नवे वर्ष, आरोग्याचा संकल्प
नूतन वर्षाभिनंदन २०२२ २०२२ ह्या नव्या कोऱ्या वर्षाची सुरुवात होत आहे. गेल्या दिड दोन वर्षांपासुन आपण कोरोना हया महाभयंकर जागतिक महामारीच्या सावटाखाली वावरत आहोत. गेल्या वर्षी देशात शिरकाव केलेला कोरोना विषाणू अदयाप आपल्यातून जाण्यास तयार नाही. या साथीच्या पहिल्या दोन लाटांमध्ये मोठी जिवितहानी झाली आहे. आपले अनेक परिचीत आप्तजनदेखील या जिवघेण्या साथीच्या लाटांमध्ये मृत्यूमुखी पडले. त्यात सध्या ओमायक्रॉन या कोरोनाच्या नव्या प्रकाराची भिती सर्वत्र पसरलेली आहे. या प्रकाराचा प्रसार परदेशांमध्ये मोठया वेगाने होत असल्याने त्या दृष्टीने आपण खबरदारी घेतलीच पाहीजे. सार्वजनिक ठिकाणी सोशल डिस्टंसींगचे नियम व मास्कचा वापर आपण कटाक्षाने करायलाच हवा. त्याचबरोबर सर्वच पात्र ठरणाऱ्या लाभार्थ्यांनी कोविड लसीचे दोन्ही डोसदेखील घेणे अत्यंत आवश्यक आहे. या पार्श्वभूमीवर नव्या वर्षात पदार्पण करत असताना आपल्यापुढे अनेक आव्हाने अजूनही आ वासुन उभी आहेत. मात्र आरोग्याच्या बाबतीत आपण बाळगलेली सतर्कता आप...