्ण अशा ह्या यंत्रणेच्या वापराबाबत ना रेल्वेला सोयरसुतक ना प्रवाशांना. त्यामुळे अडगळीच्या ठरत असलेल्या ह्या यंत्रांना सुरक्षेच्या दृष्टिकोनातून मुख्य प्रवाहात आणण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न होणे गरजेचे आहे.  वैभव...

Female foeticide is sin and crushed out from the society

Image
Female foeticide is sin and crushed out from the society Female foeticide is a very sensitive issue in our society. A birth rate of female children in many states has declined because of life taken while female baby in the womb of the mother. The number of female children has been declining gradually as compared to the male child in many of the states. It is surprising that a culture of patriotic society still exists and pushing the agenda male as the only descendent of the family resulting into the concept of male child only descendent of family and associated the male ego part of it. Today, many families’ vows worship and even undergoes for sex determination in preference to the male child.  Male child is the only descendent of the family and even support in old age days for the parents is the ideology with which a common person lives. Female child no matter how smart and good she but one day she is the property of other family where she would be married. Many of people...

२५ एप्रिल - जागतिक हिवताप दिन

Image
२५ एप्रिल - जागतिक हिवताप दिन   आज २५ एप्रिल २०१९. २५ एप्रिल हा दिवस सर्वत्र जागतिक हिवताप दिन म्हणून साजरा केला जातो. डासांच्या उपद्रवामुळे निर्माण होणारा हिवताप हा आपल्‍याला ज्ञात असलेला खूप जूना आजार आहे. हा रोग मानवी वसाहतींच्‍या काळाइतका पुरातन आहे. हिवताप हा मानवास फार पुर्वीपासून माहिती असलेल्‍या रोगांपैकी एक रोग आहे. मानवाची आणि हिवतापाची उत्‍क्रांती एकाच वेळी झाली असावी. ज्‍यामुळे लाखो वर्षापासून मानवाला या आजाराची माहिती आहे. मोठया प्रमाणात आर्थिक आणि जीवितहानी करणारा हा आजार असल्‍याने सार्वजनिक आरोग्‍याच्‍या दृष्‍टीने ही एक गंभीर समस्‍या आहे. देशाच्‍या स्‍वातंत्र्याच्‍या वेळी देशात हिवतापाचे वार्षिक प्रमाण सुमारे ७.५ कोटी रुग्‍ण व ८ लाख मृत्‍यू एवढे होते. प्‍लाझामोडीयम प्रजातीच्‍या एकपेशीय सूक्ष्‍म परजीवी जंतूंचा संसर्ग झाल्‍याने हिवताप होतो आणि त्‍याचा प्रसार काही वि‍शिष्‍ट जातीच्‍या अॅनाफीलिस मादीमुळे होतो. भारतात आढळणा-या अॅनाफीलिसच्‍या सुमारे ५८ जातीपैकी केवळ काही हिवतापाच्‍या प्रमुख प्रसारक समजल्‍या जातात. ग्रामीण भागात अॅनॉफीलिस क्‍युलेसिफेसीस व शहरी भागा...

मतदान यंत्रे आता जीपीएसच्या देखरेखीखाली

Image
मतदान यंत्रे आता जीपीएसच्या देखरेखीखाली वाहनांवर, रुग्णवाहिकांवर जीपीएस प्रणाली लावून वाहने ट्रॅक करण्याची पद्धत फार पूर्वीच अस्तित्वात आली आहे. मात्र आता थेट मतदान यंत्रे घेऊन जाणाऱ्या वाहनांवरच ही प्रणाली बसवण्यात येत असल्यामुळे चर्चा होणे स्वाभाविक आहे. खरेतर निवडणूक काळात मतदान प्रक्रियेशी संबंधित सर्व साहित्य सामग्री यांची सुरक्षितता खूप महत्त्वाची असते. मतदान प्रक्रिया पारदर्शकपणे पार पाडण्यासाठी सर्वतोपरी उपाययोजना निवडणूक आयोग आखताना दिसत आहे. त्या दृष्टीने येत्या लोकसभा निवडणुकीत आवश्यक दक्षता घेतली जात असून निवडणूक प्रक्रियेवर घेतले जाणारे संभाव्य आक्षेप दूर होण्यासाठी करण्यात येत असलेले प्रयत्न म्हणजे प्रतिबंधात्मक काळजी म्हणता येईल. मतदान यंत्रे वाहतूक करणाऱ्या वाहनांवर जीपीएस प्रणाली बसवल्याने जिल्हा मुख्यालयात बसून या वाहनांचे लोकेशन पाहता येणार असल्यामुळे वाहनांत बिघाड झाल्यास किंवा वाहन मतदान केंद्रावर वेळेवर पोहोचू न शकल्यास तातडीने पर्यायी व्यवस्था करता येणे शक्य होणार आहे शिवाय मतदान साहित्याची सुरक्षितता देखील अबाधित राखता येणार असल्यामुळे आयोगाचा हा निर्णय स्व...

आरोग्य विभागाच्या वतीने महापुरुषांना मानवंदना

Image
आरोग्य भवनमध्ये संयुक्त जयंती महोत्सव उत्साहात साजरा सालाबादप्रमाणे यावर्षीदेखील आरोग्य आयुक्तालयाचे मुख्यालय असलेल्या आरोग्य भवन येथे महापुरुषांचा संयुक्त जयंती महोत्सव मोठ्या उत्साहात मंगळवार दिनांक २३ एप्रिल २०१९ रोजी साजरा करण्यात आला. महाराष्ट्राचे आराध्य दैवत, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, महामानव भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर, क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले, राजर्षी शाहू महाराज यांची संयुक्त जयंती आज साजरी करण्यात आली. आरोग्य भवनमधील अधिकारी व कर्मचारी वृंदाने या कार्यक्रमात सक्रिय सहभागी होत या महापुरुषांना मानवंदना दिली. देशाच्या जडणघडणीत मोलाचे योगदान दिलेल्या महापुरुषांच्या जयंत्या साजऱ्या करण्याचा प्रघात सरकारी अस्थापनांमध्ये अनेक वर्षांपासून आहे. त्यानुसार संबंधित तिथी वा तारखेला महापुरुषांना मांवनदना देत अभिवादन करण्याचा उपक्रम आरोग्य विभागातदेखील नियमित राबवण्यात येतो. एप्रिल महिन्यात आलेल्या महापुरुषांचा संयुक्त जयंती उत्सव महाराष्ट्रभरातील अनेक कार्यालयांमध्य...