Posts

Showing posts from August, 2023

चांगले लोकप्रतिनिधी निवडून द्या

Image
आजकाल सार्वजनिक हिताच्या प्रत्येक कामात राजकीय हस्तक्षेपाचे प्रमाण वाढत आहे. कुठलाही प्रकल्प, रस्ता, वास्तू तयार करताना त्यात काम करणाऱ्या कंत्राटदारांना अनंत अडचणी येत असतात. अगदी राजकीय नेत्यांपासून अधिकाऱ्यांपर्यंत मोठी जुळवाजुळव करत कंत्राटे मिळवली जातात व त्यानंतर त्यांना टक्केवारी वाटण्यात रस्ता वा प्रकल्पाची गुणवत्ता खालावली जाते. अनेक प्रकल्प तर श्रेयवादाच्या लढाईत अडकून पडले आहेत. एखाद्या ठिकाणचा प्रकल्प उदघाटनासाठी तयार असेल तर त्याचे लोकार्पण करण्यावरून स्थानिक नेत्यांमध्ये जुंपते. नेरुळ उरण रेल्वेमार्ग, बेलापूर पेंधर मेट्रोमार्ग लोकार्पणासाठी बड्या नेत्यांना वेळ नसल्याने खोळंबला आहे. मागील वर्षी ऐरोली येथे तयार होत असल्येल्या नाट्यगृहाच्या भूमिपूजन कार्यक्रमावेळी अशाच प्रकारचा राजकीय राडा नवी मुंबईकरांनी अनुभवला होता. ठेकेदार, बिल्डर, छोटेमोठे कंत्राटदार यांनी कामे सुरू केल्यानंतर राजकीय पुढाऱ्यांचा त्यातील हस्तक्षेप व अपेक्षा वाढत चालल्यामुळे तेदेखील हैराण आहेत. जोवर समाजाला चांगले लोकप्रतिनिधी मिळत नाहीत तोवर विकासकामांमध्ये गती व पारदर्शकता मिळणार नाही. यासाठ...

प्लास्टिक बंदी वरील कारवाईत सातत्य हवे

Image
प्लास्टिकच्या अनिर्बंध वापरामुळे राज्यात प्लास्टिक कचऱ्याची मोठी समस्या निर्माण झाली आहे. केंद्र सरकारनं मागील वर्षी १ जुलै २०२२ पासून सिंगल युज प्लास्टिकवर बंदी घातली आहे. त्यामुळे राज्यातदेखील मागील वर्षीच राज्य सरकारनं सिंगल युज प्लास्टिकवर बंदी आणत असा निर्णय घेणारे पहिले राज्य म्हणून लौकिक मिळवला. राज्यात प्लॅस्टिक बंदीच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी स्थापन करण्यात आलेल्या शक्तिप्रदत्त समितीने महाराष्ट्र प्लास्टिक आणि थर्माकॉल उत्पादने अधिसूचना २०१८ मध्ये सुधारणा करण्याचा निर्णय घेत १५ जुलै २०२२ रोजीच्या अधिसूचनेद्वारे प्लास्टिक लेपीत आणि प्लॅस्टिकचा थर असलेल्या उत्पादनांवर देखील बंदी घातली आहे. यामुळे पेपर किंवा ॲल्युमिनियम इत्यादी पासून बनवलेले डीस्पोजेबल डीश, कप, प्लेट्स, ग्लासेस, काटा, वाडगा, कंटेनर इत्यादी एकल वापरावर, वापर उत्पादनावर आता बंदी आणण्यात आली आहे. मात्र या सर्व निर्णयांची काटेकोर व कठोर अंमलबजावणी होत नसल्यामुळे प्लास्टिक बंदीचा कुठलाही परिणाम अद्याप राज्यात दिसून आलेला नाही. सर्व प्रकारचे प्लास्टिक राज्यात सर्रास उत्पादित व विक्री होताना दिसत आहे. वास्तव...

अभ्यासू व्यक्तिमत्त्व हरपले

Image
जेष्ठ साहित्यिक, विचारवंत, इतिहास संशोधक प्रा. हरी नरके यांचे ९ ऑगस्ट रोजी वयाच्‍या ६०व्‍या वर्षी दीर्घ आजारानं निधन झाले. विचारवंत, लेखक, मालिका निर्माते, ब्लॉगर म्हणून ते महाराष्ट्राला परिचित होते. समतेच्या लढाईतील एक कणखर संवेदनशील माणूस काळाच्या पडद्याआड गेला आहे. फुले, शाहू, आंबेडकरांच्‍या विचारांचा वारसा जपणारा एक उत्‍तम वक्‍ता म्‍हणून त्‍यांची ओळख होती. पुण्‍यातील विद्यापीठात प्राध्यापक म्हणून काम करणारे प्रा. नरके हे महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय आयोगाचे सदस्यदेखील होते. महात्मा फुले यांच्‍यासह डॉ. बाबासाहेब आंबेडकर तसेच  सामाजिक चळवळींवर त्‍यांचा सखोल अभ्‍यास होता. महात्‍मा फुले यांच्‍यावरील विपूल साहित्‍यासह हिंदी, मराठी इंग्रजी भाषेत त्यांचे ३७ ग्रंथ प्रकाशित झाले. विविध वर्तमानपत्रांमध्‍येदेखील त्‍यांनी साहित्‍यलेखन केले. अनेक सामाजिक विषयांवर त्‍यांनी थेट भाष्य केले होतं. समता परिषदेच्या माध्यमातून त्यांनी ओबीसी प्रश्नांवरून सत्ताधाऱ्यांना अनेकदा धारेवर धरलं होतं. त्यांच्या निधनामुळे संशोधन, सामाजिक क्षेत्रातील अभ्यासू व्यक्तिमत्व हरपले आहे. वैभव मोहन पाटील ...

अशा कर्ज बुडव्यांचे काय ?

Image
सामान्य माणूस हा आपली प्रतिष्ठा जपत असतो. प्रसंगी पोटाला चिमटे काढून तो घर, उद्योग व्यवसाय, वाहनासाठी घेतलेले कर्ज फेडत असतो. एखादा हप्ता भरता न आल्यास पैसे हातात आल्यावर मात्र व्याजासकट बँकेच्या कर्जाची परतफेड करत असतो. कर्ज न चुकवल्याने घरापर्यंत बँकांचे प्रतिनिधी येणे ही त्याच्यासाठी सर्वात नामुष्कीची घटना असते. याच ओझ्याने अनेकांनी आपले आयुष्य संपवल्याची अनेक उदाहरणे देता येतील. सामान्यांबरोबरच अनेक सेलिब्रिटीजदेखील हे ओझे सहन करू शकत नाहीत. यामुळेच नुकतेच कला दिग्दर्शक नितीन देसाई, अभिनेते रवींद्र महाजनी यांनी मृत्यूच्या पाशात जात आपली सुटका करून घेतली. मात्र हजारो, शेकडो कोटी रुपयांची कर्जे घेऊन ती न फेडता परदेशात पळून जात एशोआरामाचे जीवन जगणारे अनेक महाभागही आपल्या देशात राहून गेलेत. भारतीय बँकांचे नऊ हजार नऊशे कोटी बुडवणारा विजय मल्ल्या, १३ हजार कोटी बुडवणारा निरव मोदी, ३६ हजार कोटींचा घोटाळा करणारा नीरज सिंघल, ललित मोदी, मेहुल चोकसी अशी अनेक नावे घेता येतील. त्यामुळे गर्भश्रीमंत व्यक्तीच बँक घोटाळे करून कर्जे बुडवू शकते हे वारंवार अधोरेखित होत आहे. कर्जाच्या बाबत स...

रुग्ण व रुग्णालयांमध्ये सुसंवाद असावा

Image
ठाण्यातील कळव्याच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात रविवारी घडलेली दुर्घटना अत्यंत दुर्दैवी आहे. एका रात्रीत रुग्णालयात तब्बल १७ मृत्यू होत असतील तर ते निश्चितपणे रुग्णालयीन अपयशच मानावे लागेल. असे असले तरी सदरच्या रुग्णालयावरील रुग्णांचा भार, वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी संख्या व दाखल होत असलेल्या रुग्णांची स्थिती हे मुद्देदेखील विचारात घ्यावे लागतील. ठाणे व पालघर जिल्ह्याच्या ग्रामीण भागांतून मोठ्या संख्येने रुग्ण कळवा रुग्णालयात संदर्भित होत आहेत. वैद्यकीय महाविद्यालय संलग्न असल्याने गेली कित्येक वर्षे हे रुग्णालय असंख्य रुग्णांना चांगल्या प्रतीच्या सेवा देत आहे. मात्र गेल्या काही वर्षांत मुख्यत्वे कोविड काळापासून या रुग्णालयावरील रुग्णसंख्येचा ताण वाढत असून त्याचा परिणाम रुग्णसेवा बाधित होण्यावर होताना दिसत आहे. ठाणे जिल्हा सामान्य रुग्णालय अगोदर कोविड समर्पित होते व सध्या अद्ययावत सुविधांसह नव्याने उभारण्याचे काम प्रगतीपथावर असल्याने हे रुग्णालय मनोरुग्णालयाशेजारी स्थलांतरित झाले असून कळव्याच्या रुग्णालयावरील वाढता भार चिंताजनक आहे. अवाढव्य ठाणे जिल्हा व त्याला जोडले ...

श्रीमती चंदा धुरंदर उ.श्रे. लघुलेखक यांची स्वेच्छानिवृत्ती

Image
श्रीमती चंदा धुरंदर, उच्चश्रेणी लघुलेखक. ९०च्या दशकात स्टेनोग्राफर म्हणून आरोग्य सेवेत रुजू झालेल्या सौ. धुरंदर यांनी ३२ वर्षांची प्रदीर्घ सेवा बजावून शासन सेवेतून स्वेच्छा निवृत्ती स्वीकारली. आरोग्य विभागातील अनेक प्रशासकीय कक्षांमध्ये काम केलेल्या धुरंदर यांनी खरेदीसारख्या किचकट विभागात जवळपास दहा वर्षे कामकाज केले. दोन वर्षांपूर्वीच त्या मा आयुक्त कक्षात रुजू झाल्या. मात्र प्रकृती अस्वास्थ्य व कौटुंबिक जबाबदाऱ्या यामुळे त्यांनी स्वेच्छा निवृत्तीचा मार्ग पत्करला. त्यांचे पती नेव्हीत असून मुलगा सध्या टीसीएस मध्ये कार्यरत आहे. त्यामुळे कौटुंबिक स्थिरता प्राप्त करण्यासाठी त्यांनी निवृत्ती स्वीकारली. स्टेनोग्राफर या पदाला एकेकाळी अष्टपैलूत्व बहाल होते. कार्यालयातील रिसोर्स पर्सन म्हणून तो ओळखला जायचा. कालपरत्वे, संगणकातील आधुनिक क्रांतीमुळे शॉर्टहॅन्ड हा एकेकाळचा हुकमी पॅटर्न शासकीय कामकाजातून हद्दपार होऊ पाहतोय. त्यामुळे स्टेनोग्राफर पदाच्या मूळ जबाबदाऱ्या दूर होत त्याचे रूपांतर आता अधिकाऱ्यांचे स्वीय सहाय्यक, टायपिस्ट, दूरध्वनी इथपर्यंत सिमित होत असल्याचे पाहायला मिळत आहे. ...

तंबाखूमुक्त महाराष्ट्र हवा

Image
राज्‍यात गुटखाविक्रीवर बंदी असली तरी गुटख्‍याची निर्मिती व वितरण अजिबात थांबलेले नाही. आजकाल सार्वजनिक ठिकाणांवर सरेआम गुटका व तंबाखूजन्‍य विकले जातात. ठोस कारवाई व यंत्रणेचा अभाव यामुळे हया गुटखा माफियांना कुणाचे भय राहिलेले नाही. या गंभीर सामाजिक विषयाकडे अधिक लक्ष केंद्रित करण्‍याची गरज असुन तंबाखू व तंबाखूजन्‍य पदार्थांच्‍या सेवनामुळे होणा-या दुष्‍परिणामांवर पुन्‍हा एकदा विचारमंथन करण्‍याची आवश्‍यकता निर्माण झाली आहे. भारतीय स्‍वातंत्र्याचा ७७ वा वर्धापन दिन येत्‍या १५ ऑगस्‍ट रोजी आपण साजरा करत आहोत. देशाला स्वातंत्र्य मिळून सात दशके लोटली तरी आपण अनेक अनिष्ट, अनुचित रूढी, परंपरा, सवयीच्या जोखडात बंदिस्त आहोत. व्‍यसन हे कुठलेही वाईटच. मात्र अनेक व्‍यसने ही प्राणघातक ठरु शकतात. त्यातीलच एक घातक व्‍यसन म्हणजे तंबाखू सेवन. आज आपल्याभोवती वावरणाऱ्या बहुतांशी लोकांना तंबाखूचे व्यसन असल्याचे दिसून येते. गुटखा, खर्रा, जर्दा, विडी, सिगारेट व इतर तंबाखूजन्य पदार्थांच्या विळख्यात आपला समाज आज सापडलेला आहे. आज आपण कार्यालये, सार्वजनिक स्‍थळे, बस, रेल्‍वे परिसर, सिनेमाग...

बेरोजगारांच्या जखमेवर मीठ

Image
बेरोजगार उमेदवारांकडून परीक्षा शुल्काच्या नावाखाली एक हजार रुपयांपर्यंत प्रति उमेदवार शुल्क वसूल करणाऱ्या सरकारी संस्थांच्या अवाजवी शुल्क आकारणीवर राज्याचे उपमुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत उत्तर देताना बेरोजगारांच्या मानसिकतेचा विचार केलेला दिसत नाही. स्पर्धा परीक्षांच्या क्लासेससाठी विद्यार्थी पन्नास हजार मोजतात पण परीक्षा शुल्क हजार रुपये का भरू शकत नाही हे राज्यातील लाखो बेरोजगारांच्या जखमेवर मीठ चोळण्यासारखे आहे. वास्तविक अशा प्रकारचे क्लासेस लावणारे उमेदवार किती प्रमाणात आहेत याचा विचार करायला हवा होता. अगदी मोजक्या प्रमाणात विद्यार्थी खाजगी क्लासेस मधून स्पर्धा परीक्षांची तयारी करत असतात. गोरगरीब, निर्धन, शेतकऱ्यांच्या मुलांना अशा प्रकारे हजारो लाखो रुपये खर्चून क्लास लावणे परवडणार तरी आहे का? अत्यंत गरीब व प्रतिकूल परिस्थितीत मुलांना शिकवून त्यांना स्पर्धा परीक्षांची तयारी करायला लावणारे पालक कधीही ह्या न परवडणाऱ्या क्लासेसचा विचार करत नाहीत. वास्तविक अशा प्रकारे अवाजवी शुल्क आकारणाऱ्या क्लासेसवरच निर्बंध आणण्याची आवश्यकता आहे. सधन व धनदांडग्या घरात...

मुंबईत भटक्या कुत्र्यांची गणना

Image
मुंबई व उपनगरांमध्ये भटक्या कुत्र्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून त्यामुळे नागरिकांना रात्री अपरात्री, भल्या पहाटे त्रासाला सामोरे जावे लागते. निर्जन ठिकाणी ही कुत्री लोकांचा पाठलाग करत त्यांचे लचके तोडत असल्याचीही अनेक उदाहरणे समोर आली आहेत. मुंबईत २०१४ मध्ये भटक्या कुत्र्यांची गणना झाली होती. त्यानंतर भटक्या कुत्र्यांच्या संख्येत वाढ होत आहे. सार्वजनिक ठिकाणे, बस, रेल्वे स्थानकांच्या ठिकाणीही ही कुत्री ठाण मांडून बसलेली दिसतात. त्यामुळे मुंबईकर या भटक्या कुत्र्यांपासून हैराण आहेत. ह्युमन सोसायटी इंटरनॅशनल संस्थेच्या माध्यमातून भटक्या कुत्र्यांची गणना होणार आहे. गेल्या पाच वर्षांत भटक्या कुत्र्यांनी साडेतीन लाख मुंबईकरांना चावा घेतल्याची धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. सन २०१४ मध्ये मुंबई महापालिकेने ह्युमन सोसायटी ऑफ इंटरनॅशनल संस्थेच्या माध्यमातून श्वानांची गणना केली असता मुंबईत जवळपास ३ लाख भटके कुत्रे आढळले होते. मात्र सध्या मुंबईत भटक्या कुत्र्यांची संख्या नेमकी किती हे निश्चित नसल्याने महापालिका आता ह्युमन सोसायटी इंटर नॅशनल संस्थेच्या माध्यमातून भटक्या कुत्र्यांच...

गणेशोत्सवात कोकणात जादा रेल्वे बस गाड्या सोडा

Image
गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांची संख्या मुंबई व उपनगरांत सर्वाधिक आहे. मिळेल ते वाहन पकडून उत्सवकाळात कोकणी ग्रामस्थ कुटुंबासह गावाकडे प्रवास करतात. गणपतीच्या काळातले रेल्वेचे आरक्षण सुरू झाल्याझाल्या फुल्ल होत असल्यामुळे अनेक लोक रस्तेमार्गे बस व खाजगी वाहने घेऊन कोकणात जातात. मात्र कोकणातील रस्त्यांची अवस्था वर्षानुवर्षे अत्यंत दयनीय असल्याने त्यांचा हा प्रवासदेखील त्रासदायक ठरतो. यंदाही यापेक्षा काही वेगळी अवस्था नाही. ना रेल्वेचे ना बसचे तिकीट उपलब्ध अशी अवस्था असल्याने आता बहुतांश चाकरमान्यांची मदार जादा रेल्वे व बस गाड्यांवर आहे. खाजगी वाहतूकवाले प्रवासाचे अवाच्या सव्वा दर आकारत असल्यामुळे भर गणेशोत्सवात लोकांवर प्रवासाचा जादा आर्थिक भार पडतो. सर्वाधिक लोक रस्ते मार्गे प्रवास करत असल्यामुळे वाहतूक कोंडीचाही मोठा फटका प्रवाशांना बसतो. त्यामुळे दरवर्षी गणपती उत्सवात मोठ्या आनंदाने श्रीगणेशाचे स्वागत करण्यासाठी कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांचा यंदाचा प्रवास तरी सुखकर व्हावा यासाठी महामार्गाची दुरुस्ती करून अधिकच्या बस गाड्या, रेल्वे कोकणात सोडल्या जाव्यात अशी ...

सामाजिक परिवर्तन गरजेचे

Image
महिला व मुली बेपत्ता होण्याचे प्रमाण देशात अत्यन्त धक्कादायक आहे. याची अनेक कारणे देत येतील. अनेक कुटुंबांमध्ये वैचारिक मतभेद, अवास्तव इच्छा अपेक्षा आणि इतर कारणांवरून लहान-मोठे वाद होत असतात. परंतु अशा परिस्थितीत रागाच्या भरात परिवाराला सोडून जाण्याच्या घटना वाढत आहेत. अनेक लहान मोठ्या कारणांवरून पती-पत्‍नीतील वाद विकोपाला जातात व टोकाची भूमिका घेतली जाते. नवऱ्याच्‍या त्रासाला कंटाळून अनेक महिला घर सोडून निघून जातात. तरुण-तरुणी प्रेमात कुटुंबीयांचा अडसर होत असेल, तर थेट पळून जाण्‍याचा निर्णय घेतात. मोठमोठी आश्वासने  देऊन तरुणी किंवा महिलांना पळवून नेण्‍याच्‍या घटना वाढल्‍या आहेत. फूस लावून पळवून नेण्‍याचे प्रमाण तरूण मुलींमध्‍ये अधिक आहे. हरविल्‍यानंतर पोलिसांकडून संबंधित महिला, मुलींचा शोध घेतला जातो मात्र अनेकदा महिलेचा पत्‍ता हुडकून काढणे कठीण होते. १८ वर्षांवरील अनेक मुली, महिला स्‍वयंमर्जीने घर सोडून गेल्याने त्‍या घरी परतण्‍यास नकारही देतात. सुमारे पन्‍नास टक्‍के महिला घरी परतण्‍याची आकडेवारी समोर आली असली, तरी मानवी वाहतुकीचा विषय गंभीर असून अनेक महिलांना लैंगिक...

एक अजनबी चित्रकार

Image
काल सायंकाळी नेहमीप्रमाणे कार्यालयातून सुटल्यावर सीएसएमटी ते वाशी लोकलप्रवास करत होतो. वाशी गाडी पकडल्यावर नेहमीप्रमाणे सीट पकडून मोबाईलवर टाईप करत लिखाणाला लागलो. काही वेळाने लक्षात आले बाजूला विंडो सीटवर बसलेली व्यक्ती बॅगेतून ड्रॉईंग बुक काढून पेन्सिलने काहीतरी रेखाटत होती. समोर बसलेल्या एका लहान मुलीकडे थोड्या थोड्या वेळाने पाहत चित्र रेखाटण्याचे त्याचे काम सुरूच होते. काही वेळाने कुर्ल्याला ती मुलगी आपल्या पालकांसह उतरली मात्र डोळ्यात साठवलेल्या कल्पनाचित्राच्या साहाय्याने त्या व्यक्तीने मुलीचे चित्र हुबेहूब कागदावर वठवत पूर्ण केले. त्यांनतर त्या मुलीच्या मागे दरवाज्याच्या जवळ बसलेल्या एका प्रवाशाचे चित्र काढण्यात ती व्यक्ती मग्न झाली. मीदेखील काही वेळ माझ्या लिखाणात गुंतलो. वाशी आल्यावर चित्रावर नजर टाकली तर आमच्या समोरचे काही वेळापूर्वीचे ते चित्र, ती लहान मुलगी व तिच्या मागे खाली बसलेल्या व्यक्तीसह अगदी तंतोतंत त्या कागदावर उतरले होते व तेदेखील केवळ ३०-३५ मिनिटांमध्ये. उतरताना त्या चित्राचा फोटो घेत व प्रशंसा करत मी त्या व्यक्तीची तोंडओळख करून घेतली तर म...

कथानक आटोपशीर असावे

Image
'प्रतिशोध - झुंज अस्तित्वाची' ही सोनी मराठीवरील मालिका तृतीयपंथी व्यक्ती आणि त्यांच्या कुटुंबीय यांना भेडसावणाऱ्या समस्या आणि त्यांच्या जीवनाचे अनेक पैलू उलगडणारी आहे. तृतीयपंथी म्हणून वावरणारी ममता आणि तिची मुलगी दिशा यांचा समाजातील बदलाचा प्रेरणादायी प्रवास या मालिकेच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे. मालिकेतील सर्वच कलाकारांचा अभिनय दर्जेदार आहे. मात्र तृतीयपंथीय पात्राच्या सभोवताली फिरत असलेल्या ह्या मालिकेला गुन्हेगारी आणि थराराचा मुलामा चढवताना मालिका काहीशी गुंतागुंतीची व रटाळ होत असल्याचा भास होतो. एक दुर्लक्षित व गंभीर सामाजिक समस्येला टीव्ही मालिकेच्या माध्यमातून दाखवताना तिला गुन्हेगारीचा रंग देऊन वेगळ्या दिशेने नेण्याचा प्रयत्न प्रेक्षकांना गृहीत धरणारा आहे. मालिकेच्या कथानकातील अनपेक्षित वळणे आणि घडणारे गुन्हे मालिकेला मूळ आशयापासून दूर नेणारे आहेत. त्यामुळे मालिकेचे कथानक आटोपशीर असायला हवे असे वाटते.  वैभव मोहन पाटील  घणसोली, नवी मुंबई 

मुंबई लोकलची बिकट अवस्था

Image
मुंबई उपनगरीय लोकल गाड्यांमधील बहुतांश डब्यांमधील दरवाजे व खिडक्या नादुरुस्त अवस्थेत आहेत. दरवाजे व खिडक्या बंदच होत नसल्याने सध्या सुरू असलेल्या पावसाळ्यात त्याचा मोठा त्रास प्रवाशांना सहन करावा लागत आहे. खिडकी उघडणे व बंद करणे प्रवाश्यांसाठी एक दिव्यच असते. दररोजच्या कटकटीमुळे प्रवाशी हैराण आहेत. एकदा खिडकी उघडली तर बंद होत नाही आणि एकदा बंद झाली तर ती उघडता उघडता नाकी नऊ येतात अशी अवस्था आहे. जेष्ठ नागरिक तर ह्या उघडझाप क्रियेत पडतच नाहीत. पावसाचे पाणी ह्या तुटलेल्या खिडक्यांतून थेट आत येत असल्याने प्रवाशांना एकतर भिजत प्रवास करावा लागतो किंवा सीट सोडून उभ्याने प्रवास करावा लागतो अशी अवस्था अनेक गाड्यांमध्ये आहे. अनेक डब्यांतील दरवाजे बंदच होत नाहीत. त्यामुळे भर पावसात गाडीतून चढउतार करताना दरवाजात पाणी पडत असल्याने प्रवाशांना पावसाचे पाणी अंगावर घेत कार्यालय गाठावे लागते. मेल एक्सप्रेस गाड्यांमध्ये ज्या तत्परतेने अशा नादुरुस्त साहित्याची देखभाल केली जाते तशी लोकल डब्यांची केली जात नाही हे लोकल प्रवाशांचे दुर्दैव आहे. लांब पल्ल्यांच्या गाड्यांप्रमाणे लोकल गाड...

जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर काळाच्या पडद्याआड

Image
ज्येष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचे वयाच्या ८८व्या वर्षी वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले आहे. जयंत सावरकर यांनी मराठी रंगभूमिपासून आपल्या अभिनयाच्या कारकिर्दीला सुरुवात केली होती. १९५५ पासून रंगभूमीशी नाळ जुळलेल्या सावरकर यांनी त्यावेळी पडद्यामागे राहून मिळेल ती छोटीमोठी कामे अगदी प्रोम्पटिंग केले, प्रॉपर्टीची मांडणी केली, पार्श्वसंगीत वाजवण्यास मदत केली, तर कधी हिशोब लिहिणे तर कधी डोअर किपिंगचे सुद्धा काम त्यांनी केले होते. मोठ्या संघर्षातून त्यांनी नंतर नाट्य, टीव्ही व चित्रपटसृष्टीत आपला जम बसवला. मिळालेल्या भूमिकेशी अत्यंत प्रामाणिक राहिल्याने त्यांना सकारात्मक भूमिका मिळत गेल्या व त्यांनी त्या भूमिकांना योग्य न्यायदेखील दिला. अपराध मीच केला या नाटकात त्यांनी साकारलेली गोळे मास्तरची भूमिका खूप गाजली. प्रपंच, ईजा बिजा तिजा, धमाल बाबल्या गणप्याची, गडबड गोंधळ, झंगडगुत्ता, गजरा, अपूर्णांक,अलीबाबा चाळीस चोर, अल्लादीन जादूचा दिवा, आम्ही जगतो बेफाम, एकच प्याला, कळलाव्या कांद्याची कहाणी अशा नाटक चित्रपट तसेच मालिकांमधून त्यांनी आपल्या अभिनयाची छाप पाडली. त्यांच्या सहजसुंदर अभिनयाने...