Posts

Showing posts from August, 2024

केळठणच्या सरस्वती गणपत पाटील विद्यालयात जॉय संस्थेचा विद्यार्थी मदत उपक्रम

Image
जॉय ऑफ गिव्हिंग सामाजिक संस्थेचा उपक्रम  जॉय ऑफ गिव्हिंग ह्या सामाजिक संस्थेमार्फत विद्यार्थी मदत उपक्रमाचे आयोजन शनिवार दिनांक ३१ ऑगस्ट २०२४ रोजी पालघर जिल्ह्यातील केळठण येथील सरस्वती गणपत पाटील माध्यमिक विद्यालयात करण्यात आले होते. या विद्यालयात शिकणाऱ्या एकूण १७० मुलांना संस्थेच्या वतीने शैक्षणिक साहित्याचे वाटप याप्रसंगी करण्यात आले. यावेळी संस्थेचे सभासद वैभव पाटील, गजानन पाटील, निलेश घोडविंदे आदी सदस्य उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजन व विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या स्वागत गीताने करण्यात आली. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक विजय पाटील, सहशिक्षक कुमार पाटील, सह शिक्षिका राजश्री वेखंडे, वर्षा सावंत, लिपिक योगेश पाटील, शिपाई दिपक ठाकरे, नरेश पाटील तसेच उपस्थित ग्रामस्थ रामचंद्र पाटील यांचादेखील सन्मान जॉय संस्थेच्या वतीने करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक विजय पाटील यांनी केले तर योगेश पाटील यांनी उपस्थितांचे आभार मानले. संस्थेच्या कार्याची संक्षिप्त माहिती देत वैभव पाटील यांनी मुलांना अभ्यासामध्ये झोकून देण्याचा सल्...