Posts

Showing posts from May, 2019

श्री पालांडे, श्री कांबळे, श्रीमती बनसोडे सेवानिवृत्त

Image
आरोग्य सेवेतील आणखी तीन अधिकाऱ्यांनी सेवेतून काल एक्झिट घेतली. श्री प्रताप पालांडे, श्री दीपक कांबळे व श्रीमती नीलम बनसोडे हे अधिकारी नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाले. तिन्ही अधिकाऱ्यांचा आरोग्य सेवेत तीन दशकाहून अधिक असा प्रदीर्घ कालावधी लोटला. आज या सर्वांनी आरोग्य भवनात सहकुटुंब हजेरी लावत कार्यालयीन सेवानिवृत्ती स्वीकारली. कार्यालयातील वरीष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत अगदी खेळीमेळीच्या वातावरणात त्यांचा सेवानिवृत्ती कार्यक्रम पार पडला. त्यांचा याप्रसंगी सर्व अधिकारी कर्मचारी वर्गासाठी दुपारच्या भोजनाची व्यवस्था केली गेली होती तसेच आयुक्तालयातील कर्मचाऱ्यांनी वर्गणीतून त्यांच्यासाठी भेटवस्तू आणल्या होत्या. हे तीनही वरिष्ठ कर्मचारी तसे आपापल्या जागेवर अत्यंत अभ्यासू, कर्तव्यतत्पर व हजरजबाबी म्हणून ओळखले जातात. इतर सहकर्मचाऱ्यांशी त्यांच्या सौहार्दपूर्ण वागण्यामुळे आज त्यांच्या सेवानिवृत्ती समारंभाप्रसंगी आरोग्य भवनातील ऑडिटोरिअम खचाखच भरले होते. अनेक कर्मचाऱ्यांनी त्यांच्याबद्दल भरभरून मनोगते व्यक्त केली तसेच त्यांच्या सानिध्यात आलेले अनुभवदेखील शेअर केले. श्री ...

रॅगिंग एक विकृतीच

Image
मुंबईच्या नायर रुग्णालयातील वसतिगृहात जळगावच्या पायल तडवी या प्रशिक्षणार्थी विद्यार्थिनीने रॅगिंगला कंटाळून नुकतीच आत्महत्या केल्याचा घडलेला प्रकार खूपच धक्कादायक आहे. कडक कायदे व रॅगिंगमुळे यापूर्वीही अनेकदा जीव जाण्याचे प्रकार घडल्याची उदाहरणे असताना आजदेखील महाविद्यालयांतील उच्च शिक्षित तरुणांमध्ये रॅगिंगचे प्रकार घडत असतील ती विकृतीच म्हणावी लागेल. ही विकृती मोडीत काढण्यासाठी आता शिक्षण संस्थानीच पावले उचलण्याची खरी गरज असून अशा घटनांवर देखरेख ठेवण्यासाठी विद्यार्थ्यांचीच पथके बनवावी. ही पथके रॅगिंगच्या घटना प्रशासन व सुरक्षयंत्रणांकडे पोहोचवण्याचे काम करतील व रॅगिंगमुळे एखादी गंभीर घटणा घडण्याअगोदार त्यावर अंकुश आणता येईल.  वैभव मोहन पाटील  घणसोली, नवी मुंबई

महाराष्ट्र तंबाखूमुक्त करू या - आरोग्य मंत्री मा ना एकनाथ शिंदे

Image
जागतिक तंबाखू विरोधी दिनाचा राज्यस्तरीय सोहळा संपन्न जागतिक तंबाखू विरोधी दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र तंबाखुमुक्त करण्याच्या दिशेने आपण कार्य करावयास हवे. तंबाखू विरोधी अभियान ही एक चळवळ म्हणून कायमस्वरूपी रूजविणे गरजेचे आहे, असे आवाहन आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. मुंबईच्या यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे आज दिनांक 29 मे 2019 रोजी सकाळी जागतिक आरोग्य संघटना व सलाम मुंबई फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने "जागतिक तंबाखू विरोधी दिन" राज्यस्तरीय सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे उद्घाटन आरोग्यमंत्री श्री. शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. आरोग्यमंत्री म्हणाले, भारतात साधारणतः आठ ते नऊ लक्ष व्यक्ती तंबाखूमुळे दगावतात. तंबाखूजन्य पदार्थाच्या सेवनामुळे होणाऱ्या कर्करोग, उच्च रक्तदाब, मधुमेह, नपुंसकत्व यासारख्या गंभीर आजारांबाबत जनजागृती राज्य शासन करीत असून, पानाच्या दुकानांमध्ये तंबाखूजन्य पदार्थांसोबतच अन्य खाद्य पदार्थ, शितपेये, चॉकलेट व बिस्किटे या पदार्थांच्या विक्रीवर बंदी घातली असल्याचे श्री शिंदे यांनी स...

शिक्षण व्यवस्थेचे फायर ऑडिट व्हावे

Image
शिक्षणव्यवस्थेत बदल आवश्यक २० पेक्षा अधिक जणांचा जीव घेणाऱ्या गुजरातमधील सूरत येथील तक्षशिला इमारत दुर्घघटनेने अवघ्या देशाला हादरून सोडलेे. या घटनेतून शिकवणीला जाणाऱ्या आपल्या विद्यार्थ्यांचा जीव किती धोक्यात आहे, याची प्रचिती सर्वांना आली असणार. अनेक क्लासवाले सुरक्षेचे सर्व नियम धाब्यावर बसवून मुलांच्या जीवाशी अक्षरशः खेळत असतात. आज बहुतांशी कोचिंग क्लासेसमध्ये विद्युत उपकरणांचा भरमसाठ भरणा असतो. त्याची देखभाल दुरुस्तीदेखील वेळेवर होत नाही ज्यामुळे शॉर्टसर्किट सारख्या घटना घडतात. यामुळे बऱ्याच ठिकाणी विद्यार्थी आपला जीव धोक्यात घालून कोचिंग क्लासेसमध्ये शिक्षण घेत असतात. सुरतमध्ये मागील शुक्रवारी घडलेली घटना ह्याच निष्काळजीपणाचे फलित आहे. कोचिंग क्लासेसमध्ये आगीपासून सुरक्षेसाठी काहीच उपाययोजना नसल्याने विद्यार्थ्यांना इमारतीच्या थेट चौथ्या मजल्यावरून उड्या माराव्या लागल्या. आज बहुतांशी कोचिंग क्लासेसचे ‘फायर आॅडीट’ झाले नसल्याची बाब तपासात पुढे येईल. वस्तुतः शिक्षण क्षेत्रापेक्षा जास्त फायद्याचा दुसरा कोणताच व्यापार आज दिसून येत नाही. त्यामुळे सध्या कुणालाही व्यापार सुरू करा...

तंबाखुला नकार तर आरोग्याला होकार

Image
जागतिक तंबाखू दिनाच्या निमित्ताने.. या महिन्‍यात ३१ मे हा जागतिक तंबाखू विरोधी दिन म्‍हणून सर्वत्र साजरा केला जात आहे. या दिवशी शासकीय पातळीवर सर्व महाराष्‍ट्रातील जिल्‍हयांमध्‍ये विविध स्‍वरुपाचे जनजागृती कार्यक्रम हाती घेण्‍यात येत आहेत.  तंबाखूजन्‍य पदार्थांव्‍दारे होणारे धुम्रपान हा सध्‍याचा अत्‍यंत गंभीर विषय असून महाविदयालयीन तरुणांमध्‍ये त्‍याचे वाढते प्रमाण चिंतेची बाब आहे. तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन करणारे लोक आपल्‍याला सर्वत्र दिसून येतात. घर, कार्यालये तसेच सार्वजनिक ठिकाणी तंबाखू खाणारी व तंबाखूजन्‍य पदार्थांचे धुम्रपान करणा-या लोकांची संख्‍या दिवसेंदिवस वाढत आहे. या पदार्थांच्‍या विक्री व सेवनावर अनेक निर्बंध आणुनदेखील अनेक ठिकाणी त्‍यांची विक्री खुलेआम होताना दिसते. तंबाखू सेवनाने भारतात साधारणतः १० लक्ष लोक विविध आजारांनी मृत्‍यू पावत आहेत. महाराष्‍ट्रामध्‍ये साधारणतः ३६ टक्‍के पुरुष व ५ टक्‍के महिला तंबाखू व तंबाखुजन्‍य पदार्थांचा वापर करतात. तंबाखूमुळे ह़दयरोग, कर्करोग, यकृताचा आजार, फुफुसाचे आजार, टि.बी. यासारख्‍या प्राणघातक आजारांना बळी पडतात. पक्ष...

महाराष्ट्र आरोग्य पत्रिका एप्रिल २०१९

Image
बाहेरचे खाताय....सावधान व्यस्त जीवनशैली व दररोजची दगदग यामुळे बहुतांशी कुटुंबे आज बाहेर हॉटेलचे जेवण पसंत करतात. काही लोक रोजच्या चवीतून बदल म्हणूनदेखील रेस्टॉरंटमध्ये नियमित जेवायला जातात. मात्र हॉटेल्समधील खाद्यपदार्थ आरोग्यास घातक ठरत असल्याचे वारंवार निदर्शनास येत आहे. हे खाद्यपदार्थ चवीला जरी चांगले वाटत असले तरी त्याचे शरीरावर विपरीत व दूरगामी परिणाम  ठरलेले असतात. आपल्याला रोजच्या जीवनात अनेक खाद्यपदार्थांची गरज लागते. आधुनिक जीवनशैलीमुळे अनेक कुटुंबे न्याहरीसह जेवणात बेकरीचे पदार्थ मोठ्या प्रमाणात वापरत असल्याचे चित्र आहे. बेकरी पदार्थांचा खरेदीदार वाढल्याने या पदार्थांच्या उत्पादनात कमालीची वाढ झाली आहे. त्यामुळेच आपल्याला आज गल्लीगल्लीत बेकरीची दुकाने थाटलेली प्रकर्षाने जाणवतात. मात्र या बेकरी उत्पादनांवर कोणाचेही नियंत्रण नसल्याचे सध्याचे चित्र आहे. स्वस्त व भूक भागवण्यास चांगले अशी ओळख असलेल्या ह्या पदार्थांची निर्मिती जर आपण खोलात जाऊन पाहिली तर हे पदार्थ सेवन करणे किती घातक ठरू शकेल हे आपल्या लक्षात येईल. बेकरीचे पदार्थ बनवताना चांगला दर्जा व गुणवत्तापूर्ण ...

शास्वत नैसर्गिक शेतीचा सक्षम पर्याय

Image
लोकउद्धार फाउंडेशनचा उपक्रम आजकाल शेतीमधून चांगले पीक येण्यासाठी व पिकांवर होणारा कुठल्याही प्रकारचा रोगांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शेतकऱ्यांकडून रासायनिक कीटकनाशके व खतांचा वापर करण्यात येतो. मात्र    शेतकरी वर्गाकडुन अजाणतेपणे अति प्रमाणात होणा-या रासायनीक खते कीटकनाशके फवारणीमुळे  मानवी जिवनात आरोग्याच्या अनेक समस्या भेडसावण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या रासायनिक किटकनाशकांमुळे कर्करोग, डायबिटीज, उच्च रक्तदाब यासारखे घातकी आजार बळावू शकतात. खरेतर 40 ते 50 वर्षांपूर्वी रासायनिक खते वापरण्याचे प्रमाण नगण्य होते तरीदेखील शेतकरी भरमसाठ उत्पन्न घ्यायचे. कीटकनाशके फवारणीचे पम्पही नव्हते म्हणजे तशी गरजच नसायची. पूर्वी गावात एक किंवा दोनच कीटकनाशके फवारणी पंप असायचे. मात्र आता ह्या रासायनिक कीटकनाशकांचा भडिमार पिकांवर केला जातो. कडक व क्षारयुक्त जमिनिमुळे पिकांवर रोगांचा व अळ्यांचा प्रादुर्भाव वाढला आहे. परिणामी उत्पन्न कमी झाले व शेतकरी कर्जबाजारी होऊ लागला आहे. शेती, पाणी, हवा, पर्यावरण यातील प्रदूषण दिवसेंदिवस वाढीस लागले आहे. त्यामुळे आरोग्य व जीवनमान बिघडत ...

एक्झिट पोलने उत्कंठता संपुष्टात

Image
देशातील सर्वोच्च समजल्या जाणाऱ्या लोकसभेसाठी मतदान प्रक्रिया अखेर पूर्ण झाली आणि आता सर्वांना वेध लागलेत ते निकालाचे. येत्या 23 तारखेला ही प्रतीक्षा संपणार आहे आणि मतपेटीत बंद झालेली गुपिते उघड होणार आहेत. यंदा चोहूबाजूंनी लागलेला प्रचाराचा जोर पाहता साशंकतेमुळे राजकीय पक्ष मात्र भलतीच चुप्पी साधून आहेत. स्थानिक राजकीय पक्षांना तर येणाऱ्या विधानसभा निवडणुकीची चिंताच जास्त भेडसावत आहे. लोकसभा निवडणुकीकडे ते केवळ वजन चाचपण्याची रंगीत तालीम म्हणूनच पाहत आहेत. असो, निकाल यायला अजून अवधी आहे मात्र टीव्ही चॅनेल्सवाल्यांनी मात्र आकड्यांची जुळवाजुळव सुरू केली आहे. अनेक चॅनेल्सचे एक्झिट पोलचे आकडेदेखील बाहेर आलेले आहेत. खरेतर हे एक्झिटवाले जिंकणाऱ्या उमेदवारांचे आकडे शोधून लोकांना कशाचा आधारे दाखवतात हे एकदा तपासून पाहायला हवे. लोकशाहीत मतदान हे गुप्त पद्धतीने होत असताना कुठला उमेदवार जिंकणार हे एखाद्या सर्वेतून निष्पन्न होत असेल राजकीय पक्षांनीही असे सर्व्हे करूनच निवडणुका लढवल्यास त्याचा फायदा त्यांना नक्कीच होईल. एक्झिट पोलच्या आधारे कुठला उमेदवार वा पक्ष जिंकणार हे तर्क लावले ज...

अवयवदान श्रेष्ठ दान

Image
दानाकडून कृतज्ञतेकडे जाण्याचा मार्ग - अवयवदान अवयवदानाबद्दल लोकांमध्ये जागरुकता निर्माण होत असल्याचे अनेक उदाहरणांवरून दिसून येत आहे. त्यामुळे आजच्या डिजिटल युगात परोपकाराची भावना लोकांच्या मनात तग धरून आहे ही बाब नाकारून चालणार नाही. आपल्या घरातील कर्त्या पुरुषाचे अकाली कोमात जाणे कुटुंबातील सर्वांसाठीच दुःखप्रद असते. मात्र अशा अवघड प्रसंगी घरातील कुटुंबियांनी मन घट्ट करीत त्यांच्या अवयवदानाचा निर्णय घेतल्याची घटना भिवंडीत मागील आठवड्यात घडली. भिवंडी शहरातील कासार आळी येथील इमारतीत राहणारे स्वतःचा व्यवसाय करणारे कमलेश हस्तीमल जैन हे ४६ वर्षीय गृहस्थ ५ मे रोजी मिरभाईंदर येथे आपल्या मित्रांना भेटण्यासाठी दुचाकीवरून गेले होते. रात्री अकरा वाजता माघारी घरी परतत असताना त्यांचा अपघात होऊन दुचाकी वरून पडल्याने ते जखमी होऊन कोमात गेले. त्यानंतर त्यांच्या कुटुंबियांनी त्यांना भिवंडीतील ऑर्बिट हॉस्पिटल येथे उपचारासाठी दाखल केले होते. वैद्यकीय उपचार करणाऱ्यांनी त्यांच्या कुटुंबियांना ब्रेन डेथ झाल्याचे जाहीर केले. या घटनेनंतर दुःखाचा डोंगर कुटुंबियांवर कोसळला असताना कमलेश जैन यांचे वडील...

लग्न, रिसेप्शन, यजमान आणि वऱ्हाडी

Image
लग्नसमारंभ आणि स्वागतसोहळे सध्या लग्नसराई अगदी जोमात सुरू आहे. एकाच दिवशी जवळच्या नातलगांचीच एकापेक्षा अधिक लग्न होत असल्याचादेखील अनेकांचा अनुभव आहे. म्हणून त्यातल्याच खूपच जवळच्या नातेवाईकाची निवड उपस्थितीसाठी केली जाते आणि इतर ठिकाणी मानपान आहेर हस्ते परहस्ते पाठवण्याचे सोपस्कार पार पाडले जातात. लग्न ही खरंतर टाळता येण्यासारखी गोष्ट नाही कारण लग्नकार्याप्रसंगी आपण वधू वराला किंवा यजमानाला येऊ शकत नसल्याबद्दल सॉरी बोलून ' पुढल्या वेळी नक्की येईन' असे म्हणू शकत नाही. त्यामुळे लग्नसमारंभप्रसंगी उपस्थित राहणे ही अनिवार्य बाब झाली आहे. आजकाल तर आमंत्रणे देखील अगदी विविध मार्गाने केली जात असल्याने कुणी नातेवाईक अमंत्रणाविना सुटून गेला असं होतं नाही. लग्न पत्रिका ह्या हस्ते परहस्ते, सोशल मिडियावरही पाठवल्या जातात तर फोनवरही आमंत्रणे दिली जातात. उन्हाने अगदी उच्चांकी पारा गाठला असला तरी त्याला लग्नकार्य रोखता येणे शक्य झालेले नाही. शेवटी ऊन हे काही नैसर्गिक आपत्ती किंवा संकट नाही, नाही का ! त्यामुळे उन्हामुळे लग्नकार्य पुढे ढकलले किंवा रद्द केले असे ऐकिवात नाही....

महाराष्ट्राच्या विविधांगी संस्कृतीचे दर्शन घडवणारे फेस्टिवल शहरांत व्हावेत

Image
ठाण्यात सोलापूर फेस्टचे आयोजन प्रत्येक विभागाची निरनिराळी संस्कृती हे महाराष्ट्राचे वेगळेपण मानले जाते. प्रत्येक जिल्हा, विभाग आपापल्या वैशिष्ट्यांसाठी येथे ओळखला जातो. सोलापूर हा जिल्हादेखील अशीच मोठी अध्यात्मिक, सांस्कृतिक, वस्त्र व खाद्य पार्श्वभूमी लाभलेला जिल्हा आहे. याच संस्कृतीचे दर्शन मुंबई ठाण्यातील नागरिकांना घडावे यासाठी सोलापूर सोशल फाऊंडेशन तर्फे १७,१८,१९ मे २०१९ रोजी हायलँड ग्राउंड ढोकाळी, ठाणे येथे 'सोलापूर फेस्ट 2019' चे करण्यात आले आहे. मी देखील शनिवारी सुट्टीचा मुहूर्त साधत या फेस्टिवलला भेट दिली. दुपारच्या सुमारास उन्हाचा पारा चाळिशीपार गेलेला असल्याने वर्दळ थोडी कमीच होती मात्र आयोजक व स्टॉलधारक यांचा उत्साह मात्र तसूभरही कमी झालेला नव्हता हे विशेष. सोलापुरी संस्कृतीचे व तेथील जीवनपद्धतीचे हुबेहूब दर्शन घडवणारा हा महोत्सव आयोजकांना धन्यवाद द्यावेत असाच भरवण्यात आला आहे. यामध्ये सोलापूरचे वेज नॉनव्हेज जेवण, शेंगांची चटणी, चादरी, मसाले, पापड, असे अनेक अस्सल सोलापूरी पदार्थ प्रदर्शन व विक्रीसाठी मांडण्यात आले आहेत. शिवाय कलात्मक कार्यक्रमात दी...

संसर्गजन्य आजारांचा प्रसार रोखण्यासाठी

Image
संसर्गजन्य आजारांचा प्रसार होऊ नये यासाठी फूड डिलिव्हरी करणाऱ्या मुलांची आरोग्य तपासणी व्हायलाच पाहिजे. स्वीगी, झोमॅटो सारख्या कँपन्यांना एफडीएने त्यासाठी आदेश दिल्याने खाद्यपदार्थ पुरवणाऱ्या इतर कँपन्यांदेखील ही बाब गांभीर्याने घेतील अशी आशा आहे. मात्र फूड डिलिव्हरी करणाऱ्यांपेक्षा ते बनवणाऱ्या कामगारांची आरोग्य तपासणी करणे अधिक गरजेचे आहे. आज शहरी भागांत कामाच्या व्यापामुळे बहुतांशी कुटुंबे अशा प्रकारे ऑनलाइन ऑर्डर देऊन खाद्यपदार्थ मागवणे पसंत करतात. मात्र हे अन्न कोठून येते, कशा परिस्थितीत व कोणत्या गुणवत्तेचे पदार्थ वापरून तयार केले जाते याबाबत त्यांना काहीही माहिती होत नाही. त्यामुळे केवळ डिलिव्हरी बॉईजची आरोग्य तपासणी करून उपयोगाचे नाही तर ते पदार्थ तयार करणाऱ्या कुकचीदेखील आरोग्य तपासणी होणे आवश्यक आहे. फूड डिलिव्हरी कँपन्यांनी आपल्या खाद्यपदार्थांची गुणवत्ता टिकवण्यासाठी आपल्या कर्मचाऱ्यांची नियमित आरोग्य तपासणी करणे सर्वांच्या हिताचे आहे.  वैभव मोहन पाटील  घणसोली, नवी मुंबई

आरोग्यमंथन ८१ वे - मानसिक आजारांवर करा मात

Image
मानसिक आजारांवर करा मात आपणा प्रत्‍येकाला कुठल्‍या न कुठल्‍या प्रकारच्‍या व्‍याधी असतात. काही शारीरीक तर काही मानसिक. शारिरीक व्‍याधींवर वैदयकीय उपचारांनी आपणाला काही कालावधीत मात करता येते. ज्‍यातून लवकर बरे होता येते. मात्र मानसिक व्‍याधींचे समाधान तितक्‍या प्रभावीपणे करता येत नसल्‍याने त्‍या जटील बनत जातात. मानसशास्‍त्रीय कारणांचा अभ्‍यास केला असता हया आजाराने त्रस्‍त व्‍यक्‍तींना यातून बाहेर काढण्‍यासाठी काही उपाय सुचविले जातात ज्‍याचे काटेकोर पालन केले तर रुग्‍ण या आजारातुन बरा होऊ शकतो. शारिरीक विकार दृश्य स्वरुपात असतात परंतु मानसिक विकार वैयक्तिक स्‍वरुपात असल्यामुळे तात्काळ दिसून येत नाहीत. जागतिक पातळीवर समाजात शंभरात एकजण तरी कोणत्या ना कोणत्यातरी गंभीर आजाराने बाधीत असतो व सुमारे 10 ते 12 टक्के माणसं कमी तिव्रतेच्या मानसिक आजारांनी पछाडलेली असतात. महाराष्ट्र राज्यात लोकसंख्येचा जर विचार केला तर सुमारे 8 ते 10 लाख मानसिक आजाराने ञस्त आहेत. म्हणजेच राज्यात मानसिक आरोग्य समस्या निर्माण झाली आहे असे म्‍हटल्‍यास ते वावगे ठरणार नाही. मानसिक आजाराच्या समस्यांचे गांभिर्य आण...

लाईफलाईन ठरतेय डेड लाईन

Image
स्टंटबाजाना आवरण्याची गरज मुंबई उपनगरीय रेल्वेमध्ये अल्पवयीन व कॉलेज मुले सातत्याने स्टंटबाजी करताना आढळतात. या स्टंटबाजीने अनेकांचा जीव जात आहे. हे स्टंटबाज लोकलच्या दरवाजावर लटकून प्रवास करतात ज्याचा त्रास लोकलमधून प्रवास करणाऱ्या इतर प्रवाशांना तसेच चढण्या-उतरणाऱ्या प्रवाशांना होतो. स्टेशनवर कितीही गर्दी असली तरीही हो मुले लोकलचा दरवाजा सोडत नाहीत. परिणामी प्रवाशांना प्रचंड त्रास होतो व अक्षरशः जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतो. स्टंटबाजी करताना ही मुले कधी पूर्ण शरीर चालत्या लोकलच्या बाहेर काढतात तर कधी स्टेशन प्लॅटफॉर्मवर वेगवेगळ्या करामती करताना दिसतात. फटका मारून मोबाईल चोरी, चैन स्नाचिंग, पाकिटमारी यामध्ये बऱ्याच प्रमाणात याच मुलांचा समावेश असतो. त्यामुळे मुंबईची 'लाईफलाईन' समजल्या जाणाऱ्या उपनगरीय रेल्वेला 'डेडलाईन' बनवणाऱ्या या स्टंटबाजांना आवरण्याची गरज आहे.  वैभव मोहन पाटील  घणसोली, नवी मुंबई

मोठे व्हायची स्वप्न जरूर पाहावीत मात्र आधी संस्कारक्षम व्यक्ती व्हा

Image
संस्कारक्षम पिढीसाठी बाल संस्कार शिबिरे उपयुक्त माझे जन्मगाव असलेल्या पालघर जिल्ह्यातील देवघर गावामधील के जी पाटील विद्यालय येथे 2 मे 2019 पासून भव्य निवासी बाल संस्कार शिबिर सुरू झाले असून या शिबिरात परिसरातील 70 मुले सहभागी झाली आहेत. पंचक्रोशीतील आळंदी येथे अध्यात्मिक शिक्षण घेतलेल्या हरिभक्त पारायण व महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकारांच्या पुढाकाराने तसेच देवघर विभाग शिक्षण प्रसारक ट्रस्ट व ग्रामस्थ मंडळ देवघर यांच्या सहयोगाने सलग दुसऱ्या वर्षी आयोजित करण्यात आलेल्या ह्या निवासी बाल संस्कार शिबिरास मी ठाणे येथील माझे भावोजी श्री निलेश घोडविंदे यांच्यासह शनिवार दिनांक 11 मे रोजी भेट दिली. ह्या बाल संस्कार शिबिरामुळे गावातील वातावरणदेखील पूर्णपणे अध्यात्मिक व पवित्र झाले असून आजकाल दुर्मिळ होत चाललेले व दैनंदिन जीवनात उपयुक्त ठरणारे बाल संस्कार मुलांवर घालण्यात येत आहेत. यावेळी मी शिबिरातील मुलांशी संवाद साधत त्यांनी आत्मसात केलेल्या अनेक गोष्टी व कला मुलांकडूनच उलगडवल्या. त्यातून शिबिराच्या दहा दिवसांत अनेक मुले पेटी, पखवाज, तबला, श्लोक, हरिपाठ, हनुमान चालीसा, गीतेचा प...