Posts

Showing posts from December, 2023

नव्या वर्षात करा आरोग्यदायी संकल्प

Image
नवीन वर्षाच्या मनःपूर्वक शुभेच्छा सन २०२४ या नव्या कोऱ्या करकरीत वर्षात आपण पदार्पण करत आहोत. नवीन वर्ष साजरे करण्याच्या अनेक देशी विदेशी पद्धती आपल्या समाजात दृढ आहेत. कुणी फिरायला शहर सोडून बाहेर पडतो, कुणी कुटुंबासह दिवस घालवतो, अगदीच हौशी मंडळी मित्रमंडळीसह या दिवसाचे सेलिब्रेशन करतो तर काही नव्या वर्षाचे विविध संकल्प सोडून नववर्षाचे स्वागत करतात. एखादा नवा उद्योगधंदा सुरू करण्याचा पण केला जातो, नवे घर, गाडी विकत घेण्याचा संकल्प किंवा दररोजच्या जीवनात ठराविक गोष्ट खाणे सोडणे, वागणे, बोलणे, चालणे यात बदल करण्याचादेखील संकल्प केला जातो. मात्र माणसाच्या आयुष्यात सर्वात महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे त्याचे आरोग्य. आरोग्य व्यवस्थित असेल तर त्याला हव्या त्या गोष्टी मिळवण्यात फारशा अडचणी उदभवत नाहीत त्यामुळेच आपले आरोग्य नीट सांभाळण्याचा संकल्प प्रत्येकाने नव्या वर्षात करायला हवा असे माझे मत आहे. नव्या वर्षाकडून आपल्यापैकी प्रत्येकाला अनेक आशा असतात. अनेक प्रकारची नियोजने केलेली असतात. मात्र, आपले नियोजन तेव्हाच यशस्वी होते, जेव्हा आपण तंदुरुस्त आणि निरोगी राहू. आपल...

योग्य काळजी घेतल्यास प्रतिबंध शक्य

Image
, राज्यात कोरोनाच्या ‘जेएन-१’ या नवीन व्हेरियंटचे रुग्ण आढळून आले आहेत. केरळसह इतर राज्यांत या नव्या प्रकाराचे रुग्ण आढळत असले तरी योग्य काळजी घेतल्यास त्याचा धोका नसल्याने चिंतेचे कारण नाही. ‘जेएन-१’ साठी आरोग्य यंत्रणा सज्ज असून, संशयित रुग्णांच्या चाचण्या वाढविण्याचे, त्यांचे सर्वेक्षण अधिक सक्षम करण्याचे आणि त्यांच्यावर आवश्यक ते उपचार करण्याचे निर्देश देऊन आरोग्य यंत्रणा अधिक सतर्क करण्यात आलेल्या आहेत. कोरोना साथीनंतर गेले काही महिने लोकांमध्ये कमालीचा बिनधास्तपणा आलेला आहे. वास्तविक संसर्गजन्य आजारांचे वाढते प्रमाण पाहता स्वच्छता, मास्क, सोशल डिस्टसिंग या बाबींचा अंगीकार सार्वजनिक ठिकाणी सातत्याने केला गेला पाहिजे. मात्र एखादा नवा व्हेरिएन्ट आल्यानंतर पुन्हा या सगळ्या गोष्टींसाठी सरकारी आवाहन करावे लागते. नवनवे आजार, प्रदूषण, हवेवाटे पसरणाऱ्या व्याधी पाहता सर्वांनी नियमितपणे योग्य काळजी घेतली तर कुठल्याही विषाणूला घाबरण्याची गरज पडणार नाही.  प्रसारमाध्यमांनी या नव्या विषाणूबद्दल योग्य व अधिकृत माहिती प्रसारित केल्यास अफवा पसरणार नाहीत.  वैभव मोहन पाटील घणसोल...

भटक्या कुत्र्यांचा त्रास

Image
भटक्या कुत्र्यांचा त्रास समाजाला नवा नाही. मात्र त्याकडे सातत्याने होत असलेले दुर्लक्ष अनेकांच्या जीवावर उठत आहे. काही दिवसांपूर्वी ‘वाघ-बकरी चहा’चे मालक पराग देसाई यांच्या मृत्युमुळे भटक्या कुत्र्यांचा प्रश्न चर्चेत आला आहे. देसाई यांच्यासमोर अचानक आलेले कुत्रे आणि कुत्र्यासमोर अचानक आलेला माणूस यांमुळे अपघात होऊन, ‘ब्रेन हॅमरेज’मुळे त्यांचा मृत्यू झाला. देसाईंच्या मृत्यूनंतर भुंकणाऱ्या कुत्र्यांची दहशत किती आहे, तेही समोर आले. रागिष्ट असलेल्या जातीचे कुत्रे पाळण्याची सध्या फॅशन सुरू झाली आहे. अनेक देशांमधे कुत्र्यांच्या ज्या जातींना पाळण्यास बंदी आहे त्या जातिदेखील आपल्याकडे वाढलेल्या दिसतात. तसेच रस्त्यावरील फिरणाऱ्या मोकाट कुत्र्यांचा त्रास सर्वानाच होत आहे. भटक्या कुत्र्यांमुळे घडणाऱ्या घटनांमागील कारणे शोधणे आणि त्या कारणांवर योग्य मार्ग काढणे अत्यंत आवश्यक आहे. कुत्री मागे लागतात, तेव्हा त्यातून वाचण्याच्या प्रयत्नांत गाडी चालकांचा अपघात होतो. दुचाकीस्वार असंख्य वेळा जखमी होतात किंवा काही वेळा त्यात जीवही जातो. लहान मुलांना चावा घेण्याच्या अनेक घटनाही समोर आल्या आहेत...

सुरक्षेतील चुका सुधारायला हव्यात

Image
संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरू असताना थेट लोकसभेत खासदारांच्या मध्ये जात दोन व्यक्तींनी स्मोक बॉम्बचा वापर करत सभागृहात हंगामा केला. संसदेत २२ वर्षांपूर्वीच्या २००१ मध्ये याच दिवशी संसदेवर दहशतवादी हल्ला झाला होता. त्या घटनेच्या आठवणी या निमित्ताने ताज्या झाल्या. प्रश्न आहे तो संसदेसारख्या देशाच्या सर्वोच्च वास्तूच्या सुरक्षेचा. एखादी गंभीर हल्ल्याची घटना घडल्यावर तेव्हढ्यापुरते कडेकोट उपाय केले जातात. मात्र काही दिवसानंतर पुन्हा ये रे माझ्या मागल्या ! ही पद्धत दिसुन येते. मुंबईवरील २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यानंतर देखील अशीच सुरक्षा व्यवस्था वाढविली होती मात्र सध्याची मुंबईची सुरक्षाही बेभरवशी आहे.  संसदेत झालेला थरार हा एक प्रकारचा धडाच आहे. गाफील सुरक्षा यंत्रणांचा परिणाम किती मोठा होऊ शकतो व त्याने किती हाहाकार माजू शकतो हे दर्शवण्यासाठी हे एक उदाहरणच आहे. संसदेत कडक सुरक्षा व्यवस्था असते. सर्वसामान्य व्यक्तीला चार स्तरीय सुरक्षा व्यवस्थेतून जावे लागते. मोबाईल, बॅगा, पाकीट, चाव्या, कंगवा, इलेक्ट्रॉनिक उपकरणे, बेल्ट अशा कुठल्याच वस्तुंना आत घेऊन जाता येत नाही. मग धूर सोड...

शिक्षण क्षेत्राला अशोभनीय प्रकार

Image
माजी कुलगुरु डॉ. अशोक प्रधान यांच्यावर नुकताच घरात घुसून प्राणघातक हल्ला करण्यात आला.  एखाद्या घटनेचा बदला घेण्यासाठी व्यक्ती कुठल्याही थराला जाऊ शकतो हे आपण गुन्हेगारीच्या अनेक प्रकरणांमध्ये पाहिले आहे. अगदी एखाद्याच्या घरी गुंड, टोळी नेऊन त्याला धमकवण्याचे, मारण्याचे प्रकारही दिसून आलेत. मात्र शिक्षणासारख्या पवित्र क्षेत्रात असे प्रकार घडणे ही चिंतेची बाब आहे. मुळात शिक्षक हा शांत, शिस्तप्रिय, सहनशील घटक म्हणून गणला जातो. मात्र आपल्या निलंबनाचा बदला घेण्यासाठी घटनेच्या अनेक वर्षांनंतर आपल्या वरिष्ठाच्या घरी जाऊन हल्ला करणे शिक्षकी पेशाला अशोभनीय आहे. तसेच कायदा सुव्यवस्थेचा प्रश्नही याने निर्माण झालेला आहे. माजी कुलगुरू अशोक प्रधान यांना मारहाण प्रकरणी, दोन हल्लेखोरांमध्ये बडतर्फ शिक्षकासह इतर आरोपींचाही समावेश आहे. प्रधान यांना बनावट पिस्तूलचा धाक दाखविणे, त्यांच्या पत्नीला फरफटत नेणे, त्यांना बांधून ठेवणे, पैशाची मागणी करणे असे प्रकार सीसीटीव्हीत कैद झाले आहेत. त्यानुसार ज्येष्ठ नागरिक संरक्षण कायद्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिक्षणक्षेत्रात योगदान असणाऱ्या एक...

सरकारी पुढाकाराची मात्र हवी

Image
दुकानांवर मराठी पाट्या लावण्यासाठी न्यायालयाने दिलेली अंतीम मुदतही संपली तरी राज्यातील अनेक भागांतील दुकानांवरील इंग्रजी पाट्या बदलण्यात आल्या नाहीयेत. आजूबाजूच्या राज्यांमध्ये आपापल्या मातृभाषेचा कडवा पुरस्कार होत असताना महाराष्ट्रात मात्र दुकाने व आस्थापनांवर मराठी पाट्या लावण्यासाठी झगडावे लागत आहे. त्यासाठी न्यायालयाचे दरवाजे ठोठावले गेले. न्यायालयाने आदेश दिल्यावरही दुकानदार जुमानायला तयार नाहीत. यामुळे राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांनी इंग्रजी पाट्यांची तोडफोड आंदोलन सुरू केले आहे. महाराष्ट्रात सातत्याने मराठीची होत असलेली गळचेपी व दुरवस्था चिंतेचा विषय बनला आहे. मराठी शाळा, मराठी साहित्य, मराठी सिनेसृष्टी, नाट्यसृष्टी अस्तित्वासाठी झगडत असून शासकीय पातळीवरदेखील त्यासाठी म्हणावे तितके प्रयत्न होताना दिसत नाहीत. मराठी पाट्यांच्या नियमाची अंमलबजावणी करण्यासाठी सरकारी यंत्रणांनी आपली जबाबदारी ओळखत पोलीस विभागाच्या समन्वयाने कठोर भूमिका घेणे गरजेचे असताना तसे होत नसल्याने आता राजकीय पक्ष त्यासाठी आक्रमक होताना दिसत आहेत. वास्तविक अमराठी लोकांची राज्यात वाढत चा...