१ मे महाराष्ट्र दिन विशेष -
जागर मराठी भाषेचा स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा होत असताना १ मे हया महाराष्ट्र दिनाचा उत्साह राज्यात आहे. महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने राज्याची मातृभाषा असलेल्या मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्यासाठी सुरु असलेला संघर्षदेखील अधारेखित होणे आवश्यक आहे. गेल्या अनेक वर्षांपासुनची ही मागणी अजुनही केंद्र शासनाच्या दरबारी प्रलंबित आहे. त्यासाठी सुरु असलेल्या लढयाला यंदाच्या महाराष्ट्र दिनी यश मिळेल अशी अपेक्षा होती. मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळण्यासाठी केल्या जात असलेल्या या प्रयत्नांना खरे तर मोठा पूर्वातिहास आहे. मराठी ही केवळ भाषा नसून एक संस्कृती आहे. अनदीकाळापासून या भाषेचे महत्व व अस्तित्व अधोरेखित आहे. मराठी भाषेमध्ये जितके साहित्य उपलब्ध आहे तितके खचितच अन्य एखाद्या भाषेत तयार झाले असणार. धार्मिक, पौराणिक, ऐतिहासिक, राजकीय, क्रीडा, सांस्कृतिक ह्या सर्वच क्षेत्रांत मराठी भाषेचे आमूलाग्र योगदान अनन्यसाधारण आहे. त्यामुळेच मराठीला एक जागतिक वारसा लाभलेला आहे जो केवळ महाराष्ट्रपुरता सीमित नाही. भारत देशात भाषावार प्रांतरचना अस्तीत्वात आहे. याच...