Posts

Showing posts from January, 2023

हा ट्रेंड योग्य नव्हे

Image
चित्रपटांना विरोध करण्याचा नवा ट्रेंड सध्या समाजात रुजू होत चाललाय. भावना दुखवण्याच्या नावाखाली गेल्या काही वर्षांत अनेक चित्रपटांना राजकीय, सामाजिक विरोध झाला. मात्र त्याने त्या चित्रपटाची प्रसिद्धी कमी होण्याऐवजी त्या चित्रपटाबद्दलची दर्शकांची उत्सुकता अधिकच वाढल्याचे दिसून आले. हर हर महादेव या चित्रपटाने ऐतिहासिक कथानकावरून वाद अनुभवला तर अश्लीलतेवरून व धर्मभावनांवरून नुकत्याच रिलीज झालेल्या बॉलिवूडच्या पठाण चित्रपटालाही मोठा विरोध झाला. वास्तविक एखादा चित्रपट तयार करण्यासाठी चित्रपटाचे लेखक, दिग्दर्शक, निर्मात्यांची मोठी मेहनत व गुंतवणूक त्यामागे असते. चित्रपट प्रदर्शित करावा की न करावा यासाठी सेन्सॉर बोर्ड कार्यरत आहे. मात्र सेन्सॉरने हिरवा कंदील देऊनही चित्रपटांवरून वाद उद्भवणार असतील तर त्यावर विचारमंथन होणे गरजेचे आहे. अनेकदा निर्माण होणारे वाद चिरकाल टिकत नाहीत. सवंग प्रसिद्धीसाठी त्याचा वापर करून नंतर ते वाद आपोआप शमवले जातात. फारच अपवादात्मक परिस्थितीत चित्रपटातील वादग्रस्त चित्रीकरण बदलले अथवा काढून टाकले जाते. त्यामुळे अनावश्यक वाद हे टाळायलाच हवेत....

अनंत बोरसे यांच्या "अव्यक्त अनंत ६१" पुस्तकाचे शहापुरात प्रकाशन

Image
आमचे निकटस्नेही व लेखन क्षेत्रातील आदर्श श्री अनंत बोरसे यांच्या "अव्यक्त अनंत ६१" या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा रविवार दिनांक २२ जानेवारी २०२३ रोजी सकाळी ११ वाजता शहापूर येथील कुमार शहा मंगल कार्यालयात मोठ्या दिमाखात पार पडला. या प्रसंगी आवर्जून उपस्थित राहत श्री बोरसे यांना मी पुस्तक प्रकाशनाच्या निमित्ताने शुभेच्छा दिल्या. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून व्यासपीठावर जेष्ठ पत्रकार जयंत माईनकर, साहित्यिक डॉ रसनकुट्टे, मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष, साहित्यिक प्रा राम नेमाडे, दै नवे शहरचे उपसंपादक श्री राजेंद्र घरत, पत्रकार महेश धानके, दत्ता खंदारे आदी मान्यवर उपस्थित होते. तसेच सभागृहात श्री बोरसे यांचे कुटुंबीय, आप्तेष्ट, मित्रमंडळी व साहित्य क्षेत्रातील अनेक मंडळी उपस्थित होती. कार्यक्रम आटोपल्यावर सर्वांसाठी त्यांनी सुग्रास भोजनव्यवस्थाही केली होती. श्री अनंत बोरसे यांचा माझा परिचय गेल्या चार पाच वर्षांपूर्वीचा. दोघेही नियमित वृत्तपत्रलेखन करत असल्यामुळे अनेक कार्यक्रमांमध्ये आम्ही एकत्र आलो. योगायोगाने त्यांचा भाचा प्रसाद माझ्याच कार्यालयात कार्यरत...

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक जाहीर

Image
अभिजित राणे युथ फाउंडेशनच्या वतीने संस्थेचे संस्थापक अभिजित राणे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय निबंध स्पर्धा, कविता स्पर्धा आणि वृत्तपत्र लेखन स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा मुंबईच्या नरिमन पॉईंट येथील यशवंतराव सभागृहात दिनांक २४ जानेवारी २०२३ रोजी सायंकाळी पार पडला. अभिजित राणे युथ फाउंडेशन, वास्ट मीडिया, दै.  मुंबई मित्र व दै. वृत्तमित्र यांच्या विद्यमाने आयोजित ह्या पुरस्कार वितरण सोहळ्याप्रसंगी संस्थापक अभिजित राणे, दै मुंबई मित्रच्या संपादिका सौ अनघा राणे, माहिती अधिकार कार्यकर्ते श्री अनिल गलगली व इतर मान्यवर उपस्थित होते. राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत नवी मुंबईचे वृत्तपत्रलेखक श्री वैभव पाटील यांना 'देशाच्या विकासातील महिलांचे स्थान' या विषयावरील त्यांच्या निबंधासाठी दुसऱ्या क्रमांकाचे पारीतोषिक प्राप्त झाले. तर प्रथम क्रमांक सुजाता हनमघर, श्रद्धा वझे तृतीय, सुशील माळवी चतुर्थ, मनीषा कडव यांनी पंचम क्रमांक पटकावला. राज्यस्तरीय वृत्तपत्र लेखन स्पर्धेत जयराम देवजी प्रथम, मनमोहन रोगे द्वितीय, दीपक गुंडये तृतीय, मधुकर कुबल च...

जॉय सामाजिक संस्थेच्या वर्धापन दिनानिमित्त सादर केलेली व संस्थेच्या कार्य अहवालात प्रकाशित कविता

Image
जॉय सामाजिक संस्थेच्या वर्धापन दिनानिमित्त सादर केलेली व संस्थेच्या कार्य अहवालात प्रकाशित कविता

या चित्रपटांना मिळणार सरकारचे १ कोटी अनुदान

Image
ऐतिहासिक, सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात समाज घडवण्याचे कार्य करणाऱ्या व सामाजिक विषयांवरील चित्रपटांना १ कोटी रुपये अनुदान देण्याचा निर्णय नुकताच महाराष्ट्र सरकारने घेतला आहे. वाद विवाद, प्रेमप्रकरणे, भांडणे, गुन्हेगारीतील रहस्य व अश्लीलतेकडे झुकत चाललेल्या चित्रपटसृष्टीला पुन्हा समाजप्रबोधनाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शासनाचा हा प्रयत्न निश्चितच स्वागतार्ह म्हणावा लागेल. चित्रपट आज केवळ मनोरंजनाचे साधन राहिलेला नाही तर ज्ञान व प्रबोधनाचे उत्तम माध्यमही आहे. समाज घडवण्यास मोलाचा हातभार लावलेल्या महान व्यक्तींवर चित्रपट तसेच दूरचित्रवाणी मालिकांच्या आणि सामाजिक विषयांवरील चित्रपटांच्या निर्मितीसाठी शासन अर्थसहाय्य देणार आहे. अशा कलाकृतींच्या निर्मितीसाठी प्रयत्नशील असलेल्या मात्र निधीअभावी अडकून पडलेल्या दिग्दर्शक, निर्मात्यांसाठी ही बाब दिलासादायक आहे. यातून भावी पिढीला नक्कीच प्रेरणा मिळेल व समाजात चित्रपटांच्या माध्यमातून सुसंस्कारित वातावरण तयार होण्यास मदत होईल. लवकरच याविषयीचे धोरण तयार होणार आहे.  सुसंस्कारित समाज घडवण्यासाठी शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाचा ...

विविध क्षेत्रांतील मान्यवरांचा जॉय संस्थेमार्फत सन्मान

Image
जॉय सामाजिक संस्थेचा वर्धापन दिन उत्साहात साजरा नवी मुंबई - वैभव पाटील सामाजिक क्षेत्रात गेल्या काही वर्षांमध्ये आपला वेगळा ठसा उमटवलेल्या मुंबईच्या जॉय सामाजिक संस्थेचा वर्धापन दिन रविवार दिनांक १५ जानेवारी २०२३ रोजी दादर पूर्व येथील आरजु सभागृहात मोठ्या उत्साहात संपन्न झाला. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून व्यासपीठावर ज्येष्ठ साहित्यिक तसेच मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष प्राध्यापक डॉ. राम नेमाडे,  अविनाश दौंड कामगार नेते, शिक्षक नेते जनार्दन जंगले, दैनिक आपलं महानगर चे संपादक संजय सावंत, आरोग्य सेवेतील अधिकारी डॉ अविनाश भागवत, जॉय सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष गणेश हिरवे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी विविध क्षेत्रात सामाजिक उत्तरदायित्व निभावणाऱ्या सामाजिक घटकांचा, पत्रकार, वृत्तपत्रलेखक, आदर्श शाळा तसेच संस्थेच्या सभासदांचा विविध पुरस्कारांनी गौरव करण्यात आला. आपल्या प्रास्ताविकामध्ये संस्थापक गणेश हिरवे यांनी संस्थेची निर्मिती, वाटचाल, भूमिका व आगामी संकल्पनांविषयी माहिती दिली. विचारमंचावरील सर्वच प्रमुख अतिथींनी जॉय ऑफ गिव्हिंग करत असलेल्या कार्याचा गौ...

डॉ पदमजा जोगेवार यांची आरोग्य सेवेतून स्वेच्छानिवृत्ती

Image
                                                       काल आणखी एका कर्तव्यनिष्ठ अधिकाऱ्याने आरोग्य सेवेतून एक्झिट घेतली. गेल्या दोन-तीन वर्षांपासून राज्यस्तरावर आरोग्य सेवा आयुक्तालयात सहसंचालक पदावर कार्यरत असलेल्या डॉ पद्मजा जोगेवर यांनी सेवानिवृत्तीला दीडेक वर्ष बाकी असताना स्वेच्छानिवृत्ती स्वीकारत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. प्रकृतीच्या व कौटुंबिक कारणांमुळे त्यांनी स्वेच्छेने निवृत्ती स्वीकारली असली तरी एक प्रामाणिक, कर्तव्य तत्पर, अभ्यासू व हजरजबाबी अधिकारी विभागाने गमावल्याची खंत नक्कीच आहे. १९९४ साली आरोग्य सेवेत रुजू झालेल्या डॉ जोगेवार यांची बहुतांश सेवा विदर्भातील भंडारा जिल्ह्यात वैद्यकीय अधिकारी म्हणुन झाली.                                     त्यानंतर नागपूर मुख्यालयी त्यांनी महत्वाच्या जबाबदाऱ्या निभावल्या. ना...

वाहनचालक अशोक डावरे आरोग्य सेवेतून सेवानिवृत्त

Image
                                                                  आरोग्य सेवा आयुक्तालयातील वाहनचालक श्री अशोक डावरे यांनी आपल्या सेवानिवृत्तीनिमित्त कार्यालयातील सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांसाठी सुग्रास भोजनाची मेजवानी आज आयोजित केली होती. ३२ वर्षांची प्रदीर्घ सेवा बजावून श्री डावरे आरोग्य सेवेतून निवृत्त होत आहेत. आपल्या सेवेतील तब्बल २० वर्षे त्यांनी मंत्री कार्यालयात सेवा बजावली हे विशेष. अगदी आरोग्य संचालकांपासून सहाय्यक संचालकांच्या वाहनांवर चालकाची जबाबदारी पार पाडताना कधीही आपल्या सेवेला त्यांनी गालबोट लागू दिले नाही. अत्यंत निष्कलंक व निर्दोष सेवा बजावलेल्या डावरे यांच्या चेहऱ्यावर आपल्या सेवेला पुरेपूर न्याय दिल्याचे समाधान स्पष्ट जाणवत होते. योगायोगाने आज त्यांचा वाढदिवसदेखील होता. सेवानिवृत्तीनन्तरचे आयुष्य भारत भ्रमण करण्यात घालवणार असल्याचा अनोखा संकल्प त्यांनी केला आहे. आज अगदी सहकुटुंब ते ...

सार्वजनिक स्थळांना महापुरुषांची नावे द्यावीत

Image
औरंगाबाद असो की अहमदनगर, मुघल साम्राज्यातील अनेक राज्यकर्त्यांची नावे देशातील अनेक स्थळांना देण्यात आली आहेत. शिवछत्रपतींनी मराठे - मावळ्यांना सोबत घेत जीवाची बाजी लावत स्वराज्य मिळवले व अन्याय, अत्याचारी राजवट संपुष्टात आणली. मात्र शहरांना व विविध ठिकाणांना दिलेली परकीय आक्रमकांची नावे मात्र अनेक शतकांनंतरही तशीच आहेत. ती न बद्दलण्यामागे काय राजकारण आहे हे मात्र अनाकलनीय आहे. मुंबईतदेखील अनेक रेल्वे स्थानकांना ब्रिटिश कालीन नावे देण्यात आली आहेत ज्यांचा पूर्वातिहास व कारणे कुणालाही जाणून घ्यायची इच्छा नाही. वास्तविक अशी सत्तास्थाने संपल्यानंतर त्यांची नावेदेखील पुसून देश व जनसेवेसाठी जीवन खर्ची घातलेल्या राष्ट्रभक्त, महापुरुष यांची नावे अशा स्थळांना द्यायला हवीत. मुळात ती लोकांमध्ये रुजवायला हवीत. मात्र दुर्दैवाने इथे अशा ठिकाणांची नावे बद्दलण्यासाठीदेखील मोठे राजकारण केले जाते. महापुरुषांच्या नावाचा वापर सोयीने केला जातो व वापर झाल्यावर मुद्दा सोडून दिला जातो. महाराष्ट्र हे पुरोगामी विचारांचे अध्यात्मिक, ऐतिहासिक वारसा जोपासणारे राज्य आहे. त्याचे प्रतिबिंब येथ...