राज्य रक्त संक्रमण परिषदेचे डॉ अरुण थोरात सेवानिवृत्त
रक्तसंकलन व रक्तपुरवठ्यामध्ये बजावली मोलाची भूमिका राज्य रक्त संक्रमण परिषदेमध्ये सहायक संचालक पदावर कार्यरत असणारे डॉ. अरुण थोरात हे नियत वयोमानानुसार काल ३१ मार्च रोजी ३२ वर्षांच्या प्रदिर्घ सेवेनंतर शासकीय सेवेतून सेवानिवृत्त झाले. मुळचे जालन्याचे असलेले डॉ थोरात यांचे औरंगाबाद येथील शासकीय वैदयकीय महाविदयालयात एमबीबीएसचे शिक्षण पार पडले. त्यानंतर त्यांनी अंबाजोगाई, जि. बीड येथील एसआरटीआर मेडीकल कॉलेज येथुन एमडी पॅथॉलॉजीचे शिक्षण घेतले. औरंगाबाद जिल्हयातील प्राथमिक आरोग्य केंद्र पिशोर या आरोग्य केंद्रापासून त्यांनी शासकीय वैद्यकीय सेवेची सुरुवात केली. पदव्यूत्तर शिक्षणानंतर त्यांची नियुक्ती उल्हासनगर येथील मध्यवर्ती रुग्णालयात करण्यात आली. मागील पाच वर्षांपासुन राज्य रक्त संक्रमण परिषदेची धुरा त्यांनी यशस्वीपणे सांभाळली आहे. या दरम्यान राज्यातील रक्तसाठे, रक्तदान मोहिमा, रक्ताचा तुटवडा याबाबत उपस्थित होणा-या प्रश्नांवर त्यांनी अत्यंत कुशलतेने व अनुभवसंप्पनतेने मार्ग काढत रक्तदानाची चळवळ अविरतपणे सुरु ठेवली. कोरोनासारख्या महामारीत राज्याती...