Posts

Showing posts from March, 2021

लोकांच्या प्रश्नांपेक्षा अवांतर चर्चाच अधिक

Image
राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन नुकतेच पार पडले. या अधिवेशनात वास्तविक वाढती महागाई, इंधन - गॅस दर, वाढीव वीजबिले व बेरोजगारीवर चर्चा होणे अपेक्षित होते. त्यातून ठोस उपाययोजना व तरतुदी अर्थसंकल्पात प्रस्तावित करण्यात याव्यात. मात्र अधिवेशन केवळ सत्ताधारी व विरोधक यांच्यातील संघर्षापर्यंतच मर्यादित राहिले. आधीच अधिवेशनाचे दिवस कमी त्यात नको त्या विषयावर एकमेकांवर आरोप प्रत्यारोप यामुळे जनसामान्यांचे मूळ प्रश्न बाजूलाच पडले व त्यातच अधिवेशनाचे सूप वाजले. यातून लोकप्रितिनिधींना जनतेच्या प्रश्नात रसदेखील स्वतःच्या सोयीपुरताच दिसून येतो. काही आमदार मात्र आपापल्या मतदारसंघातील प्रश्न पोटतिडकीने मांडताना दिसत होते मात्र प्रमुख नेत्यांच्या भलत्याच विषयांवरील आकांडतांडवामुळे ते प्रश्नदेखील झाकोळले जात होते. अधिवेशन ही एक संधी असते, लोकप्रतिनिधींना आपापली भूमिका या कायदेमंडळात मांडण्याची. मात्र त्यांना म्हणावा तितका वाव मिळताना दिसत नाही. राजकीय व पक्षीय अजेंड्यामुळे जनसामान्यांचे जिव्हाळ्याचे प्रश्न बाजूला पडतात व केवळ वादविवाद, आरोप प्रत्यारोपच अधिक घडतात. ही परिस्थिती बदलाय...

महाशिवरात्रीच्या शुभेच्छा

Image
निसर्ग व अध्यात्मकलेचा सुंदर आविष्कार - श्रीक्षेत्र तिळसेश्वर वैभव मोहन पाटील, नवी मुंबई पालघर जिल्‍हयातील वाडा तालुका हा मुळतः भातशेतीचे उत्‍पन्‍न काढणारा भाग म्‍हणून ओळखला जातो. येथील 'वाडा कोलम' हा तांदळाचा प्रकार राज्‍यभर प्रसिध्‍द आहे. मात्र वाडा तालुका हा प्राचिन मंदिरे व एतिहासिक पार्श्‍वभुमी असलेला परिसर म्‍हणूनदेखील प्रसिध्‍द आहे. अशाच एका प्रसिध्‍द एतिहासिक स्‍थळाची ही ओळख. वाडा तालुक्यातील वैतरणा नदीच्या काठावर तिळसेश्वर शिव मंदिर प्राचीन काळापासून अस्तित्वात आहे. वाडा बस स्थानकापासून 7 कि.मी.अंतरावर असलेल्‍या हया मंदिरात जाणेयेणेसाठी बस व खाजगी वाहनांची सुविधा आहे. वैतरणा नदी येथे महाशिवरात्रीच्या दिवशी मोठी जत्रा भरते, महाशिवरात्री यात्रेच्‍या दिवशी ठाणे, पालघर जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून ‍भाविक या ठिकाणाला भेट देतात. विविध वस्‍तु व खादयपदार्थांची असंख्‍य दुकानांची या ठिकाणी रेलचेल असल्‍याने स्‍थानिक व आसपासच्‍या परिसरातील लोकांना चांगला रोजगारदेखील उपलब्‍ध होतो. यंदा कोरोना पार्श्वभूमीवर महाशिवरात्री यात्रा बंद आहे. या ठीकाणचे आणखी एक वैशिष्‍टय म्‍हणज...

आधी मतदार याद्यांतील घोळ मिटवा

Image
नवी मुंबई महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. या मतदार याद्यांमध्ये प्रचंड घोळ असल्याचे निदर्शनास आले आहे. बोगस मतदार, एका प्रभागातील मतदार दुसऱ्या प्रभागात टाकणे, मयत मतदारांची नावे न वगळणे, बोगस मतदार नोंदणीसाठी पैशांची देवाणघेवाण अशा प्रकारचे गंभीर आरोप आता राजकीय नेत्यांकडून होऊ लागले आहेत. अशा परिस्थितीत मतदार याद्या पुन्हा एकदा नीट तपासून त्या अद्ययावत करण्याची आवश्यकता आहे. आगामी निवडणुका नवी मुंबईसाठी अत्यंत संवेदनशील असणार आहेत. भाजप विरुद्ध महाविकास आघाडी अशी थेट लढत मातब्बर राजकीय पक्षांमध्ये होणार असल्यामुळे बोगस मतदान प्रशासनाला व निवडणूक आयोगाला परवडणार नाही. मात्र तसा प्रयत्न काही समाजकँटकांमार्फत सुरू असल्याची शक्यता नाकारता येत नाही. वास्तविक पाच वर्षांतून येणाऱ्या ह्या निवडणुकांसाठी खऱ्या मतदारांची प्रभागनिहाय ओळख पटवणे पालिकेसाठी अवघड नाही. निवासी पत्त्यानुसार तसे सर्वेक्षण पाच वर्षातून एकदा करणे पालिकेला सहज शक्य आहे. मात्र मतदारांची खातरजमाच होत नसल्याने बोगस मतदारांची नावे, फेरफार व अदलाबद...

ह तर चीनची कुटील रणनीती

Image
पॅन्गांगत्सो सरोवर परिसरातून भारत व चीन दोन्ही देशांनी आपापले सैन्य मागे घेण्याचा निर्णय भारताच्या गेल्या अनेक दशकांच्या लढाईचा निश्चितच विजय आहे. मात्र चीनवर इतक्या सहजासहजी विश्वास ठेवणे धोकादायक आहे. भारत चीन सीमेवरील कुरघोड्यांमध्ये चिनी सैन्याला कधीही सफल होऊ न दिलेल्या भारताला कुटील रणनीतीने गाफील करण्याचा प्रयत्न या माध्यमातून असू शकतो. चीनचे भारताविषयी अरेरावीचे धोरण लपून राहिलेले नाही. पाकिस्तानसारख्या दहशतवादी देशाला भारताविरुद्ध कुमक पूरवण्यासाठी चीन अग्रेसर राहिला आहे हे विसरून चालणार नाही. एकेकाळी भारतीय बाजारपेठा चीनच्या सामुग्रीनी व्यापलेल्या दिसायच्या. मात्र सध्याचे भारताचे आत्मनिर्भर धोरण चीनचा तिळपापड करणारे आहे. चीनवर अवलंबून असलेली भारतीय अर्थव्यवस्था आज स्वयंपूर्ण होत असून चीनमधून होणाऱ्या आयातीलादेखील उतरती कळा लागलेली आहे. चिनी बनावटीची अनेक मोबाईल एप्लिकेशन्स भारताने बँद केलेली आहेत ज्या माध्यमातून चीनवर हेरगिरीचा आरोप सातत्याने होत होता. कोरोनासारख्या जागतिक महामारीला चीन जबाबदार असल्याचे जगमान्य झाले ...