Posts

आरोग्य तपासणी व रक्तदान शिबीर

Image
डॉ. दा. भ. मार्ग पोलीस दवाखान्यामार्फत आरोग्य तपासणी व रक्त दान शिबीर सशस्र पोलिस मुख्यालय ताडदेव यांच्या माध्यमातून पोलीस प्रशिक्षण सभागृहात येथे मंगळवार दिनांक ४ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी १० ते दुपारी ३ वाजेपर्यंत रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. सर जे. जे. रुग्णालयीन रक्तपेढी मार्फत सदरचे रक्तदान शिबीर  घेण्यात आले. डॉ. दा. भ. मार्ग पोलीस दवाखाना मधील वैद्यकीय अधिकारी व आरोग्य कर्मचारी यांनी ताडदेव येथील सर्व पोलीस बांधवांची आरोग्य तपासणी करून त्यांचेवर औषधोपचार केले. तसेच ताडदेव पोलीस दवाखान्यातील वैद्यकीय अधिकारी व आरोग्य कर्मचारी  यांनी देखील सदर कामात मदत केली. या शिबिरात  वजन, उंची करून BMI ची नोंद घेण्यात आली. तसेच Heamoglobin, blood sugar व blood cholesterol ई रक्ताच्या  तपासण्या करण्यात आल्या. ह्या शिबिरात १२६ पोलीस कर्मचारी व अधिकारी तसेच पोलीस वसाहतीमधील त्यांच्या कुटुंबीयांची आरोग्य तपासणी करण्यात आली व १९ दात्यांनी रक्तदान केले. सशस्र पोलिस मुख्यालय ताडदेव यांच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीमती मौसमी पाटील यांनी शिबिराचे उद्घाटन करून आपल्य...

असा किर्ती कुमार न होणे

Image
असा 'कीर्ती' कुमार न होणे मंगळवारी सकाळी नेहमीप्रमाणे ऑफिसला जाण्यासाठी निघालो तोच एक अत्यंत धक्कादायक आणि अस्वस्थ करणारी गावाकडची बातमी कानावर आली. ज्याला त्याच्या लहानपणापासून सोबतीने मोठे होताना पाहत आलो तो माझा चुलतबंधू किर्ती यशवंत भोईर याचे अकाली निधन झाल्याचा तो निरोप होता. गेले कित्येक महिने आजारपणाशी संघर्ष करणाऱ्या किर्तीने अखेर  सर्वांचा निरोप घेतला. अवघ्या पस्तीशीतील किर्तीने अगदीच कमी मात्र सर्वांनाच हेवा वाटावा असे आयुष्य जगले. आज जीवाला जीव लावणारा कुटुंबकबिला आणि पुढ्यात असणारे सुंदर आयुष्य हे सारे अर्धवट सोडून जाणाऱ्या कीर्तीच्या अंतिम यात्रेत धाय मोकलून रडणारी त्याची आई (काकू) आणि कधी न रडणारे मात्र आज आपल्या अश्रूंना वाट मोकळी करून देणारे त्याचे वडील (यशवंत काका) पाहून मन अत्यंत गहिवरून आले. त्याला आजारातून बरे करण्यासाठी ह्या कुटुंबाने विशेषतः धाकट्या संतोष काकाने अगदी जीवाचे रान केले. जिथे मार्ग सापडेल तिथे त्याच्या उपचारासाठी धाव घेताना मी त्यांना पाहिलंय. मात्र काही घटना ह्या विधिलिखित असतात आणि त्या चुकवता येत नाहीत असे आमचे बाबा म्हणायचे. त्...

अस्मिता संस्थेचा प्रथम वर्धापन दिन उत्साहात

Image
अस्मिता संस्थेचा प्रथम वर्धापन दिन उत्साहात साजरा ठाणे येथील लेखक, कवी वैभव पाटील यांच्या कवितेचा सन्मान अस्मिता साहित्य संस्कृती आणि कला मंडळ नवी मुंबई यांचे वतीने आयोजित राज्यस्तरीय काव्यस्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ व संस्थेचा प्रथम वर्धापन दिन रविवार दिनांक २६ जुलै २०२६ रोजी वाशी येथील दैवज्ञ भवन हॉल येथे मोठया उत्साहात पार पडला. सदर स्पर्धेत ठाणे येथील कवी, लेखक वैभव मोहन पाटील यांना 'डिजिटल गॅप' या कवितेसाठी उत्तेजनार्थ क्रमांक देऊन गौरविण्यात आले. सदर स्पर्धेत सुविद्या करमरकर (पुणे) यांनी प्रथम, प्रिती देशपांडे (वाशी) यांनी द्वितीय तर शुभदा पाटील (झांबिया) यांनी तृतीय क्रमांक पटकावला. सदर पारितोषिके कार्यक्रमास उपस्थित असलेल्या प्रमुख अतिथी सुप्रसिद्ध कवी, बालनाटककार, सुलेखनकार, नेपथ्यकार श्रीहरी पवळे, अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद गोरे, कवी, नाटककार किरण येले, एबीपी माझा च्या भारती सहस्त्रबुद्धे, कवी, कलाकार, आरजे वैभव वऱ्हाडी यांचे हस्ते प्रदान करण्यात आली. अस्मिता प्रकाशन संस्थेचे अनावरणदेखील यावेळी पार यावेळी मान्...

ताई (कविता) _ कु. ध्रुव गोतारणे

Image
ताई   तोंडाने नाय तर मी  शब्‍दांनी बोलू पाहतोय  तर आज मी पहा  कायतरी लिहू पाहतोय  लिहायलो गेलो तर  लिहू तरी काय  ताई शिवाय दुसरा  विषयच सापडला नाय  जेव्‍हा मित्रांनी सोडली  माझी साथ  तेव्‍हा ताईने फिरवला  मायेचा हात  ज्‍या ताईने माझेसाठी  केलं इतकं काय  तिच्‍याबददल वर्णन मी  करु तरी काय    जेव्‍हा जेव्‍हा नात्‍यांमुळे लागतो घरात वणवा  तेव्‍हा ताईच्‍या आवाजाने  पसरतो सर्वत्र गारवा  मित्रांमध्‍ये मी कितीही  हसून जरी वावरतो  हस-या चेह-यामागील दुःख  फक्‍त तिलाच सांगू पाहतो  शांत मला पाहून ती विचारी  ‘बंधूश्री झालंय तरी काय ?’ मी उत्‍तरतो ऋण तुझे प्रेमाचे  ‘फेडू तरी कसे काय ?’ देवा तुझे माझेवर  उपकार आहेत फार  मानलेली बहीण लावी  माया मला जिवा पाड  कवी ध्रुव गोतारणे  मु. गातेस,  ता. वाडा,  जि. पालघर

३१ मे - जागतिक तंबाखू विरोधी दिन

Image
जागतिक तंबाखू विरोधी दिन ३१ मे रोजी जागतिक तंबाखू विरोधी दिन साजरा होत आहे. व्यसन कुठलेही असो, ते घातकच. मात्र तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांचे वाढते सेवन आज चिंतनाचा विषय आहे. आपल्या सभोवताली वावरणाऱ्या अनेक लोकांना तंबाखू, सिगरेट, मावा यासारख्या आरोग्याला अपायकारक गोष्टींचे व्यसन असल्याचे आपणास दिसून येते. या वर्षी, २०२६ मध्ये, जागतिक तंबाखू विरोधी दिनाची संकल्पना "आकर्षणाचा बुरखा फाडणे – निकोटीन आणि तंबाखूच्या व्यसनाचा सामना करणे " ही आहे. तंबाखू आणि निकोटीन उद्योग लहान मुले आणि किशोरवयीन मुलांना आकर्षित करण्यासाठी उत्पादनांची विविध मार्ग अवलंबतात. त्याचा बुरखा फाडून अल्पवयीन मुलांना ह्या व्यसनापासून परावृत्त करणे हे या संकल्पनेचे उद्दिष्ट आहे. धुम्रपान हा अत्‍यंत गंभीर विषय असून महाविदयालयीन तरुणांमध्‍ये त्‍याचे वाढते प्रमाण चिंतेची बाब आहे. धुम्रपान हे मुख्‍यत्‍वे तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांशी निगडीत आहे. या पदार्थांचे सेवन करणारे लोक आपल्‍याला जागोजागी दिसून येतात. घर, कार्यालये तसेच सार्वजनिक ठिकाणी तंबाखू खाणारी व तंबाखूजन्‍य पदार्थांचे धुम्रपान करणा-या लोक...

डॉ. डी. बी. मार्ग पोलीस ठाण्यात रक्तदान शिबिर

Image
सलग दुसऱ्या वर्षी डॉ डी बी मार्ग पोलीस दवाखान्यामार्फत शिबिराचे आयोजन  मंगळवार दिनांक ७ एप्रिल २०२६ रोजी जागतिक आरोग्य दिनाच्या निमित्ताने डॉ. डी. बी. मार्ग पोलीस दवाखाना यांचेमार्फत  डॉ. डी. बी. मार्ग पोलीस ठाण्यात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी ९ ते दुपारी २ या कालावधीत सदर शिबिर आयोजित करण्यात आले होते. शिबिरासाठी डॉ. हितेश पगारे यांच्या नेतृत्वाखालील जे. जे. रुग्णालयामधील राज्य रक्त संक्रमण परिषदेच्या ब्लड बँकेच्या टीममधील डॉक्टर व त्यांचे सहकारी यांनी महत्त्वाची भुमिका राबविली. डॉ. डी. बी. मार्ग पोलीस ठाण्याचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक श्री. नितीन दळवी, पोलीस निरीक्षक श्री. प्रशांत पाटील व त्यांचे सर्व सहकारी पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी आयोजनासाठी प्रत्यक्ष मदत करून सहकार्य केले. सदर शिबिराचे उदघाटन नागपाडा पोलीस रुग्णालयाचे पोलीस शल्य चिकित्सक डॉ. गजानन सानप यांचे हस्ते पार पडले. रक्तदानाचे सार्वजनिक जीवनातील महत्व विषद करून त्यांनी रक्तदात्याना मार्गदर्शन केले. सदर शिबिरात एकूण ४५ रक्तदात्यांनी रक्तदान केले. उन्हाळ्यात नेहमीच रक्ताचा तुटवडा जाण...

जागतिक आरोग्‍य दिन विशेष - "आरोग्यासाठी एकत्र, विज्ञानासोबत उभे राहू या"

Image
जागतिक आरोग्‍य दिन विशेष "आरोग्यासाठी एकत्र, विज्ञानासोबत उभे राहू या" ``स्वच्छतेतून आरोग्‍याकडे'' दरवर्षी ७ एप्रिल हा दिवस जागतिक आरोग्य दिन म्हणून साजरा केला जातो. दरवर्षी जागतिक आरोग्‍य संघटनेमार्फत एक घोषवाक्‍य निवडण्‍यात येते ज्‍याचा प्रचार व प्रसार जागतिक स्‍तरावर सर्वत्र करण्‍यात येतो. यंदाच्या आरोग्य दिनाचे घोषवाक्य “आरोग्यासाठी एकत्र, विज्ञानासोबत उभे राहू या” हे आहे. आरोग्य क्षेत्रातील विविध आव्हाने पेलण्यासाठी ज्ञान, तंत्रज्ञान आणि विज्ञान या बाबींचा वापर करणे क्रमप्राप्त आहे. अनेक असाध्य व्याधींवर उपचार करणे सोयीस्कर व्हावे यासाठी आधुनिक संसाधनांचा वापर अनिवार्य ठरत आहे. यामुळेच विज्ञान आणि आरोग्य यांची योग्य सांगड घालून आरोग्यदायी विश्व तयार करण्यासाठी प्रोत्साहित करणारे यंदाचे घोषवाक्य आहे. आपल्‍या व कुटुंबाच्‍या निरोगी आयुष्‍यासाठी प्रत्‍येकाने दक्ष असणे आवश्‍यक आहे. यासाठी व्‍यक्‍तीगत स्‍वच्‍छता फार महत्‍वाची आहे. जागतिक आरोग्‍य दिनी आरोग्‍याच्‍या दृष्‍टीने विविध उपक्रम दरवर्षी राबविण्‍यात येतात. या दिवशी स्थापन झालेल्या जाग‍तिक आरोग्‍य संघ...