Posts

Showing posts from September, 2021

पोलिसांचा धाक व विश्वासार्हता वाढणे गरजेची

Image
मुंबईतील साकीनाका घटनेनंतर डोंबिवलीमध्ये 15 वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर घडलेली बलात्काराची घटना अत्यंत चीड आणणारी आहे. सातत्याने उघडकीस येत असलेल्या बलात्काराच्या घटनांनी कायदा व सुव्यवस्थेचा बोजवारा उडालेला असून मुंबई महाराष्ट्रात महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलेला आहे. तब्बल तीस जणांनी एका अल्पवयीन मुलीवर अनेक महिने तिला ब्लॅकमेल करत बलात्कार केला व ही घटना पोलीस यंत्रणांपर्यंत पोहोचली नाही हे खरोखरच दुर्दैव आहे. आजच्या २१व्या शतकातदेखील अशा प्रकारच्या घटना सरेआम घडत असतील तर त्यासाठी मोठ्या आत्मचिंतानाची गरज आहे. नराधमांना पोलिसांचे व कायद्याचे भय राहिले नसल्याने त्यांची हिंमत बळावत चालली आहे. पैसा व राजकीय वजन वापरून कितीही मोठा गुन्हा केला तरी सुटता येते हा समाजात दृढ होत चाललेले भ्रम दूर करण्याची जबाबदारी आता पोलिसांवर आलेली आहे. अत्याचाराच्या गुन्ह्यातील आरोपींना ताबडतोब कठोरातील कठोर नव्हे फाशीचीच शिक्षा सुनावली गेली पाहिजे. यासाठी पोलीस व न्यायव्यवस्थेने असे खटले अधिक न लांबवता त्यावर तातडीने सुनावणी घेतली पाहिजे. आरोपींना पाठीशी घालणारा दबाव झुगार...

सहकारी बॅंकामधील ठेवी किती सुरक्षित?

Image
सहकारी बॅंकामधील ठेवी किती सुरक्षित https://kiranhegdelive.com/how-much-secured-our-deposits-in-co-op-banks-asks-vaibhav-mohan-patil/ शासकीय बँका, नागरी सहकारी बँका व मल्टी स्टेट को-ऑपरेटिव्ह बँका आता पूर्णपणे रिझर्व्ह बँकेच्या देखरेखीखाली आणण्‍याचा निर्णय नुकताच केंद्रिय मंत्रीमडळाने घेतलेला आहे. गेल्या काही वर्षांपासुन सहकारी बँकांमधून मोठे घोटाळे उघड झालेले आहेत. त्‍यामध्‍ये लाखो ठेविदारांच्‍या ठेवी अडकलेल्‍या असुन त्‍याचा बॅंक ग्राहकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. महाराष्ट्रातील  पंजाब अँड महाराष्ट्र कॉ-ऑपरेटिव्ह बँकेवर अंतर्गत अनियमिततेमुळे आरबीआयने निर्बंध आणले असुन गेल्‍या दोन वर्षांपासुन  लाखो खातेधारकांचे कोटयवधी रुपये या बॅंकेत अडकुन पडले आहेत. असे घोटाळे टाळण्यासाठी सहकारी बँकांना ‘आरबीआय’च्या अधिकार कक्षेत आणण्याचा केंद्र सरकारचा निर्णय नक्‍कीच स्‍वागतार्ह आहे. आता सर्वच सहकारी बॅंकांचा ताळेबंद आरबीआय या शिखर बॅंकेकडे राहणार असल्‍यामुळे सहकारी बँकांमधील ठेवीदारांना आपला पैसा सुरक्षित असल्याची हमी मिळणार आहे. गेल्‍या काही वर्षांमध्‍ये अनेक सहकारी बॅं...

भ्रष्टाचाराची कीड मुळापासून उपटायला हवी

Image
भ्रष्टाचार ही एक सामाजिक कीड आहे. ही कीड इतकी खोलवर रुतली आहे की ती मुळापासून उपटून काढणे कुठल्याही सरकारला आजवर शक्य झालेले नाही. प्रशासनापासून ते राजकारण्यांपर्यंत भ्रष्टाचाराचे धागेदोरे आढळून आलेले आहेत. लाचलुचपत खात्याने प्रशासनातील अशी असंख्य प्रकरणे उघडकीस आणलेली आहेत. राजकारणातील प्रामाणिक पणा सध्या दुर्मिळ होऊ पाहत आहे. सध्या भाजप नेते किरीट सोमय्या हे महाविकास आघाडीतील मंत्र्यांवर करत असलेले आरोप तपास यंत्रणांकडून सिद्ध झाले तर ती अतिशय गंभीर बाब ठरेल. अगोदरच अनेक बड्या नेत्यांवर ईडी, सीबीआय सारख्या केंद्रीय तपास यंत्रणांची कारवाई सुरू आहे व त्यात अनेक धक्कादायक बाबी उघडकीस येत आहेत. सरकारचे महत्वाचे प्रकल्प व योजनांमध्ये भ्रष्टाचाराची मुळे दडलेली आहेत. लोकांचा कर रूपाने भरलेला पैसा असा भ्रष्टाचारातून वाहून जात असेल तर लोकांना किती गुणवत्तेच्या सुविधा मिळत असतील याबाबत शंकाच आहे. सामाजिक कार्यकर्त्यांची व लोकांची जागरूकता भ्रष्टाचाराला वाचा फोडण्याचे काम करते. त्यामुळे भ्रष्टाचार व सरकारी कामांमधील अनियमितता शोधुन काढून ती उघडकीस आणल्यामुळे भविष्यात घोट...

अशी हिंमत होतेच कशी

Image
साकीनाका घटनेनंतर डोंबिवलीमध्येदेखील 15 वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर घडलेली बलात्काराची घटना अत्यंत चीड आणणारी आहे. सातत्याने उघडकीस येत असलेल्या बलात्काराच्या घटनांनी कायदा व सुव्यवस्थेचा बोजवारा उडालेला असून मुंबई महाराष्ट्रात महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलेला आहे. तब्बल तीस जणांनी एका अल्पवयीन मुलीवर अनेक महिने तिला ब्लॅकमेल करत बलात्कार केला व ही घटना पोलीस यंत्रणांपर्यंत पोहोचली नाही हे खरोखरच दुर्दैव आहे. आजच्या २१व्या शतकातदेखील अशा प्रकारच्या घटना सरेआम घडत असतील तर त्यासाठी मोठ्या आत्मचिंतानाची गरज आहे. नराधमांना पोलिसांचे व कायद्याचे भय राहिले नसल्याने त्यांची हिंमत बळावत चालली आहे. पैसा व राजकीय वजन वापरून कितीही मोठा गुन्हा केला तरी सुटता येते हा समाजात दृढ होत चाललेले भ्रम दूर करण्याची जबाबदारी आता पोलिसांवर आलेली आहे. अत्याचाराच्या गुन्ह्यातील आरोपींना ताबडतोब कठोरातील कठोर नव्हे फाशीचीच शिक्षा सुनावली गेली पाहिजे. यासाठी पोलीस व न्यायव्यवस्थेने असे खटले अधिक न लांबवता त्यावर तातडीने सुनावणी घेतली पाहिजे. आरोपींना पाठीशी घालणारा दबाव झुगारून त्यांना तातडी...

डॉक्टर आणि पेशंट मध्ये सुसंवाद आवश्यक

Image
डॉक्टर ह्या नावाबद्दल समाजात प्रचंड आदर असतो. डॉक्टर हा आजारातून बरे करणारा, जीव वाचवणारा व रुग्णाची काळजी घेणारा असल्यामुळे कुटुंबासाठी तो एक प्रकारचा वरदानच ठरतो. निरनिराळे आजार व त्यावरील आधुनिक संशोधन यामुळे वैद्यकीय क्षेत्र फार झपाट्याने बदलू लागले आहे. मात्र या बदलांबरोबरच आजारपण किंवा डॉक्टरी इलाजातील खर्चातदेखील मोठी वाढ झाल्याचे दिसून येत आहे. यामुळेच आजच्या बदलत्या काळात डॉक्टर व पेशंट यांच्यातील दरी दिवसेंदिवस रुंदावत आहे. सुसंवादाचा आभाव तसेच विविध कारणांतून निर्माण झालेले गैरसमज हे त्यामागील एक प्रमुख कारण आहे. जीवनदान देणारा डॉक्टर कोणत्याही रुग्णाला देवापेक्षा अधिक जवळचा असतोच. मात्र महागड्या वैद्यकीय सेवांमुळे पेशंट व त्यांचे नातेवाइक अस्वस्थ आहेत. आजारातून कायमस्वरुपी मुक्त तर व्हायचे आहे; पण त्यासाठी पैसे कसे उभे करायचे, हा प्रश्न त्यांच्यासमोर आहे. वैद्यकीय जगतातील बदलत्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या महागड्या सुविधा आपल्यावर विश्वास ठेवणाऱ्या पेशंटपर्यंत पोचविण्याची धडपड डॉक्टर मंडळींकडून केली जाते. यासाठी पेशंटचे समुपदेशन करण्यापासून शक्य तितकी मद...

कलाकार राजकारणात केवळ प्रसिद्धीमुळेच

Image
कलाकारांना राजकीय प्रवेश मिळतो तो केवळ त्यांच्या प्रसिद्धीचा फायदा उचलण्यासाठी. त्यामुळे असे कलावंत राजकारणात गेल्याने कलाक्षेत्राला काय व किती फायदा मिळतो याबद्दल कुणाला देणेघेणे नसते. मराठी व हिंदी टीव्ही-चित्रपट-नाट्य श्रुष्टीतील अनेक कलाकार विविध राजकीय पक्षांमध्ये प्रवेशकर्ते झालेले आहेत व लोकप्रतिनिधी म्हणून निवडूनदेखील आलेले आहेत. मात्र त्यातला कुणीही, कलाकारांचे प्रश्न घेऊन सरकारदरबारी पोटतिडकीने बाजू मांडताना दिसलेला नाही. मुळात राजकारणात गेलेले हे कलाकार पैसा व प्रसिद्धीच्या यशोशिखरावर असतात. त्यांना सर्वसामान्य कलाकार, पडद्यामागे काम करणारे सहाय्यक, तंत्रज्ञ, व्यवस्थापक, करिअर घडवण्याच्या प्रयत्नात असलेले हरहुन्नरी मात्र दुर्लक्षित कलावंत यांच्या समस्यांशी फार सोयरसुतक नसते. कलावंत म्हणून लोकांमधील प्रसिद्धीच्या बळावर ते निवडून येतात व राजकारणी म्हणून नाव मिळवतात. सर्वसामान्य लोकांच्या त्यांच्याकडून चित्रपटाप्रमाणे वास्तविक जीवनात असामान्य कामगिरीच्या अपेक्षा असतात. मात्र या अपेक्षांना खरे उतरण्याची कामगिरी त्यांच्याकडून अपवादानेच होत असल्यामुळे कालांतराने राजकार...

पर्यटन सुरू व्हावे

Image
कोरोना प्रादुर्भाव कमी झाल्यामुळे राज्यातील बहुतांशी व्यवहार सुरू झालेले आहेत. महाराष्ट्र हे विविधता व निसर्गसौंदर्याने नटलेले राज्य असून येथील पर्यटनासाठी राज्यभरासह देश विदेशातून लोक येतात. लॉकडावूनच्या काळात पर्यटन व्यवसाय सर्वात बाधित झाला आहे जो अद्यापि सुरू होऊ शकलेला नाही. या व्यवसायाशी निगडित घटक जसे हॉटेल्स, टूर्स ट्रॅव्हल्स, गाईड्स, स्थानिक व्यवसायिक मोठ्या प्रमाणावर बाधित आहेत. मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक व इतर पर्याय उपलब्ध नसल्याने त्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. कोरोनाचा कहर आता बऱ्याच प्रमाणात कमी झालेला आहे. रोजगारासाठी पर्यटनावर अवलंबून असलेल्या लोकांची वाताहत पाहता सरकारने आता पर्यटन स्थळे सुरू करण्यास हरकत नाही. पर्यटनातून लोकांचेदेखील मानसिक परावर्तन होत असल्याने कोरोनाच्या विवक्षित मानसिकतेतून बाहेर पडण्यास त्यांना मदत होणार आहे. ऐतिहासिक स्थळे, गडकिल्ले, समुद्रकिनारे, धार्मिक स्थळांवरील पर्यटन सुरू करून त्यावर रोजगारासाठी अवलंबून असलेल्या लोकांना दिलासा देण्याची वेळ आलेली आहे.  वैभव मोहन पाटील  घणसोली, नवी मुंबई 

भटक्या कुत्र्यांची दहशत

Image
भटक्या कुत्र्यांच्या उच्छादाबाबत वर्तमानपत्रांमध्ये दररोज बातम्या छापुन येत आहेत. मात्र या गंभीर विषयाबाबत महानगरपालिकांच्या उदासीन धोरणांमुळे मोकाट कुत्र्यांची समस्या दिवसेंदिवस उग्र रूप धारण करीत आहे. सर्व महानगरपालिका व त्यांच्या झोपड़पट्टी क्षेत्रांमधे ह्या कुत्र्यांचा दिवसरात्र वावर असतो. येणाऱ्या जाणाऱ्या पादचाऱ्यांवर भुंकणे, दुचाकीस्वारांच्या मागे लागणे, प्रसंगी चावा घेणे हे प्रकार नित्याचेच झालेत. त्यामुळे नागरिकांना या कुत्र्यांच्या अक्षरशः दहशतीत राहावे फिरावे लागत आहे. महानगरपालिकांनी तातडीने या समस्येकडे गांभीर्याने पाहणे आवश्यक असून वरिष्ठ अधिकाऱ्यांनी देखील भटक्या कुत्र्यांच्या नियंत्रणासाठी जातीने लक्ष् देण्याची गरज आहे. रोज होणारे अपघात, नागरिकांना कुत्रि चावण्याच्या प्रमाणात होणारी वाढ यावरुन तरी प्रशासनाने बोध घेण्याची गरज आहे नाहीतर रस्त्यावर फिरणारा हा भस्मासुर उद्या आपल्या घरापर्यंत पोहोचला तर पश्चातापचि वेळ येवु नये. रस्त्यावर त्रासदायक ठरणाऱ्या या कुत्र्यांचे निर्बिजिकरण व नियंत्रण पथकांमार्फत नियमित कारवाई परिणामकारकरित्या होणे गरजेचे आहे. वैभव मोहन प...

शिक्षण, कला, खेळ व अध्यात्म क्षेत्रातील अष्टपैलू व्यक्तिमत्त्व - श्री मोतीराम धाऊ पाटील

Image
क्रिकेट समालोचकापासून ते मार्गदर्शकापर्यंतचा प्रवास  पराभवाने खचून जाता लढत राहायला शिकवणारा सर्वांच्या आवडीचा खेळ म्हणजे क्रिकेट. या खेळात हार जित झाली तरी खेळाडू जिंकण्याच्या उर्मिनेच खेळतो व आपले सर्व कौशल्य पणाला लावतो. आज गावोगावी, खेडोपाडी क्रिकेटचे महासंग्राम भरवले जातात, त्यातही आता अनेक नवनवे प्रकार सामील झालेत. खेळाने शरीराबरोबर बुद्धीही तल्लख होते असे म्हणतात. त्यामुळेच खेळात यश मिळवणाऱ्या बहुतांश व्यक्ती आपल्या आयुष्यातदेखील यशाला गवसणी घालतात. पालघर जिल्ह्यातील माझे देवघर हे गावदेखील एकेकाळी अष्टपैलू खेळाडू व कलावंतांचा भरणा असलेले गाव म्हणून परिचित होते. प्रत्येकाच्या अंगी असलेले पैलू घडवण्यासाठी एखाद्या शिल्पकाराची गरज भासते व हेच शिल्पकार सध्या दुर्मिळ होऊ पाहत आहेत. मात्र आमच्या गावात जन्मलेल्या एका शिल्पकाराने कलावंत व खेळाडूंची ही गरज ओळखून त्यांच्या गुणांना वाव देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला व त्यामुळेच माझ्या लहानपणी मी पाहिलेला तो काळ कायम स्मरणात बसला. 'मोतीराम धाऊ पाटील' उर्फ मोतिभाऊ हे आमच्या गावाला लाभलेले एक रत्नच म्हणावे लागे...

पत्रकार, उद्योजक श्री शरद यशवंत पाटील

Image
वाड्यातील एक बहुआयामी व्यक्तिमत्व - शरद पाटील गणेशोत्सवाच्या निमित्ताने यंदा अनेक महिन्यांनी पत्रकार, उद्योजक श्री शरद पाटील सरांना भेटण्याचा योग आला. तसे त्यांचे दर्शन रोजच त्यांच्या मशाल चॅनेलवर होते मात्र इच्छा असूनही प्रत्यक्ष भेटीचा प्रसंग दुर्मिळच. ग्रामीण भागातील अनेक पत्रकारांना मी जवळून ओळखत असताना आपली कुशाग्र बुद्धिमत्ता, रोखठोक भाषाशैली व डेरिंगबाज पत्रकारिता यामुळे ओळखल्या जाणाऱ्या शरद पाटील यांचा मी कॉलेजजीवनापासून फॅन आहे. अनेक दशके पत्रकारितेत घालवलेल्या शरद पाटील यांनी कधी कुणासमोर हार मानल्याचे मी पाहिलेले नाही. आपल्या स्वतःच्या बुद्धिकौशल्यावर प्रचंड आत्मविश्वास बाळगणारे शरद पाटील अत्यंत जिद्दी, निर्भीड, शून्यातून विश्व उभे केलेले आजच्या तरुणांना आदर्शवत असेच आहेत. सन १९९७ साली वाड्याला ज्युनिअर कॉलेजला असताना त्यांनी अनेक दशकांपूर्वी सुरू केलेले "मशाल" हे मासिक आवर्जून वाचायचो. एकतर त्यावेळी स्थानिक बातम्या छापणाऱ्या वृत्तपत्रांची कमतरता अन दुसरे म्हणजे तो संपूर्ण पेपर एकट्याने लिहून काढलेल्या पत्रकार शरद पाटील यांची निडर भाषा यामुळ...

रेल्वे कर्मचाऱ्यानेच प्रमाणपत्र तपासावे

Image
कोविड लसीचे दोन डोस घेतलेल्या नागरिकांना रेल्वेचा लोकल प्रवास खुला करण्यात आलेला आहे. त्यासाठी आवश्यक कागदपत्रे तपासण्यासाठी रेल्वेने कर्मचारी नियुक्त न करता महानगरपालिकांच्या कर्मचाऱ्यांवर हा भार टाकलेला आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी पालिका कर्मचारी, शिक्षक हे प्रवाशांची कागदपत्रे तपासताना दिसत आहेत. वास्तविक कोविड मध्ये काम करणाऱ्या फक्त अत्यावश्यक सेवेतील कर्मचार्यांसाठी जेव्हा लोकल सुरू होती त्यावेळी त्यांचे ओळखपत्र तिकीट खिडकीवरील कर्मचाऱ्यांकडून तपासले जात होते. मात्र आता कोविड लसीचे दोन डोस घेतलेली प्रमाणपत्रे तपासण्यासाठी अतिरिक्त मनुष्यबळ तैनात करण्यामागील उद्देश अनाकलनीय आहे. जे काम तिकीट देणारा रेल्वे कर्मचारी करू शकतो त्यासाठी महानगरपालिकांतील शिक्षक व आरोग्य कर्मचाऱ्यांना दिवस भर रेल्वे स्थानकांमध्ये बसवून हे अधिकचे व अनावश्यक काम देण्यात काय अर्थ आहे?  वैभव मोहन पाटील  घणसोली, नवी मुंबई 

'प्रधानमंत्री मातृ वंदना योजना'

Image
१ ते ७ सप्‍टेंबर २०२१या कालावधीत विशेष सप्‍ताहाचे आयोजन  योजनेंतर्गत रु. १००० कोटींपेक्षा अधिक रक्‍कमेचे लाभार्थ्‍यांना वितरण माता व बालकांचे निरोगी व सुदृढ आयुष्य आज  प्रत्येक कुटुंबाच्या दृष्टीने प्राधान्‍याचा विषय आहे. आज कोरोना संक्रमणकाळात तर कौटुंबिक आरोग्‍य अबाधित राखणे आपल्‍या सर्वांसाठी अत्‍यंत आवश्‍यक झाले आहे. त्‍यात गरोदर मातांना कोरोना व गर्भार अवस्‍था अशा दुहेरी आव्‍हानांचा सामना करावा लागत आहे. माता व बालकांच्‍या निरोगी आयुष्‍यासाठी शासनाकडून आरोग्‍यविषयक अनेक योजना राबिवण्‍यात येत आहेत ज्‍यामध्‍ये जननी शिशु सुरक्षा कार्यक्रम, राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम, मिशन इंद्रधनुष्य, नियमित लसिकरण, पल्स पोलिओ मोहिमा, जननी सुरक्षा योजना, नवजात शिशु उपचार, माहेर घर योजना यासारख्‍या आरोग्य कार्यक्रमांचा समावेश होतो. माता बाल आरोग्य विषयक कार्यक्रमांमुळे राज्यातील माता मृत्यू व बालमृत्यूचे प्रमाणदेखील गेल्या काही वर्षांपासुन आटोक्यात आलेले आहे. गर्भवती महिलेचे आरोग्‍य, आहार या बाबी सुदृढ बालकासाठी खूप गरजेच्‍या आहेत. यासाठी गर्भवती महिला व स्तनदा मातेला सकस आ...

प्रधानमंत्री मातृ वंदना योजना

१ ते ७ सप्‍टेंबर २०२१या कालावधीत विशेष सप्‍ताहाचे आयोजन  योजनेंतर्गत रु. १००० कोटींपेक्षा अधिक रक्‍कमेचे लाभार्थ्‍यांना वितरण माता व बालकांचे निरोगी व सुदृढ आयुष्य आज  प्रत्येक कुटुंबाच्या दृष्टीने प्राधान्‍याचा विषय आहे. आज कोरोना संक्रमणकाळात तर कौटुंबिक आरोग्‍य अबाधित राखणे आपल्‍या सर्वांसाठी अत्‍यंत आवश्‍यक झाले आहे. त्‍यात गरोदर मातांना कोरोना व गर्भार अवस्‍था अशा दुहेरी आव्‍हानांचा सामना करावा लागत आहे. माता व बालकांच्‍या निरोगी आयुष्‍यासाठी शासनाकडून आरोग्‍यविषयक अनेक योजना राबिवण्‍यात येत आहेत ज्‍यामध्‍ये जननी शिशु सुरक्षा कार्यक्रम, राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम, मिशन इंद्रधनुष्य, नियमित लसिकरण, पल्स पोलिओ मोहिमा, जननी सुरक्षा योजना, नवजात शिशु उपचार, माहेर घर योजना यासारख्‍या आरोग्य कार्यक्रमांचा समावेश होतो. माता बाल आरोग्य विषयक कार्यक्रमांमुळे राज्यातील माता मृत्यू व बालमृत्यूचे प्रमाणदेखील गेल्या काही वर्षांपासुन आटोक्यात आलेले आहे. गर्भवती महिलेचे आरोग्‍य, आहार या बाबी सुदृढ बालकासाठी खूप गरजेच्‍या आहेत. यासाठी गर्भवती महिला व स्तनदा मातेला सकस आहार मिळणे अत...