विरोध स्वाभाविक
अभिनेते व खासदार अमोल कोल्हे यांच्या ‘व्हाय आय किल्ड गांधी’ या चित्रपटावरुन हा सर्व वाद सुरु आहे. खासदार अमोल कोल्हे यांनी या चित्रपटामध्ये नथुराम गोडसेची भूमिका साकारली आहे. २०१७ मध्ये या चित्रपटाचं शूटिंग झालं होतं. पण दिग्दर्शक आणि निर्मात्यांमधील वादामुळे हा चित्रपट रखडला होता. पण त्यांच्यातील वाद समन्वयाने मिटल्यामुळे हा चित्रपट आता पाच वर्षांनी प्रदर्शित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सध्या ज्या पक्षात ते सक्रिय आहेत त्या राष्ट्रवादी पक्षाची विचारसरणी नेहमीच नथुराम गोडसेला विरोध करत आली आहे. त्यामुळे एका प्रकारे नथुराम गोडसेचं उदात्तीकरण करणाऱ्या ह्या त्यांच्या चित्रपटाचं समर्थन राष्ट्रवादी पक्ष कधीही करणार नाही. आता प्रश्न राहिला तो त्यांच्या अभिनेते पदाच्या कारकिर्दीचा, तर एखादी व्यक्तिरेखा साकारणे व त्या व्यक्तिरेखेच्या विचारसरणीशी सहमत असणे ह्या दोन भिन्न गोष्टी आहेत. एखादी नकारात्मक भूमिका साकारणारा अभिनेता कधीही त्या नकारात्मक विचारांच्या पाठीशी नसतो. मात्र हिंसेचे समर्थन करणाऱ्या विचारांच्या प्रवृत्तीला जाहीरपणे अभिनयातून न्याय देण्याचा प्रयत्न करणे ही बाबदेख...