Posts

Showing posts from April, 2023

वाडा तालुक्यातील देवघर व गांधरे येथे भव्य बाल सुसंस्कार शिबिरांचे आयोजन

Image
के जी पाटील विद्यालय देवघर व कुणबी समाज मंदिर, गांधरे येथे बाल सुसंस्कार शिबिराचे आयोजन शालेय मुलांना नवे शैक्षणिक वर्ष सुरु होण्‍याअगोदर दरवर्षी दिड दोन महिने सुटटया मिळतात. या सुटटयांमध्‍ये बहुतांश मुलांना कुटुंबासह फिरायला जाणे, गावी जाणे किंवा मित्रांसोबत वेळ घालवणे आवडते. मात्र त्‍याशिवाय अनेक गोष्‍टी मुलांना या सुटटीमध्‍ये करता येण्‍यासारख्‍या आहेत. सध्‍याचे युग हे स्‍पर्धेचे युग आहे. नवनवे तंत्रज्ञान अवतरत असल्‍याने त्‍या गतीने मुलांनी स्‍वतःला गतीमान केलेच पाहिजे. यासाठी संगणकीय तंत्रज्ञानातील अदययावत बाबी आत्‍मसात करण्‍याकडे कल असायला हवा. संगणकातील बेसिक गोष्‍टी तसेच नवनवे सॉफटवेअर, एप्‍लीकेशन्‍स शिकायला हवेत जे शाळाबाहय आहे. शाळांमध्‍ये ज्‍या गोष्‍टी शिकवल्‍या जात नाहीत त्‍या गोष्‍टी शिकण्‍यासाठी या सुटटीचा वापर करता येईल. हे सर्व करत असताना मुलांनी आपल्‍या आवडीनुसार आपले छंददेखील जोपासायला हवेत. वाचन, लिखाण, गायन, नृत्‍य, मैदानी खेळ, विविध प्रकारच्‍या सुप्‍त कलांना सुटटीच्‍या काळात चालना दयायला हवी. आज गावोगावी अनेक संस्‍था, तज्ञ व्‍यक्‍तींकडून बाल संस्‍कार शिबि...

वाडा तालुक्यात मे महिन्यात देवघर व वाडा येथे भव्य बाल सुसंस्कार शिबिरांचे आयोजन

Image
के जी पाटील विद्यालय देवघर व कुणबी समाज मंदिर, गांधरे येथे बाल सुसंस्कार शिबिराचे आयोजन शालेय मुलांना नवे शैक्षणिक वर्ष सुरु होण्‍याअगोदर दरवर्षी दिड दोन महिने सुटटया मिळतात. या सुटटयांमध्‍ये बहुतांश मुलांना कुटुंबासह फिरायला जाणे, गावी जाणे किंवा मित्रांसोबत वेळ घालवणे आवडते. मात्र त्‍याशिवाय अनेक गोष्‍टी मुलांना या सुटटीमध्‍ये करता येण्‍यासारख्‍या आहेत. सध्‍याचे युग हे स्‍पर्धेचे युग आहे. नवनवे तंत्रज्ञान अवतरत असल्‍याने त्‍या गतीने मुलांनी स्‍वतःला गतीमान केलेच पाहिजे. यासाठी संगणकीय तंत्रज्ञानातील अदययावत बाबी आत्‍मसात करण्‍याकडे कल असायला हवा. संगणकातील बेसिक गोष्‍टी तसेच नवनवे सॉफटवेअर, एप्‍लीकेशन्‍स शिकायला हवेत जे शाळाबाहय आहे. शाळांमध्‍ये ज्‍या गोष्‍टी शिकवल्‍या जात नाहीत त्‍या गोष्‍टी शिकण्‍यासाठी या सुटटीचा वापर करता येईल. हे सर्व करत असताना मुलांनी आपल्‍या आवडीनुसार आपले छंददेखील जोपासायला हवेत. वाचन, लिखाण, गायन, नृत्‍य, मैदानी खेळ, विविध प्रकारच्‍या सुप्‍त कलांना सुटटीच्‍या काळात चालना दयायला हवी. आज गावोगावी अने...

आरोग्य विभागातील अधीक्षक श्री राजेश भंकाळ सेवानिवृत्त

Image
आरोग्य सेवा आयुक्तालयाच्या खरेदी कक्षात अधीक्षक या पदावर कार्यरत असलेले आमचे कार्यालयीन सहकारी व मित्र श्री राजेशजी भंकाळ हे नियत वयोमानानुसार ३१ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर २८ एप्रिल रोजी सेवानिवृत्त झाले. त्यानिमित्ताने त्यांचा दिमाखदार सेवानिवृत्ती समारंभ शुक्रवारी आरोग्य भवनात आयोजित करण्यात आला. कौटुंबिक, मित्रमंडळी व कार्यालयीन अधिकारी सहकाऱ्यांच्या गोतावळ्यात पार पडलेला हा समारंभ जितका खेळीमेळीच्या वातावरणात पार पडला तितकाच भावनिक देखील झाला. कर्मचाऱ्यांच्या उत्स्फूर्त सहभागातून आयोजित केलेला व मी पाहिलेल्या आजवरच्या सेवानिवृत्ती कार्यक्रमांपैकी एक सर्वोत्कृष्ट असा हा सोहळा होता. वडिलांच्या सेवानिवृत्तीवेळी मुलाची उपस्थिती सामान्य आहे पण मुलाच्या सेवानिवृत्तीप्रसंगी त्यांचे वडील श्री अनंत भंकाळ हे स्वतः उपस्थित राहून मुलाबद्दल अभिमानास्पद भाषण करण्याचे चित्र मी पहिल्यांदाच पाहिले. त्याचप्रमाणे अनेक कर्मचारी व मित्र श्री भंकाळ यांच्या सौहार्दपूर्ण, मदतीच्या, मैत्रीला जागणाऱ्या व दिलदार वृत्तीबद्दल भावनिक होत व्यक्त झाले. त्यांनी अनेकांचे संसार, घरे, मुलां...

आठवण बाबांची

Image
प्रिय बाबा,  वयाच्या ९६व्या वर्षी तुम्ही आम्हाला सोडून गेलात. मात्र तुमच्या आठवणी कायमच्या आमच्या मनात घर करून आहेत. बालपणातील सर्वात जास्त काळ मी तुमच्या सोबत राहिलो. ८०च्या दशकात गावात थाटलेल्या किराणा दुकानाच्या जोरावर तुम्ही भल्यामोठया कुटुंबाचा गाडा हाकलात आणि मोठ्या कष्टाने शेतीही कसलीत. ४ मुली आणि २ मुले असा कुटुंब कबिला असणारे तुम्ही कमालीचे करारी जीवन जगलात. मुलांना पायावर उभे राहण्याइतके चांगले शिक्षण तर दिलेच मात्र आम्हा नातवंडांवरदेखील निर्मळ व निरपेक्ष प्रेम केलेत. हिशोबाला अगदी काटेकोर असणारे तुम्ही आम्हा नातवंडांसाठी अत्यंत प्रेमळ व दिलदार व्यक्तिमत्व होतात. दिवाळीला फटाक्यांपासून शाळेची वह्यापुस्तके खरेदी करून देण्यामध्ये तुम्ही कधीही काटकसर केली नाही. कॉलेजला जाण्यासाठी मला भिवंडीवरून तुम्ही विकत आणलेली सायकल अजूनही माझ्या डोळ्यासमोरून जात नाही. मात्र प्रत्येक गोष्टीचा हिशोब ठेवुन तुम्ही तुमचा व्यवहारीपणा कायम जपलात. व्यवहारीपणासोबत तुम्ही संपूर्ण कुटुंबाला संस्कारदेखील दिले. त्यामुळे मन कधीही चुकीच्या गोष्टींकडे भरकटले नाही. तुम...

लोकलच्या सामान्य डब्यांमध्येही हवे महिलांना सिटचे आरक्षण

Image
परवा सकाळी नेहमीप्रमाणे वाशीवरून सीएसटी लोकल पकडली. रोजच्याप्रमाणे पनवेलवरून आलेली ती लोकल प्रवाशांनी खचाखच भरलेली होती. त्यात एका लहानग्या मुलाला घेऊन एक जोडपे गाडीत चढले. दरवाजातून आत शिरायलाही जागा नाही अशा परिस्थितीत त्या महिलेचे व मुलाचे प्रचंड हाल झाले. आत सीटपर्यंत पोहोचल्यावर संवेदनशील प्रवाशांनी त्यांना बसायला जागा दिली हा भाग वेगळा. मात्र सर्वसामान्य डब्यांमध्ये महिलांचे होणारे हाल काही नवीन नाहीत. त्यात सामान्य वर्गामध्ये आरक्षित सीट नसल्याने अनेकदा महिलांना उभे राहूनच प्रवास करावा लागतो. महिला प्रवाशांच्या वाढत्या संख्येमुळे महिला आरक्षित डबे आधीच कमी पडायला लागलेत. त्यामुळे अनेक महिला सामान्य डब्यांमध्ये प्रवास करताना दिसतात. त्यात कुटुंबासह प्रवास करणाऱ्या महिलांची संख्याही लक्षणीय आहे. त्यामुळे लोकल रेल्वे डब्यांमध्ये जेष्ठ नागरिकांच्या धर्तीवर काही जागा महिलांसाठी आरक्षित ठेवायला हव्यात जेणेकरून काही अपरिहार्य कारणास्तव सर्वसामान्य डब्यांमधून प्रवास करणाऱ्या महिलांची कुचंबणा होणार नाही. ज्यावेळी महिला प्रवाशी ह्या डब्यांमध्ये चढतील त्या वेळी पुरुष प्रवाशी त्...

२५ एप्रिल - जागतिक हिवताप दिन

Image
२५ एप्रिल - जागतिक हिवताप दिन   आज २५ एप्रिल २०२३. २५ एप्रिल हा दिवस सर्वत्र जागतिक हिवताप दिन म्हणून साजरा केला जातो. डासांच्या उपद्रवामुळे निर्माण होणारा हिवताप हा आपल्‍याला ज्ञात असलेला खूप जूना आजार आहे. हा रोग मानवी वसाहतींच्‍या काळाइतका पुरातन आहे. हिवताप हा मानवास फार पुर्वीपासून माहिती असलेल्‍या रोगांपैकी एक रोग आहे. मानवाची आणि हिवतापाची उत्‍क्रांती एकाच वेळी झाली असावी. ज्‍यामुळे लाखो वर्षापासून मानवाला या आजाराची माहिती आहे. मोठया प्रमाणात आर्थिक आणि जीवितहानी करणारा हा आजार असल्‍याने सार्वजनिक आरोग्‍याच्‍या दृष्‍टीने ही एक गंभीर समस्‍या आहे. देशाच्‍या स्‍वातंत्र्याच्‍या वेळी देशात हिवतापाचे वार्षिक प्रमाण सुमारे ७.५ कोटी रुग्‍ण व ८ लाख मृत्‍यू एवढे होते. प्‍लाझामोडीयम प्रजातीच्‍या एकपेशीय सूक्ष्‍म परजीवी जंतूंचा संसर्ग झाल्‍याने हिवताप होतो आणि त्‍याचा प्रसार काही वि‍शिष्‍ट जातीच्‍या अॅनाफीलिस मादीमुळे होतो. भारतात आढळणा-या अॅनाफीलिसच्‍या सुमारे ५८ जातीपैकी केवळ काही हिवतापाच्‍या प्रमुख प्रसारक समजल्‍या जातात. ग्रामीण भागात अॅनॉफीलिस क्‍युलेसिफेस...

आधार बेस्ड मतदान हवे

Image
आधार कार्डला पॅन कार्ड लिंक करण्याविषयी सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. नागरिकांना लवकरात लवकर ही प्रक्रिया पूर्ण करून घेण्यासाठी वारंवार सूचना देण्यात येत आहेत. या प्रक्रियेमुळे आर्थिक व्यवहारांना आधारच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सुरू असलेले योग्यच आहेत मात्र त्याची उपयुक्तता लोकांपर्यंत पोहोचू शकलेली नसल्याने त्याबाबत प्रचंड संभ्रमावस्था आहे. खरेतर पॅन कार्ड आधारशी जोडण्यापूर्वी मतदान कार्ड आधारशी जोडून संपूर्ण मतदानाची प्रक्रियाच आधार बेस करण्याची गरज आहे. आगामी काळात राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांबरोबरच लोकसभा, विधानसभा निवडणुका होत आहेत. आपल्याकडे पारंपरिक पद्धतीच्या मतपत्रिकांद्वारे होणाऱ्या मतदानप्रक्रियेत काळानुरूप बदल घडून आला आणि आता मतपत्रिकांची जागा ईव्हीएम मशीन सारख्या अद्ययावत यंत्रांनी घेतली असून केवळ एक बटन दाबून आपले मत नोंदवता येते. यामुळे मतदानप्रक्रियेतील वेळ व खर्च वाचला असे म्हटले जात असले तरी या ईव्हीएम मशिन्सवर मध्यंतरी अनेक शंका उपस्थित करण्यात आल्यामुळे बराच गदारोळ झाला होता. त्यांनतर पुन्हा जुन्याच मतपत्रिकेद्वारे मतदान होण्याची मागणी जोर धरू लाग...

उष्णतेचा अंदाज न आल्याने दुर्घटना

Image
रविवारचा दिवस असल्याने १६ एप्रिल रोजी मीदेखील सकाळी दहाच्या सुमारास खारघर येथे होत असलेल्या 'महाराष्ट्र भूषण' पुरस्कार सोहळ्यासाठी जाण्यास निघालो होतो. परमपूज्य अप्पासाहेब धर्माधिकारी यांना हा पुरस्कार मिळणार असल्याने ह्या भव्यदिव्य सोहळ्याची उत्सुकता लाखो श्री सदस्यांसारखी मलाही होती. त्यामुळे घरापासून फारसे अंतर नसलेल्या सोहळ्यास्थळी जाऊ म्हणून घराबाहेर पडलो. मात्र त्या दिवशी उन्हाच्या झळा पाहून पुन्हा माघारी फिरलो. तळपता सूर्य त्या दिवशी अक्षरशः आग ओकत होता व त्या काहिलीने कुठे बाहेर जाण्याची इच्छा उरली नाही. त्यानंतर टीव्हीवरच हा संपूर्ण दिमाखदार सोहळा पाहिला. यात व्यासपीठावरील जवळपास सर्वच मान्यवरांनी प्रचंड संख्येने जमलेल्या जनसमुदायाचा उल्लेख केला. भरगच्च मैदान, मैदानाबाहेरील रस्ता व रस्त्याच्या पुढील मैदानदेखील गर्दीने भरल्याचे आवर्जून नमूद केले. मैदानावरील गर्दीचे नियोजन व इतर व्यवस्था अगदी चोखरीत्या केली गेली होती. मात्र डोक्यावरील ऊन असह्य होत होते. रखरखत्या उन्हात पुरस्कार सोहळा पार पडला, मात्र त्यानंतर अनेक श्री सदस्यांना उष्माघाताचा त्रास ह...

शिधापत्रिकांचा लाभ खऱ्या लाभार्थ्यांना मिळावा

Image
राज्यातील शिधापत्रिका ऑनलाईन प्रणालीत आणण्यासाठी सरकारने प्रयत्न सुरू केले आहेत. यासाठी शिधापत्रिका धारकांना आपली शिधापत्रिका आधार कार्डशी लिंक करावी लागणार आहे. दुबार, रद्द झालेल्या व मयत व्यक्तींचा समावेश असलेल्या शिधापत्रिका यामुळे कालबाह्य होणार आहेत. गरज असलेल्या लाभार्थ्यांनाच यामुळे लाभ मिळणार असल्याने सरकारची ही कल्पना स्तुत्यच आहे. सध्या साठ हजारांच्या वर मिळकत असलेल्या लोकांना पांढरी, साठ हजारांच्या खाली उत्पन्न असलेल्यांना केशरी तर विनाधार लोकांना पिवळी शिधापत्रिका दिली जाते. पांढऱ्या शिधापत्रिकाधारकांना कुठलाही लाभ मिळत नाही, केशरी पत्रिकाधारकांना दोन रुपयांत तांदूळ व तीन रुपयांत गहू मिळतात आणि पिवळ्या रेशन कार्डधारकांना या सर्व सुविधा मोफत मिळतात. वास्तविक मिळकतीनुसार सर्व्हे केला तर यातील बहुतांश शिधापत्रिका बाद कराव्या लागतील. त्यामुळे खरेतर सध्या महागाई व कौटुंबिक मिळकत वाढत असल्याने रेशन कार्डसाठी उत्पन्नाची ही मर्यादा आता वाढवण्याची गरज आहे. तसेच गावाकडे व शहरात दोन्ही ठिकाणी शिधापत्रिकांवरील लाभ मिळवणाऱ्या रेशन कार्डधारकांची संख्याही मोठी आहे. शिधापत्रिका...

नियमित व तातडीने कारवाई करणारी यंत्रणा हवी

Image
मुंबई आणि उपनगरांमध्ये प्रभाग रचना अस्तित्वात आहे. प्रत्येक प्रभागात वॉर्ड अधिकारी व विविध प्रशासकीय विभागांमध्ये मोठ्या प्रमाणावर कर्मचारी वर्ग अस्तित्वात आहे. एका प्रभागाची क्षमता मर्यादित रहिवाशी संकुले, दोनेक तासांत सहज फेरफटका मारून पूर्ण होईल इतका परिसर व काही हजार नागरिकांची असते. त्यामुळे प्रत्येक प्रभागावर लक्ष ठेवणे त्या प्रभाग अधिकाऱ्याची व त्याखालील कर्मचाऱ्यांची जबाबदारी असते. प्रभागामध्ये एखादा कार्यक्रम किंवा अप्रिय घटना घडली तर त्याची खबर तातडीने प्रभाग कार्यालयास लागते. अनेकदा विनापरवाना जाहीर कार्यक्रम किंवा व्यवसाय करणाऱ्या ठिकाणी ही यंत्रणा लगोलग पोहोचून त्यावर कारवाई करण्याची तत्परता दाखवते. मात्र अनधिकृतपणे, निकृष्ट दर्जाचे मटेरियल वापरून धोकादायक पद्धतीने उभ्या राहत असलेल्या इमारतींकडे अर्थपूर्ण डोळेझाक केली जाते. त्यामुळे सर्वत्र जागोजागी ही अनधिकृत बांधकामे रातोरात उभारली जातात व गरजूंना विकलीही जातात. त्यांना लाईट, पाणी, कर, दूरध्वनी सेवाही पुरविली जाते. मात्र या अनधिकृत रहिवाशी बांधकामांमुळे स्थानिक स्वराज्य संस्थांवरील पायाभूत सुविधांचा बोजा वाढत...

कोरोना अजून संपलेला नाही

Image
महाराष्ट्रातून नाहीसा होत चाललेला कोरोना पुन्हा एकदा शिरकाव करू लागला आहे. रोज शेकडोंच्या संख्येने कोरोना रुग्ण राज्याच्या विविध भागांमध्ये आढळत आहेत. सध्या तब्बल सात हजारांच्या वर रुग्ण विविध रुग्णालयांमध्ये उपचार घेत आहेत. यावरून कोरोना अजून संपलेला नाही हे लक्षात घेतले पाहिजे. कोरोनामुळे मृत्यूचे प्रमाण कमी असले तरी योग्य काळजी व वेळेत उपचार घेतले नाहीत तर तो जीवावर बेतू शकतो. गेल्या तीन वर्षांत राज्यामध्ये कोरोनाने जवळपास दीड लाख रुग्णांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. कोरोनाचे नवनवे येणारे प्रकार पाहता परदेशातून येणाऱ्या प्रवाशांची तपासणी करण्याची मोहीम आरोग्य विभागाने हाती घेतली आहे. अधिक रुग्णसंख्या असलेल्या भागांत सर्वेक्षण मोहिमाही सुरू झालेल्या आहेत. त्यामुळे कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटच्या पार्श्वभूमीवर आवश्यक दक्षता घेतलीच पाहिजे. व्यक्तिगत स्वच्छता व सार्वजनिक ठिकाणी मास्क वापरणे सर्वांच्या हिताचे आहे. त्यासाठी सक्ती करावी लागू नये. संसर्ग पसरू न देण्यासाठी योग्य काळजी व लक्षणे दिसल्यास त्वरित चाचणी व उपचार घेतले पाहिजेत. गेल्या वर्षभरापासून कोरोना नाहीसा झाल्याचे च...

भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना १३२व्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन

Image
भारतरत्‍न डॉ. बाबासाहेब आंबेडकर डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे आपल्‍या देशाला लाभलेले असामान्‍य व्‍यक्तिमत्‍व. भारतीय राज्‍यघटना ज्‍यांनी आपल्‍या कुशाग्र बुध्‍दीमत्‍तेच्‍या जोरावर लिहीली व जीचे आजदेखील आपण विनयशिलतेने पालन करतो त्‍या राज्य घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म वडील रामजी व माता भीमाबाई यांच्या पोटी १४ एप्रिल १८९१ रोजी झाला. आपल्‍या देशात अनेक थोर पुरुषांनी जन्‍म घेतला. देशाला स्‍वातंत्र्य मिळवून देण्‍यापासुन सामाजिक कार्यात स्‍वतःला वाहून घेतलेल्‍या अनेक महापुरुषांची नावे घेता येतील. डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे आपल्‍या देशाला लाभलेले एक रत्‍नच. डॉ. बाबासाहेब उर्फ भीमराव यांचे वडील रामजी आपल्या मुलांवर चांगले संस्कार व्हावेत म्हणून दक्ष असत, त्‍यांना चांगली पुस्तके वाचावयास आणून देत. त्‍यामुळेच बाबासाहेबांच्या आयुष्याच्या अंतिम क्षणापावेतो वाचनाची व अभ्यासपूर्ण चिंतनाची सवय त्याच्या ठायी आढळते. डॉ. बाबासाहेब म्हणजे अष्टपैलू व्यक्तीमत्व होते. त्यांना प्रत्येक क्षेत्राचे परिपूर्ण ज्ञान व माहिती होती. सामाजिक, राजकीय, आर्थिक, शैक्षणिक धार्मिक, पत्रकारिता, कायद...

सर्वच ठिकाणी भेसळयुक्त पदार्थ

Image
भेसळयुक्‍त पदार्थांच्‍या गुणवत्‍तेचा मुददा अत्‍यंत संवेदनशीलन असुन लोकांच्‍या आरोग्‍याशी निगडीत आहे. आज गल्‍लोगल्‍ली किराणा व तत्‍सम पदार्थांच्‍या दुकानांमध्‍ये लटकवण्‍यात आलेली प्‍लॅस्‍टीकची खाऊची चमचमीत पाकिटे ब्रॅंडेड पाकीटांपेक्षा स्‍वस्‍तात उपलब्‍ध होतात. त्‍याचा दर्जा सुमार असुन लोकांच्‍या प्रामुख्‍याने लहान मुलांच्‍या तब्‍येतीशी खेळणारा आहे. दुधाच्‍या पिशव्‍यांची पाकीटेही निरनिराळया कंपन्‍यांची निरनिराळया किंमतींना मिळतात. त्‍यांच्‍या गुणवत्‍तेबददलही शंका निर्माण होते. अगदी जिवनावश्‍यक वस्‍तुंपासुन ते खादयपदार्थांपर्यंत सर्वच बाबतीत सर्रास आढळुन येणारी ही भेसळ लोकांच्‍या जीवनमानाशी खेळणारी असुन एफडीएने याला वेळीच आवर घातला नाही तर भविष्‍यात त्‍याचे उग्र परिणाम भावी पिढीला भोगावे लागतील एव्‍हढे नक्‍की.  वैभव मोहन पाटील  घणसोली, नवी मुंबई

डीएड ऐवजी बीएड नवी शिक्षणपद्धती

Image
राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार आता शिक्षक होण्यासाठी बीएड करणे बंधनकारक असणार आहे. त्‍यामुळे डीएड आता कायमचे बंद होणार आहे. सध्याच्या शैक्षणिक पद्धतीनुसार जिल्हा परिषदेच्या शाळेत प्राथमिक विभागाचे शिक्षक होण्यासाठी बारावीनंतर दोन वर्षाचे डीएड करावे लागते. तर माध्यमिक-उच्च माध्यमिक शाळांवरील शिक्षकांसाठी ‘बीएड’ बंधनकारक आहे. बारावीनंतर चार वर्षांच्या पदवी अभ्यासक्रमात शिक्षणशास्त्र विषय घेऊन विद्यार्थ्यांना 'बीएड'च करावे लागणार आहे. विद्यार्थ्यांना चार वर्षांचा पदवी अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर शेवटच्या सेमिस्टरला ज्या क्षेत्रात आवड आहे, त्यास त्यासंबंधीची सहा महिने ॲप्रेटायशेन, इंटर्नशिप करावी लागेल. त्यानंतर विद्यार्थी नोकरी करण्यासाठी पूर्णपणे तयार होतील. बारावीनंतर नव्याने पदवीला प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांनाच राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचा पॅटर्न लागू असणार आहे. सध्या शिकत असलेल्यांना हा पॅटर्न लागू असणार नाही. नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार पदवीचा अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी सात वर्षांचा काळ विद्यार्थ्यांना देण्यात आला आहे. कोणत्या विषयाचे शिक्षक व्हायचे यानुसा...

भटक्या कुत्र्यांना आवरा

Image
खारघरमध्ये भटक्या कुत्र्याने तब्बल २० जणांना चावा घेतल्याची घटना नुकतीच उघडकीस आली आहे. मागील आठवड्यात एका १२ वर्षाच्या मुलीला चावा घेतल्यानंतर सोसायटी रहिवाश्यांनी खारघर पोलीस स्थानकात तक्रार दिली. यानंतर पालिका या कुत्र्यावर उपचार करून त्याला पुन्हा याच परिसरात सोडून देणार आहे. वास्तविक मुंबई व उपनगरांमध्ये ह्या भटक्या कुत्र्यांचा उपद्रव मोठ्या प्रमाणावर वाढलेला आहे. मात्र त्यावर उपाययोजना करण्यासाठी कुठलीही पालिका यशस्वी ठरत नसल्याने भटक्या कुत्र्यांचा त्रास नागरिकांच्या जीवावर उठत आहे. दिवसेंदिवस मोकाट कुत्र्यांची संख्या वाढत चालल्याने पालिकांच्या निर्बीजीकरण प्रक्रियेवरच शंका उपस्थित होत आहे. मुंबई पालिका हद्दीमध्ये तर ह्या भटक्या कुत्र्यांची नेमकी संख्या किती याची माहितीच उपलब्ध नसल्याने आता ती मोजण्यासाठी ह्युमन सोसायटी इंटरनॅशनल या संस्थेकडून हे काम करून घेण्यात येणार आहे. एकीकडे नुकत्याच एका प्रकरणात न्यायालयाने अशा कुत्र्यांकडे संवेदनशीलतेने पाहा असा निर्वाळा दिला आहे तर दुसरीकडे ह्या भटक्या कुत्र्यांचा सामाजिक उपद्रव सुरूच आहे. त्यामुळे भट...

जागतिक आरोग्‍य दिन विशेष - स्वच्छतेतुन आरोग्याकडे

Image
जागतिक आरोग्‍य दिन विशेष सर्वांसाठी समान आरोग्य सुविधा, सर्वांसाठी आरोग्य ! ``स्वच्छतेतून आरोग्‍याकडे'' दरवर्षी ७ एप्रिल हा दिवस जागतिक आरोग्य दिन म्हणून साजरा केला जातो. दरवर्षी जागतिक आरोग्‍य संघटनेमार्फत एक घोषवाक्‍य निवडण्‍यात येते ज्‍याचा प्रचार व प्रसार जागतिक स्‍तरावर सर्वत्र करण्‍यात येतो. यंदाच्या आरोग्य दिनाचे घोषवाक्य “सर्वांसाठी समान आरोग्य सुविधा, सर्वांसाठी आरोग्य!” हे आहे. जवळजवळ ना‍हीशी होत चाललेली कोविड साथ पुन्‍हा एकदा डोके वर काढत आहे. आज राज्‍यात जवळपास ४ हजार कोविड आजाराचे रुग्‍ण राज्‍यातील विविध रुग्‍णालयांत उपचार घेत आहेत. असे असले तरी त्‍याचे फार गंभीर परिणाम सध्‍याच्‍या लाटेत दिसुन येत नसल्‍याने फार काळजी करण्‍याचे कारण नाही. मात्र संसर्ग पसरु न देण्‍यासाठी आवश्‍यक दक्षता घेतलीच पाहीजे. व्‍यक्‍तीगत स्‍वच्‍छता, मास्‍क, सामाजिक अंतर हया नियमांचे पालन करणे वाढत्‍या प्रादुर्भावाच्‍या पार्श्‍वभुमीवर अत्‍यंत आवश्‍यक आहे. कोविडच्‍या याच धास्‍तीच्‍या पार्श्‍वभुमीवर आज जागतिक आरोग्‍य दिन जगभर साजरा होत आहे. या दिवशी स्थापन झालेल्या जाग‍ति...

सुंदर माझा दवाखाना

Image
जागतिक आरोग्य दिनानिमित्त ‘सुंदर माझा दवाखाना’ स्वच्छता मोहीम  सरकारी आरोग्य संस्था स्वच्छतेच्या बाबतीत दिवसेंदिवस कात टाकताना दिसत आहेत. खाजगी रुग्णालयांच्या तुलनेत नेहमीच सरकारी दवाखान्यांना दुय्यम स्थान दिले जाते. याचे मूळ कारण आहे शासकीय दवाखान्यांमध्ये आढळून येणारी अस्वच्छता, डॉक्टर, कर्मचाऱ्यांची उपलब्धता व रुग्णांना मिळणाऱ्या सुविधा. मात्र गेल्या काही वर्षांपासून हे दवाखाने या सर्वच बाबतीत स्वयंपूर्ण होताना दिसत आहेत. शासकीय आरोग्य संस्थांमध्ये स्वच्छतेवर भर दिला जात असून रुग्णांना स्वच्छ वातावरणात उपचार मिळावेत यासाठी आरोग्य यंत्रणा आग्रही आहेत. याचाच भाग म्हणून सरकारी आरोग्य केंद्रांमध्ये कर्मचाऱ्यांच्या सहयोगातून नियमित पणे स्वच्छता मोहिमा राबविल्या जात आहेत. दरवर्षी ७ एप्रिल हा दिवस जागतिक आरोग्य दिन म्हणून साजरा केला जातो. दरवर्षी या दिवसानिमित्त एक घोषवाक्य निश्चित केले जाते. यंदाच्या आरोग्य दिनाचे घोषवाक्य “सर्वांसाठी समान आरोग्य सुविधा, सर्वांसाठी आरोग्य!” ही आहे. राज्याच्या आरोग्य मंत्री महोदयांच्या संकल्पनेतून  सार्वजनिक आरोग्य विभागाने...