Posts

Showing posts from November, 2020

वीज युनिट दर कमी करावेत

Image
विजबिलांसंदर्भातील विषय सध्या महाराष्ट्रात ऐरणीवर आहे. लॉकडाऊन काळात विद्युत महावितरण मंडळाने अवाजवी बिल आकारणी केल्याच्या मुद्द्यावरून विरोधकांनी सरकारला लक्ष्य केले आहे. वास्तविक, लॉकडाऊन काळात विजेचा वापर वाढल्याने नेहमीपेक्षा अधिकची बिले आली आहेत हे वास्तव आहे. या काळात मीटर रिडींग न घेता सरासरी बिले आकारली गेली जी रिडींग पेक्षा कमी होती. त्यामुळे जेव्हा रिडींग प्रमाणे बिल आकारणी सुरू झाली तेव्हा अतिरिक्त रिडींगनुसार दिली गेलेली विजबिले अपेक्षेपेक्षा जास्त दिसून आली. त्यामुळे कोरोना संक्रमण काळात लोकांच्या आर्थिक बाजूचा सकारात्मक विचार करून विजबिलांत सवलत मिळायला हवी ही मागणी खरेतर रास्त आहे. मात्र विद्युत कँपन्यांचे अवाजवी युनिट दर हेदेखील फुगत चाललेल्या विजबिलांना कारणीभूत आहेत हे विसरून चालणार नाही. महावितरणसारख्या शासकीय विजमंडळाचे दर १०० युनिट पर्यंत रुपये ३.४६ तर १०० -३०० युनिटचे दर दुप्पट म्हणजे ७.४३ इतके आहेत. ३०० युनिटच्या वर गेल्यास १० रुपयांच्या वर प्रति युनिटला मोजावे लागतात. शिवाय स्थिर आकार, प्रति युनिटला १.४५% वहन आकार, वीज शुल्क य...

सक्षम स्थानिक परिवहन सेवा आवश्यक

Image
वाचक संवाद सदरासाठी परिवहन सेवा हा प्रत्‍येक महानगरपालिकेचा अत्‍यंत प्राधान्‍याचा व जिव्‍हाळयाचा विषय असतो. महानगरपालिका कार्यक्षेत्रातील प्रभागांना तसेच नजीकच्‍या पालिका हददींना जोडण्‍यासाठी सक्षम परिवहन सेवा उभी करणे महानगरपालिकेचे प्रमुख उददीष्‍ट असते. मुंबई, नवी मुंबई, ठाणे, कंडोम यासारख्‍या महानगरपालिका परिवहन सेवांच्‍या बाबतीत स्‍वयंपूर्ण असताना पनवेल महानगरपालिका मात्र स्‍थापन होऊन मोठा कालावधी उलटलेला असतानादेखील अदयाप स्‍वतःची वाहतूक सेवा उभारण्‍यासाठी उत्‍सुकता दाखवत नसल्‍याबाबत आश्‍चर्य आहे. पालिका हददीमध्‍ये अनेक गावे, एमआयडीसी क्षेत्र व वस्‍त्‍या असल्‍याने या ठिकाणी परिवहन सेवा ही अत्‍यंत निकडीची बाब आहे. तसेच सिडकोमार्फत उभारण्‍यात येत असलेल्‍या बेलापूर ते पेंधर या ११ किलोमिटरच्‍या पहिल्‍या टप्‍प्‍यातील मेट्रो रेल्‍वेमार्गाचे कामाची व कोचची सुरक्षा तपासणी गेल्‍या वर्षीच होणे अपेक्षित होते. मात्र हे कामदेखील अपूर्णावस्‍थेतच असुन रेल्‍वे स्‍थानकांच्‍या विस्‍तारासाठी महानगरपालिकेकडे मागणी करण्‍यात आलेला निधी देण्‍यासदेखील पालिकेने नकार दिलेला आहे. यामुळे तिसरी ...

सन्मान अवयवदानाचा

Image
११व्या भारतीय अवयवदान दिनानिमित्त महाराष्ट्राचा गौरव ११व्या भारतीय अवयवदान दिनाच्या निमित्ताने शुक्रवार दिनांक २७ नोव्हेंबर २०२० रोजी केंद्र शासनाचे आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय तसेच राष्ट्रीय अवयव प्रत्यारोपण संस्था (NOTTO) यांच्या वतीने एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अवयवदानाच्या मोहिमेत उत्तुंग कामगिरी करणाऱ्या संस्थांना केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ हर्षवर्धन यांच्या शुभहस्ते गौरवण्यात आले. सदर कार्यक्रमाप्रसंगी राज्याचे आरोग्यमंत्री डॉ राजेश टोपे, प्रधान सचिव डॉ प्रदीप व्यास, अतिरिक्त अभियान संचालक डॉ सतीश पवार, सहाय्यक संचालक डॉ अरुण यादव आदी मान्यवर राज्य शासनाच्या वतीने व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे उपस्थित होते. अवयवदान मोहिमेत कार्यरत असणाऱ्या देशाच्या विविध राज्यांतील संस्थांनी या कार्यक्रमास ऑनलाइन उपस्थिती लावली. तसेच महाराष्ट्रातील ROTTO-SOTTO या अवयवदान उपक्रमातील अग्रगण्य संस्थेने अवयवदान करणाऱ्या दात्यांच्या कुटुंबांचा सत्काराचा कार्यक्रम मुंबईच्या केईएम रुग्णालयात एका छोटेखानी कार्यक्रमाद्वारे आयोजित केला होता व सदर कार्यक्रमदेख...

श्री रवींद्र शेळके, संचालक वित्त व लेखा यांच्या सेवानिवृत्ती निमित्त

Image
आरोग्‍य विभागातील आणखी एक वरिष्‍ठ अधिकारी श्री. रविंद्र शेळके सर हे नियत वयोमानानुसार दिनांक ३० नोव्‍हेंबर २०२० रोजी शासकीय सेवेतुन निवृत्‍त होत आहेत. त्‍या निमित्‍ताने कार्यालयीन कामकाजाचा अखेरचा दिवस म्‍हणून आज कार्यालयातील सहका-यांसह त्‍यांची सदिच्‍छा भेट घेतली. राज्‍य शासनाच्‍या वित्‍त विभागातील वरिष्‍ठ अधिकारी असलेले श्री. शेळके सर आरोग्‍य विभागात २०१६ म्‍हणजे गेल्‍या चार वर्षांपासुन संचालक (वित्‍त व लेखा) या पदावर कार्यरत होते. गेल्‍या चार वर्षाच्‍या कारकिर्दीत त्‍यांनी आपल्‍या पदाला व वित्‍त विभागाला न्‍याय देत सन्‍मानजनक कामगिरी करुन दाखविली. आरोग्य खात्यात राष्‍ट्रीय आरोग्‍य अभियानासारख्‍या एका मोठया बजेटच्‍या कार्यक्रमासोबतच त्‍यांनी एडस नियंत्रण संस्‍था व आयुक्‍तालयातील लेखाविषयक किचकट कामकाजदेखील काही काळ यशस्‍वीरित्‍या सांभाळले. कोणत्‍याही विभागाच्‍या दृष्‍टीने आर्थिक बाब ही अत्यंत संवेदनशील व महत्वपूर्ण बाब असते. अशा विषयामध्ये अचूकता राखत शासन सेवा यशस्वीरीत्या पूर्ण करणे म्हणजे एक दिव्यच. ते पार करण्यात शेळके सरांना आलेले यशच त्यांची उपयुक्तता सिद्ध करते. १९...

हा नाला कधी स्वच्छ होणार?

Image
घणसोली व कोपरखैरणे नोडला विभागणारा नाला ठाणे बेलापूर मार्गावरील शीळफाट्याकडे जाणाऱ्या ब्रिजजवळ पूर्वीपासून अस्तित्वात आहे. सदर नाला पहिल्यापासूनच अत्यंत दुरावस्थेत असून या नाल्यात सदैव गाळ, कचरा, माती, शेवाळ यांचे साम्राज्य असते. घणसोली सेक्टर १ ते ४ मधील रहिवाशांना या नाल्याचा मोठा त्रास गेल्या अनेक वर्षांपासून सहन करावा लागत आहे. नाल्यातील घाणीचा उग्र वास व त्यातून निर्माण होणारे डास यामुळे येथील नागरिक हैराण आहेत. पावसाळ्यात या नाल्याची थातूर मातूर साफसफाई करण्यात येते. मात्र नाल्यातील गाळ व कचरा कमी होण्याचे नाव घेत नाही. त्यामुळे बाराही महिने या नाल्याची अवस्था अत्यंत वाईट असते. विविध भागातून सांडपाणी व केमिकलयुक्त पाण्यामुळे या नाल्यातून अनेकदा उग्र वास येतो. परिसरातील काही लोक या नाल्यात कचरादेखील टाकत असल्यामुळे त्यांच्यावरदेखील कारवाईची मागणी होत आहे. येथील नागरिकांना होणारा हा सततचा त्रास पाहता नाल्याच्या या दुरावस्थेवर कायमस्वरूपी तोडगा काढण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. नाल्याशेजारी सध्या बसण्यासाठी बाकडे व विविध झाडांनी सुशोभीकरण देखील...

कोरोनामुक्त महाराष्ट्र धावणार

Image
कोरोनामुक्त महाराष्ट्र धावणार स्वच्छतेची कास बाळगूनी अंगी, कोरोनाला मी हरवणार I मास्क वापरूनी सदा सर्वदा, आजारा ह्या दूर पळवणार II सुरक्षित अंतराची गुरुकिल्ली, अंगी कायम मी बाळगणार I गर्दी करणे अन गर्दीत वावरणे, कटाक्षाने मी टाळणार II परिसर अन घर स्वच्छ ठेवून, नियमित हात मी धुणार I निरोगी जीवनाची धरलिया कास, नागरिक मी जबाबदार II स्वच्छता अन आरोग्याचा निकट संबंध आम्हा कधी कळणार I शासकीय सूचनांचे पालन करेन, सुरक्षित अंतर मी राखणार II संसर्ग दिसता आजाराचा, त्वरीत घेणार शासकीय उपचार I कुटुंब अन सामाजिक आरोग्याचा, मीच आहे जबाबदार II चला घेऊया शपथ आपण, निरोगी महाराष्ट्राचे आम्ही वारसदार I पुन्हा एकदा नव्या दमाने, कोरोनामुक्त महाराष्ट्र धावणार II पुन्हा एकदा नव्या दमाने, कोरोनामुक्त महाराष्ट्र धावणार II वैभव मोहन पाटील कक्ष अधिकारी

चिंता नको मात्र दक्षता हवीच

Image
कोरोनाचा कहर आता ब-याच अंशी आटोक्‍यात आला आहे. दररोजची महाराष्‍ट्रभरातील रुग्‍णसंख्‍या साधारणतः ४ ते ५ हजारांच्‍या घरात आहे. रुग्‍ण बरे होण्‍याचे प्रमाण ९० टक्‍क्‍यांच्‍या वर गेलेले असुन आजवर १७ लक्ष पॉझीटीव्‍ह रुग्‍णांपैकी साडे पंधरा लक्ष रुग्‍ण बरे होऊन घरी परतलेले आहेत. कोरोनामुळे होणा-या मृत्‍यूंचे प्रमाणदेखील कमी झालेले असुन मृत्‍यूदर सध्‍या २.६ इतका आहे. रुग्‍ण नसल्‍यामुळे कोविड केअर सेंटर्स हळूहळू कमी करण्‍यात येत आहेत. या आजाराची लसदेखील लवकरच उपलब्‍ध होणार आहे. त्‍यामुळे येत्‍या काही दिवसांत कोरोना साथ नाहीशी होण्‍याच्‍या मार्गावर आहे असे म्‍हटल्‍यास ते वावगे ठरणार नाही. मात्र असे असले तरी गाफील राहून अजिबात चालणार नाही. सणासुदीचे दिवस सुरु आहेत तसेच सरकारने सर्वच व्‍यवहार अनलॉक करताना दैनंदिन व्‍यवहार व सार्वजनिक प्रवासाची सर्वच साधने मुक्‍त केलेली असल्‍यामुळे गर्दीचे प्रमाण मुख्‍यतः मुंबई, पुण्‍यासारख्‍या शहरांमध्‍ये वाढत आहे. यामुळे संसर्गाचा धोकादेखील वाढलेला आहे. तसेच जगातील काही देशांमध्‍ये या साथीची दुसरी लाटदेखील उदभवल्‍याचे समोर येत आहे. त्‍याम...

मुंबईकरांची यंदा प्रदूषण मुक्त दिवाळी

Image
दरवर्षी दिवाळीत मुंबईमध्‍ये फुटणा-या फटाक्‍यांमुळे वायू प्रदूषण, ध्वनी प्रदूषण मोठ्या प्रमाणावर होत असतं. मात्र यंदा मुंबईमध्ये गेल्या १७ वर्षातील सर्वात कमी ध्वनी प्रदूषणाची नोंद झाली आहे. कोरोनाचे संकट व फटाक्‍यांमुळे होणा-या प्रदुषणाने उदभवणारे आजार पाहता यंदा फटाके न फोडण्‍याचे आवाहन करण्‍यात आले होते. मुंबईकरांनी त्‍याला सकारात्मक प्रतिसाद देत फटाक्‍यांवर निर्बंध आणत ख-या अर्थाने फटाकेमुक्‍त दिवाळी साजरी केली. यासंदर्भात सर्व्‍हेक्षण करणा-या आवाज फाऊंडेशनने फटाक्‍यांच्‍या आवाजाची आकडेवारी समोर आणली आहे. लक्ष्‍मी पुजनाच्‍या दिवशी सर्वाधिक फटाके फोडले जातात. मात्र सन २००३ नंतर लक्ष्मी पूजनच्या दिवशी सर्वात कमी ध्वनी प्रदूषणाची नोंद करण्‍यात आली आहे. मुंबईकरांनी या दिवाळीला दाखवलेलं सकारात्मक चित्र कोरोना संक्रमण काळासाठी अनुकूल असुन या प्रदुषणामुळे उदभवणा-या आजारांवर नक्‍कीच नियंत्रण येऊ शकेल. दिवाळीसारखा सणदेखील नागरीकांनी अत्‍यंत साधेपणाने व कौटुंबिक पातळीवरच साजरा केल्‍याने संभाव्‍य आजारांची शक्‍यतादेखील कमी होणार आहे. दिवाळीनंतर कोरोनाची दुसरी लाट येण्‍याची शक्‍यता व...

जप्तीच्या मालातून समाजोपयोगी कामे करा

Image
जप्त केलेल्या मुद्देमालाची विल्हेवाट कशी लावली जाते याबाबत सर्वसामान्य लोकांच्या मनात प्रचंड संभ्रमावस्था आहे. सोने, चांदी, दारू, चंदन, चरस, गांजा, वाहने, रोख रक्कम व इतर महागड्या वस्तू चोरट्यांकडून जप्त केल्या जातात व सरकारी तिजोरीत जमा केल्या जातात. अपवादात्मक परिस्थितीत यातील काही वस्तू ओळख पटवण्याचे व कायद्यानुसार सर्व सोपस्कार पार पडल्यावर मूळ मालकांना परतदेखील मिळतात. मात्र बहुतांश प्रकरणात या मुद्देमालाचे मोल व त्याची विल्हेवाट याबाबतचे गूढ कायम आहे. यासाठी या प्रक्रियेत अधिक पारदर्शकता, लोकाभिमुखता व सुसूत्रता आणली पाहिजे. या मुद्देमालाच्या विक्रीतून जमा होणाऱ्या निधीचा विनियोग गोरगरिबांच्या मदतीसाठी विविध उपक्रमांमध्ये करायला हवा तसेच कोविड सारख्या साथीचा मुकाबला करण्यासाठी आरोग्य तरतुदींवर त्याचा वापर केला पाहिजे. अशा प्रकारच्या जप्तीनंमधून मोठ्या प्रमाणावर मुद्देमाल मिळत असल्याने त्याचा विनियोग समाजोपयोगी व विधायक कामांसाठी केल्यास त्याचे खऱ्या अर्थाने सार्थक होईल.  वैभव मोहन पाटील घणसोली, नवी मुंबई

अर्ध्या कोयत्याचे आरोग्य

Image
अर्ध्या कोयत्याचे आरोग्य हा लेख (लोकसत्ता ११ नोव्हेंबर) वाचला. मकाम ने केलेल्या सर्वेक्षणात ऊसतोड महिला कामगारांच्या आयुष्याची दाहकता पुन्हा एकदा समोर आली आहे. दिवाळीनंतर कामावर परतणाऱ्या ऊसतोड कामगारांचे प्रश्न पुन्हा एकदा पेटणार आहेत. मुळात या कामगारांची रोजंदारी व पिळवणूक हे प्रश्न सुरुवातीपासूनच आ वासून उभे आहेत. त्यात महिला कामगारांच्या आरोग्य व मुख्यत्वे मासिक पाळी, गरोदरपणातील प्रश्नांकडे गांभीर्याने पाहायलाच हवे. बहुतांश महिला या आजारपण व प्रसूतीत घरीच उपचार घेतात, सरकारी योजनांची पुरेशी माहिती नसल्याने खाजगी रुग्णालयात उपचार घेणाऱ्यांची संख्याही लक्षणीय आहे. ४० वर्षांच्या आतील महिलांचे गर्भाशयाची पिशवी काढून टाकण्याचे प्रमाण तर धक्कादायकच आहे. या महिलांची कुटुंबात व कामाच्या ठिकाणी होणारी शारीरिक झीज प्रामुख्याने त्यांच्या अनारोग्याला कारणीभूत ठरते. त्यात अस्वच्छता व निष्काळजीपणा ह्या गोष्टी आहेतच. सरकारने स्थापन केलेल्या स्व गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार महामंडळाच्या माध्यमातून या क्षेत्रातील कामगार व प्रामुख्याने महिलांच्या प्रश्नांकडे गँभिरतापूर्वक पाहण...

आरोग्य मनाचे

Image
आरोग्य मनाचे आरोग्‍य हा आपल्‍या प्रत्‍येकाच्‍या दृष्‍टीने अत्‍यंत जिव्‍हाळयाचा व संवेदनशिल विषय आहे. आरोग्‍य निट ठेवण्‍यासाठी लोक नाना प्रकारचे उपाय व प्रयोग आपल्‍या शरीरावर करत असतात. त्‍यात व्‍यायाम, योगा, आहार, विविध सप्‍लीमेंट, नियमित वैदयकीय चाचण्‍या इत्‍यादी क्रिया सर्वसामान्‍यपणे वापरल्‍या जातात. फिटनेस राखण्‍यासाठी सर्व स्‍तरांतील लोक आग्रही असतात. फिटनेस म्हणजेच आरोग्य. फिटनेस हे शरीराचे महत्वाचे आहेच पण मनाचेही तितकेच महत्वाचे आहे. आज अनेकजण आपल्या व्‍यस्‍त जिवनशैलीतुन वेळ काढून जिम मध्ये जातात, डाएट करतात. विविध पथ्‍ये पाळतात. जे जे जमेल ते करून आरोग्य उत्तम राखण्याचा प्रयत्न करतात. पण आपण एका महत्वाच्या गोष्टीकडे म्हणावे तसे लक्ष देत नाही आणि ते म्हणजे आपले मन. त्याचेही आरोग्य तितकेच महत्वाचे आहे. मन हे आपल्‍या शरीराचा अविभाज्‍य भाग आहे. त्‍यामुळेच मनाचे आरोग्‍य शारीरीक आरोग्‍याशी निगडित आहे. मनाचे महत्‍व ओळखूनच रामदास स्वामींनी मनाचे श्लोक लिहिले आहेत जे आजही लोक आपल्‍या आचरणासाठी आदर्श मानतात. आपल्या धर्मामध्ये ध्यानधारणेला खूपच महत्व हे. आजकाल ज्याला आपण मेडि...

फटाकेमुक्त व वाचनयुक्त दिवाळी हवी

Image
दिवाळी तोंडावर आहे. दरवर्षीचा दिवाळी सण म्हणजे कुटुंबासाठी विशेषतः घरातील बच्चेकम्पनीसाठी आंनद व उत्साहाचा काळ असतो. मात्र यंदाचा दिवाळी सण कोरोनाच्या सावटाखाली आहे. रुग्णसंख्या कमी होत असली तरी दिवाळीनंतर पुन्हा एकदा कोरोना डोके वर काढणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे काळजी तर घ्यावीच लागणार आहे. मुलांनादेखील त्यांच्या ऑनलाइन शिक्षणातून पंधरा दिवसांची दिवाळी सुट्टी मिळाली आहे. त्यामुळे जल्लोषात दिवाळी साजरी करण्यासाठी मुले सज्ज आहेत. दिवाळीत सर्वाधिक मागणी असलेले फटाके यंदा टाळण्याचे आवाहन सर्व स्तरांतून करण्यात आले आहे. आर्थिक मंदी व प्रदूषणाने पसरणारी रोगराई या पार्श्वभूमीवर फटाकेमुक्त दिवाळीच साजरी करणे फायद्याचे आहे. त्याऐवजी मुलांना दिवाळी अंक व इतर वाचनीय पुस्तके देऊन वाचनाकडे वळवणे उचित ठरेल. मोबाईल अतिरेकामुळे लुप्त होत चाललेली वाचन संस्कृती जोपासणे काळाची गरज आहे. त्याची सुरुवात या दिवाळीपासून करून मुलांना फटाक्यांऐवजी त्याच पैशातून पुस्तके आणून दिली तर खऱ्या अर्थाने ही दिवाळी सार्थकी लागेल व त्यांना वाचनाचीही गोडी लागेल. वाचनातून ज्ञान ...

भाषेचा सुसंस्कृतपणा गमावू नका

Image
भाषेचा आजकाल टेलिव्‍हीजनवरील ब-याच बातम्‍या व चर्चा मसालेदार विषयांनी भरलेल्‍या दिसतात. हवे तेव्‍हढे व खपेल तेच दाखवण्‍यामध्‍ये अनेक वृत्‍तवाहिन्‍या आघाडीवर दिसतात. राजकीय मंडळी व वृत्‍तनिवेदकदेखील मग तितक्‍याच पोटतिडकीने आपली भूमिका मांडण्‍याचा प्रयत्‍न करतात व भाषेवरील नियंत्रण गमावतात. ज्‍या पध्‍दतीने सध्‍याचे राजकारण प्रवास करत आहे ते जर बघितले तर त्‍यामध्‍ये भाषेची पातळी खालावत चालल्‍याचे मुख्‍यत्‍वे आपल्‍याला दिसुन येईल. सरकारी पक्ष असो विरोधी, दोन्‍ही बाजुंकडून भाषेचे तारतम्‍य पाळले जात नाही. काही वृत्‍तवाहिन्‍यादेखील अतिउत्‍साहाने करत असलेल्‍या करत असलेल्‍या वार्तांकनामध्‍ये भाषेचा संयम ढळताना दिसत आहे. यात काही राष्‍ट्रीय वाहीन्‍या आघाडीवर आहेत. वृत्‍तवाहिन्‍यांनी घटनेचा बारकाईने उहापोह करण्‍यात व चुकीची बाजू लोकांपर्यंत पोहोचवण्‍यामध्‍ये गैर नाही. मात्र त्‍यामध्‍ये पुरावे व सौजन्‍यशील भाषेचा अंतर्भाव असावा. राजकारणातील भाषाप्रभुत्‍वाची अनेक उदाहरणे आजवर देशाने पाहिली. ज्‍यात तत्‍कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी व दिवंगत प्रमोद महाजन यांचे व्‍याख्‍यान कौशल्‍य इतर ...

कायद्याचा धाक हवाच

Image
मुळात गेल्या काही वर्षांपासून पोलीस व त्यातल्या त्यात वाहतूक पोलीस काही भ्रष्टाचारी कर्मचाऱ्यांमुळे बदनाम ठरत आहेत. गुन्हेगार व वाहतूक नियम मोडणाऱ्यांवर कडक कारवाई होत नसल्याने पोलिसांचा धाक कमी होऊ पाहत आहे. कायद्यातील पळवाटा व पैशाच्या जोरावर कायदा मोडला तरी कारवाईतुन मार्ग काढता येतो असा समज दृढ होत चाललेला आहे. त्यामुळे पोलिसांना येत्या काळात आपली सदरक्षणाय, खलनिग्रणाय ही ओळख जपण्यासाठी विभागांतर्गत शिस्तीकडे लक्ष द्यावे लागणार आहे. समाज व वाहतुकीमधील शिस्त व कायदा सुव्यवस्था अबाधित राहण्याकामी पोलिसांचा वाटा खूप मोलाचा आहे. त्यामुळे पोलिसांनी गुन्हेगारांप्रति आपली भूमिका व्यक्तिपरत्वे बदलता कामा नये. गुन्हेगारांवर वचक निर्माण करण्यासाठी गुन्हेगारांप्रति सौजन्याची भूमिका कामाची नसून त्यांचेवर कायद्याचा धाक ठेवलाच पाहिजे. पोलिसांची भीती गुन्हेगाराची प्रवृत्तीच्या लोकांमध्ये निर्माण झाली तरच समाजातील छोट्यामोठ्या गुन्ह्यांचे प्रमाण कमी होईल.  वैभव मोहन पाटील  घणसोली, नवी मुंबई

शेतकऱ्याने जगायचे कसे?

Image
मागील आठवडयात झालेल्‍या परतीच्‍या अवकाळी पावसाने महाराष्‍ट्रातील अनेक भागांत दाणादाण उडवली. बंगालच्‍या खाडीत कमी दाबाचा पटटा निर्माण झाल्‍याने चार पाच दिवस सलग पडत असलेल्‍या पावसामुळे कोकणातील शेतकरी पार बेजार झालेला असुन हातातोंडाशी आलेले पीक वाया जाण्‍याची भिती निर्माण झाली आहे. ऑक्‍टोबर महिन्‍यापर्यंत भाताचे रोप पूर्णपणे तयार होऊन कापणीला आलेले असते. गेले काही दिवस पावसाने विश्रांती घेतल्‍याने शेतक-यांनी भात कापणीला सुरुवात केली आहे. कापलेले भाताचे पीक एकतर शेतातच ठेवले जाते किंवा माळरानावर झोडपणीसाठी आणले जाते. बहुतांश शेतक-यांची कापणी पूर्ण झालेली असुन मध्‍येच मुसळधार पाऊस कोसळल्‍याने कापलेले पीक पूर्णपणे भिजले आहे तर काही वाहून गेले आहे. अशा परिस्‍थीतीत शेतक-यांना वर्षभर पुरेल इतकेदेखील पीक मिळण्‍याची शक्‍यता राहीलेली नाही. अगदी हातातोंडाशी आलेला घास अवकाळी पावसाने हिरावून घेतलेला आहे. भातशेती हा येथील शेतक-याचा प्रमुख व्‍यवसाय आहे. भाताशिवाय इतर दुसरा कोणताही उत्‍पन्‍नाचा स्‍त्रोत येथील शेतक-यांकडे सध्‍यातरी उपलब्‍ध नाही. कुटुंबाला वर्षभर पुरेल इतक्‍या धान्‍याचा साठा...