मराठी राजभाषा गौरव दिनाच्या निमित्ताने...
डिजिटल युग आणि मराठी वाचन संस्कृती मराठी ही केवळ भाषा नसून एक संस्कृती आहे. अनदीकाळापासून या भाषेचे महत्व व अस्तित्व अधोरेखित आहे. मराठी भाषेमध्ये जितके साहित्य उपलब्ध आहे तितके खचितच अन्य एखाद्या भाषेत तयार झाले असणार. धार्मिक, पौराणिक, ऐतिहासिक, राजकीय, क्रीडा, सांस्कृतिक ह्या सर्वच क्षेत्रांत मराठी भाषेचे आमूलाग्र योगदान अनन्यसाधारण आहे. त्यामुळेच मराठीला एक जागतिक वारसा लाभलेला आहे जो केवळ महाराष्ट्रपुरता सीमित नाही. भारत देशात भाषावार प्रांतरचना अस्तीत्वात आहे. याच विभागणीतून मराठी भाषकांच्या स्वतंत्र महाराष्ट्र राज्याची स्थापना होऊन आज अनेक वर्षे उलटून गेली आहे. मराठी भाषा आणि संस्कृतीच्या संवर्धनाला गती आणि दिशा देण्यासाठीच महाराष्ट्र राज्याची स्थापना करण्यात आली. भाषावार प्रांतरचनेची उद्दिष्टच भाषांना समृद्ध करण्याची होती. परंतु मराठी भाषा संवर्धनासाठी जाणीवपूर्वक आणि नियोजनबद्ध प्रयत्न सातत्याने झाले नाहीत किंवा करण्यात आलेले प्रयत्न पुरेशा सामर्थ्याने झालेले नाहीत. म्हणूनच आज मराठी भाषेच्या अस्तित्वाबद्दल चर्चा करण्याची गरज प्रकर्षाने भासत आहे. आजचे युग विज्ञ...