श्री राम जन्मोत्सव २०२६
महापे येथील राममंदिरात श्री राम जन्मोत्सव उत्साहात साजरा सालाबादप्रमाणे यंदाही श्री राम नवमी निमित्त नवी मुंबईतील महापे येथील श्री राम मंदिरात किर्तन, भजन, जन्मोत्सव व महाप्रसादाचे आयोजन श्रीराममंदिर चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने करण्यात आले होते. महापे येथील श्री रामांचे हे मंदिर अत्यंत जुने असून मागील ३४ वर्षांपासून येथे राम जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. स्वर्गीय श्री अमृत पाटील यांनी सन १९९२ साली सुरू केलेली परंपरा त्यांच्या चंद्रकांत, भगीरथ, प्रभाकर, भानुदास, देविदास ह्या त्यांच्या ५ मुलांनी आजही एकत्रितपणे त्याच उत्साहात सुरू ठेवली आहे. राम जन्मोत्सवानिमित्त दरवर्षी येथे पहाटेपासून दिवसभर विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. ग्रामस्थ व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने त्यात सहभागी झाले होते. गेल्या २६ वर्षांपासून गुरुवर्य हभप पांडुरंग महाराज भोईर (आळंदी-देवघर) यांचे हरिकीर्तन या ठिकाणी श्री राम नवमीच्या दिवशी आयोजित केले जाते. या वर्षीदेखील हभप पांडुरंग महाराजांचे श्री राम जन्मोत्सवावर सुश्राव्य कीर्तन झाले व त्यानंतर दुपारी १२ वाजता जन्मोत्सव...