मन, बुद्धी आणि एकाग्रता यांचा संगम म्हणजे काला - हभप साहेबराव महाराज पढेर
घणसोली, नवी मुंबई येथे शिवसाई माथाडी कामगार मित्र मंडळ आयोजित अखंड हरिनाम सप्ताह संपन्न शिवसाई माथाडी कामगार मित्र मंडळ, घणसोली यांच्या वतीने सलग २१व्या वर्षी अखंड हरिनाम सप्ताह व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे आयोजन दिनांक २९ ऑक्टोबर ते ५ नोव्हेंबर २०२५ या कालावधीत घणसोली, सेक्टर ४ येथील सिडको मैदानात करण्यात आले होते. सप्ताह काळात काकड आरती, ज्ञानेश्वरी पारायण, प्रवचन, हरिपाठ, कीर्तन व हरिजागर इत्यादीचे आयोजन करण्यात आले. बुधवार दिनांक ५ नोव्हेंबर रोजी सकाळी हभप साहेबराव महाराज पढेर,सासवड यांच्या सुश्राव्य काल्याच्या किर्तनाने हरिनाम सप्ताहाची सांगता झाली. काल्याच्या कीर्तनात हभप पढेर महाराज यांनी मन, बुद्धी व एकाग्रता यांचा संगम म्हणजेच काला असे काल्याचे महत्व स्पष्ट करून गरिबी, रोगराई व जन्म मृत्यू ह्या मानवीय वेदना असल्याचे विषद केले. यावेळी राज्याचे वनमंत्री मा ना श्री गणेशजी नाईक साहेब यांनी भेट देऊन उपस्थितांना मार्गदर्शन केले व आगामी काळातील सरकारच्या २५० कोटी वृक...