Posts

Showing posts from July, 2019

सामाजिक कार्यकर्ते गणेश हिरवे यांची संत नामदेव समाजोन्नत्ती परिषद महाराष्ट्र राज्य कार्यकारिणी सदस्य म्हणून नियुक्ती...

Image
सामाजिक कार्यकर्ते गणेश हिरवे यांची संत नामदेव समाजोन्नत्ती परिषद महाराष्ट्र राज्य कार्यकारिणी सदस्य म्हणून नियुक्ती... जोगेश्वरी पूर्व येथील आदर्श शिक्षक  पुरस्कारप्राप्त सामाजिक कार्यकर्ते हिरवे सर यांची नुकतीच परिषदेचे राष्ट्रिय अध्यक्ष मा ऍड सुधीर पिसे यांनी नुकतीच परिषदेच्या महाराष्ट्रा राज्य कार्यकारिणी सदस्य  म्हणून नियुक्ती करण्यात आल्याबद्दल त्यांचे खूप खुप अभिनंदन. हिरवे सर व माझा परिचय गेल्या चार पाच वर्षांचाच. एका कार्यक्रमाच्या निमित्ताने आम्ही एकत्र आलो व विचारांची जुळणी झाल्याने संपर्क वाढला आणि नंतर त्यांच्या अनेक सामाजिक उपक्रमांचा मीदेखील एक भाग झालो. खरेतर आपल्यासारख्या कुटुंबवत्सल लोकांना कुटुंब,नोकरी वा व्यवसाय या जबाबदाऱ्यातुन वेळ काढणे म्हणजे एक दिव्यच. त्यातून वेळ मिळालाच तर आपण एखादा आवडीचा छंद जोपासतो. माझेच उदाहरण घेतले तर कौटुंबिक व्याप व नोकरीतील व्यस्तता यातून दररोजच्या लिखाणासाठी वेळ देणे फारच जिकरीचे होत होते. त्यातुनच लोकलप्रवासात लिखाण करण्याचा मध्यम मार्ग मी निवडला. (हा लेखदेखील लोकलप्रवासातच लिहिला आहे बरं). असो, तर दैनंदिन व्यापा...

प्रशांत भगत आयटी सल्लागार यांची कार्यालयातून एक्झिट

Image
प्रशांत भगत, आयटी सल्लागार, ह्या आणखी एका कर्मचाऱ्याने आज अभियान कार्यालयातून एक्झिट घेतली. सन २०११ पासून कार्यालयातील आयटी सल्लागार या महत्वाच्या पदाची जबाबदारी सांभाळणाऱ्या प्रशांत यांनी त्यांच्यावर सोपवलेल्या जबाबदाऱ्या कसोशीने पार पाडण्याचा प्रयत्न केला. कार्यालयातील ऐतिहासिक ई ऑफिस संकल्पनेचा महत्वपूर्ण साक्षीदार म्हणून त्यांची कायम ओळख राहील. आरोग्य विभागात पेपरलेस कामकाज सुरू करण्यात त्यांनी महत्वाची भूमिका पार पाडली. त्यांनतर विभागात विकसित करण्यात आलेली विविध एप्लिकेशन्स, ई टेंडरिंग, व्हिडिओ कॉन्फरन्स, वेबसाईट यासारख्या बाबी रुजवण्यात त्यांचा मोलाचा हातभार लागला. एखाद्या राज्यस्तरीय कार्यक्रमात तांत्रिक सहाय्य असो की अधिकाऱ्यांना आयटी सपोर्ट असो सर्वच आघाड्यांवर त्यांनी मन लावून काम केले. अलीकडच्या काळात मानवी अवयव प्रत्यारोपण प्रक्रियेसाठी विभागामार्फत करारबद्ध करण्यात आलेले "महाआयुदान" हे एप्लिकेशन्स त्यांच्या कारकिर्दीतील विभागाची महत्वाची उपलब्धी मानले जाते. मनमिळावू व सहकार्याचा स्वभाव आणि तांत्रिक कौशल्य यामुळे त्यांचे स्थान नेहमीच उजवे राहिले. कल्याण...

माध्यमांनी पुढाकार घ्यावा

Image
फेसबुकचा तंबाखू, सिगारेट, मद्य यासारख्या व्यसनी पदार्थांशी संबंधित मजकुरावर बंदी घालण्याचा निर्णय योग्यच आहे. आज बहुतांशी तरुणाई सोशल मीडियावर प्रमाणापेक्षा अधिक सक्रिय असून त्यावर टाकल्या जाणाऱ्या संदेशांच्या व जाहिरातींच्या आहारी गेली आहे. काल्पनिकतेचे भडक दर्शन व पाश्चात्य संस्कृतीला फॉलो करणाऱ्या आजच्या पिढीवर कुठेतरी बंधने आणण्याची गरज निर्माण झाली आहे. यासाठी व्यसन वाढण्यास कारणीभूत ठरणाऱ्या माध्यमांवर नियंत्रण आणावेच लागेल. यासाठी फेसबुक उचलत असलेले पाऊल स्वागतार्हच आहे. तशाच प्रकारचा निर्णय इतर सोशल एप्लिकेशन्सनी तसेच दूरचित्रवाणी वाहिन्यांनी घेऊन भावी पिढी संस्कारक्षम बनवण्यासाठी पुढाकार घ्यावा असे मत आहे.  वैभव मोहन पाटील  घणसोली, नवी मुंबई

राष्ट्रीय व्हायरल हिपेटायटिस कार्यक्रमाचा राज्यस्तरीय शुभारंभ

Image
मुंबईच्या सायन रुग्णालयात पार पडला कार्यक्रम कर्करोग, एचआयव्ही, टीबी यासारखे आजार अत्यंत गँभिर स्वरूपाचे मानले जातात. या आजाराची लागण झालेल्या रुग्णास विशेष उपचारांची गरज भासते. याच आजारांमध्ये काहीसा दुर्लक्षित मात्र सायलेंट किलर असा आणखी एक आजार आहे आणि तो म्हणजे हिपेटायटीस. भारतात सुमारे चार कोटी हिपेटायटिस बी तर जवळपास ६० लाख ते १.२ कोटी हिपेटायटिस सी चे रुग्ण असल्याचा अंदाज आहे. या रुग्णांना यकृत संबंधित आजार व कर्करोग होण्याचा मोठा धोका आहे. जगभरात दरवर्षी सुमारे साडेतेरा लाख लोक सर्व प्रकारच्या विषाणूजन्य काविळीमुळे म्हणजेच व्हायरल हिपाटायटिसने मृत्युमुखी पडतात. विषाणूजन्य काविळीमुळे होणाऱया मृत्यूचे हे प्रमाण जवळपास टीबीएवढे आहे, तर ते एड्सपेक्षाही जास्त आहे. कावीळ हा मुख्यत्वे यकृताचा आजार आहे. यकृतामध्ये बिघाड झाला की, लघवी पिवळी होणे, डोळे पिवळे होणे अशी लक्षणे दिसू लागतात म्हणजेच त्याला कावीळ झाली असे म्हटले जाते. मुख्यत्वे लिव्हरला होणाऱ्या विषाणू संसर्गामुळे कावीळ होते. लिव्हरला संसर्ग करणारे पाच प्रकारचे विषाणू म्हणजे हिपेटायटिस ए, बी, सी, डी आणि ई. दूषि...

घणसोली रेल्वे स्थानकासमोर रहदारीची समस्या

Image
घणसोली रेल्वे स्टेशन परिसरात रहदारीची समस्या दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. बेशिस्त रिक्षावाले आणि हतबल प्रवाशी यांचा संगम म्हणजे घणसोली रेल्वे स्टेशन समोरील चौक. रिक्षाचालकांच्या अरेरावीमुळे या ठिकाणी बस व खाजगी वाहने चालवणे किती अवघड झाले आहे हे एकदा संध्याकाळच्या वेळी येथे येऊन पाहायला हवे. सिडकोने येथील दुचाकींचे पार्किंग दर्ग्याजवळ हलवले पण तरीदेखील रिक्षाचालकांना शिस्त लागत नाही हा प्रकार दुर्दैवी आहे. मनाप्रमाणे रिक्षा उभ्या करणे, वाटेल तसे प्रवाशी भरणे, आडव्या तिडव्या प्रकारे त्या चालवणे यामुळे घणसोलीकराना अक्षरशः जीव मुठीत घेऊन येथून प्रवास करावा लागतो. स्टेशनसमोरील दोन वाईन शॉप असलेल्या इमारतीच्या आजूबाजूला नेहमीच वाहनांची वर्दळ व रस्त्यावर दुचाकीस्वार आपल्या गाड्या पार्क करत असल्यामुळे येथील ट्रॅफिकची समस्या अधिकच बिकट झाली आहे. स्टेशनपासून हावरे चौकापर्यंत एखादा स्काय वॉक तयार झाला तर ते स्थानिक नागरिकांसाठी एक वरदानच ठरेल. असाच एक फूटओव्हर ब्रिज तिकीटघरासमोर नव्याने तयार करण्यात आलेल्या रस्त्यावरून सेंट्रल पार्क समोरील जागेत जाण्यासाठी तयार झाला तर तर सेक्टर 1 ते 4च...

चंद्राची गुपिते उलगडणार

Image
अवघ्या जगाचे लक्ष लागून राहिलेल्या चांद्रयान 2 चे यशस्वी उड्डाण अवकाश संशोधन क्षेत्रात भारताचे आंतराष्ट्रीय यश मानले जाते. त्याबद्दल समस्त भारतवासीयांची छाती अभिमानाने भरून आली आहे. सोमवारी हे चांद्रयान अवकाशात झेपावल्यांतर शास्त्रज्ञ व देशवासियांनी मोठा जल्लोष केला. एका आठवड्याच्या विलंबानंतर उड्डाण केलेल्या या चांद्रयानाच्या मोहिमेदरम्यान अनेक आव्हानांना सामोरे जावे लागणार आहे. येत्या सात सप्टेंबरच्या दरम्यान हे अवकाशयान चंद्राच्या पृष्ठभागावर उतरणार आहे. चंद्र व पृथ्वी या दोघांचा अत्यंत घनिष्ठ संबंध असून सुर्याप्रमाणेच चंद्रांच्या विविध कलांचा पृथ्वीवर मोठा परिणाम वेळोवेळी दिसून येतो. या मोहिमेत चंद्रावर असलेल्या पाण्याची पातळी, चंद्रावरील जमीन, रसायनं आणि चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर जमिनीखाली कोणती खनिजं दडली आहेत, तिथे पाण्याचा अंश आहे का, अशा अनेक गोष्टींचा अभ्यास केला जाणार असल्यामुळे ही मोहीम भारताच्या अवकाश संशोधन क्षेत्रातील क्रांतीकारक पाऊल आहे असे म्हटल्यास ती अतिशोयक्ती ठरणार नाही.  वैभव मोहन पाटील  घणसोली, नवी मुंबई

मुंबईत क्लस्टर?

Image
मुंबईतील धोकादायक इमारतींसाठी क्लस्टर पद्धतीने पुनर्विकास कायदा करणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले आहे. वस्तुतः मुंबईतील धोकादायक इमारतींची मोठी संख्या व त्या कोसळण्याच्या सातत्याने घडत असलेल्या घटना पाहता जुन्या, जीर्ण इमारतींचा पुनर्विकास होणे गरजेचे झाले आहे. क्लस्टर डेव्हलपमेंटद्वारे यापूर्वी नवी मुंबई, ठाणेसारख्या शहरात जुन्या इमारतींचा विकास करण्याचे धोरण यापूर्वी अंमलात आणण्याचा विचार झालेला आहे. मुंबई शहरात दाटीवाटीने उभ्या राहिलेल्या इमारती व अनधिकृत इमारतींचा त्यात पडलेला भरणा यामुळे पुनर्विकासासाठी इमारती निश्चित करणे जिकिरीचे ठरणार आहे. नवा विकासक शोधणे व सर्व परवानग्या मिळवणे ही प्रक्रियादेखील वेळखाऊ असल्यामुळे तोपर्यंत रहिवाशांना इतर सोयीस्कर ठिकाणी हलवणेदेखील महत्वाचे आहे. त्यामुळे मुंबईत क्लस्टरचा निर्णय जरी घेण्यात आला तरी तो प्रत्यक्षात अंमलात आणणे म्हणावे तितके सोपे नाही.  वैभव मोहन पाटील  घणसोली, नवी मुंबई 

आपला दवाखाना

Image
राज्यातील गरीब, गरजू व दुर्बल घटकांपर्यंत मोफत व परिणामकारक आरोग्य सेवा पोहोचावी यासाठी राज्याच्या आरोग्य विभागाच्या वतीने सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येत आहेत. ग्रामीण व शहरी भागातील नागरिकांना सर्व प्रकारच्या आरोग्‍य सुविधा जवळच्या शासकीय आरोग्य केंद्रात उपलब्ध व्हाव्यात यासाठी देशभरासह महाराष्ट्रातदेखील 'आरोग्यवर्धिनी केंद्र' ही योजना राबविण्यात येत असून राज्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रे, उपकेंद्रे व शहरी भागातील नागरी आरोग्य केंद्रांचा या योजनेच्या माध्यमातून कायापालट करण्यात येत आहे. या योजनेंतर्गत राज्यभरातील हजारो सरकारी आरोग्य केंद्रांमध्ये महत्वपूर्ण व गरजेच्या अशा 14 प्रकारच्या आरोग्य सेवा नागरिकांना मोफत उपलब्ध करून देण्यात येत असून याद्वारे रुग्णांना आपल्या जवळपासच्या शासकीय दवाखान्यातच सर्व प्रकाराचे उपचार मिळू लागले आहेत. याचाच पुढचा टप्पा म्हणून आता 'आदरणीय बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना' या शासनाच्या महत्वाकांक्षी योजनेची आखणी व नियोजनदेखील पूर्ण झाले आहे. आपला दवाखाना हा उपक्रम म्हणजे सरकारचे आरोग्य क्षेत्रातील महत्वपूर्ण पाऊल असून त्यायोगे सार्वजनिक आर...

नागरिकांचीही जबाबदारी

Image
अनधिकृत बांधकामे व धोकादायक इमारतींवर नियंत्रण ठेवणारी मोठी यंत्रणा पालिका प्रशासनाकडे असतानादेखील अशा बांधकामांचे शहरांमध्ये पेव फुटले आहे. निकृष्ट दर्जाचे बांधकाम साहित्य सर्रास वापरले जात असल्याने बांधकामांचा टिकाऊपणा हा केवळ दिखाऊपणा झालेला आहे. यामुळेच दरवर्षी इमारती कोसळण्याच्या घटना सर्वत्र घडत आहेत व त्यात निष्पाप नागरिकांचे नाहक बळी जात आहेत. मालाडमधील दीड वर्षांपूर्वी बांधलेली भिंत कोसळून तब्बल दोन डझनच्या वर बळी जाण्याची घडलेली घटना चीड आणणारी आहे. पुण्यातदेखील नुकतीच अशीच घटना घडून अनेकांचे जीव गेले.  याला जितके जबाबदार पालिका अधिकारी व लोकप्रतिनिधी आहेत तितकीच जबाबदारी नागरिकांचीदेखील आहे. धोकादायक बांधकामांची माहिती तात्काळ प्रशासनाला देऊन त्यावर त्वरित उपाययोजना करण्याची काळजी नागरिकांनी घेतली तर सातत्याने घडणाऱ्या अशा घटना रोखता येऊ शकतील.  वैभव मोहन पाटील  घणसोली, नवी मुंबई

राज्यात रोटा व्हायरस लसीकरणाचा शुभारंभ

Image
कसारा, जिल्हा ठाणे येथे पार पडला राज्यस्तरीय कार्यक्रम माता व बालकांचे आरोग्य अबाधित राहावे यासाठी केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून सातत्याने विविध योजनांद्वारे प्रयत्न करण्यात येत आहेत. मोठ्या प्रमाणात होणाऱ्या जुलाबामुळे 'डिहायड्रेशन' होऊन बालके दगावण्याचे प्रमाण सध्या वाढत असून, या घटना रोखण्यासाठी केंद्र सरकारने दीड ते साडेतीन महिन्यांच्या बालकांना 'रोटा व्हायरस' लस देण्याचा निर्णय़ घेतला आहे. राज्यातील सर्व सरकारी दवाखान्यांसह रुग्णालयांमध्ये या वयोगटातील नियमित लसीकरणात ही लस देण्यात येणार आहे. खासगी दवाखान्यांमध्ये ही लस पूर्वी दिली जात होती. आता प्रथमच सरकारी रुग्णालयात देण्यात येणार असल्याने पालकांचा आर्थिक भार हलका होणार आहे. अतिसारामुळे होणाऱ्या बालकांमधील मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी रोटा व्हायरस प्रतिबंधक लसीकरणाचा राज्यस्तरीय शुभारंभ सोहळा शनिवार दिनांक २० जुलै २०१९ रोजी संपन्न झाला. त्यासाठी कसारा या आदिवासी भागाची निवड या राज्यस्तरीय लसीकरणासाठी करण्यात आली. या लसीकरणांतर्गत राज्यातील एक वर्षापर्यंतच्या सुमारे २० लाख बालकांना दरवर्षी ...

पावसाळ्यात दूषित पाणी टाळा

Image
आला पावसाळा, आरोग्‍य सांभाळा  असहय करणा-या उन्‍हाळयानंतर आता सुखद गारवा देणा-या पावसाळयास सुरुवात झाली आहे. पावसाळयाचे दिवस हे आपल्‍या सर्वांच्‍याच दृष्‍टीने तसे आनंदाचे असतात. मुंबईसारख्‍या शहरी भागातील लोकांना हे दिवस थंड वातावरणामुळे तर ग्रामीण भागात शेतीवर उपजिविका असल्‍यामुळे प्रिय असतात. मात्र दरवर्षी येणारा पावसाळा विविध साथीच्या आजारांनादेखील आमंत्रण देत असतो हेदेखील आपल्‍याला विसरुन चालणार नाही. त्यामुळे पावसाळ्याच्या पार्श्‍वभूमीवर प्रत्येकाने आपल्या आरोग्याची काळजी घेतली पाहिजे. या दिवसामध्ये योग्य आहार आणि साथीचे आजार टाळण्यासाठी आवश्‍यक उपाययोजना केल्‍या तर हया आजारांपासुन आपल्‍याला संरक्षण करता येते व पावसाळा ख-या अर्थाने आपल्‍याला सुखद जाणवेल. यासाठी डॉक्‍टरांचा सल्ला अत्‍यंत आवश्‍यक आहे. या दिवसात बाहेरील पदार्थ खाणे टाळावे. तसेच दूषित पाणी पिण्यासाठी वापरले जाणार नाही याची दक्षता घ्यावी. लहान मुलांकडेही लक्ष दिले पाहिजे. त्यांना किरकोळ वाटणार्‍या आजारांसंदर्भात तत्काळ डॉक्टरांकडून तपासणी करून घ्यावी. पावसाळ्यामध्ये वातावरणात बदल झाल्यामुळेही अनेक आजार उदभव...

पाणी व्यवस्थापनाकडे दुर्लक्ष

Image
मुंबईत रस्ते असो वा रेल्वे मार्ग पावसाळ्यात दरवर्षी सर्वत्र पाणी भरते व वाहतूक खोळंबते. मागील आठवड्यात पडलेल्या मुसळधार पावसात पुन्हा एकदा हा अनुभव आला. पालिका व रेल्वे प्रशासनाची मुसळधार पावसाला सामोरे जायची तयारीच नसल्याने मुंबईची वाहतूक कमालीची मंदावली व त्याचा फटका पुन्हा एकदा चाकरमान्यांना बसला. उशिरा दाखल झालेल्या पावसानंतरदेखील पावसाळापूर्व कामे अर्धवट अवस्थेत असतील तर ते मुंबईकरांचे दुर्दैवच म्हणावे लागेल. पावसाच्या पाण्याचा निचरा करण्यासाठी योग्य व्यवस्थापन आखणे गरजेचे असते मात्र त्याकडे दरवर्षी दुर्लक्ष केले जाते व पाणी थेट रस्त्यावर व रेल्वे ट्रॅक वर येते. मुंबईसारख्या हायटेक शहरात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून पावसाळ्यात योग्य उपाययोजना आखायला हव्यात. मात्र प्रशासनाच्या उदासीन धोरणांमुळे मुंबईकरांची अवस्था रोज रडे त्याला कोण मरे अशी झाली आहे.  वैभव मोहन पाटील  घणसोली, नवी मुंबई 

कारवाई व्हावी

Image
देशात होणारे बहुतांश रस्ते अपघात हे खराब व निकृष्ट रस्त्यांमुळे होत असतात. रस्त्यांची बांधणी करताना साहित्याच्या दर्जामध्ये केलेली कमालीची तडजोड वाहनचालकांच्या जीवावर उठते व त्यात नाहक बळी जातात. भरमसाठ संख्येने वाढलेली वाहने हेदेखील कारण याला देता येईल. या पार्श्वभूमीवर रस्ते बांधणी व देखभालीमध्ये कामचुकारपणा करणाऱ्यांवर दंडाची तरतूद करणारे केंद्र सरकारचे विधेयक नक्कीच स्वागतार्ह आहे. वास्तविकता, कंत्राटदारासोबत करण्यात येणाऱ्या करारामध्येच देखभाल व दंडाची तरतूद असायला हवी. नव्याने तयार केलेल्या रस्त्याची देखभाल किमान पाच वर्षे तरी संबंधित ठेकेदाराने करणे आवश्यक आहे. मात्र अधिकारी, ठेकेदारांच्या संगनमतामुळे तसे होताना दिसत नाही. त्यामुळे केंद्र सरकारने कितीही कठोर विधेयक संमत केले तरी त्याची काटेकोर अंमलबजावणी होणे तितकेच महत्वाचे असून यासाठी प्रशासकीय मानसिकता बदलण्याची खरी गरज आहे. वैभव मोहन पाटील  घणसोली, नवी मुंबई

डॉक्टर व पेशंटमध्ये सुसंवाद आवश्यक

Image
डॉक्टर ह्या नावाबद्दल समाजात प्रचंड आदर असतो. डॉक्टर हा आजारातून बरे करणारा, जीव वाचवणारा व रुग्णाची काळजी घेणारा असल्यामुळे कुटुंबासाठी तो एक प्रकारचा वरदानच ठरतो. निरनिराळे आजार व त्यावरील आधुनिक संशोधन यामुळे वैद्यकीय क्षेत्र फार झपाट्याने बदलू लागले आहे. मात्र या बदलांबरोबरच आजारपण किंवा डॉक्टरी इलाजातील खर्चातदेखील मोठी वाढ झाल्याचे दिसून येत आहे. यामुळेच आजच्या बदलत्या काळात डॉक्टर व पेशंट यांच्यातील दरी दिवसेंदिवस रुंदावत आहे. सुसंवादाचा आभाव तसेच विविध कारणांतून निर्माण झालेले गैरसमज हे त्यामागील एक प्रमुख कारण आहे. जीवनदान देणारा डॉक्टर कोणत्याही रुग्णाला देवापेक्षा अधिक जवळचा असतोच. मात्र महागड्या वैद्यकीय सेवांमुळे पेशंट व त्यांचे नातेवाइक अस्वस्थ आहेत. आजारातून कायमस्वरुपी मुक्त तर व्हायचे आहे; पण त्यासाठी पैसे कसे उभे करायचे, हा प्रश्न त्यांच्यासमोर आहे. वैद्यकीय जगतातील बदलत्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या महागड्या सुविधा आपल्यावर विश्वास ठेवणाऱ्या पेशंटपर्यंत पोचविण्याची धडपड डॉक्टर मंडळींकडून केली जाते. यासाठी पेशंटचे समुपदेशन करण्यापासून शक्य तितकी मदत करण्याच...

मोकाट कुत्र्यांची समस्या उग्र

Image
मोकाट कुत्र्यांची समस्या आज सर्वच प्रमुख शहरांना भेडसावत आहे. भटक्या कुत्र्यंच्या जाचाच्या बातम्या रोज वर्तमानपत्रांत छापून येत आहेत. सर्वच शहरांमधील लोक या कुञयांपासून त्रस्त आहेत मात्र महानगरपालिका मात्र या कुत्र्यांवर वचक मिळविण्यात संपूर्ण अपयशी ठरत आहेत असेच सध्या दिसून येत आहे. नवी मुंबईमध्ये भटक्‍या कुत्र्यांनी अक्षरश उच्‍छाद मांडलेला आहे. दररोज अनेकांना ही भटकी कुत्री चावा घेत असल्‍याचे निदर्शनास येत आहे. मंगळवारी घणसोली येथील सेक्टर १ मध्ये राहणारी वैशाली पाटील ही महिला आपल्या मुलीला सिडको घरोनदा येथील शाळेत सोडण्यासाठी गेली असता रस्त्यावर फिरणाऱ्या मोकाट कुत्र्यांपैकी एका पिसाळलेल्या कुत्र्याने तिला चावा घेतला व त्यात ही महिला गँभिर जखमी झाली. तिला घणसोली प्रभागातील पालिकेच्या नागरी आरोग्य केंद्रात दाखल करून इंजेक्शन व इतर उपचार करण्यात आले आहेत. घणसोलीत मोठ्या संख्येने असलेली ही कुत्री सातत्याने कुणालातरी आपले लक्ष  बनवत असल्याचे येथील रहिवाशी सांगतात. मात्र पालिकेमार्फत या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी कुठलीही ठोस उपाययोजना करण्यात येत नसल्यामुळे नागरिकांमध्ये ...

सुसह्य प्रवास हवा

Image
मुंबई उपनगरीय रेल्वे सेवा आज अत्यंत दयनीय व असुरक्षित अवस्थेत आहे. रोजचे अपघात व मृत्यूचे दार बनलेल्या लोकलमधून मुंबईकरांना अक्षरशः जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतो. गेली अनेक वर्षे सुरू असलेली ही परिस्थिती सुधारण्यासाठी रेल्वे प्रशासन कोणतेही प्रयत्न करताना दिसत नाही ही एक शोकांतिकाच म्हणावी लागेल. मुंबईतील वाढलेली गर्दी व त्याचा स्वस्त, जलद वाहतुकीसाठी रेल्वेवर पडणारा जीवघेणा ताण लक्षात घेता उपनगरीय लोकल सेवेला पर्यायी मार्ग काढणे अपरिहार्य झाले आहे. बुलेट ट्रेन, सरकते जिने, वाय फाय अशा सुविधा देण्यापेक्षा मुंबईकरांना आज सुसह्य लोकल वाहतुकीची जास्त गरज आहे.  वैभव मोहन पाटील  घणसोली, नवी मुंबई