बालसंस्कार ग्रुपच्या ऑनलाईन लॉकडाऊन स्पर्धेचा व आंनदवारी प्रश्नमंजुषा स्पर्धेचा निकाल जाहीर
पाठांतर, गायन, चित्रकला, निबंध स्पर्धा बालसंस्कार ग्रुप देवघर व देवघर विभाग शिक्षण प्रसारक ट्रस्ट यांच्या वतीने लॉकडाऊन कालावधीत मुलांच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी भव्य ऑनलाईन बालसंस्कार स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. यात पाठांतर, गायन, चित्रकला, निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. या स्पर्धांचा निकाल दिनांक १ जुलै २०२० आषाढी एकादशीच्या दिवशी लागला. यावेळी परीक्षक व आयोजकांनी व्यक्त केलेले मनोगत :- * आयोजक व परिक्षकांचे मनोगत* नमस्कार बालमित्रांनो, संपूर्ण जगावर ओढवलेल्या कोरोना महामारीच्या संकटकाळात आपण सर्वांनी अत्यंत धीराने व संयमाने परिस्थितीचा सामना केलात त्याबद्दल आपले मनापासून अभिनंदन. या जागतिक संकटामुळेच आपले सालाबादप्रमाणे होणारे निवासी बालसंस्कार शिबीर यंदा आपण घेऊ शकलेलो नाही. कर्म, निसर्ग व नियती याच्यापुढे कुणाचे काहीच चालत नाही. त्यामुळेच माणसामाणसांत संक्रमित होणारा कोरोना विषाणू आज माणसामुळेच माणसाच्या जिवावर उठलाय. आज आपल्यातलेच अनेक बांधव या विषाणूचा मोठ्या जोमाने मुकाबला करत आहेत. मग ते कोरोनाबाधित रुग्ण असतील किंवा आपले डॉकटर, नर्स, पोलीस किं...