Posts

Showing posts from April, 2024

मध्यमवर्गीयांचे जीवन किमान सुसह्य असावे

Image
कुठल्‍याही आंदोलनादरम्‍यान शासकीय मालमत्‍तेचे नुकसान व कर्मचा-यांना मारहाण या बाबी समर्थनीय नाहीत. यामध्‍ये जनतेच्‍याच कररुपातून भरलेल्‍या निधीचाच चुराडा होत असतो. मात्र सध्‍या अशा प्रकारे हिंसक आंदोलन केल्‍याशिवाय सरकारी यंत्रणा जाग्‍या होत नाहीत हा समज दृढ होत चालल्‍यानेच असे प्रकार वारंवार घडत आहेत. सध्‍या नवी मुंबईसह सर्वत्र उष्‍णतेने परमोच्‍च टोक गाठले आहे. अशात तासंतास विज गायब होत असेल व त्‍यावर तातडीने उपाययोजना होणार नसतील तर नागरिकांच्‍या संतापाचा कडेलोट होणारच. अनेकांच्‍या घरात वयोवृध्‍द, रुग्‍ण तसेच लहान मुले असतात. प्रचंड उकाडयात विजेविना त्‍यांना बसणे असहय होऊन जाते. त्‍यामुळे उन्‍हाळा, पावसाळा व प्रामुख्‍याने रात्रीच्‍या वेळेस विज यंत्रणेत बिघाड झाल्‍यास त्‍या तातडीने दुरुस्‍त करणा-या यंत्रणा वीज महामंडळाने कार्यान्वित करायला हव्‍यात. उघडयावरील लोंबकळणा-या तारा, नादूरुस्‍त डिपी बॉक्‍स यांची दुरुस्‍ती करण्‍यासाठी फिरती दुरुस्‍ती पथके पाठवायला हवीत. बिघाडाच्‍या बहुतांश घटना अतिभारामुळे घडत असल्‍याने अधिक क्षमतेची वीजयंत्रे बसवून वीजचोरी रोखायला हवी. वीज कार्याल...

जागतिक हिवताप दिन

Image
जागतिक हिवताप दिन २५ एप्रिल हा दिवस दर वर्षी सर्वत्र जागतिक हिवताप दिन म्‍हणून साजरा केला जातो. हिवतापाविषयी जनजागृती करुन प्रतिबंधात्‍मक उपाययोजना विविध उपक्रमांव्‍दारे नागरिकांव्‍दारे पोहोचवण्‍याचा उददेश यामागे आहे. या वर्षी हिवताप दिनाचे घोषवाक्‍य ‘Accelerating the Fight Against Malaria for a more Equitable World’ म्‍हणजेच ‘मलेरियाविरुध्‍द  जनाच्‍या संरक्षणासाठी, गतिमान करु या लढा मलेरियाला हरवण्‍यासाठी’ असे आहे. देशामध्‍ये २०३० पर्यंत हिवताप दूरीकरणाचे लक्ष ठेवण्‍यात आले आहे. डासांच्या उपद्रवामुळे निर्माण होणारा हिवताप हा आपल्‍याला ज्ञात असलेला खूप जूना आजार आहे. हा रोग मानवी वसाहतींच्‍या काळाइतका पुरातन आहे. हिवताप हा मानवास फार पुर्वीपासून माहिती असलेल्‍या रोगांपैकी एक रोग आहे. मानवाची आणि हिवतापाची उत्‍क्रांती एकाच वेळी झाली असावी. ज्‍यामुळे लाखो वर्षापासून मानवाला या आजाराची माहिती आहे. मोठया प्रमाणात आर्थिक आणि जीवितहानी करणारा हा आजार असल्‍याने सार्वजनिक आरोग्‍याच्‍या दृष्‍टीने ही एक गंभीर समस्‍या आहे. देशाच्‍या स्‍वातंत्र्य...

शैक्षणिक व सांस्कृतिक नगरी पुण्यात सन्मान - राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत द्वितीय

Image
शैक्षणिक आणि सांस्कृतिक नगरी म्हणून समजल्या जाणाऱ्या पुण्यामध्ये काल रविवारी सन्मानित होण्याचा योग आला. निमित्त होते साई कला आविष्कार नाट्य संस्था  व श्रीमती चंद्रकला गोयल प्रतिष्ठान, पुणे यांच्या वतीने 'भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्वप्नातील भारत' या विषयावर खुली राज्यस्तरीय निबंध स्पर्धा २०२४ तसेच शालेय विद्यार्थ्यांसाठी चांद्रयान ३ चित्र रंगभरण स्पर्धा. ह्या दोन्ही स्पर्धांचा पारितोषिक वितरण सोहळा चिंचवड (पुणे) येथील सायन्स पार्क ऑडिटोरियम येथे रविवार दिनांक २१ एप्रिल २०२४ रोजी दुपारी १२ वाजता संपन्न झाला. यावेळी उपस्थित राहून राज्यस्तरीय निबंध स्पर्धेतील द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक शास्त्रज्ञ डॉ. अशोक नगरकर यांच्या शुभहस्ते स्वीकारले. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून व्यासपीठावर भारताचे ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. अशोक नगरकर, उद्योजक बसवराज कल्लोळी, माजी सीनियर मॅनेजर टाटा मोटर्स रमाकांत आडके, मराठी विभाग प्रमुख महात्मा फुले महाविद्यालय प्राध्यापक डॉ. प्रा. पांडुरंग भोसले, मॉर्डन महाविद्यालय पुणे प्रा.डॉ.रुपेश बनसोडे, जयहिंद इंटरनॅशनल स्कूल प्राचार्य डॉ.किरण पैठ...

वाचाल तर वाचाल

Image
ज्ञान हे दोन गोष्टीतून मिळते. एक अनुभव व दुसरे वाचन. अनुभव तर आपण पदोपदी घेत असतो त्यातून शिकण्यासारखे काय व किती हे प्रत्येकाच्या बुद्धिकौशल्यावर अवलंबून असते. अनुभवाने माणूस प्रगल्भ होतो पण हि प्रगल्भता जपण्यासाठी व ज्ञान आत्मसात करण्यासाठी वाचन हे अत्यंत आवश्यक आहे. वाचनामुळे व्यक्तीची वैचारिक पातळी उंचावून ज्ञानात वाढ होते व मुख्य म्हणजे शब्दसंचयात भर पडते. धावत्या जगाबरोबर चालण्यासाठी, प्रत्येक घटनेवर प्रतिक्रिया व्यक्त होण्यासाठी वाचनाशिवाय पर्याय नाही. "वाचाल तर वाचाल" हि नुसती उक्ती नसून यशस्वी जीवनाचा तो मूलमंत्र आहे. वाचन करत नसलेला माणूस एकतर अज्ञानी म्हणून ओळखला जातो अथवा आयुष्याबद्दल निरुत्साही. त्यामुळे वाचन हे यशस्वी व्यक्तीचे खरे उपासना यंत्र आहे. आजच्या पिढीने तर वाचनात सातत्य राखणे काळाची गरज आहे. परंतु नेमके याच्या उलट परिस्थिती आज पाहायला मिळते. संगणक, मोबाईल, लॅपटॉप या यंत्रामध्ये अडकलेला आधुनिक युवक आज वाचन पूर्णपणे विसरलेला आहे. फेसबुक, व्हाट्सअप, इंटरनेट या अभावी स्वतःला अपूर्णतेची जाणीव त्याला होते. एकतर वाचनासाठी वेळ मिळत नाही किंवा काढला...

नवी मुंबईतील महापे येथे श्री राम जन्मोत्सव उत्साहात साजरा

Image
जय श्री राम अयोध्येतील श्री राम मंदिर प्रतिष्ठानेमुळे यंदा सर्वत्र श्री राम नवमीचा उत्साह ओसंडून वाहत आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही श्री राम नवमी निमित्त नवी मुंबईतील महापे येथील श्री राम मंदिरात जाऊन जन्मोत्सवाचा लाभ घेतला. महापे येथील श्री रामांचे हे मंदिर जुने असून मागील ३२ वर्षांपासून येथे राम जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. स्वर्गीय श्री अमृत पाटील यांनी सुरू केलेली परंपरा त्यांच्या ५ मुलांनी आजही एकत्रितपणे त्याच उत्साहात सुरू ठेवली आहे. राम जन्मोत्सवानिमित्त दरवर्षी येथे पहाटेपासून दिवसभर विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. ग्रामस्थ मोठ्या संख्येने त्यात सहभागी होतात. गेल्या २५ वर्षांपासून आमचे पारमार्थिक व कौटुंबिक गुरुवर्य हभप पांडुरंग महाराज भोईर (आळंदी) यांचे न चुकता हरकीर्तन या ठिकाणी श्री राम नवमीच्या दिवशी आयोजित केले जाते. गेल्या काही वर्षांपासून मीदेखील या कार्यक्रमाध्ये नित्यनेमाने सहभागी होत आहे. आज राम नवमीच्या दिवशीदेखील सकाळी मी त्यांच्या सुश्राव्य कीर्तनाचा लाभ घेतला व त्यानंतर राम जन्मोत्सवाच्या कार्यक्रमात सहभागी झालो. श्री रामनवमी या हिंदू ...

समाज व नेत्यांनी चिंतन करण्याची गरज

Image
मराठा समाज हा पूर्वीपासूनच प्रगत व सुशिक्षित म्हणून गणला जात असला तरी महाराष्ट्रात बहु संख्येत असलेल्या ह्या समाजातील अनेक कुटुंबे उदरनिर्वाहासाठी झगडत असल्याचे वास्तव आहे. मागासवर्गीय समाज आरक्षणाच्या आधारे शैक्षणिक व रोजगार क्षेत्रात पुढे जात असताना मराठा समाजातील काही घटक मागे पडले. राज्याच्या सत्ताकारणात अनेक मराठा नेते आपल्या समाजाच्या बळावर मोठमोठ्या पदांवर पोहोचले. ह्या नेते मंडळींनी मराठा समाजास आरक्षण अथवा सामाजिक स्थिरता देण्यासाठी फार मोठे प्रयत्न केल्याचे ऐकिवात नाही. मागासवर्गीय आयोगाच्या अहवालानुसार ४३.७६ टक्के मराठा महिला उदरनिर्वाहासाठी मोलमजुरी करत असल्याची बाब पुढे येत असेल तर इतकी वर्षे मराठा समाजातून सत्तेवर बसणाऱ्या नेत्यांनी याबाबत चिंतन करणे गरजेचे आहे. समाजासाठी ह्या नेत्यांचे योगदान किती यावर समाजानेच विचार करायला हवा. मराठा समाजाला शिक्षण व रोजगाराच्या मुख्य प्रवाहात आणून ह्या समाजातील खऱ्या अर्थाने वंचित व गरीब कुटुंबांना लाभ मिळायला हवेत याविषयी दुमत असण्याचे कारण नाही. मात्र यासाठी समाजानेच आता झारीतील शुक्राचार्य शोधून त्यांना त्यांची जागा दाखव...

आधुनिक पिढीला संस्कारांच्या कक्षेत आणण्यासाठी बाल संस्कार शिबिरे उपयुक्त

Image
पालघर जिल्ह्यात बाल संस्कार शिबिरांचे आयोजन शाळांना लागणा-या मे महिन्‍यातील सुटटयांचे निमित्‍त साधुन सालाबादप्रमाणे यंदाही पालघर जिल्‍हयातील विविध ठिकाणी बाल सुसंस्‍कार शिबीरांचे आयोजन करण्‍यात आले आहे. बाल संस्‍कार वारकरी शिक्षण संस्‍था, देवघर यांच्‍या वतीने सोमवार दिनांक १ मे ते १८ मे २०२४ या कालावधीत भव्‍य बाल संस्‍कार निवासी शिबीराचे आयोजन वाडा तालुक्‍यातील देवघर गावी करण्‍यात आले आहे. आजच्‍या मोबाईलच्‍या व विज्ञान युगामध्ये तरुण पिढी ही आपले आई वडिल, बहिण भाऊ व गुरुजन यांच्‍या आदरापासुन दुरावत चाललेली आहे. कारण कुटुंबे ही धनाने श्रीमंत झाली पण संस्काराची श्रीमंती गमावून बसली आहे. कामधंदयाच्‍या व्‍यापामुळे आज पालकांना मुलांकडे लक्ष देण्‍यास वेळ नाही.  विभक्‍त कुटुंब पध्‍दतीमुळे वडिलधा-यांच्‍या संस्‍कारांपासुनही अनेक कुटुंबांतील मुले दुरावत चाललेली आहेत. संस्‍कार चांगले असतील तर संतती चांगली होईल. संस्‍कारक्षम संतती निर्माण होण्‍यासाठी प्रथम लहान मुलांवर संस्कार होणे अत्‍यंत आवश्‍यक आहे. याच उदात्‍त हेतुने देवघर पंचक्रोशीतील परमार्थिक हेतू जोपासणा-या हभप...