Posts

Showing posts from January, 2026

वनवासी कल्याण आश्रम, चिंचवली केंद्रात ‘रानपाखरं’ च्या ७५ व्या अंकाचा प्रकाशन सोहळा संपन्न

Image
वनवासी कल्याण आश्रम, चिंचवली केंद्रात ‘रानपाखरं’ च्या ७५ व्या अंकाचा प्रकाशन सोहळा संपन्न वनवासी कल्याण आश्रम विद्यार्थी वसतिगृह, चिंचवली केंद्र, पनवेल येथे २४ जानेवारी २०२६ रोजी ‘रानपाखरं’ या मासिकाच्या ७५ व्या अंकाचा प्रकाशन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. या अंकाचे प्रकाशन आश्रमातील मुलांच्या हस्ते करण्यात आले, ज्यामुळे मुलांमध्ये आनंदाचे वातावरण होते. या प्रसंगी व्यासपीठावर उपस्थित असलेल्या मान्यवरांनी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले. 'रानपाखरं'च्या संपादिका मृदुला परचुरे यांनी ‘रानपाखरं’च्या प्रवासावर प्रकाश टाकला. सह-संपादिका सुवर्णा भट यांनी साहित्याचे महत्त्व विशद केले. कोकण प्रांत संघटन मंत्री प्रदीपजी पाटील यांनी संघटनेची भूमिका व कार्यावर मार्गदर्शन केले. ज्योतीताई जपे व प्रियाताई आचवल यांनी शिक्षण आयामाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांशी संवाद साधला. याप्रसंगी वरिष्ठ कार्यकर्ते कोचरेकर काका, हेमांगी भागवत आणि माजी पालक भाटवडेकर यांचीदेखील प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे स्वरूप, कार्यक्रमाचे नेटके सूत्रसंचालन चिंचवली केंद्रप्रमुख विवेक फुफाणे यांनी ...

श्री गणेश हिरवे

Image
सामाजिक कार्यातील महामेरु आमचे परममित्र व सामाजिक कार्यातील आदर्श श्री गणेश हिरवे यांचा आज ५३वा वाढदिवस. गेल्या दशकभरापासून आम्ही एकमेकांच्या संपर्कात आहोत. त्यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या जॉय ऑफ गिव्हिंग ह्या संस्थेच्या माध्यमातून नवी मुंबई, ठाणे, पालघर मध्ये अनेक सामाजिक उपक्रम त्यांच्या सोबतीने राबवता आले. त्यांच्या आजारपणात, अनुपस्थितीत व  मार्गदर्शनाखाली काही उपक्रम संस्थेमार्फत राबवण्याचा प्रसंग आला. पण कुठल्याही कार्यक्रमात हिरवे सर सोबत असताना एक बिनधास्तपणा असतो तो त्यांच्या गैरहजेरीत जाणवत नाही, एक प्रकारचे दडपण असते. गेल्या वर्षी जॉयचा दिवाळी अंक प्रकाशित करून आम्ही साहित्य क्षेत्रात पदार्पण केले तर हिरवे सरांनी आता जॉय एक्सप्रेस हे वृत्तपत्रदेखील सुरू केले आहे. खरेतर आपल्यासारख्या कुटुंबवत्सल लोकांना कुटुंब, नोकरी वा व्यवसायिक जबाबदाऱ्यातुन वेळ काढणे म्हणजे एक दिव्यच. त्यातून वेळ मिळालाच तर आपण एखादा आवडीचा छंद जोपासतो. माझेच उदाहरण घेतले तर कौटुंबिक व्याप व नोकरीतील व्यस्तता यातून दररोजच्या लिखाणासाठीदेखील वेळ काढणे जिकरीचे ठरते. त्यातुनच मग लोकलप्रवासात ...

मलेशिया येथील पामा ग्लोबल इंटरनॅशनल स्पर्धेत भारतीय विद्यार्थ्यांची दैदिप्यमान कामगिरी

Image
मलेशिया येथील पामा ग्लोबल इंटरनॅशनल स्पर्धेत भारतीय विद्यार्थ्यांची दैदिप्यमान कामगिरी पामा ग्लोबलद्वारे आयोजित २३व्या पामा ग्लोबल इंटरनॅशनल स्पर्धेत भारतातील विद्यार्थ्यांनी दैदिप्यमान कामगिरी केली. ही स्पर्धा मलेशिया मध्ये दिनांक २१ डिसेंबर २०२५ रोजी पार पडली आणि २८ देशांतील ५०० हून अधिक विद्यार्थ्यांनी त्यात सहभाग घेतला. अभिमानाची बाब म्हणजे भारतामधून ४४ विद्यार्थ्यांची निवड या स्पर्धेसाठी करण्यात आली होती. पामा इंडिया या संस्थेने भारतातून विद्यार्थ्यांना ह्या ABACUS स्पर्धेसाठी निवडले होते आणि त्या यादीत नवी मुंबईच्या स्किल क्रीएशन्स एजुकेशनल सेंटर चे ८ विद्यार्थी सहभागी झाले होते. या विद्यार्थ्यांनी स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करत भारताला गौरवाचे स्थान मिळवून दिले. सर्व विद्यार्थ्यांच्या मेहनतीला फळ आलं आणि त्यात विशेष उल्लेखनीय कामगिरी केली ती सुर्यांश रासकर ह्या विद्यार्थ्याने, ज्याने चॅम्पियन पदक पटकावले. त्याचप्रमाणे ह्या सेंटरच्या दक्ष बारस्कर तृतीय, सार्थक लोहार द्वितीय, मानसी पोपळे तृतीय, स्वरा कदम प्रथम, दक्ष तेरसे द्वितीय, विपुल यादव द्वितीय, रिद्धी शेट यांनी तृ...

बहुआयामी व्यक्तिमत्व आरोग्य सेवक डॉ. प्रभाकर भेरे

Image
*बहुआयामी व्यक्तिमत्व आरोग्य सेवक डॉ. प्रभाकर भेरे* ठाणे जिल्ह्यातील एक बहुआयामी व्यक्तिमत्व म्हणजे आरोग्य सेवक पदावर कार्यरत डॉ. प्रभाकर दामोदर भेरे. सध्या वज्रेश्वरी प्राथमिक आरोग्य केंद्रात कार्यरत असलेल्या भेरे यांनी आपल्या आरोग्य सेवेतील कारकिर्दीला खऱ्या अर्थाने न्याय देत कार्यकक्षेपलीकडे जाऊन अनेक नवनवीन संकल्पना विभागासाठी राबविल्या ज्याचा मोठा लाभ रुग्ण व ग्रामस्थांना झाला. स्वतः आजवर ४६  वेळा रक्तदान करून "गाव तेथे रक्तदाता" ही संकल्पना राबवून रक्तदानाची चळवळ व प्रचार व्यापक प्रमाणात केला. आरोग्य शिक्षणावर शीघ्र कविता तसेच वारली चित्राव्दारे आरोग्य शिक्षण देणारे भेरे हे एकमेवाद्वितीय आरोग्य कर्मचारी आहेत. आरोग्याबाबत जनजागृती करण्यासाठी त्यांनी  अनेक छोट्यामोठ्या व्हिडीओ क्लिप्स तयार करून प्रसारित केल्या. स्वतः पुरुष नसबंदी करून पत्नीचा सम्मान करून कुटुंब नियोजनाचा एक अनोखा आदर्श त्यांनी समाजात निर्माण केला आहे. व्यसनमुक्तीकरीता शाळा, कॉलेजमध्ये जाऊन ते जनजागृती करतात. आरोग्य, पर्यावरण, शेतकरी, व्यसनमुक्ती, वृक्षलागवड, शिक्षणाचे महत्व इ. विषयावर त्यांनी ...