कोरोनामुक्तीसाठी लसीकरण महत्वाचे
केंद्र सरकार नियोजनबद्ध पद्धतीने टप्प्याटप्प्याने लसीकरण प्रक्रिया राबवत आहे. ही संपूर्ण प्रक्रिया 'कोविन' या ऑनलाईन अप्लिकेशनद्वारे पार पडत असल्यामुळे ती पूर्णपणे पारदर्शी व लसीकरणातील सावळागोंधळ रोखणारी आहे. सुरुवातीला केवळ आरोग्य कर्मचारी व कोरोना योद्धयांना लस दिली जात होती. त्यानंतर 60 वर्षांवरील जेष्ठ नागरिक व 45 वर्षांवरील विविध व्याधींनी ग्रस्त व्यक्तींचा समावेश करण्यात आला. त्यानंतर 45 वर्षांवरील सर्वच व्यक्तींना व येत्या १ तारखेपासून १८ वर्षांवरील सर्वच नागरिकांना लस उपलब्ध होणार आहे. टप्प्याटप्याने सर्वांनाच ही लस उपलब्ध होणार आहे. कोरोनाप्रतिबंधक लस घेण्यासाठी मोठ्या प्रमाणावर लोक लसीकरण केंद्रांवर गर्दी करत आहेत. कोरोनाविरुद्धच्या लढाईत सर्व नागरिकांचे लसीकरण अत्यंत महत्वाचे आहे. सद्यस्थितीत सिरम इन्स्टिट्यूटची कोविशिल्ड व भारत बायोटेकची कोव्हॅक्सीन ह्या स्वदेशी लसी लाभार्थ्यांना दिल्या जात आहेत. मात्र दररोज कोट्यवधी लोकांना लस देण्यामुळे तसेच लसीच्या निर्यातीमुळे येत्या काळात लसीचा तुटवडा जाणवू लागणार ही वस्तुस्थिती नाकारून चालणार नाही. यामुळे लसीचा पु...