Posts

Showing posts from November, 2024

वाढदिवस माझा

Image
 वाढदिवस   खरंतर वाढदिवस हा गतकाळातील आठवणींना उजाळा देण्‍याचा दिवस असतो आणि त्‍याचबरोबर हा दिवस म्‍हणजे एक संधी असते भविष्‍यातील आव्‍हानांचा सामना करण्‍यासाठी रुपरेषा आखण्‍याची. वाढदिवस म्हणजे दिवसभर शुभेच्छा स्वीकारण्याचा आणि कौतुक करवून घेण्याचा 'स्पेशल' दिवस. सकाळपासून शुभेच्छांचा पाऊस सुरू झालाय तो अजुनही तसाच आहे. पण या निमित्‍ताने आपला विस्तारलेला परीघ लक्षात येत जातो.. नातेवाईक, आप्‍तेष्‍ट, कार्यालयीन सहकारी, ओळखीचे, हितचिंतक, मित्र मनापासून शुभेच्छा देतात. कुणीतरी मध्‍येच आपल्याविषयी लिहून जातं, गाऊन जातं. याहीवर्षी अशीच काही surprizes मिळाली. पण खरं सांगायचं तर याच दिवशी मागे वळून पाहावंसं वाटतं. आज वयाची चाळीशी ओलांडली. बॅचलर आयुष्‍यातून प्रपंचात प्रवेश, कुटुंबकबिला, जबाबदा-या सांभाळताना वाचन, लिखाण, सर्वांसाठी सदैव जमेल तशी मदतीची तत्‍परता तसेच सामाजिक भान ढळू दिलेले नाही याचे समाधान जास्‍त आहे. खरेतर अशा प्रवासात अनेकांच्‍या अपेक्षा वाढतात, अनेकजण दुखावतात, दुरावतात, पण थांबून चालत नाही. सभोवतालचा गोतावळा कायमच नवी उमेद देत असतो. आतापर्यंत काय सोडलं, काय सरलं आणि ...

वाढदिवस माझा

Image
वाढदिवस   खरंतर वाढदिवस हा गतकाळातील आठवणींना उजाळा देण्‍याचा दिवस असतो आणि त्‍याचबरोबर हा दिवस म्‍हणजे एक संधी असते भविष्‍यातील आव्‍हानांचा सामना करण्‍यासाठी रुपरेषा आखण्‍याची. वाढदिवस म्हणजे दिवसभर शुभेच्छा स्वीकारण्याचा आणि कौतुक करवून घेण्याचा 'स्पेशल' दिवस. सकाळपासून शुभेच्छांचा पाऊस सुरू झालाय तो अजुनही तसाच आहे. पण या निमित्‍ताने आपला विस्तारलेला परीघ लक्षात येत जातो.. नातेवाईक, आप्‍तेष्‍ट, कार्यालयीन सहकारी, ओळखीचे, हितचिंतक, मित्र मनापासून शुभेच्छा देतात. कुणीतरी मध्‍येच आपल्याविषयी लिहून जातं, गाऊन जातं. याहीवर्षी अशीच काही surprizes मिळाली. पण खरं सांगायचं तर याच दिवशी मागे वळून पाहावंसं वाटतं. आज वयाची चाळीशी ओलांडली. बॅचलर आयुष्‍यातून प्रपंचात प्रवेश, कुटुंबकबिला, जबाबदा-या सांभाळताना वाचन, लिखाण, सर्वांसाठी सदैव जमेल तशी मदतीची तत्‍परता तसेच सामाजिक भान ढळू दिलेले नाही याचे समाधान जास्‍त आहे. खरेतर अशा प्रवासात अनेकांच्‍या अपेक्षा वाढतात, अनेकजण दुखावतात, दुरावतात, पण थांबून चालत नाही. सभोवतालचा गोतावळा कायमच नवी उमेद देत असतो. आतापर्यंत काय सोडलं, काय सरल...

खराब रस्त्यांचा कोकणच्या पर्यटनावर विपरित परीणाम

Image
मुंबई गोव्याला जोडणाऱ्या व कोकणातून जाणाऱ्या हया रस्त्यावरून जाण्याचा नुकताच योग आला. ह्या रस्त्याची अवस्था अत्यंत बिकट आहे. कोकणात जाणारे चाकरमानी व पर्यटक मोठ्या संख्येने ह्या रस्त्यावरून प्रवास करतात. रस्त्यात प्रचंड प्रमाणात खड्ड्यांचे साम्राज्य असून ठिकठिकाणी सुरू असणाऱ्या रस्त्यांच्या कामामुळे वाहतूक कोंडीदेखील होत आहे. भरधाव वेगाने धावणाऱ्या अवजड वाहनांनी सर्वत्र धुळीचे साम्राज्य पसरलेले असते. यामुळे कोकणाकडे नेणारा हा प्रवास अत्यंत त्रासदायक असून वाहनांचे नुकसान करणाराही आहे. मुंबईहून नागपूरकडे जाणारा समृद्धी महामार्ग, मुंबईतील मेट्रो, मोनो, सागरी मार्गांचे अनेक प्रकल्प विक्रमी वेळेत पूर्ण होऊ शकतात तर कोकणी लोकांच्या जीवन मरणाशी जोडलेला हा रस्ता प्रवासालायक बनवायला इतकी वर्षे का लागतात हा खरा प्रश्न आहे. येत्या निवडणुकांमध्ये याचा जाब लोकांनी मते मागायला येणाऱ्या लोकप्रतिनिधींना विचारायला हवा. कोकणाचे खरे सौंदर्य येथील समुद्रकिनारे व ऐतिहासिक - धार्मिक स्थळांमध्ये आहे. त्यामुळे कोकणातले पर्यटन दिवसेंदिवस बहरत आहे. देशभरातून पर्यटक या ठिकाणी कोकणचे सौंदर्य पाहायला य...

भाऊबीजेच्या पूर्वसंध्येला जॉय ऑफ गिव्हिंगची वात्सल्य बालिकाश्रम व वृद्धाश्रमात दीपावली पाडवा भेट

वात्सल्य ट्रस्टच्या बालिकाश्रम व वृद्धाश्रमात जॉय ऑफ गिव्हिंगची दिपावली पाडवा भेट  शनिवार २ नोव्हेंबर २०२४ रोजी दिपावली पाडव्याचे औचित्य साधून जॉय ऑफ गिव्हिंग ह्या सोशल ग्रुपच्या वतीने सानपाडा (नवी मुंबई) येथील वात्सल्य ट्रस्टच्या बालिकाश्रम व वृद्धाश्रमात दिवाळी भेट उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ह्या अनाथालयातील जवळपास ५२ बालिका व वृद्धांना दिवाळी फराळ व जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. जॉयचे संस्थापक अध्यक्ष गणेश हिरवे यांच्या मार्गदर्शनाखाली राबवण्यात आलेल्या ह्या उपक्रमावेळी जॉयचे नवी मुंबई समन्वयक वैभव पाटील, सदस्य हॅप्पी रायडर गजानन पाटील, दत्ता रातवडकर, विजय फणसेकर, निलेश घोडविंदे, आरोग्य विभागाचे वैद्यकीय अधिकारी डॉ सुभाष घोलप, ठाणे जिल्हा परिषदेतील आरोग्य विभागाचे उपअभियंता प्रदीप पाटील, नेरुळ युथ कौंसिलचे सुभाष हांडे देशमुख इत्यादी मान्यवर उपस्थित होते.  वात्सल्यचे व्यवस्थापक श्री बापूराव काळे यांनी उपस्थितांचे स्वागत करत संस्थेच्या कार्याची थोडक्यात माहिती दिली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक तसेच सूत्रसंचालन वैभव पाटील यांनी केले. १९८३ साली स्थापन झालेल्य...