Posts

Showing posts from August, 2020

ई पासची अट रद्द करा

Image
को रोनाचा संसर्ग रोखण्यासाठी लॉकडाऊन काळापासून एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात किंवा दुसऱ्या राज्यात जाण्यासाठी राज्य शासन ई पास देण्याची योजना राबवत आहे. मात्र राज्य अनलॉक होत असताना या ई पासचे औचित्य आता फार राहिलेले नाही. एसटीतून आंतरराज्य प्रवास करण्यासाठी ई-पासची गरज नसल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे, मग खासगी गाडीतून प्रवास करताना ई पास बंधनकारक करण्याचे प्रयोजन काय हे अनाकलनीय आहे. तसेच अनेक दलाल ई-पास मंजूर करण्यासाठी पैसे घेत असल्याचे प्रकार घडत आहेत, तसेच बनावट ई पास वितरित करणाऱ्या लोकांचेदेखील पेव फुटले आहे. अनेक जिल्हयांच्या सीमांवर तर ई-पास तपासणी करणारी यंत्रणाच अस्तित्वात नाही. ओळखीच्या लोकांसोबत खासगी गाडीतून प्रवास करताना ई-पास बंधनकारक आणि अनोळखी प्रवाशांसोबत एसटीतून प्रवास करताना मात्र पासची गरज नाही ही सरकारी भूमिका न पटणारी असून त्यावर जनसामान्यांतून नकारात्मक प्रतिक्रिया उमटत आहेत. रस्त्यांवरील खड्डे, वाहतूककोंडी यांमुळे रस्ते प्रवास दिवसेंदिवस अधिक वेदनादायी ठरत आहे. सामान्यांना लोकलमध्ये प्रवेश नाही. एसटी-बेस्टमध्ये गर्दी असल्याने सर्वसामान्यांना खासगी वाहतुकी...

श्री विलास कांबळे सर यांची ठाणे सार्वजनिक बांधकाम विभागात अधीक्षक अभियंता म्हणून बदली

Image
  आरोग्य आयुक्तालयात काल वित्त विभागाचे अधिकारी श्री पतंगे सर यांच्यानंतर आज अभियान कार्यालयातील अधीक्षक अभियंता श्री विलास कांबळे सर हेदेखील बदली झाल्याने कार्यमुक्त झाले. राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत पायाभूत सुविधा विकास कक्षातील कामकाजाची जबाबदारी बराच काळ त्यांनी यशस्वीपणे सांभाळली. राज्यातील आरोग्य संस्थांची बांधकामे व दुरुस्त्यांच्या कामांवर सनियंत्रण करण्यासाठी त्यांनी राज्य पालथे घातले. अभियानांतर्गत कार्यरत राज्यभरातील उपअभियंता,  कनिष्ठ अभियंता, कार्यकारी अभियंता, वास्तुविशारद यांच्यासमवेत त्यांनी एक चांगला समन्वय राखला होता. अभियानाच्या वार्षिक आराखड्यातील मोठा भाग हा बांधकाम दुरुस्त्यांसाठी मंजूर होत असतो. त्याचे सुनियोजन, कालमर्यादीत व्यवस्थापन, राज्यस्तरीय सनियंत्रण, क्षेत्रीय स्तरावर स्थळ पाहणी या बाबी पार पाडण्याची जबाबदारी अधीक्षक अभियंता या पदाची असून त्याला न्याय देण्याचा कांबळे सरांनी पुरेपूर प्रयत्न केला. कुठल्याही प्रकारचे दडपण न घेता अडचणीच्या वेळी शांत राहून मार्ग कसा काढावा याचे त्यांना चांगले कसब होते. त्यामुळे कोणत्याही कामाचे त्यांना कधी टेन्शन आल...

अशा दुर्घटना रोखायला हव्यात

Image
रायगड जिल्ह्यातील महाड शहरात तारीक पॅलेस ही पाच मजली निवासी इमारत पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे जमीनदोस्त झाल्याची घटना सोमवारी संध्याकाळी घडली. या दुर्घटनेत डझनभर लोकांचा मृत्यू झाला आहे.  या इमारतीचे बांधकाम करणाऱ्या बिल्डरसह तत्कालीन मुख्याधिकारी, वास्तुविशारद, नगरपालिका इंजिनिअर आणि आरसीसी कन्सल्टन्स अशा पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. साधारणपणे पाच ते सात वर्षांपूर्वी या इमारतीचं बांधकाम झालं होतं अशी माहिती आहे. 45 फ्लॅट असलेली ही इमारत गेल्या काही महिन्यांपासून हेलकावे खात असल्याची तक्रार रहिवाशांनी विकासकाकडे केली होती. मात्र, या तक्रारींकडे त्यांनी दुर्लक्ष केल्याने इतकी मोठी दुर्घटना घडल्याचे स्पष्ट होते. शिवाय दुर्घटनेच्या दिवशी इमारतीचा एक पिलेर (खांब) देखील ढासळला असल्याचे दिसून आले आहे. वास्तविकता अशा अनेक इमारती सर्वत्र जलद गतीने उभारण्यात आलेल्या आहेत. काहीतर रातोरात उभारल्या गेल्या आहेत. त्यावर नियंत्रण राखण्यात स्थानिक यंत्रणा अपयशी ठरत असल्याने लोकांची फसवणूक करणारे तथाकथित बिल्डर लोकांना लाखोंचा चुना लावून पसार होतात. त्यांनतर काही वर्षांनी इमारतींच्या बांध...

वित्त अधिकारी श्री संजय पतंगे ठाणे महानगरपालिकेत

Image
आरोग्‍य सेवा आयुक्‍तालयांतर्गत सहसंचालक (अर्थ व प्रशासन) या पदावर जानेवारी २०१९ पासुन कार्यरत असलेले वित्‍त विभागाचे अधिकारी श्री संजय पतंगे सर यांची विनंती बदली शासनाने मान्‍य केल्‍याने ते आज कार्यमुक्‍त झाले. जवळपास दिडेक वर्षे आयुक्‍तालयात काम करणारे पतंगे सर हे अत्‍यंत प्रामाणिक, जबाबदारीचे भान असणारे व कर्तव्‍यनिष्‍ठ अधिकारी होते. त्‍यांचेवर सोपविलेल्‍या जबाबदा-यांना त्‍यांनी सुयोग्‍य पध्‍दतीने न्‍याय दिला. मग वैदयकीय अधिकारी व कर्मचा-यांच्‍या आस्‍थापनाविषक बाबी असो की पदभरतीचे विषय असो. प्रत्‍येक लहानसहान बाबींमध्‍ये त्‍यांनी अगदी झोकुन देऊन काम केले व वरिष्‍ठांना अभिप्रेत असलेले आऊटकम, त्‍यांनी कार्यकुशलता व क्षमतेप्रमाणे देण्‍याचा प्रयत्‍न केला. गेल्‍या अनेक वर्षांपासुन विभागामध्‍ये प्रलंबित असलेली आस्‍थापनााविषयक अनेक प्रकरणे विशेष मोहिमा व पाठपुरावा करुन निकाली काढण्‍यामध्‍ये त्‍यांचे योगदान नाकारता येणार नाही. गेल्‍या पाच सहा महिन्‍यांतील कोविड साथपरिस्‍थीतीतदेखील त्‍यांनी कर्तव्‍यभावनेने अविरतपणे काम केल्‍याचे आम्‍ही पाहिले आहे. जितक्‍या जबाबदारीने त्‍यांनी कर्तव्‍ये पार पा...

सुखकर्ता दुखहर्ता

Image
  श्रीगणेश हे ज्ञान, बुध्‍दी व कोणत्‍याही नव्‍या प्रारंभाचे दैवत व प्रतिक आहे. गणेशोत्‍सव सुरु झाला की घरोघरी गणपतीच्‍या आरतीचे सुर घमू लागतात. गावामध्‍ये व शहरी भागांतील इमारतींमध्‍ये घरोघरी श्रीगणेश प्रतिष्‍ठापना केली जात असल्‍यामुळे सकाळ सायंकाळ मोठया उत्‍साहात आरती गणपतीसमोर सामूहिकरित्‍या आरती गायली जाते. सुखकर्ता दुखहर्ता म्हणजे सुख आणणारा व दु:ख दूर करणारा. गणपतीला उद्देशून रचलेले काव्य हे समर्थ रामदास ह्यांनी लिहिले आहे. या आरतीने गणेशासमोर नतमस्‍तक होऊन आपले गा-हाणे मांडण्‍याचे एक विलक्षण समाधान प्राप्‍त होते. ही आरती पूजेच्या शेवटी म्हणण्यात आलेल्या आरत्यांपैकी पहिली असते म्हणून विशेष प्रसिद्ध आहे. ही आरती गणेश चतुर्थीपासून उत्सव काळात व नित्य पूजेतही म्हटली जाते. गणपती आपल्‍या जिवनात सुख आणून दुःख दूर करतो आणि भक्ताचे जीवन प्रेमाने भरुन टाकतो ह्याचे वर्णन या आरतीमध्‍ये करण्‍यात आलेले आहे. मंगलमूर्तीच्‍या केवळ दर्शनाने आपल्या सर्व इच्छा पूर्ण होतात. दुसर्‍या कडव्यात गणपतीचे गौरी (पार्वती) पुत्र म्हणून वर्णन आहे. भरपूर रत्‍ने असलेला एक दागिना लावलेले त्याचे कपाळ चंदन, कुंक...

अग्‍नी आयुर्वेदीक केंद्र, पनवेल

Image
अग्‍नी आयुर्वेदीक केंद्र, पनवेल -   निसर्गरम्‍य व शांत ठिकाणी आयुर्वेदीक उपचार कोरोनासारख्‍या महाभयंकर रोगाशी मुकाबला करता करता अनेक जण आज आयुर्वेद शास्‍त्राकडे वळताना दिसत आहेत. आयुर्वेदिक औषधांचा वापर, योग, प्राणायाम सारखे शारीरीक कसरतीचे प्रकार तसेच विविध आयुर्वेदिक थेरपींकडे आता लोक वळू लागलेले आहेत. आयुर्वेद शास्‍त्राचा अभ्‍यास व वापर करण्‍यासाठी प्रसिध्‍द असलेल्‍या मुंबईजवळील पनवेल येथील एका नामांकित ठिकाणाला भेट देण्‍याचा योग मला नुकताच आला. पनवेलपासुन साधारणतः १० ते १२ किलोमिटर अंतरावर पनवेल-माथेरान रस्‍त्‍यावर मोरबे गावानजिक गेल्‍या ३० वर्षांपासुन स्‍थापित असलेले अग्नि आयुर्वेदीक व्हिलेज या नावाने एक आयुर्वेद केंद्र स्‍थापित आहे. केरळमध्‍ये आयुर्वेदाचा प्रसार ज्‍या झापाटयाने झाला तितक्‍या गतीने देशातील कुठल्‍याच राज्‍यात झालेला नाही. केरळमधील आयुर्वेद संस्‍थांंच्‍याच धर्तीवर तयार करण्‍यात आलेले हे अग्‍नी आयुर्वेद सेंटर त्‍यामुळेच आपले वेगळेपण सिध्‍द करते. अत्‍यंत निसर्गरम्‍य व शांत वातावरण, आजुबाजुला डोंगरमाथे व मध्‍येच वसवण्‍यात आलेले हे अग्नि आयुर्वेद केंद्र, आयुर्वेदाच...