Posts

Showing posts from December, 2025

मलेशियातील आंतराष्ट्रीय स्पर्धेत अक्षरशिल्प पामा इंडिया मुलांची दमदार कामगिरी - ४४ विद्यार्थ्यांनी पटकावली पदके

Image
नवी मुंबईच्या घणसोली शाखेच्या विद्यार्थ्याचे सुयश मलेशियातील क्वालालंपुर येथे पार पडलेल्या २३ व्या आंतराष्ट्रीय पामा ग्लोबल ॲबॅकस अँड मेंटल एरिथमॅटीक स्पर्धेत अक्षरशिल्प इंडियाच्या विद्यार्थ्यांनी जागतिक स्तरावर दैदिप्यमान यश मिळवले. सन १९९९ पासून आंतराष्ट्रीय स्पर्धांची परंपरा जपणाऱ्या PAMA आंतराष्ट्रीय स्पर्धांमध्ये यंदा २८ देशांतील ५९९ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेत भारतीय विद्यार्थ्यांना आंतराष्ट्रीय व्यासपीठ उपलब्ध करून देणाऱ्या पामा इंडिया अक्षरशिल्प संस्थेतील मुलांनी देशाचा गौरव वाढवला आहे. यात अक्षरशिल्पमधील ८ विद्यार्थ्यांनी चॅम्पियन्स, ७ जणांनी द्वितीय क्रमांक, १७ जणांनी द्वितीय तर १२ जणांनी तृतीय क्रमांक पटकावत एकूण ४४  पदकांची लयलूट करत आंतराष्ट्रीय स्तरावर भारताचा तिरंगा अभिमानाने फडकवला. या स्पर्धेत नवी मुंबईच्या घणसोली येथील अक्षरशिल्प शाखेतील कु आर्या रोहन लोखंडे ह्या विद्यार्थिनीने द्वितीय क्रमांकाचे पदक पटकावले. या स्पर्धांच्या माध्यमातुन देशाची बुद्धिमान पिढी घडवण्यात महत्वपूर्ण योगदान देणाऱ्या अक्षरशिल्प पामा इंडियाचे सर्वत्र कौतुक होत...

बाळासाहेब ठाकरे गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणीसंग्रहालय

Image
बाळासाहेब ठाकरे गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणीसंग्रहालय नागपूरमध्ये जाऊन आपल्याला वन्य प्राण्यांना पाहण्याची इच्छा असेल तर बाळासाहेब ठाकरे गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणीसंग्रहालय हा एक उत्तम पर्याय उपलब्ध आहे. नागपूर शहरापासून फक्त ८ किमी अंतरावर असणाऱ्या ह्या अद्भुत ठिकाणास भेट देण्याचा नुकताच योग आला. जवळपास पाचशेपेक्षा जास्त हेक्टर जागेवर पसरलेले हे प्राणिसंग्रहालय बहुदा देशातील सर्वात मोठे प्राणिसंग्रहालय आहे. ह्या प्राणीसंग्रहालय उद्यानात सध्या भारतीय सफारी करता येते आणि भविष्यात आफ्रिकन सफारी आणि रात्रीच्या सफारीचा आनंददेखील घेता येणार आहे. बाळासाहेब ठाकरे गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी उद्यान हे एक प्राणीसंग्रहालय आणि सफारी स्थळ आहे. येथे वाघ, बिबट्या, स्लॉथ बेअर, हरीण आणि नीलगाय असे अनेक प्राणी आहेत ज्यांना एका मोठ्या खुल्या पिंजऱ्यासारख्या जागेत ठेवण्यात आले आहे. येथे सर्व प्राणी उघड्या जागेत फिरतात असे वाटते की ते जंगलात आहेत. फक्त येथे तुम्ही हे सर्व प्राणी पाहण्यासाठी बंद बसमध्ये सफारी करता. तुम्ही बंद वातानुकूलित बसने गोरेवाडा प्राणीसंग्रहालय उद्यानातील सर्व प्राण...

रामकृष्ण मठ, धंतोली, नागपूर

Image
शांत, स्वच्छ, अध्यात्मिक ठिकाण नागपूर येथील एका शांत, अध्यात्मिक वातावरणातील ठिकाणास भेट देण्याचा नुकताच योग आला. मागील महिन्यात नागपूरच्या एका सहकारी मित्राने "शोध आनंदाचा" हे वाचनीय पुस्तक वाढदिवसानिमित्ताने भेट दिले होते. ते पुस्तक वाचता वाचता प्रकाशन संस्थेचे 'रामकृष्ण मठ', नागपूर हे नाव वाचनात आले होते. त्याच वेळेस अधिवेशन काळात ह्या ठिकाणी भेट देण्याचा संकल्प केला होता. त्यानुसार सोमवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास कार्यालयीन सहकाऱ्यांसह आमच्या वसतीगृहापासून जवळच असलेल्या या ठिकाणी भेट दिली. नागपूर येथील रामकृष्ण मठ हा धंतोली ह्या काहीश्या गजबजलेल्या परिसरात असून, तो स्वामी विवेकानंदांनी स्थापन केलेल्या रामकृष्ण मिशनचा एक भाग आहे. अत्यंत सुरेख, रेखीव बांधकाम, कमालीची स्वच्छता व शांतता तसेच नियोजनपूर्ण व्यवस्थापन यामुळे हे ठिकाण मनाला खूप भावले. या मठात अध्यात्मिक शांतता, ध्यानधारणा आणि धार्मिक साहित्याची विपुल उपलब्धता आहे. तसेच तरुणांसाठी विशेष वर्ग आणि विविध सेवा कार्ये चालतात, ज्यामुळे तो एक शांत व सकारात्मक ऊर्जा देणारा मठ म्हणून ओळखला जातो. आरो...