आषाढी एकादशीनिमित्त वृक्ष पूजन आणि वृक्षारोपण
श्री गजानन महाराज भक्तमंडळ आणि युथ कौंसिलचा आषाढीनिमित्त वृक्षपूजन व वृक्षारोपण शुभारंभ सोहळा उत्साहात संपन्न श्री गजानन महाराज भक्त मंडळ वाशी आणि युथ कौंसिल नेरुळ यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षीप्रमाणे आषाढी एकादशीच्या निमित्ताने रविवार दिनांक ६ जुलै २०२५ रोजी सकाळी १० वाजता वृक्ष पूजन आणि वृक्षारोपण शुभारंभ सोहळा नेरुळ येथील सावली रोपवाटिकेत मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी संस्थेचे सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी मा नगरसेविका सौ मीरा पाटील, नवे शहरचे उपसंपादक राजेंद्र घरत, जे ना संघ ग्रंथालयाचे अध्यक्ष प्रभाकर गुमास्ते, पंडित जितेंद्र कुलकर्णी गुरुजी, नवी मुंबई महानगरपालिका घणसोली शाळेचे मुख्याध्यापक अशोकराव सोनावणे आणि लेखक, सामाजिक कार्यकर्ते वैभव मोहन पाटील आदी मान्यवर प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. यावेळी पंडित जितेंद्र गुरुजींनी मंत्रोपचार आणि वृक्ष महत्व समजाऊन सांगत विधिवत वृक्ष पूजन केले. यानंतर युथ कौंसिलचे मुख्य सचिव सुभाष हांडे देशमुख यांनी संस्थेच्या कार्याचा मागोवा घेत आजवरची वाटचाल उपस्थितांसमोर मांडली. १ जून १९८८ रोजी स्थापन झाल...