Posts

Showing posts from December, 2022

नवे वर्ष २०२३ -

Image
आरोग्यदायी संकल्पांनी साजरे करा नवे वर्ष २०२३ ह्या नव्या कोऱ्या वर्षाची सुरुवात होत आहे. खरेतर नवीन वर्ष म्हंणजे उत्सााहाचे व नव्या  संकल्पाचे. नवीन वर्ष साजरे करण्याच्या अनेक देशी विदेशी पद्धती आपल्या समाजात दृढ आहेत. कुणी फिरायला शहर सोडून बाहेर पडतो, कुणी कुटुंबासह दिवस घालवतो, अगदीच हौशी मंडळी मित्रमंडळीसह या दिवसाचे सेलिब्रेशन करतो तर काही नव्या वर्षाचे विविध संकल्प सोडून नववर्षाचे स्वागत करतात. एखादा नवा उद्योगधंदा सुरू करण्याचा पण केला जातो, नवे घर, गाडी विकत घेण्याचा संकल्प किंवा दररोजच्या जीवनात ठराविक गोष्ट खाणे सोडणे, वागणे, बोलणे, चालणे यात बदल करण्याचादेखील संकल्प केला जातो. मात्र माणसाच्या आयुष्यात सर्वात महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे त्याचे आरोग्य. आरोग्य व्यवस्थित असेल तर त्याला हव्या त्या गोष्टी मिळवण्यात फारशा अडचणी उदभवत नाहीत त्यामुळेच आपले आरोग्य नीट सांभाळण्याचा संकल्प प्रत्येकाने नव्या वर्षात करायला हवा असे माझे मत आहे. गेली दोन वर्ष कोरोना साथरोगाने सर्वांच्याकच आयुष्याआवर थोडयाफार फरकाने विपरीत परिणाम झालेला आह...

बाईक राईडद्वारे पर्यटनातून छंद जोपासणारे श्री गजानन पाटील

Image
हौशी हॅप्पी रायडर – गजानन पाटील आमचे मित्र श्री गजानन पाटील हे एक हौशी बाईक रायडर. आजवर हजारो किलोमिटरचा प्रवास त्यांनी त्यांच्या विशेष अशा रॉयल एनफिल्ड हिमालयन या मोटरसायकलने केलेला आहे. मागील वर्षी त्यांनी छंद म्हणून मुंबई ते लेह-लडाख-अमृतसर अशी बाईक राईड केली होती. त्यांना पर्यटन व ट्रेकींगची प्रचंड आवड आहे. ही पर्यटनाची आवड ते आपल्याल बाईकव्दा‍रे पूर्णत्वास नेतात. आजवर त्यांनी शिवनेरी, हरिहर गड, प्रबळगड, लोहगड, कळसूबाई, सादन व्हाली, भीमाशंकर, गोरखगड, कलावती दूर्ग, हरिश्चंद्र गड अशा अनेक ठिकाणी ट्रेकिंग केलेली आहे. पर्यटन करताना त्यांना त्याचे व्हिडीओ रेकॉर्डींग करण्याचीही भारी हौस आहे. त्यांच्या प्रत्येक पर्यटनाचे त्यांनी रेकॉर्डींग करुन त्यांच्या Happy Rider Gajanan Patil हया यूटयूब चॅनलवर अपलोड केलेले आहेत. गजानन पाटील यांची नियुक्ती सध्या् ठाणे शहर पोलिसअंतर्गत नागपूर हिवाळी अधिवेशन बंदोबस्ता्साठी करण्यात आलेली आहे. त्यासाठी त्यांनी नुकताच मुंबई ते नागपूर असा ८१० किलोमिटरचा प्रवास त्यांच्या आवडीच्या‍ रॉयल एनफिल्ड हिमालयन या बाईकनेच केला व नागपूर ते मुंबई हा परतीचा प्...

भटक्या कुत्र्यांना आवरा

Image
भटक्या कुत्र्यांची समस्या दिवसेंदिवस फोफावताना दिसत आहे. दररोज कुठे ना कुठे या कुत्र्यांच्या हल्ल्यात नागरिक जखमी होत आहेत. महानगरपालिकांमार्फत भटक्या कुत्र्यांच्या निर्बिजिकरणाची प्रक्रिया राबवण्यात येते. मात्र असे निर्बिजिकरण केलेल्या कुत्र्यांची आकडेवारीच्या पारदर्शकतेबाबत शंका आहे. एकट्या मुंबईत भटक्या कुत्र्यांची अधिकृत संख्या आज तीन लाखांच्या घरात आहे. आठ वर्षांपूर्वी हीच संख्या लाखाच्या आत म्हणजे ९५ हजार होती. सन २०२० व २०२१ या  दोन वर्षांत निर्बिजिकरण केलेल्या कुत्र्यांची संख्या ३३ हजार इतकी आहे. एक मादी चार पिलांना जन्म देत असल्याने दिवसेंदिवस ह्या कुत्र्यांची संख्या वाढती असून निर्बिजिकरण अत्यावश्यकच ठरते. मात्र भटक्या कुत्र्यांची रस्त्यावरील संख्या कमी करण्यासाठी दुर्दैवाने प्रयत्न होताना दिसत नाहीत. जखमी कुत्र्यांना पशु रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले जाते मात्र बरे झाल्यावर जिथून घेऊन जाण्यात आले तिथेच सोडण्यात येते. अशाने भटक्या कुत्र्यांची संख्या कमी होणार तरी कशी? राजरोसपणे रस्त्यावर चालणाऱ्या पादचाऱ्यांच्या अंगावर धावून जाणे, जोरजोरात भुंकणे, चावा घेणे ...

यामुळे महाराष्ट्राचे तुकडे होण्याचा धोका

Image
संयुक्त महाराष्ट्रासाठीच्या लढ्यात अनेकांनी हौतात्म्य पत्करले. महाराष्ट्र राज्याची निर्मिती ही मुळात भाषिक, अध्यात्मिक संस्कृती व विकासाच्या मुद्द्यावर झाली. मात्र त्यानंतर आलेली सरकारे व एकंदरीत राजकीय परिस्थितीने सातत्याने राज्याला हादरे दिले आहेत. राज्य व केंद्राच्या महसुलातून कोट्यवधींचा खर्च दरवर्षी करूनही राज्याच्या अनेक भागांत विकासाची गंगा पोहोचली नाही. अन्न, पाणी, रस्ते, वीज यांसारख्या मूलभूत गरजांसाठी देखील तेथील लोकांना झगडावे लागत आहे. इतर राज्यांतून महाराष्ट्रात झालेली स्थलांतरे राज्याच्या मुळावर उठली आणि इथला स्थानिक भूमिपुत्र अस्वस्थ झाला. कर्नाटक, तेलंगणा यांसारख्या सीमावर्ती भागांमध्ये लोक उघड उठाव करू लागले  आहेत. विदर्भातील काही भागांत लक्षली चळवळी अजूनही तग धरून आहेत. मराठवाडा, विदर्भ ह्या प्रांतातील काही लोक स्वतंत्र राज्याची मागणीसाठी आग्रही आहेत. ही परिस्थिती आजवरच्या राज्य सरकारांच्या उदासीनतेने उत्पन्न झाली आहे. सीमाभागात राहणाऱ्या नागरिकांकडे होत असलेले दुर्लक्ष, त्यांना मूलभूत सोयी सुविधा देण्यातील चालढकलपणा उद्या महाराष्ट्राचे तुकडे पाडण्यास ...

सीमावादात केंद्राचे मौन का?

Image
महाराष्ट्र कर्नाटकमधील सीमावाद पुन्हा एकदा पेटत आहे. मंगळवारी महाराष्ट्राच्या वाहनांवर कर्नाटकात हल्ला करण्यात आला. राज्याच्या व देशाच्या दृष्टीने ही खरेतर अत्यंत निंदनीय घटना आहे. स्वातंत्र्याच्या पंचाहत्तरीनंतरही देशातील दोन शेजारी राज्ये सीमेवरून भांडत असतील तर केंद्र सरकारच्या अस्तित्वाबद्दलच शंका उपस्थित होते. कर्नाटक घुसखोरी करत असलेल्या भागांत लोकांच्या भावना विचारात न घेता सीमाभागात स्थानिक नागरिकांना त्रास देण्याचे प्रकार कर्नाटकाकडून वारंवार घडलेले आहेत. आता पुन्हा एकदा सोयी सुविधा मिळत नसल्याचा कारणावरून हा वाद चिघळवायला सुरुवात झाली आहे. वादात असलेल्या सीमाभागातील नागरिकांची महाराष्ट्रातच सामील होण्याची इच्छा असताना कर्नाटक सरकार विनाकारण तिथे सीमेचे राजकारण करण्यात मश्गुल आहे. वास्तविक या वादामध्ये केंद्र सरकारने न्यायिक भूमिका बजावत तोडगा काढणे अपेक्षित होते. मात्र केंद्र सरकारचे मौन यातील राजकीय हस्तक्षेप स्पष्ट करते. त्यामुळे आता महाराष्ट्र सरकारने या वादावर सर्वमान्य मार्ग काढण्यासाठी राजकारण बाजूला ठेवत आग्रही भूमिका केंद्र सरकारकडे ठेवायला हवी. यासाठी राज...

रस्ते अपघात रोखायला हवेत

Image
राज्यात अपघाती मृत्यूंची संख्या वाढती आहे. याला जबाबदार रस्त्यांची दुरावस्था आहे. मुंबईकडून गुजरात, नाशिक, कोकणात जाणारे सर्वच प्रमुख महामार्ग आज खड्डयांनी व्यापलेले दिसतात. खराब रस्ते व त्यावरील जीवघेण्या खड्ड्यांमुळे दररोज अनेक निष्पाप जीव नाहक जात आहेत तर अनेकजण जखमी होत आहेत. वेळेचे व वाहनांचे होणारे नुकसान तर गिणतीतच नाही. रस्ते अपघातात पडणाऱ्या बळींची संख्या चिंताजनक आहे. मात्र याकडे प्रशासनाकडून जाणीवपूर्वक कानाडोळा केला जातो. वर्षांनुवर्षे खड्डेयुक्त रस्त्यांची समस्या सोडवण्याकडे सर्वच घटकांची उदासीनता दिसून येते. याला कारणीभूत रस्ते बांधणी व दुरुस्तीत मूरत असलेली टक्केवारी आहे. प्रशासनापासून लोकप्रतिनिधीपर्यंत सर्वच या साखळीत प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे सहभागी असल्याने रस्त्यांच्या गुणवत्तेकडे सोयीस्कर कानाडोळा केला जातो. रस्ते दुरुस्तीची कामे वर्षानुवर्षे केली जातात मात्र रस्ते टिकत नाहीत ही समस्या सातत्याने व सर्वत्रच भेडसावते. अनेक आंदोलने करूनही रस्त्यांची कामे केली जात नाहीत अशी ओरड सातत्याने केली जाते. मात्र झोपलेल्यांना जागे केले जाते झोपेचे सोंग घेतलेल्यांना ना...

गुरुजींच्या सेवानिवृत्तीनिमित्त विद्यार्थ्याचे पत्र

Image
आदरणीय श्री गुरुनाथ पष्टे सर, सन १९८९-९४ या कालावधीत देवघर जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शिक्षण घेत असताना आपला विद्यार्थी होण्याचा बहुमान प्राप्त झाला. आपण दिलेल्या शिकवणुकीवरच शैक्षणिक पाया घडला आणि आयुष्य जगण्याच्या धडपडीतून आजची जी काही वाटचाल सुरू आहे ती याच पायावर उभी आहे. प्राथमिक शिक्षण पूर्ण करून २५ वर्षे उलटली तरी आपला व फराड गुरुजींचा तो वर्ग आजही तसाच आठवतो. आपली ती लाकडी फूटपट्टी त्यावेळी जर हातावर पडली नसती तर आज जीवनाची दिशा काही निराळीच असती. अभ्यासाबरोबरच भविष्याचा वेध घेत आपण करिअर घडवण्यासाठी शालेय जीवनात दिलेले मोटीवेशन कदापि विसरता येणार नाही. अनेकविध उदाहरणे देत जीवनात नेहमी कुणालातरी आदर्श ठेवून वाटचाल करण्याचा सल्ला आपण सातत्याने दिलात. अंकाची ओळख आणि गणिताचे पाढे जीवनात किती उपयोगी पडतात हे त्यावेळेस आपण लक्षात आणून दिलेले गणित आज तंतोतंत पटतंय. मुलीचे पाढेपाठांतर घेताना होत असलेली दमछाक विद्यार्थ्यांसाठी आपण त्यावेळी घेतलेल्या कष्टाची जाणीव करून देते. शाळा व विद्यार्थी घडवताना आपण अत्यंत प्रामाणिकपणे, जिद्दीने, दूरदृष्टीने व तळमळीने करत आलेले प्रयत्न...