Posts

Showing posts from October, 2024

वात्सल्य ट्रस्ट येथे जॉय ऑफ गिव्हिंगचा दिवाळी भेट उपक्रम

Image
सानपाडा (नवी मुंबई) येथील वात्सल्य अनाथालयातील बालिका व वृद्धांसमवेत येत्या शनिवारी जॉय ऑफ गिव्हिंग साजरी करणार दीपावली   जॉय ऑफ गिव्हिंगचा दिवाळी भेट उपक्रम  शनिवारी २ नोव्हेंबर २०२४ रोजी दिपावली पाडव्याचे निमित्त साधून जॉय ऑफ गिव्हिंग ह्या सोशल ग्रुपच्या वतीने सानपाडा (नवी मुंबई) येथील वात्सल्य ट्रस्टच्या बालिकाश्रम व वृद्धाश्रमात दिवाळी भेट उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी जॉयचे सभासद सदर अनाथाश्रमात उपस्थित राहून जवळपास ५० अनाथ व वृद्धांना दिवाळी फराळ व जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करणार आहेत. १९८३ साली स्थापन झालेल्या वात्सल्य ट्रस्टने आजवर हजारो बालिका व वृद्धांना मायेचा आधार दिला आहे. जेष्ठ व बालिका असे आजी - नातींचे अनोखे नाते येथे पाहायला मिळते. जॉयचे अध्यक्ष श्री गणेश हिरवे सरांच्या सूचनेनुसार मागील शनिवारी पनवेलच्या वनवासी कल्याण आश्रमातील कार्यक्रम आटोपून मी, डॉ घोलप, भूषण, मीना भूतकर असे जॉयचे सभासद या आश्रमास भेट देण्यासाठी गेलो होतो. त्यावेळी ह्या ट्रस्टचे व्यवस्थापक श्री काळे यांनी आम्हाला ह्या अनाथाश्रमाबद्दल माहिती देत परिसर द...

मोरबे (पनवेल) येथील वनवासी कल्याण आश्रमात जॉय ऑफ गिव्हिंगचा दिवाळी भेट उपक्रम संपन्न

Image
पनवेलच्या वनवासी कल्याण आश्रमात जॉय ऑफ गिव्हिंगचा दिवाळी भेट उपक्रम संपन्न मुंबई व परिसरात सातत्याने विविध सामाजिक उपक्रम राबविणाऱ्या जॉय ऑफ गिव्हिंग ह्या सामाजिक संस्थेच्या वतीने शनिवार दिनांक २६ ऑक्टोबर २०२४ रोजी सकाळी पनवेल जवळील वनवासी कल्याण आश्रमाच्या वस्तीगृहातील निराधार आदिवासी मुलांसाठी दिवाळी भेट उपक्रम राबविण्यात आला. यावेळी जॉय संस्थेचे नवी मुंबई समन्वयक वैभव पाटील, हॅप्पी रायडर गजानन पाटील, सभासद भूषण मुळ्ये, मीना भूतकर, डॉ सुभाष घोलप, डॉ बालाजी सुकणे, डॉ राहुल होगाडे, मंगेश देवकर तसेच नेरुळ युथ कौंसिलचे सुभाष हांडे देशमुख, रमेश सुर्वे, अशोकराव महाजन, दत्ताराम आंब्रे, रवींद्र कांबळे इत्यादी कार्यकारणी सदस्य उपस्थित होते. वसतीगृहाचे केंद्र प्रमुख संदीप शिंदे यांनी उपस्थितांचे स्वागत केले व वनवासी कल्याण संस्थेच्या कार्याची माहिती दिली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक तसेच सूत्रसंचालन वैभव पाटील यांनी केले. जॉय संस्था विविध भागात विविध घटकांसाठी करत असलेल्या कार्याची माहिती देत त्यांनी संस्थेच्या सदर उपक्रमासाठी सहकार्य करणाऱ्या सर्व सभासदांचे आभ...

निकृष्ट खाद्यपदार्थ आरोग्यासाठी घातक

Image
निकृष्ट खाद्यपदार्थांमुळे विविध प्रकारच्या विषबाधा होण्याच्या घटना दिवसेंदिवस विविध ठिकाणी घडताना दिसत आहेत. बहुतांश आजार हे अशा प्रकारचे खाद्यपदार्थ सेवन केल्याने होत आहेत. व्यस्त जीवनशैली व दररोजची दगदग यामुळे बहुतांशी कुटुंबे आज बाहेर हॉटेलचे जेवण पसंत करतात. काही लोक रोजच्या चवीतून बदल म्हणूनदेखील रेस्टॉरंटमध्ये नियमित जेवायला जातात. मात्र हॉटेल्समधील खाद्यपदार्थ आरोग्यास घातक ठरत असल्याचे वारंवार निदर्शनास येत आहे. हे खाद्यपदार्थ चवीला जरी चांगले वाटत असले तरी त्याचे शरीरावर विपरीत व दूरगामी परिणाम  ठरलेले असतात. आपल्याला रोजच्या जीवनात अनेक खाद्यपदार्थांची गरज लागते. आधुनिक जीवनशैलीमुळे अनेक कुटुंबे न्याहरीसह जेवणात बेकरीचे पदार्थ मोठ्या प्रमाणात वापरत असल्याचे चित्र आहे. बेकरी पदार्थांचा खरेदीदार वाढल्याने या पदार्थांच्या उत्पादनात कमालीची वाढ झाली आहे. त्यामुळेच आपल्याला आज गल्लीगल्लीत बेकरीची दुकाने थाटलेली प्रकर्षाने जाणवतात. मात्र या बेकरी उत्पादनांवर कोणाचेही नियंत्रण नसल्याचे सध्याचे चित्र आहे. स्वस्त व भूक भागवण्यास चांगले अशी ओळख असलेल्या ह्या पदार्थांची ...

विश्वविक्रमविर, गायक, दिग्दर्शक, निर्माता, लेखक विराग मधुमालती यांचा पर्यावरण रक्षणासाठी अनोखा उपक्रम

पर्यावरण रक्षणासाठी विराग मधुमालती यांची चालत १२०० किलोमीटरची १ लक्ष वृक्षलागवड दिंडी पर्यावरण संवर्धनासाठी समाजातील अनेक घटक आपापल्या परीने योगदान देत असतात. आगामी काळात निसर्गाचे संतुलन राखण्याचे मोठे आव्हान आपल्यासमोर आहे. यासाठी आपले प्रत्येक पाऊल पर्यावरणस्नेही असायला हवे. असाच निसर्ग संतुलनाचा संदेश घेऊन नवी मुंबईतील एक सुप्रसिद्ध व्यक्तिमत्त्व व गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये अनेक विक्रम करणारे विराग मधूमालती हे नवी मुंबईतुन नाकोडा जी पर्यंतचा १२०० किलोमीटरचा प्रवास पायी करत निघाले आहेत. १५ सप्टेंबर पासून सुरू झालेला हा प्रवास सध्या ४०० किलोमोटरच्या टप्प्यावर सुरतच्या पुढे असून ह्या प्रवासात १ लाख वृक्षलागवडीचा संकल्पदेखील ते पूर्ण करताना दिसत आहेत. या प्रवासात जागोजागी लोकांना ते पर्यावरण संवर्धन व वृक्षलगवडीचा संदेश देत त्यासाठी प्रवृत्त करत आहेत. त्यांच्या ह्या स्तुत्य उपक्रमासाठी प्रवासात त्यांचे ठिकठिकाणी विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून जंगी स्वागत करण्यात येत आहे. विराग ह्यांनी संगीत क्षेत्रात आजवर ५ वेळा विश्वविक्रम प्रस्थापित केलेला असून सिनेचित्रसृष्टीमध्ये ते निर्मा...