Posts

Showing posts from March, 2020

राज्यात करोना निदान करणा-या एकूण २३ प्रयोगशाळा कार्यरत, राज्यातील एकूण रुग्ण संख्या ३०२

Image
एकात्मिक रोग सर्वेक्षण कार्यक्रम, महाराष्ट्र सार्वजनिक आरोग्य विभाग नवीन करोना विषाणू (कोविड -१९)  - सद्यःस्थिती आणि उपाय योजना  दिनांक ३१ मार्च  २०२० प्रेस नोट राज्यात करोना निदान करणा-या एकूण २३ प्रयोगशाळा कार्यरत राज्यातील एकूण रुग्ण संख्या ३०२ करोना निदानासाठी देशभरातील प्रयोगशाळाचे जाळे विस्तार करण्यात आला असून आय सी एम आरच्या अनुमतीने सध्या राज्यात १० शासकीय आणि १३ खाजगी अशा एकूण २३ प्रयोगशाळा करोना निदानासाठी सिध्द झाल्या आहेत. यातील खाजगी प्रयोगशाळांकडील अहवालांचे मूल्यमापन करुन त्यानंतर त्यांचे अहवाल अंतिम करण्यात येत आहेत. आज राज्यात एकूण ८२ नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. यामध्ये मुंबईतील मागील चार दिवसांमधील अहवालांचा समावेश आहे. त्यामुळे राज्यातील एकूण करोना बाधित रुग्णांची संख्या ३०२ झाली आहे. या नवीन रुग्णांमध्ये ५९ रुग्ण मुंबईचे आहेत, १३ रुग्ण मुंबई परिसरातील शहरी भागातील आहेत तर ५ रुग्ण पुण्याचे, ३ नगरचे आणि २ बुलढाणा येथील आहेत.    राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे -  अ.क्र....

डॉ राजू जोटकर व श्री सुनील कुलकर्णी यांची सेवानिवृत्ती

Image
कोरोना विषाणूच्‍या प्रादुर्भावाने आज संपूर्ण जनजिवन विचलित झालेले असताना आरोग्‍य विभागातील आणखी दोन सहकारी आज ३१ मार्च रोजी शाासकीय सेवेतुन सेवानिवृत्‍त झाले. त्‍यातले एक म्‍हणजे आरोग्‍य सेवा आयुक्‍तालयात गेल्‍या ३७ वर्षांपासुन आरोग्‍य संचालक कार्यालयात लघुलेखक या पदावर काम करणारे श्री. सुनिल कुलकर्णी. दिनांक १३ जुन १९८३ रोजी आपल्‍या शासकीय सेवेला आरोग्‍य सेवा संचालनालयातुन सुरुवात केलेल्‍या कुलकर्णी यांनी आज वयाच्‍या ५८व्‍या वर्षी आपली शासकीय सेवा यशस्‍वीपणे व मोठया दिमाखात पूर्ण केली. अत्‍यंत प्रामाणिक, हजरजबाबी, अभ्‍यासू व आरोग्‍यातील विविध विषयांंचा अगदी सखोल अभ्‍यास असणा-या कुलकर्णी यांच्‍या कार्यशैलीवर आरोग्‍य सेवेतील सर्वच अधिकारी आज समाधानी आहेत. आपल्‍यासोबत काम करणा-या इतर सहकारी वर्गाशीदेखील त्‍यांचे सौर्हादाचे व सहकार्याचे संबंध असल्‍यामुळे कधी कुणाशी त्‍यांचे बिनसल्‍याचे ऐकिवात नाही. कार्यालयीन कामकाजाव्‍यतिरीक्‍त इतर अनेक सामाजिक विषयांवर गप्‍पा मारताना त्‍यांच्‍या भौतिक ज्ञानाची अनुभुती मला अनेकदा आलेली आहे. सुटटीचे दिवस वगळता जवळपास दररोज सुनिल यांच...

खाजगी डॉक्टरांनी लोकांची गैरसोय टाळावी

Image
कोरोनामुळे शहरी भागांत गल्लीबोळात व ग्रामीण भागात गाव-नाक्यांवर असणारे खाजगी डॉक्टर्स भयभीत झाले आहेत. अशा बहुतांश डॉक्टर्सनी संसर्ग टाळण्यासाठी आपापले दवाखाने बंद केले आहेत. मात्र याचा मोठा फटका नागरिकांना बसत आहे. किरकोळ उपचारांसाठी या दवाखान्यांचा मोठा आधार लोकांना असतो. घराजवळ त्वरित औषधोपचार मिळत असल्याने सकाळ सायंकाळ या खाजगी दवाखान्यांमध्ये रुग्णांची मोठी गर्दी असते. करोनाच्या दहशतीमुळे हे दवाखाने बंद झाल्याने लोकांची मोठी गैरसोय होत आहे. सध्या सर्वत्र संचारबंदी असल्याने लोकांना आजारपणात फार दूरचा दवाखाना वा रुग्णालय गाठणे शक्य होत नाही. त्यामुळे स्थानिक खाजगी वैद्यकीय व्यावसायिकांनी आपापले दवाखाने सुरू ठेवून किरकोळ आजारपणात लोकांना सेवा द्यायला हवी. सरकारी दवाखाने रुग्णांच्या गर्दीने सदैव हाऊसफुल्ल असल्याचे दिसून येते. त्यातच खाजगी दवाखाने बंद झाल्याने या गर्दीत भरच पडत आहे. त्यामुळे खाजगी डॉकटरांनी आपल्यातली माणुसकी जागी ठेवत अशा कठीण प्रसंगी लोकांना आरोग्य सेवा पुरवणे आवश्यक आहे. जेणेकरून सरकारी रुग्णालयांवरील भार हलका होईल. महानगरपालिका व स्थानिक प्रशासनानेदेखील हे खाजगी...

जागतिक जल दिन

Image
जागतिक जलदिन   दरवर्षी 22 मार्च रोजी जागतिक जल दिवस म्‍हणून साजरा केला जातो. पाण्याचा नियंत्रित व गरजेपुरता वापर करून पाणीबचतीचा संदेश या दिनाच्या निमित्ताने देण्याचा उद्देश आहे. सन 1992 साली 'रियो डी जेनेरियो' येथे पार पडलेल्या संयुक्त राष्ट्रसंघाच्या (UNCED) संमेलनात पाणीबचतीचा संदेश देण्यासाठी 22 मार्च हा जागतिक जल दिन म्हणून पाळण्याचा निर्णय घेण्यात आला व 22 मार्च 1993 पासून संपूर्ण जगभर हा दिवस विविध उपक्रमांद्वारे साजरा करण्यात येतो. खरेतर आज निसर्गाचे असंतुलित पर्जन्यमान व जागतिक तापमानात होत असलेली कमालीची वाढ या पार्श्वभूमीवर या दिवसाचे महत्व अधिकच अधोरेखीत झाले आहे. पर्यावरणाची अनावश्यक व नको तितकी हानी आज आपल्या भारत देशात सर्वाधिक होत असल्यामुळे भविष्यात पाणीटंचाईचा सर्वाधिक फटका आपल्या देशाला भोगावा लागू शकतो हे गेल्या काही वर्षात देशातील विविध भागांतील पाणीटंचाईने सिद्ध केले आहे. पाण्याची बचत व नियोजन या बाबी आपण आजच गांभीर्याने घेतल्या नाही तर येत्या काळात त्याचे दूरगामी परिणाम आपल्या भावी पिढयांना भोगावे लागतील. पाणी हि गोष्ट निर्माण करण्याची ताकत आपल्...

स्वच्छतेची सवय नियमित असावी

Image
कोरोना विषाणूने भारतासह जगभरात हाहाकार माजवलेला आहे. या आजाराने जगात लाखो लोक बाधित असून हजारो लोक मृत्युमुखी पडले आहेत. सार्वजनिक वाहतूक सेवा तसेच अस्वच्छतेमध्ये या विषाणूचा प्रसार अधिक जोमाने होत असल्याने लोकल ट्रेन्स, बसेस, एअरपोर्ट यासारख्या सार्वजनिक वाहतुकीच्या साधनांची साफसफाई करण्यात येत आहे. यामुळे निश्चितपणे आजाराचा प्रसार रोखणे शक्य होणार आहे याबाबत दुमत नाही. मात्र स्वच्छतेची ही सवय चिरकाल व नियमितपणे लागणे गरजेचे आहे. आज कोरोनाचे संकट आले केवळ म्हणून जर आपण स्वच्छता राखत असू तर त्याला काही अर्थ नाही. प्रशासनाबरोबरच ह्या सार्वजनिक सेवा स्वच्छ राखण्याची जबाबदारी प्रवाशांचीदेखील तितकीच आहे. लोकांनी प्रवास करताना ट्रेन, बस अस्वच्छ करता कामा नये. खाद्यपदार्थांची वेष्टने, पाण्याच्या रिकाम्या बाटल्या परिसरात इतरत्र फेकू नये, सार्वजनिक ठिकाणांवर थुंकू नये ही खबरदारी घ्यायला हवी. स्वच्छतेची सवय घरापासून सार्वजनिक ठिकाणी वावरेपर्यंत कायम ठेवायला हवी. ज्या ठिकाणची जनता व प्रशासन स्वच्छतेच्या बाबतीत गंभीर व आग्रही असतात ती ठिकाणे नेहमीच स्वच्छ, नीटनेटकी व निरोगी असतात.  ...

राज्यातील २६ करोना रुग्ण बरे होऊन घरी, बाधित १०४ रुणांमध्ये कोणतेही लक्षण नाही, आज नवीन २८ रुग्ण, एकूण रुग्ण १८१

Image
एकात्मिक रोग सर्वेक्षण कार्यक्रम, महाराष्ट्र सार्वजनिक आरोग्य विभाग नवीन करोना विषाणू (कोविड -१९)  - सद्यःस्थिती आणि उपाय योजना  दिनांक २८ मार्च  २०२० प्रेस नोट राज्यातील २६ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी  बाधित आढळलेल्या १०४ रुणांमध्ये कोणतेही लक्षण नाही आज नवीन २८ रुग्णांची नोंद  राज्यातील एकूण रुग्ण संख्या १८१ आज राज्यात आणखी २८ कोविड १९ रुग्णांची नोंद झाली त्यामुळे राज्यातील एकूण करोना बाधित रुग्णांची संख्या १८१ झाली आहे. या नवीन रुग्णांमध्ये सर्वाधिक २२ रुग्ण मुंबईचे आहेत तर २ रुग्ण नागपूर येथील आहेत. इतर ४ रुग्ण पालघर - वसई विरार आणि नवी मुंबई परिसरातील आहेत.  सध्या बधित आढळलेल्या आणि रुग्णालयात भरती असलेल्या १०४ रुग्णांना करोना आजाराचे कोणतेही लक्षण नाही तर ५ जणांची प्रकृती गंभीर आहे.    राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे -  अ.क्र.  जिल्हा / मनपा बाधित रुग्ण मृत्यू १ मुंबई ७३ ४ २ सांगली २४ ० ३ पुणे मनपा १९ ० ४ पिंपरी चिंचवड मन...

घाबरू नका.. पण जागरूक राहा

Image
जगावर ओढवलेल्या भयानक अशा कोरोना विषाणूच्या संकटाने सामाजिक परिस्थिती दिवसेंदिवस बिकट बनत चालली आहे. देशामधील सर्वात जास्त रुग्ण महाराष्ट्रात आढळले असून प्रमुख शहरे सुतकी वातावरणात आहेत. वस्तुस्थितीची जाण करून देणारे व प्रतिबंधाचा मार्ग सुकर करून देणारी ही कविता.... घाबरू नका पण..जागरूक राहा जगभरात साथ आली, करोनाची सुरुवात झाली, चीनमध्ये पसरलेल्या, विषाणूची जात आली .. जग झाले चिंताग्रस्त, लाखो लोकांना लागण झाली, करोनाला दूर ठेवण्या, कसरत सर्वांची सुरू झाली ..  एका नंतर एक अन, त्यांच्यामुळेच अनेक, संसर्गाने बाधित झाले, आपल्यातलेच कित्येक .. चीन, इटली, इराक, अमेरिका अन, भारतामध्येही मृत्यू घुसला, करोनापासून बचाव करण्या, जो तो उपाय शोधू लागला .. कुणी म्हणते मास्क लावा, कुणी म्हणते सॅनिटायझर घ्या, जिकडे तिकडे फक्त अन फक्त, गो करोना गो करोना .. माणसाने पसरवलेला विषाणू, माणसालाच डसू लागलाय, देशानंतर देश अन, माणसांमध्येही घुसू लागलाय .. शहरे पडली ओस अन, व्यवसाय झाले हवालदिल, काय करावे सुचत नाही, व्यवहार झालेत सर्वच सील .. करोनाला भिऊ नका, मुकाबला करा जोमाने, क...

योग्य निर्णय

Image
कोरोनाच्या प्रदूर्भावाने सध्या गंभीर रूप धारण केलेले आहे. सध्या आपला देश कोरोनाच्या दुसऱ्या टप्प्यात असून सामाजिक अंतर राहण्याची दक्षता घेतली नाही तर सर्वसामान्य जनतेत झपाट्याने लागण होण्याच्या तिसऱ्या टप्प्यातील प्रवेश अटळ आहे. या विषाणूच्या प्रदूर्भावाची लागण होण्याचा सर्वाधिक धोका लहान मुलांमध्ये आहे कारण मोठया व्यक्तींच्या तुलनेत लहान मुले स्वच्छतेच्या बाबतीत आवश्यक काळजी घेत नाहीत. यामुळेच सरकारने सर्वप्रथम शाळा बंद करण्याचा घेतलेला निर्णय योग्यच आहे. परदेशामध्ये या आजाराची लागण व मृत्यूचे आकडे पाहिले तर त्याची दाहकता आपण वेळीच ओळखली पाहिजे. एकदा हा विषाणू समाजात पसरण्यास सुरुवात झाली तर त्याला रोखणे अवघड होऊन बसेल. महाराष्ट्रात 50 च्या वर लोकांना या आजाराची लागण झाली आहे तर त्यांच्या संपर्कात आलेल्या अनेकांचा शोध सुरू आहे. या पार्श्वभूमीवर मार्च एप्रिल महिन्यात होऊ घातलेल्या शालेय विद्यार्थ्यांच्या पाहिली ते आठवी पर्यंतच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय रास्तच आहे. यापूर्वी वर्षभरात झालेल्या तीन ते चार टर्म परीक्षांच्या आधारे मुलांना पुढच्या वर्गात प्रवेश देण्यास हरकत नाही. शे...