संकटात संधी शोधा
लॉकडाऊनमुळे सध्या राज्यातील बहुतांश उदयोग धंदे, व्यवसाय सर्वच बंद आहे. यासाठी महाराष्ट्रात आलेले अनेक छोटे मोठे उदयोजक, कामगार, मजुर आपापल्या राज्यात परतलेले आहेत. असे असले तरी मुख्यमंत्री व उदयोगमंत्री राज्यात नवे उदयोग व्यवसाय आणण्यास उत्सुक आहेत. नव्या उदयोगांना लागणा-या सर्व प्रकारच्या सोयी सवलती देण्यास राज्य सरकार सकारात्मक आहे. खरेतर राज्यातील तरुणांसाठी ही एक प्रकारची संधीच आहे. आपल्याकडील उदयोग हे एकतर परप्रांतीयांच्या हातात आहेत किंवा परप्रांतीयांच्यामुळेच चालतात असा एक समज आहे आणि तो ब-याच अंशी सत्यदेखील आहे. स्थानिकांना भांडवल व मनोबलाअभावी उदयोग व्यवसायांमध्ये पाय रोवता येत नाही हे वास्तव आहे. मात्र कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभुमीवर भुमिपुत्रांना आता उदयोग व्यवसाय सुरु करण्यास संधी चालून आली आहे असे म्हटल्यास ते वावगे ठरणार नाही. आज मुंबईतील छोटे मोठे उदयोग व्यवसाय करणारे अनेक परप्रांतिय काम नसल्याने आपापल्या प्रांतात परतले आहेत. आता स्थानिकांसाठी चालून आलेली ही संधी दवडली जाऊ नये. उदया पुन्हा सर्व व्यवहार सुरु झाल्यानंतर परप्र...