Posts

Showing posts from January, 2021

लसीबाबत संभ्रम नको

Image
कोविडच्या लसीबाबत अजूनही अनेकांच्या मनात मोठा संभ्रम आहे. त्यातून मार्ग काढत ही लस समाजातील सर्व घटकांपर्यंत पोहोचवण्याचे आव्हान सरकारसमोर नक्कीच आहे. आगामी काळात देशातील कोट्यवधी लोकांना लस देण्यात येणार आहे. त्यानंतर लस दिलेल्या व्यक्तीची शारीरिक रचना व इतर व्याधींच्या स्थितीनुसार लसीची परिणामकारकता कमी अधिक असणार आहे ही जाण सर्वांना असायला हवी. त्यामुळेच काहींच्या बाबतीत किरकोळ तक्रारी संभवतात मात्र त्यामुळे लसीच्या परिणामकारकतेवरच शंका घेणे उचित नाही. लस देण्यासाठीचे सरकारचे नियोजन उत्तम आहे. डॉक्टर, आरोग्य कर्मचारी हे सातत्याने रुग्णांच्या संपर्कात असल्याने त्यांना सुरुवातीला लस देण्याचा निर्णय रास्तच आहे. कोरोनामुक्तीच्या दिशेने वाटचाल करत असताना ह्या लसीचे भवितव्य देशाच्या दृष्टीने खूप महत्वाचे ठरते. पूर्वपदावर येत असलेले जनजीवन व लसीची उपलब्धता लोकांच्या मनातील कोरोनाची भीती घालवण्यास कारणीभूत ठरणार आहे. त्यामुळे माध्यमांनीही लसीसंदर्भात वार्तांकन करताना संवेदनशीलता व सदसद्विवेकबुद्धी जागृत ठेवावी. चुकीच्या बातम्यांमुळे लोकांमध्ये लसीबाबतचा संभ्रम वाढत जातो व 'ब...

आता बर्ड फ्लू..

Image
आता बर्ड फलू.. कोरोनाचा कहर उतरत चालल्‍याचे चित्र सर्वत्र असतानाच आता नव्‍या आजाराचे सावट देशावर घोंघावत आहे. बर्ड फ्लू (Bird Flue) नामक रोगाचा धोका देशभर वाढताना दिसत आहे. देशात अनेक ठिकाणी मृत पक्षी आढळुन आले आहेत. त्‍यातील काही राज्यांतील बहुतांश पक्षांना बर्ड फ्लू झाल्याचं स्पष्ट झालं आहे. त्यामुळे लोकांमध्ये दहशतीचं वातावरण निर्माण झालं आहे. महाराष्‍ट्रासह उत्तर प्रदेश, केरळ, राजस्थान, मध्य प्रदेश, हिमाचल प्रदेश, हरियाणा आणि गुजरात या ७ राज्यांमध्ये बर्ड फ्लूचा धोका वाढत चाललेला आहे. शनिवारपर्यंत पूर्ण देशात १२०० पेक्षा अधिक पक्षांचा मृत्यू झाला आहे. बर्ड फ्लू संक्रमण अर्थात 'एव्हियन एन्फ्लुएन्जा' या आजाराचा आर्थिक फटका संबंधित व्यवसायिकांना बसत आहे. हा विषाणू पक्षांच्‍या संपर्कातून माणसाच्‍या शरीरात प्रवेश करण्‍याची शक्‍यता असल्‍यामुळे माणसासाठीदेखील याचा मोठा धोका आहे. माणसामध्‍ये या विषाणूच्‍या संक्रमणामुळे कमाल मृत्‍यूदर ६० टक्‍क्‍यांपर्यंत असल्‍यामुळे चिंतेचे कारण नक्‍कीच आहे. या आजारासंदर्भात आपल्‍याकडे सर्वात मोठा धोका कोंबडया व अंडी यांमधून होणारा संसर्...

लोकल सुरू करण्याचा निर्णय घेण्यापूर्वी

Image
सर्वसामान्यांसाठी लोकल सेवा सुरू करण्याची मागणी पुन्हा एकदा जोर पकडू लागलीय. राज्य सरकारदेखील त्या दृष्टीने सकारात्मक असून लवकरच सर्वांसाठी लोकल वाहतूक खुली होणार असल्याची चिन्हे दिसत आहेत. वास्तविक कोरोना संसर्गाचा धोका अद्याप पूर्णपणे संपलेला नसला तरी लोकांच्या मनातील या विषाणूची भीती बऱ्यापैकी कमी झालेली आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण जवळपास ९५ टक्के व कमी मृत्युदर ही कारणे याला आहेत. या पार्श्वभूमीवर लोक स्वतःचे आरोग्य जपण्यासाठी स्वतःहून प्रयत्न करत असले तरी संसर्ग रोखण्यासाठी सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन आगामी काळात करणे अत्यंत महत्वाचे ठरणार आहे. मुंबईतील दाट लोकवस्ती व प्रवासासाठी सर्वाधिक वापरली जाणारी लोकलसेवा आज गर्दीची सर्वात मोठी ठिकाणे आहेत. व्यवसाय, रोजगार, उद्योगधंदे सुरू झाल्यामुळे मात्र लोकल बंद असल्यामुळे लोक मिळेल त्या खाजगी वाहनाने प्रवास करताना दिसत आहेत. यात सर्वसामान्य लोकांना मोठ्या प्रमाणावर आर्थिक फटका बसत असून अनावश्यक वेळदेखील खर्ची पडत आहे. तसेच रस्तेवाहतुकीवरील ताणदेखील गेल्या काही दिवसांपासून वाढलेला दिसत असून सर्वत्र मुंबईत...

चौकशी पूर्ण होईपर्यंत संविधानिक पदावर नकोत

Image
विविध आरोपांमुळे 'क्लीनबोल्ड' झालेल्या अनेक राजकीय नेत्यांना पक्षातील वरिष्ठांनी 'क्लीनचिट' दिल्याची अनेक उदाहरणे मागील काही वर्षात घडलेली आहेत. वास्तविक ही क्लिनचिट संस्कृती राज्यातील कायदा व सुव्यवस्थेसाठी अनुकूल नाही. चौकशा व शहानिशा होण्याआधीच 'त्या' प्रकरणात संबंधित नेत्याचा हात नसल्याचे जाहीररीत्या सांगणे म्हणजे न्यायव्यवस्थेवर अविश्वास दाखवणे आहे. राजकारण्यांनी चौकशी यंत्रणांच्या कामकाजात हस्तक्षेप न करता त्यांना त्यांचे काम करू द्यावे. आरोपांमध्ये अधिक गंभीरता असल्यास चौकशी पूर्ण होईस्तोवर संबंधित नेत्यांना संविधानिक पदावर न ठेवणे इष्ट ठरेल. चौकशी यंत्रणांवरील दबावामुळे अनेकदा प्रकरणे दाबण्याचे प्रकारदेखील घडतात. ज्या पोटतिडकीने प्रसारमाध्यमे नेतेमंडळींचे घोटाळे, अत्याचार, गुन्हे लोकांसमोर आणतात त्याच जबाबदारीतून त्यामागील तथ्य उघडकीस आणण्यासाठी पाठपुरावा केला तर पारदर्शकरित्या सत्य उघडकीस येण्यास मदत होईल. प्रसारमाध्यमांची भूमिका अशा प्रकरणांमध्ये अत्यंत महत्वाची असल्यामुळे त्यांनी लोकांची विश्वासार्हता व लोकशाहीचा चौथा स्तंभ टिकवून ठेवावा. ...

लसीबाबत संभ्रम नको

Image
लसीकरणाची पथ्ये कुपथ्ये (लोकसत्ता 19 जानेवारी ) हा लेख कोविड लसीकरणाबाबतच्या शंका कुशकांवर प्रकाश टाकणारा आहे. कोविडच्या लसीबाबत अजूनही अनेकांच्या मनात मोठा संभ्रम आहे. त्यातून मार्ग काढत ही लस समाजातील सर्व घटकांपर्यंत पोहोचवण्याचे आव्हान सरकारसमोर नक्कीच आहे. आगामी काळात देशातील कोट्यवधी लोकांना लस देण्यात येणार आहे. त्यानंतर लस दिलेल्या व्यक्तीची शारीरिक रचना व इतर व्याधींच्या स्थितीनुसार लसीची परिणामकारकता कमी अधिक असणार आहे ही जाण सर्वांना असायला हवी. त्यामुळेच काहींच्या बाबतीत किरकोळ तक्रारी संभवतात मात्र त्यामुळे लसीच्या परिणामकारकतेवरच संशय घेणे उचित नाही. लस देण्यासाठीचे सरकारचे नियोजन उत्तम आहे. डॉक्टर, आरोग्य कर्मचारी हे सातत्याने रुग्णांच्या संपर्कात असल्याने त्यांना सुरुवातीला लस देण्याचा निर्णय रास्तच आहे. कोरोनामुक्तीच्या दिशेने वाटचाल करत असताना ह्या लसीचे भवितव्य देशाच्या दृष्टीने खूप महत्वाचे ठरते. पूर्वपदावर येत असलेले जनजीवन व लसीची उपलब्धता लोकांच्या मनातील कोरोनाची भीती घालवण्यास कारणीभूत ठरणार आहे. त्यामुळे माध्यमांनीही लसीसंदर्भात वार्तां...

शेतकरी हिताचा निर्णय

Image
शेतीसाठी वापरल्या जाणाऱ्या कृषिपंपाच्या विजजोडणीसाठी स्वतंत्र जोडणी वीज मंडळामार्फत देण्यात येते. मात्र यासाठी कराव्या लागणाऱ्या सरकारी प्रक्रियेत सर्वसामान्य शेतकरी बेजार होऊन जातो. त्यामुळे अनधिकृत जोडण्यांचे प्रमाण वाढले आहे. राज्यात जवळपास  4 लाख 85 हजार अनधिकृत कृषिपंप वीज जोडण्या असून यापैकी किमान ३० टक्के अनधिकृत जोडण्या या वीज खांबापासून ३० मीटरच्या आत आहेत. राज्यातील शेतक-यांना कृषी पंपांसाठी विजेच्या अधिकृत जोडण्या मिळाव्यात म्हणून वीज खांबापासून 30 मीटरच्या आत असलेल्या सर्व अनधिकृत कृषिपंप वीज जोडण्यांना येत्या 26 जानेवारी पूर्वी अधिकृतपणे जोडण्या देण्याचा शासनाने नुकताच घेतलेला निर्णय स्वागतार्हच आहे. तसेच येत्या 31 मार्च पर्यंत राज्यातील सर्वच अनधिकृत कृषी पंप वीज जोडण्यांना अधिकृत करण्याचादेखील निर्णय घेण्यात आलेला आहे. अनेक वर्षांपासून कृषीपंप जोडणीसाठी प्रयत्नशील असलेल्या शेतकऱ्यांसाठी हा निर्णय म्हणजे नवीन वर्षाची एक अनमोल भेटच मानली जात आहे. कित्येक वर्षे महावितरणच्या कार्यालयात कृषिपंप वीज जोडणीसाठी खेटे घालणाऱ्या राज्यातील लाखो शेतकऱ्यांना फार मोठा द...

बर्ड फ्लू बाबत आवश्यक दक्षता घ्या

Image
आपल्या देशात दर महिन्‍याकाठी ३० कोटी पोल्‍ट्रीतले पक्षी व ९०० कोटी अंडी खादयपदार्थांसाठी वापरली जातात असे एका आकडेवारीतुन समोर आले आहे. याच कोंबड्या व अंड्यांमधून बर्ड फ्लू हा आजार बळावण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. माणसामध्‍ये बर्ड फ्लू या विषाणूच्‍या संक्रमणामुळे कमाल मृत्‍यूदर ६० टक्‍क्‍यांपर्यंत असल्‍यामुळे चिंतेचे कारण नक्‍कीच आहे. आधीच कोरोना विषाणूने विस्कळीत झालेले जनजीवन पुन्हा पूर्वपदावर येण्याची चिन्हे दिसत असताना आता बर्ड फ्लू हा सन 2006 साली आपल्याकडे आलेला आजार पुन्हा एकदा डोके वर काढत आहे. कोंबडया व अंडी यांमधून या आजाराच्या संसर्गाची भीती वर्तवण्यात येत असली तरी दक्षिण आशियातील इतर देशांच्‍या तुलनेत आपल्‍या देशातील स्‍वयंपाकाची पध्‍दत अशा आजारांपासुन दूर राहण्‍यासाठी लाभदायक मानली जाते. ७० डिग्री सेल्‍सीयसच्‍या वरील तापमानात हा विषाणू जिवंत राहत नाही व आपण शिजवणारे अन्‍न व मांस साधारणतः १०० डिग्रीच्‍या वर तापमानातील असते त्‍यामुळे इतक्‍या मोठया तापमानात हा विषाणू तग धरुन राहणे शक्‍यच नाही. त्‍यामुळे चिकन, अंडयांच्‍या माध्‍यमातून हा विषाणू माणसांमध्‍ये येण...

संघर्षातून उभे राहिलेले निष्पक्ष वृत्तपत्र

Image
आज सर्वसामान्य माणसाची आपले घर चालवताना होणारी कसरत अत्यंत संघर्षमय असते. प्रापंचिक जबाबदाऱ्यांमध्ये आपण इतके गुरफटून गेलेलो असतो की सामाजिक दोष, उणिवा, क्लेश आपल्याला दिसत असूनही आपण त्याकडे कानाडोळा करतो. मात्र अनेक व्यक्ती सामाजिक जबाबदारीचे भान ठेवत कौटुंबिक आव्हाने पेलत सामाजिक सुधारणांचे शिवधनुष्यदेखील यशस्वीपणे पेलत आहेत. त्यातीलच एक म्हणजे वृत्तपत्रलेखक. समाजातील अनुचित, न पटणाऱ्या गोष्टींवर प्रहार करत सर्वसामान्यांना पटणारी मते तो आपल्या लेखणीतून वृत्तपत्रांमध्ये मांडत असतो. म्हणूनच तो समाजमनाचा आरसा म्हणूनदेखील ओळखला जातो. मात्र यातील अनेक आसामी यापुढे जात स्वतःचे वृत्तपत्र काढन्याचे स्वप्न रंगवतात व त्यात यशस्वीदेखील होतात. त्यातीलच एक म्हणजे आमचे मित्र श्रीमान पंकजकुमार पाटील. वृत्तपत्रलेखनापासून आपल्या सामाजिक जीवनाची सुरुवात करणाऱ्या पंकजकुमार यांनी आपले स्वतःचे एक वृत्तपत्र काढण्याचा विडा उचलला व तो यशस्वीपणे पेललादेखील. जानेवारी २०२० या पत्रकारदिनी पंकजकुमार यांनी "आदर्श वार्ताहर" या वृत्तपत्राचे (पाक्षिक) मुंबईतून प्रकाशन केले. आज हे वृत्तपत्र एक ...

या निमित्ताने तरी पीएमसी मुद्दा चर्चेत

Image
शिवसेना खासदार संजय राऊत यांच्‍या पत्‍नी वर्षा राऊत यांना सक्‍त वसुली संचालनालय म्‍हणजे ईडीने बजावलेल्‍या नोटीशीच्‍या निमित्‍ताने पंजाब अॅंड महाराष्‍ट्र को ऑपरेटीव्‍ह बॅंकेचा मुददा पुन्‍हा एकदा चर्चेला आलेला आहे. रिझर्व्‍ह बॅंकेने पीएमसी बॅंकेवर निर्बंध घालुन वर्ष झाले तरी हया बॅंकेतील खातेदारांना अदयाप आपले हक्‍काचे व कष्‍टाचे पैसे बॅंक खात्‍यातुन परत मिळालेले नाहीत. याअगोदर येस बॅंक व लक्ष्‍मी विलास बॅंकांवर आरबीआयने घातलेले आर्थिक निर्बंध काही दिवसांतच उठवण्‍यात आले मात्र पीएमसी बॅंकेच्‍या बाबतीत मात्र तसे घडले नाही. या बॅंकेच्‍या पुनरुज्‍जीवनासाठी भागीदार शोधण्‍याची प्रक्रिया बॅंकेच्‍या प्रशासकांमार्फत सुरु करण्‍यात आली आहे. वास्‍ताविक, सहकार क्षेत्रातील पीएमसी बॅंक ही अग्रगण्‍य बॅंक समजली जात होती. मुंबई, ठाणे, नवी मुंबईसारख्‍या नागरी भागांत या बॅंकेच्‍या अनेक शाखा सर्वसामान्‍य वस्‍तीच्‍या ठीकाणी अस्तित्‍वात आहेत. त्‍यामुळे या बॅंकेचे लाखो खातेधारक हे सर्वसामान्‍य नागरीक, किरकोळ व्‍यावसायिक, सहकारी गृहनिर्माण सोसायटया, धार्मिक संस्‍था, सेवानिवृत्‍त कर्मचारी, जेष्‍ठ नाग...

केलेला संकल्प पूर्ण करण्याचा प्रयत्न

Image
सुरू होणारे प्रत्येक नवे वर्ष आपले आयुष्य एका वर्षाने कमी करणारे असले तरी उर्वरित आयुष्यात सुखासमाधानाने जगण्यासाठी नव्या वर्षाच्या निमित्ताने संकल्प हे करायलाच हवेत. यंदाच्या पूर्ण वर्षात कोरोना विषाणूने जगभरात मृत्यूतांडव केले. आपल्यातलेच अनेक जण नवे वर्ष पाहण्यासाठी उरले नाहीत इतकी विदारक परिस्थिती चार महिन्यांपूर्वी होती. आरोग्य व कोरोना प्रदूर्भावाच्या बाबत उचित प्रतिबंधात्मक दक्षता घेणारे आजवर सुदैवाने या विषाणूच्या कचाट्यात सापडलेले नाहीत. त्यामुळे आपण आपल्या आरोग्याच्या बाबतीत आजवर घेत असलेली काळजी यापुढेदेखील कायम राखण्याचा संकल्प प्रत्येकाने करायला हवा. नव्या वर्षात मास्क, स्वच्छता, सामाजिक अंतर या बाबींचे कटाक्षाने पालन केले तर कोरोनाच काय, येणारे इतर नवनवे संसर्गजन्य विषाणू आपल्याला बाधणार नाहीत. त्याव्यतिरिक्त प्रत्येकाने आपल्या आयुष्यात प्रापंचिक जबाबदाऱ्यांव्यतिरिक्त एखादा आवडीचा छंद जोपासावा व तो टिकवण्याचा संकल्प करावा. हाच छंद आपल्याला पुढील आयुष्य समाधानाने जगण्याचे बळ देऊन जाईल. माझ्या बाबतीत सांगायचे तर दरवर्षी मी गेल्या वर्षीपेक्षा अधिक व नाविन्यपूर्ण ...

यांना आवर घाला

Image
परवा गोरेगाव येथे कामानिमित्त जाण्यासाठी दादर येथून लोकल पकडली. अंधेरी स्थानकात गाडी येताच तीन चार तृतीयपंथी डब्यात चढले व प्रवाशांकडून पैशांची मागणी करू लागले. त्याच दिवशी पश्चिम रेल्वे मार्गावरच एका चोरट्याने एका प्रवाशाचा मोबाईल हिसकावून धूम ठोकली. त्याला पकडण्याच्या नादात तो प्रवाशी लोकलखाली येतायेता वाचला. वास्तविक सध्या कोरोना संसर्ग रोखण्यासाठी लोकल वाहतूक सर्वसामान्य नागरिकांसाठी बंद आहे. तिकीट काढताना व रेल्वे स्थानकांमध्ये प्रवाशांकडून ओळ्खपत्राची मागणी केली जाते. असे असताना हे भुरटे चोर व इतर घटक रेल्वे स्थानकांमध्ये प्रवेश करतातच कसे हा मोठा प्रश्न पडतो. रेल्वे स्थानकांमध्ये पोलीस व सीसीटीव्ही सारख्या यंत्रणा कार्यान्वित असतानादेखील मोठ्या हिंमतीने हे लोक स्थानकांमध्ये घुसतात व आपला कार्यभार साधण्याचा प्रयत्न करतात. रेल्वे डब्यांमध्ये लहान लहान मुलांकडून सर्रास भीक मागितली जाते. अशा मुलांना बालसुधागृहात भरती केले पाहिजे. सध्या रेल्वेमध्ये मर्यादित प्रवेश असल्यामुळे फार गर्दीदेखील नसते. तरीदेखील चोरीसारखे प्रकार करण्याचे धाडस करत असतील तर रेल्वे स्थानकांच्या सुरक...

समान नागरी कायदा आवश्यक

Image
कुटुंबनियोजनाचे नियम, सरकारी प्रतिबंधात्मक लसी नाकारणारे अनेक दूषित घटक समाजात आहेत. याबाबत अनेक गैरसमज मनात असल्याने व त्याच्या भविष्यातील फायद्यांची जाण नसल्याने उचित प्रबोधनाअभावी त्यांच्याकडून अशा गोष्टींना सपशेल नकार दिला जातो. देशाच्या वाढत चाललेल्या विस्फोटक व भरमसाठ लोकसंख्येचे परिणाम सर्वश्रुत आहेत. त्यामुळे कुटुंबनियोजनाचे नियम हे अधिक कडक करावेच लागतील. ते नियम नाकारणाऱ्या घटकांना कोणत्याही सरकारी योजनांचे लाभार्थी करण्यास अटकाव करणारा कायदा अस्तित्वात येणे काळाची गरज आहे. तीच बाब लसीकरणाच्या बाबतीत लागू पडत असून सामाजिक आरोग्य अबाधित राखायचे असेल संसर्गजन्य आजारांसाठी उपलब्ध होणारी सार्वत्रिक लस सर्व घटकांना बंधनकारक करणे देशहिताचे आहे. अन्यथा लस टोचून न घेणारे लोक इतरांसाठी कर्दनकाळ ठरतील. लोकशाहीत प्रत्येक नागरिकाला व्यक्तिस्वातंत्र्याचा अधिकार असला तरी समाजहिताच्या दृष्टीने आवश्यक बाबींमध्ये सक्तीची बंधने आणावीच लागतील.  वैभव मोहन पाटील घणसोली, नवी मुंबई

अभिजित राणे युथ फाउंडेशनचा पुरस्कार सोहळा संपन्न

Image
अभिजित राणे युथ फाउंडेशनच्या वतीने आयोजित वृत्तपत्रलेखन व गणेशोत्सव देखावा स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा दिनांक २ जानेवारी २०२१ रोजी सायंकाळी ५ वाजता गोरेगाव येथील केशव गोरे ट्रस्ट हॉल मोठ्या दिमाखात पार पडला. यावेळी महाराष्ट्रातील नामांकित पत्रकार, वृत्तवाहिन्यांचे प्रतिनिधी तसेच वृत्तपत्रलेखक मोठया संख्येने उपस्थित होते. राज्यस्तरीय वृत्तपत्रलेखन स्पर्धेसाठी जवळपास १५० पत्रलेखकांनी आपल्या प्रवेशिका पाठवल्या होत्या. त्यातून परीक्षकांनी १५ पत्रांची पुरस्कारासाठी निवड केली. यात विश्वनाथ पंडित-चिपळूण यांच्या पत्राला प्रथम क्रमांक मिळाला, दत्ता खंदारे धारावी यांच्या पत्राला द्वितीय क्रमांक तर प्रिया मेश्राम-नागपूर यांनी तृतीय क्रमांकाचे पारितोषिक पटकावले. तसेच सिराज शेख-बीड चतुर्थ, सुधीर कनगुटकर-दिवा पंचम, दत्तप्रसाद शिरोडकर मुलुंड-सहावा, सुभाष अभंग ठाणे-सातवा, यशवंत चव्हाण बेलापूर-आठवा, गणेश लेंगरे सोलापूर-नववा व किरण धुमाळ-अकलूज यांनी दहावा क्रमांक प्राप्त केला. जनार्दन नाईक, शांताराम वाघ, रोहित रोगे, संगीता जांभळे व अनुज केस...

शहरातील कोरोना संपला की काय?

Image
कोरोनाचा प्रादुर्भाव काही अंशी कमी झालेला असला तरी 'तो' पूर्णपणे संपलेला नाही. मास्‍क व सोशल डिस्‍टंसींग बंधनकारक केलेले असताना अनेक जण या नियमांचे सर्रास उल्‍लंघन करत असल्‍याचे दिसुन येते. नवी मुंबईच्‍या सर्वच बाजारपेठांमधील गर्दी पाहीली तर सोशल डिस्‍टंसींगचे तीन तेरा वाजल्‍याचे पाहायला मिळते. कधी नव्‍हे इतकी गर्दी बाजारात सायंकाळच्‍या वेळेत दिसुन येते. वाहनांची वर्दळदेखील प्रचंड प्रमाणात वाढलेली असुन रस्‍त्‍यांवरील वाहनकोंडीदेखील वाढताना दिसत आहे. वाहनचालक व बाजारात फिरणा-या अनेकांच्‍या तोंडावर मास्‍कदेखील दिसुन येत नाहीत. अशा व्‍यक्‍ती खरेतर इतरांसाठी धोकादायक आहेत. एकीकडे शासनाच्‍या वतीने संसर्ग रोखण्‍यासाठी जनजागृती व प्रयत्‍न करण्‍यात येत असताना काही लोकांचा फाजील अतिआत्‍मविश्‍वास कोरोना संसर्गाला प्रोत्‍साहन देणारा आहे. त्‍यामुळे विनामास्‍क फिरणा-या लोकांवरील कारवाई अधिक तिव्र करण्‍याची आवश्‍यकता निर्माण झाली आहे. त्‍यांचेकडून आकारण्‍यात येणा-या दंडाची रक्‍कमदेखील दामदुप्‍पट करायला हवी. तसेच बाजारपेठांमधील अनावश्‍यक गर्दी विविध उपाययोजनांव्‍दारे रोखायला हवी. ...