Posts

Showing posts from February, 2024

बस प्रवाशांना मनस्ताप का?

Image
कोपरखैरणे येथून उरणला जाणारी ३१ नंबरची एनएमएमटी बस गेली १५ ते २० वर्षांपासून सुरू आहे. या बसने नियमित प्रवास करणाऱ्या व बसची वाट पाहणाऱ्यांची संख्याही मोठी आहे. एका बसला अपघात झाला व त्यामुळे स्थानिकांचा रोष पत्करावा लागला म्हणून इतकी वर्षे सुरू असणारी बस सेवा बंद करणे संयुक्तिक वाटत नाही. यामुळे या भागांतून नवी मुंबईत ये जा करणाऱ्या नोकरदारांचे व विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल होणार आहेत. खाजगी प्रवाशी वाहतूक सेवेला फायदा मिळण्यासाठी एनएमएमटीची ही सेवा बंद करण्यात आल्याची शंका घेण्यास नक्कीच वाव आहे. एका बसच्या ड्रायव्हरच्या निष्काळजीपणाचा परिणाम हजारो प्रवाशांना भोगावा लागणे कितपत योग्य आहे याचा विचार परिवहन विभाग व स्थानिकांनीही करायला हवा. नवी मुंबईच्या अनेक दाटीवाटीच्या, अरुंद, रहदारीच्या, बाजारपेठांच्या रस्त्यांवर परिवहन वाहतूक सुरू आहे. यात मोठ्या संख्येने धावणाऱ्या बसेस व इतर वाहनांचा त्रास पादचाऱ्यांना होतोच मात्र त्याचा त्रास वाहन चालवणाऱ्यानाही होत आहे. मात्र  परिवहन वाहतूक ही नवी मुंबईकरांच्या सोयीसाठी आहे, तिचा सोयीप्रमाणे वापर करू नये हीच अपेक्षा आहे.  वै...

घणसोलीतील वैभवशाली सोसायटीस २५ वर्षे पूर्ण

Image
नवी मुंबई - घणसोली नवीन वसाहत येथील सर्वात जुन्या वैभवशाली गृहनिर्माण सोसायटीमध्ये, सोसायटी स्थापनेस पंचवीस वर्षे पूर्ण झाल्याबद्दल रविवार दिनांक १८ फेब्रुवारी २०२४ रोजी सत्यनारायण महापूजा व विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. घणसोली सेक्टर १ येथील वैभवशाली को ऑप हौसिंग सोसायटी ही या नोडमधील सर्वात अगोदरची व जुनी सोसायटी समजली जाते. १९९९ साली स्थापन झालेल्या ह्या सोसायटीस तब्बल २५ वर्षे पूर्ण झाली आहेत. नवी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमधील कर्मचाऱ्यांसाठी उभारण्यात आलेल्या ह्या सोसायटीत एकूण ४८ कुटुंबे वास्तव्य करत आहेत. एकाच कार्यालयात काम करणाऱ्या ह्या सोसायटीतील सभासदांचे एकमेकांशी कौटुंबिक ऋणानुबंध असून अनेक उपक्रम सोसायटीत उत्साहात साजरे केले जातात. पंचवीसाव्या वर्षपूर्तीनिमित्त रविवारी सकाळी सत्यनारायण महापूजा संपन्न झाली तर सायंकाळी सभासद व लहान मुलांसाठी स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रम पार पडले. यावेळी सोसायटीतील मुलांनी आपले कलागुण सर्वांसमोर सादर केले. त्यानंतर ह्या स्पर्धांचा तसेच अयोध्या येथील श्री राम मंदि...

सूडाच्या भावनेने प्रेरित राजकारण

Image
राज्यातील अनेक लोकप्रतिनिधी हे गुन्हेगारी पार्श्वभूमीचे असून दहशतीच्या जोरावर निवडणुका लढवत असल्याचे दिसून येत आहे. राज्यात दररोज शेकडोंच्या संख्येत गुन्हेगारी घटना घडत असतात. त्यातील गुन्हेगारांना बळ देण्याचे वा त्यांना गुन्ह्यातून बाहेर काढण्याचे काम हेच लोकप्रतिनिधी करत असतात. यातील अनेक घटना तर उघडकीसदेखील येत नाहीत इतक्या सराईतपणे दडपल्या जातात. पोलिसांवरील दबाव वा सेटलमेंटदेखील यासाठी कारणीभूत ठरते. मात्र राजकीय पार्श्वभूमी असलेल्या नेत्यांवर होणारे हल्ले लपून राहत नाहीत. त्याचा राजकीय लाभ उचलण्याचा प्रयत्न विरोधकांकडून केला जातो. कुठलीही घटना घडली की त्याचा थेट संबंध राज्याच्या गृहमंत्री व मुख्यमंत्र्यांशी जोडला जातो. सध्याचे राजकीय वातावरण हे सुडाच्या भावनेने प्रेरित आहे. जे पक्ष सत्तेत आहेत तेच विरोधात आहेत. त्यामुळे कार्यकर्ते व मतदार प्रचंड संभ्रमात आहेत. अशावेळी वर्चस्वासाठी एकमेकांवर हल्ले करण्याच्या घटना आगामी काळात घडणार हे निश्चित आहे. पोलिसांची भूमिका यात निःपक्षपाती राहणे अत्यंत महत्वाचे आहे. गुन्हेगार कुठल्याही पक्ष वा संघटनेचा असो, त्याला नियमानुसार कडक ...

ऑनलाईन गेम्सच्या विळख्यात तरूणाई

Image
लोकांना ऑनलाइन व्यवहारांमधून गंडा घालणाऱ्या कंपन्या व महाभागांबरोबरच आता ऑनलाईन गेमिंगद्वारे लुबाडणूक करणाऱ्या काही कंपन्या अस्तित्वात आलेल्या आहेत. शाळा महाविद्यालयीन विद्यार्थ्यांबरोबरच व्यावसायिक व नोकरदारांमध्येही ऑनलाईन गेमिंगचे फॅड वाढत चाललेले आहे. यातूनच अनेकांचा वेळ व पैसा जुगारात खर्ची होत आहे. क्रिकेट, पत्ते यासारख्या गेम्सच्या आहारी आजची तरुणाई गेल्याचे चित्र आहे. सहजरित्या उपलब्ध होणार अँड्रॉइड फोन व इंटरनेट यामुळे शालेय मुलांच्या हातीदेखील अद्ययावत फोन आले आहेत. क्रिकेटमधील ऑनलाइन गेमिंगमुळे अनेक कुटुंबे उद्ध्वस्त झाली आहेत. त्याच्या जाहिराती करणाऱ्या अनेक अभिनेते व खेळाडूंवर टीका झाली. जनहित याचिकाही दाखल झाल्या. मात्र गेमिंग कंपन्या मोठमोठे वकील लावून यातून सुटका करून घेताना दिसतात. गेमिंग कंपन्यांच्या विवीध प्लॅटफॉर्मवर सध्या देशभरात 55 कोटींहून अधिक ग्राहक आहेत. ते दररोज 500 कोटींचा, वर्षाला 1.80 लाख कोटींचा सट्टा लावतात अशी धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. नोकरदारांकडून या गेमिंगवर संपूर्ण पगाराची यात उधळपट्टी होत आहे. बेरोजगार, महाविद्यालयीन विद्यार्थी क...

नवे वर्ष नवी मोहिम

Image
भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच ISRO ने गेल्या काही वर्षात अनेक मोहिमा यशस्वी करत अंतराळ संशोधन क्षेत्रात जागतिक ठसा उमटवलेला आहे. नुकतेच चांद्रयान 3 च्या यशस्वी लँडिंगनंतर, इस्रोने जगाचे लक्ष वेधून घेतले होते. चंद्र आणि सूर्यानंतर आता इस्रो अंतराळातील गूढ उकलणार आहे. अंतराळातील क्ष-किरण स्त्रोतांच्या तीव्र ध्रुवीकरणाची तपासणी करण्यासाठी इस्रो नवीन वर्षाची सुरुवात पहिल्या क्ष-किरण पोलारिमीटर उपग्रहाच्या प्रक्षेपणाने करणार आहे. १ जानेवारी २०२४ ला उपग्रह लॉन्च होईल. हे भारताचे पहिले समर्पित ध्रुवीय मिशन आहे. ही मोहीम इस्रोसाठी अत्यंत महत्त्वाची असून ती यशस्वी करण्यासाठी ISRO रात्रंदिवस काम करत आहे. या उपग्रहामध्ये दोन मुख्य पेलोड असतील, एक बेंगळुरूस्थित रमण संशोधन संस्थेने विकसित केला आहे आणि दुसरा इस्रोच्या यू ए राव सॅटेलाइट सेंटर, इस्रोने विकसित केला आहे. अंतराळ मोहिमांमध्ये एकापेक्षा एक सरस कामगिरी करणाऱ्या इस्रोची ही आणखी एक महत्वाकांक्षी मोहीम असून यामुळे भारत अवकाश संशोधन क्षेत्रात आणखी एक मैलाचा दगड पार करणार आहे.  वैभव मोहन पाटील  घणसोली, नवी मुंबई

सर्वच गड किल्ल्यांचे संवर्धन व्हावे

Image
युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत मान्यता मिळण्यासाठी भारत सरकारकडून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळातील महाराष्ट्रातील ११ किल्ल्यांचे नामांकन पाठवण्यात आलं आहे. यामध्ये शिवनेरी, लोहगड, रायगड, सुवर्णदुर्ग, पन्हाळा, विजयदुर्ग, सिंधुदुर्ग, साल्हेर, राजगड, खंडेरी, प्रतापगड या किल्ल्यांचा समावेश आहे. यामुळे निश्चितच या किल्ल्यांना जागतिक ओळख मिळणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी मिळवलेले खरे वैभव राज्यातील गड, दुर्ग, किल्ले हेच आहेत. राज्यात ३९० पेक्षा अधिक किल्ले आहेत. मात्र यातील अनेक गड-दुर्गांची अवस्था आज अत्यंत दयनीय आहे. दुर्गप्रेमी व गिर्यारोहक बऱ्याचदा आपल्या दैनंदिन कामातून वेळ काढून या किल्ल्यांची डागडुजी करताना दिसतात. गडावर चढण्यासाठी पायवाट तयार करणे, सुचनाफलक लावणे, साफसफाई करणे ही कामे सातत्याने व हिरीरीने त्यांच्यामार्फतच होताना दिसतात. मात्र महाराजांच्या नावाचा व प्रतिमेचा वापर करून वर्षानुवर्षे सत्ता उपभोगणाऱ्यांना मात्र महाराजांच्या गडांच्या दयनीय अवस्थेचा पुळका न यावा हि खरी शोकांतिका आहे. आज प्रत्येक शहरात, जिल्ह्यात महाराजांचे शेकडो पुतळे चौकाच...

४ फेब्रुवारी - जागतिक कर्करोग दिनाच्या निमित्ताने

Image
युवावर्गातील धुम्रपान चिंताजनक आज ४ फेब्रुवारी, जागतिक कर्करोग दिन. धुम्रपान हा सध्‍याचा अत्‍यंत गंभीर विषय असून महाविदयालयीन तरुणांमध्‍ये त्‍याचे वाढते प्रमाण चिंतेची बाब आहे. धुम्रपान हे मुख्‍यत्‍वे तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांशी निगडीत आहे. या पदार्थांचे सेवन करणारे लोक आपल्‍याला जागोजागी दिसून येतात. घर, कार्यालये तसेच सार्वजनिक ठिकाणी तंबाखू खाणारी व तंबाखूजन्‍य पदार्थांचे धुम्रपान करणा-या लोकांची संख्‍या दिवसेंदिवस वाढत आहे. या पदार्थांच्‍या विक्री व सेवनावर अनेक निर्बंध आणुनदेखील अनेक ठिकाणी त्‍यांची विक्री खुलेआम होताना दिसते. तंबाखू सेवनाने भारतात साधारणतः १० लक्ष लोक विविध आजारांनी मृत्‍यू पावत आहेत. महाराष्‍ट्रामध्‍ये साधारणतः ३६ टक्‍के पुरुष व ५ टक्‍के महिला तंबाखू व तंबाखुजन्‍य पदार्थांचा वापर करत असल्‍याचे सर्व्‍हेक्षणातुन स्‍पष्‍ट झाले आहे. तंबाखूमुळे ह़दयरोग, कर्करोग, यकृताचा आजार, फुफुसाचे आजार, टि.बी. यासारखे प्राणघातक आजार उदभवून बळी जाणा-यांची संख्‍या वाढत आहे. पक्षाघात, मोतीबिंदू, नपुसंकत्‍व, कमी वजनाचे – व्‍यंग असलेले – मृत्‍यु पावलेले बाळ ...